Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    संस्कार… माणुसकी आणि सहिष्णुतेचे!

    March 24, 2026

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Dnyaneshwari : जैसें चंद्राआड आभाळ, सदट दाटे सजळ…
    अध्यात्म

    Dnyaneshwari : जैसें चंद्राआड आभाळ, सदट दाटे सजळ…

    Team AvaantarBy Team AvaantarJanuary 28, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter ten, दहावा अध्याय, अध्याय दहावा,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    अध्याय आठवा

    धूमो रात्रिस्तथा कृष्णः षण्मासा दक्षिणायनम् । तत्र चान्द्रमसं ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते ॥25॥

    तरि प्रयाणाचेनि अवसरें । वातुश्लेष्मु सुभरे। तेणें अंतःकरणीं आंधारें । कोंदलें ठाके ॥226॥ सर्वेंद्रियां लांकुड पडे । स्मृति भ्रमामाजीं बुडे । मन होय वेडें । कोंडे प्राण ॥227॥ अग्नीचें अग्निपण जाये । मग तो धूमचि अवघा होये । तेणें चेतना गिंवसिली ठाये । शरीरींची ॥228॥ जैसें चंद्राआड आभाळ । सदट दाटे सजळ । मग गडद ना उजाळ । ऐसें झांवळें होये ॥229॥ कां मरे ना सावध । ऐसें जीवितासि पडे स्तब्ध । आयुष्य मरणाची मर्याद । वेळु ठाकी ॥230॥ ऐसी मनबुद्धिकरणीं । सभोंवतीं धूमाकुळाची कोंडणी । जेथ जन्में जोडलिये वाहणी । युगचि बुडे ॥231॥ हां गा हातींचें जे वेळीं जाये । ते वेळीं आणिका लाभाची गोठी कें आहे । म्हणऊनि प्रयाणीं तंव होये । येतुली दशा ॥232॥ आणि देहाआंतु ऐसी स्थिति । बाहेरी कृष्णपक्षु वरि राति । आणि सामासही ते वोडवती । दक्षिणायन ॥233॥ इये पुनरावृतीचीं घराणीं । आघवीं एकवटती जयाचिया प्रयाणीं । तो स्वरूपसिद्धीची काहाणी । कैसेनि आइके ॥234॥ ऐसा जयाचा देह पडे । तया योगी म्हणोनि चंद्रवरी जाणें घडे । मग तेथूनि मागुता बहुडे । संसारा ये ॥235॥ आम्हीं अकाळु जो पांडवा । म्हणितला तो हा जाणावा । आणि हाचि धूम्रमार्गु गांवा । पुनरावृत्तीचिया ॥236॥ येर तो अर्चिरा मार्गु । तो वसता आणि असलगु । साविया स्वस्त चांगु । निवृत्तीवरी ॥237॥

    हेही वाचा – Dnyaneshwari : ऐसा वरिपडिलां प्रयाणकाळीं, बुद्धीतें भ्रमु न गिळीं…

    अर्थ

    (आत) धूर (धूमयुक्त अग्नि), त्याचप्रमाणे (बाहेर) रात्र, कृष्णपक्ष आणि दक्षिणायनाचे सहा महिने, या स्थितीत (ज्याचे देहावसान होते तो) योगी चंद्रलोकापर्यंत जाऊन परत येतो. ॥25॥

    तरी मरणाचे वेळी वात आणि कफ (शरीरामधे फार दाटतो, त्यामुळे अंत:करणात अंधार गच्च भरून राहतो. ॥226॥ सर्व इंद्रिये लाकडासारखी जड होतात, स्मरणशक्ती भ्रमात बुडते, मन वेडे होते आणि प्राण कोंडतो. ॥227॥ अग्नीची उष्णता जाते, मग सर्व धूरच होतो, त्या धुराने चेतना शरीरात कोंडून राहते. ॥228॥ ज्याप्रमाणे पाण्याने गच्च भरलेले ढग चंद्राच्या आड दाट यावेत, मग त्यावेळी गडद अंधकारही नाही आणि स्वच्छ उजेडही नाही, असा झुंजूमुंजू उजेड असतो. ॥229॥ याप्रमाणे तो धड मेलेला नसतो आणि शुद्धीवरही नसतो, अशी जीवितास स्तब्धता येते. आयुष्य मरणाच्या वेळेची वाट पाहात राहते. ॥230॥ याप्रमाणे मन, बुद्धी आणि इंद्रिये यांच्या सभोवती अशी ही धुराच्या समुदायाची वाटणी होते, तेव्हा जन्मभर संपादन केलेला स्वरूपअभ्यासाचा मार्ग संपूर्ण नष्ट होतो. ॥231॥ बाबा अर्जुना, जन्मभर केलेला हातचा अभ्यास जेव्हा जातो, त्यावेळी आणखी प्राप्तीची गोष्ट कशाला मनात आणायला पाहिजे? म्हणून मरणकाळी तर अशी अवस्था होते. ॥232॥ अशी ही देहाच्या आत स्थिती होऊन, बाहेर वद्य पंधरवडा, शिवाय रात्र आणि दक्षिणायनातील सहा महिनेही येतात. ॥233॥ ही वारंवार फेर्‍यात आणणारी ठिकाणे, ज्याच्या मरणाच्या वेळेला सर्वच एकत्र जुळून येतात, तो ब्रह्मप्राप्तीची गोष्ट कशी ऐकेल? ॥234॥ अशा रीतीने ज्याचा देह पडतो, तो योगी असल्याकारणाने त्याचे चंद्रलोकापर्यंत जाणे घडते. नंतर तेथून तो माघारा फिरून पुन: मृत्यूलोकात जन्मास येतो. ॥235॥ अर्जुना, आम्ही अकाळ म्हणून जो म्हटला, तो हाच, असे समज आणि हाच पुनर्जन्मरूप गावास येण्याचा धूम्रमार्ग आहे. ॥236॥ दुसरा जो अर्चिरादि मार्ग, तो वाहता आणि सुगम आहे तसेच, तो सहज कल्याणकारक असून मोक्षाची प्राप्ती करून देण्यास चांगला आहे. ॥237॥

    क्रमश:

    हेही वाचा – Dnyaneshwari : आंत अग्निज्योतींचा प्रकाशु, बाहेरी शुक्लपक्षु परी दिवसु…

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : आरंभीं बीज एकलें, मग तेंचि विरूढलिया बुड जाहलें…

    March 23, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : अगा प्रकाश आणि कडवसें, सूर्याचिस्तव जैसें…

    March 22, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    By Team AvaantarMarch 24, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा एतां विभूतिं योगं च मम यो वेत्ति तत्त्वतः । सोऽविकम्पेन योगेन…

    Dnyaneshwari : आरंभीं बीज एकलें, मग तेंचि विरूढलिया बुड जाहलें…

    March 23, 2026

    Dnyaneshwari : अगा प्रकाश आणि कडवसें, सूर्याचिस्तव जैसें…

    March 22, 2026

    Dnyaneshwari : तो चालतें ज्ञानाचें बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंभ…

    March 21, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    संस्कार… माणुसकी आणि सहिष्णुतेचे!

    March 24, 2026

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 246
    • अवांतर 174
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 184
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn