Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    हिरव्या बांगड्या

    June 17, 2026

    स्मोकर्स कफ… शरीराने दिलेली वॉर्निंग बेल!

    June 17, 2026

    Recipe : काकडीचे स्वादिष्ट सांदण अन् खमंग घावन!

    June 17, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, June 17
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » मनात बहरलेला गुलमोहर!
    फिल्मी

    मनात बहरलेला गुलमोहर!

    माधवी जोशी माहुलकरBy माधवी जोशी माहुलकरJanuary 9, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, मराठी कथा, मी मराठी, मराठी लेख, मराठी लेखक, गुलमोहराचे झाड, गुलजार गुलमोहर, देवता चित्रपट, देवता गुलमोहर, सारीका गुलमोहर, गुलजार आरडी, आरडी एक्स,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    संजीव कुमार, शबाना आझमी, राकेश रोशन आणि सारीका यांच्या अभिनयाने नटलेला ‘देवता’  नावाचा सिनेमा आठवतोय? त्याच सिनेमातील किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या तलम आवाजातील नितांत सुंदर गाण ‘गुलमोहर गर तुम्हारा नाम होता, मौसम-ए-गुल को हँसाना भी हमारा काम होता…’ आहे न रेशमी वस्त्र ल्यायल्यासारखे गर्भरेशमी गाणे?  हे गुलजार या मनस्वी संवेदनशील कवीचे पिवळ्या गुलमोहरासारखे सोनसळी शब्द आहेत आणि त्यावर आपल्या रेशमाच्या जरतारी तारांनी साज चढवला आहे, गुलजार इतक्याच हळव्या आणि नाजूक दिलाचे संगीतकार आर. डी. बर्मन यांनी. काय एकेक शब्द आहेत गुलजार यांचे! एखाद्या झाडाविषयी सुद्धा इतकं समरसून लिहावे? आणि त्यावर कोटीचा संगीताचा साज चढवावा तो आर.डी. यांनीच! तो जो मधे सॅक्सोफोन वाजतो ना, ते इतकं अप्रतिम वाटतं ऐकायला की, कितीही अरसिक माणूस असला तरी, ते सूर ऐकून दोन ओळीच मनातल्या मनात का होईना, पण नक्कीच गुणगुणल्याशिवाय राहणार नाही. इतकी शब्दांची ताकद आणावी ती गुलजार यांनीच… आणि त्याला तितक्याच ताकदीचं संगीत देऊन अजरामर करावं ते फक्त आणि फक्त आर. डी. यांनीच! मी या जोडगोळीला नेहमी संगीतामधले आर.डी. एक्स म्हणते कारण या जोडगोळीने आपल्या अनेक हरकतींनी आणि कारवायांनी विविध गाणी तयार करून हिंदी चित्रपटसृष्टी पदोपदी घायाळ केलेली आहे. या जोडगोळीची कैक गाणी थेट मनाला भिडणारी आहेत आणि अजूनही ती गाणी ऐकली की, आपण तितकेच आर्ततेने ती गाणी म्हणतो किंवा ऐकतो… असे या आ. डी. एक्सचे एकसे एक संगीतमय रेशमी आवाजांचे अन् जादुई शब्दांचे धमाके आहेत की, त्यामधून आपण कधीही सावरणार नाहीत.

    हेही वाचा – Nostalgia : निगाहें मिलाने को जी चाहता हैं…

    निसर्गातील कैक गोष्टी रोज आपणही पाहतो, परंतु गुलजार यांच्यासारखी सौंदर्य जोखण्याची दृष्टी आपल्याजवळ नाही. आपल्या शब्दांनी हा माणूस रसिकांना जखडून ठेवतो, खरंच!! आजच्या पिढीलाही या माणसाने भुरळ पाडली आहे. मला वाटत गुलमोहरवरचं हे गाणं त्यांना  घरासमोर त्यावेळेस असलेल्या गुलमोहराच्या झाडावरून सुचलेले असावे. जे झाड त्याच्या शब्दांनी अजरामर होऊन गेले. त्यानंतर कैक कविता, लेख या गुलमोहरावर आले असतीलही, परंतु गुलजार ते गुलजारच! त्यांच्यासारखे तेच! नंतर बीएमसीवाल्यांनी गुलजार यांना मोहवणारे ते झाड पाडले म्हणे… ते पाहून त्यांच्यासारख्या संवेदनशील कवीला किती यातना झाल्या असतील नाही?

