Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    एक दिवस माझ्यासाठी रडशील तू….

    May 25, 2026

    Dnyaneshwari : ‘कृष्णा’ म्हणोनि हाकारिजे, यादवपणें तूतें लेखिजे

    May 25, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 मे 2026

    May 25, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, May 25
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Dnyaneshwari : चंडवातेंही न मोडे, तें गगनचि कीं फुडें…
    अध्यात्म

    Dnyaneshwari : चंडवातेंही न मोडे, तें गगनचि कीं फुडें…

    Team AvaantarBy Team AvaantarJanuary 18, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter Eleven, अकरावा अध्याय, अध्याय अकरावा,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    अध्याय आठवा

    यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यद् यतयो वीतरागाः । यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत् ते पदं संग्रहेण प्रवक्ष्ये ॥11॥

    सकळां जाणणेयां जे लाणी । तिये जाणियेची जे खाणी । तयां ज्ञानियांचिये आयणी । जयातें अक्षर म्हणिपे ॥100॥ चंडवातेंही न मोडे । तें गगनचि कीं फुडें । वांचूनि जरी होईल मेहुडें । तरी उरेल कैंचे ॥101॥ तेविं जाणणेया जें आकळिलें । तें जाणवलेपणेंचि उमाणलें । मग नेणवेचि तयातें म्हणितलें । अक्षर सहजे ॥102॥ म्हणोनि वेदविद नर । म्हणती जयातें अक्षर । जें प्रकृतीसी पर । परमात्मरूप ।।103॥ आणि विषयांचें विष उलंडूनि । जे सर्वेंद्रियां प्रायश्चित देऊनि । आहाति देहाचिया बैसोनि । झाडातळी ॥104॥ ते यापरी विरक्त । जयाची निरंतर वाट पाहात । निष्कामासि अभिप्रेत । सर्वदा जें ॥105॥ जयाचिया आवडी । न गणिती ब्रह्मचर्यादि सांकडी । निष्ठुर होऊनि बापुडी । इंद्रियें करिती ॥106॥ ऐसें जें पद । दुर्लभ आणि अगाध । जयाचिये थडियेचे वेद । चुबुकळिले ठेले ॥107॥ तें ते पुरुष होती । जे यापरी लया जाती । तरी पार्था हेचि स्थिती । एक वेळ सांगों ॥108॥ तेथें अर्जुनें म्हणितलें स्वामी । हेंचि म्हणावया होतों पां मी । तंव सहजें कृपा केली तुम्हीं । तरी बोलिजो कां जी ॥109॥ परि बोलावें तें अति सोहोपें । तेथें म्हणितलें त्रिभुवनदीपें । तुज काय नेणों संक्षेपें । सांगेन ऐक ॥110॥ तरी मना या बाहेरिलीकडे । यावयाची साविया सवें मोडे । हें हृदयाचां डोहीं बुडे । तैसें कीजे ॥111॥

    हेही वाचा – Dnyaneshwari :  जें नानागती पावतें, तें चित्त वरील आत्मयातें…

    अर्थ

    जे अविनाशी आहे असे वेदवेत्ते सांगतात, (संसाराच्या) इच्छेपासून पराड्मुख झालेले विरक्त ज्यामध्ये प्रवेश करतात आणि जे जाणण्याची इच्छा करणारे ब्रह्मचर्य आचरण करतात, ते (‘ब्रह्म’ नामक) पद मी तुला संक्षेपाने सांगतो. ॥11॥