    ‘देवता’ या सिनेमातील गाणे ‘गुलमोहर गर तुम्हारा नाम होता…’ जे सारीका आणि राकेश रोशन यांच्यावर चित्रित झाले आहे. या गाण्यात पिवळ्या लॅान्ग फ्रॅाकमधील घाऱ्या डोळ्यांची सारीका आणि तितकाच रोमँटिक घाऱ्या डोळ्यांचा राकेश रोशन खूप छान वाटले आहेत. मी गुलमोहर आणि बहावा या झाडांच्या जोडीवर एक लेख लिहिला होता, याच गाण्याचे शीर्षक घेऊन “गुलमोहर गर तुम्हारा नाम होता’  ते याच गाण्यामधील या जोडगोळीला समोर ठेवून… पिवळ्या लॅान्ग फ्रॅाकमधील सारीका मला बहाव्याच्या सुंदर, नाजूक आणि सोनसळी रुपासारखी भासते या गाण्यामध्ये! आणि तिचे रूप पाहून राकेश रोशनला असं वाटत असावं की, या पिवळ्या बहाव्यापेक्षा तिचे रूप गुलमोहरासारखे आरक्त आणि लाजेने चूर झालेले असावे… काय तरी एकेक आपापल्या कल्पना! परंतु ते काहीही असो बहावा आणि गुलमोहर, ही दोन्ही झाडं सौंदर्याने नटलेली आणि कवीमनाला वेड लावणारी आहेत, हे मात्र निश्चित!

    गुलमोहरावर आम्हाला मराठीमध्ये एक धडा होता.,, बहुतेक मी आठवीत असताना तो शिकवला गेला… मला निश्चित आठवत नाही आता, परंतु तो अभ्यासक्रमात जेव्हा शिकले तेव्हापासूनच मी या झाडाच्या मोहात पडले. त्या लेखकाने गुलमोहराच्या पानांची तुलना मोरपिसाच्या रेशमी स्पर्शाशी केली होती. तो धडा वाचनात आल्यानंतर, आमच्या शाळेच्या आवारात एक गुलमोहराचे झाड होते, त्याच्या खाली झुकलेल्या एखाद्या फांदीवरून हात फिरवून तो मऊसर स्पर्श मी अनुभवायची. खरचं, गुलमोहराची पान खूपचं नाजूक आणि तलम असतात.

    माझ्या मनामध्ये स्वर्गीय सौंदर्य लाभलेल्या या वृक्षाने असे अढळपद मिळवलं आहे. लहानपणी एखादी गोष्ट मनाला भावते ती आपली नेहमी हृदयस्थ असते नाही का? माझ्या वाढत्या वयासोबत मनातील हा गुलमोहरही बहरला. मुळचे साऊथ आफ्रिकेतील मादागास्कर येथील हे झाड आपल्याकडे मुंबईत शिवडी येथे प्रथम निदर्शनास आले. त्यानंतर या झाडाच्या सौंदर्याने आपल्या येथील रस्त्यांना, बंगल्यांना, बगिच्यांना सुशोभित केले. महाराष्ट्रातील सातारा येथे तर दरवर्षी 1 मे रोजी खास ‘गुलमोहर’ उत्सव साजरा केला जातो. यावर मग तिथे निसर्गप्रेमी, कवी, चित्रकार, फोटोग्राफर सगळे भेट देऊन गुलमोहराचे गुणगान करण्यात रमलेले दिसतात.