    जे ज्ञान, संपूर्ण ज्ञानाचा शेवट आहे, त्या ज्ञानाची जे केवळ खाणच आहे, त्या ब्रह्मज्ञान्यांच्या बुद्धीने ज्यास (ब्रह्मस्वरूपास) अविनाशी असे म्हणतात ॥८-१००॥  प्रचंड वार्‍यानेही जे नाहीसे होत नाही, ते खरोखर आकाशच होय, नाहीतर ते ढग असते तर, ते प्रचंड वार्‍यापुढे कसे टिकते? ॥101॥ त्याप्रमाणे ज्ञानाला जे विषय झाले आणि विषय झाल्यामुळेच त्याच्याकडून जे मोजले गेले (ते क्षर होय). नंतर वृत्तिज्ञानाला जे विषय होत नाही (तर उलट वृत्तिज्ञानच जेथे लय पावते) त्याला सहजच अक्षर असे म्हटले. ॥102॥ म्हणून वेद जाणणारे पुरुष ज्याला अक्षर असे म्हणतात आणि जे परमात्मस्वरूप प्रकृतिपलीकडचे आहे, ॥103॥ आणि जे विषयांचा विषवत् त्याग करून आणि सर्वेंद्रियांना शुद्ध करून देहरूप झाडाच्या खाली बसलेले आहेत, ॥104॥ याप्रमाणे विरक्त पुरुष आहेत, ते ज्याची (परब्रह्माची) नेहेमी वाट पाहात असतात आणि जे निष्काम पुरुषांना अखंड अत्यंत प्रिय आहे; ॥105॥ ज्याच्या प्रेमाने ते ब्रह्मचर्यासारख्या कठीण गोष्टी जुमानीत नाहीत आणि इंद्रियांवर कठोर होऊन त्यांना दीन करतात, ॥106॥ असे जे ठिकाण, जे मिळावयास कठीण आणि जाणण्यास कठीण आणि ज्याच्या अलीकडच्या काठाशीच वेद गटांगळ्या खात राहिले आहेत (वेदासही जे अगम्य आहे) ॥107॥ ते (परब्रह्म) जे पुरुष याप्रमाणे देह ठेवतात, ते होतात. तर अर्जुना, हाच प्रकार तुला आणखी एक वेळ सांगतो. ॥108॥ त्या प्रसंगी अर्जुन म्हणाला, महाराज, मी हेच विचारण्याच्या बेतात होतो. इतक्यात तुम्ही सहजच कृपा केली. तर महाराज, आता सांगावे. ॥109॥ परंतु जे सांगाल ते अतिशय सोपे करून सांगा. त्या प्रसंगी त्रैलोक्याचे प्रकाशन करणारे श्रीकृष्ण म्हणाले, आम्ही तुझे मनोगत ओळखत नाही काय? तुला थोडक्यात सांगतो, ऐक. ॥110॥ तरी या मनाला बाहेर येण्याची जी सवय आहे, ती सहज नाहीशी करून ते हृदयाच्या डोहात बुडेल तसे करावे. ॥111॥

    क्रमश:

    हेही वाचा – Dnyaneshwari : जें गगनाहून जुनें, जें परमाणुहूनि सानें

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Dnyaneshwari : ‘कृष्णा’ म्हणोनि हाकारिजे, यादवपणें तूतें लेखिजे

    May 25, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : परि ऐसिया तूतें स्वामी, कहींच नेणों जी आम्ही

    May 24, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : ऐसीं रूपें तियें अद्भुतें, आश्चर्यें स्फुरती अनंतें

    May 23, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    Dnyaneshwari : ‘कृष्णा’ म्हणोनि हाकारिजे, यादवपणें तूतें लेखिजे

    By Team AvaantarMay 25, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा विपायें राउळा येवों । तरि तुझेंनि अंगें मानु पावों । मानिसी…

    Dnyaneshwari : परि ऐसिया तूतें स्वामी, कहींच नेणों जी आम्ही

    May 24, 2026

    Dnyaneshwari : ऐसीं रूपें तियें अद्भुतें, आश्चर्यें स्फुरती अनंतें

    May 23, 2026

    Dnyaneshwari : सकळ विश्वजीवन, जीवांसि तूंचि निधान

    May 22, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    एक दिवस माझ्यासाठी रडशील तू….

    May 25, 2026

    Dnyaneshwari : ‘कृष्णा’ म्हणोनि हाकारिजे, यादवपणें तूतें लेखिजे

    May 25, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 मे 2026

    May 25, 2026

    पार्किंगसाठी पुणेकरांच्या अशाही क्लृप्त्या!

    May 24, 2026

    शिवचा हात दरवाजात सापडला अन्…

    May 24, 2026

    अगतिक मातृत्व

    May 24, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 308
    • अवांतर 187
    • आरोग्य 113
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 431
    • फिल्मी 48
    • फूड काॅर्नर 213
    • मैत्रीण 19
    • ललित 650
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    एक दिवस माझ्यासाठी रडशील तू….

    May 25, 2026

    Dnyaneshwari : ‘कृष्णा’ म्हणोनि हाकारिजे, यादवपणें तूतें लेखिजे

    May 25, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 मे 2026

    May 25, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    एक दिवस माझ्यासाठी रडशील तू….

    May 25, 2026
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.