    हेही वाचा – तोडली बंधने अन् सुटले भोग…

    मला गुलमोहराविषयी विशेष आकर्षण आहे, कारण लहानपणापासूनच हे झाड माझ्या मनात घर करून होते आणि माझे लग्न झाल्यावर माझ्या सासरी अंगणामध्ये माझ्या सासुबाईंनी, त्यांनी जेव्हा घर बांधले होते तेव्हा लावलेला गुलमोहर जणू माझी वाटच पाहात होता. दोन बाजूला दोन मोठ्ठी नारळाची झाडं आणि फाटकाला लागून समोरच हा रेशीमस्पर्शी गुलमोहर… त्यामुळे त्या घराला शोभा होती. कालांतराने सासू-सासरे गेले आणि त्या अंगणातल्या गुलमोहराची सावलीदेखील हरवली. अशा अनेक सुखदुःखाचा साथीदार असलेला हा गुलमोहर वृक्ष मला दिसला की, मी वेडावते. सहज शक्य असेल तर, त्याला स्पर्शदेखील करून पाहते. परंतु आताच्या फ्लॅट संस्कृतीमध्ये निसर्गाप्रती सहजीवन हरवले आहे. आता मी हा गुलमोहर फक्त बाहेर जंगलात, अथवा एखाद्या रस्त्याच्या कडेला किंवा हॉटेलच्या बाहेर सुशोभीकरण करण्यासाठी लावलेला पाहाते. कुठेही गुलमोहर वृक्ष पाहिला की, त्याच्याबद्दल असलेल्या अनेक संमिश्र आठवणी माझ्या मनात रुंजी घालत असतात. अशा अनेक आठवणींनी माझ्या मनातील गुलमोहर बहरलेला असतो.

    Avatar photo
    माधवी जोशी माहुलकर

    एम.ए.(इंग्रजी) बी.एड. असून सध्या नागपूरमध्ये स्थायिक आहेत. लग्नाआधी चार वर्षे मेडिकल रीप्रेझेन्टेटिव्ह म्हणून अकोला येथे कार्यरत. तीन वर्षे शिक्षिका. वाचन, प्रवास करणे, वेगवेगळ्या विषयांवर लिखाण तसेच चर्चा करणे, गायन याची आवड. गायनात गंधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण. पती Additional S.P. Anti corruption Bureau Nagpur येथे कार्यरत.

    Related Posts

    मला कायम जपणारे स्नेहबंध…

    June 15, 2026 फिल्मी

    मुख्याध्यापिकेच्या रोलसाठी ऑडिशनला गेले आणि…

    June 8, 2026 फिल्मी

    देह शुद्ध करूनी भजनी भजावे…

    June 2, 2026 फिल्मी
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फिल्मी

    मला कायम जपणारे स्नेहबंध…

    By हर्षा गुप्तेJune 15, 2026

    नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. शूटिंग दरम्यान मला अजून एक मुलगा…

    मुख्याध्यापिकेच्या रोलसाठी ऑडिशनला गेले आणि…

    June 8, 2026

    देह शुद्ध करूनी भजनी भजावे…

    June 2, 2026

    सेटवरची एनर्जी म्हणजे हरहुन्नरी साईराज!

    June 1, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    हिरव्या बांगड्या

    June 17, 2026

    स्मोकर्स कफ… शरीराने दिलेली वॉर्निंग बेल!

    June 17, 2026

    Recipe : काकडीचे स्वादिष्ट सांदण अन् खमंग घावन!

    June 17, 2026

    Dnyaneshwari : खडकीं जैसें वर्षलें, कां आगीमाजीं पेरिलें 

    June 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 17 जून 2026

    June 17, 2026

    विहिरीतला आवाज…

    June 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 331
    • अवांतर 190
    • आरोग्य 121
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 457
    • फिल्मी 53
    • फूड काॅर्नर 224
    • मैत्रीण 21
    • ललित 710
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    हिरव्या बांगड्या

    June 17, 2026

    स्मोकर्स कफ… शरीराने दिलेली वॉर्निंग बेल!

    June 17, 2026

    Recipe : काकडीचे स्वादिष्ट सांदण अन् खमंग घावन!

    June 17, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.