Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, March 18
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»अध्यात्म»Dnyaneshwari : येर तनुमनप्राणीं, जे निरंतर माझेयाचि वाहणीं…
    अध्यात्म

    Dnyaneshwari : येर तनुमनप्राणीं, जे निरंतर माझेयाचि वाहणीं…

    Team AvaantarBy Team AvaantarJanuary 4, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter Nine, नववा अध्याय, अध्याय नववा,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    अध्याय सातवा

    किंबहुना ऐसें जें भजन । तें संसाराचेंचि साधन । येर फळभोग तो स्वप्न । नावभरी दिसे ॥148॥ हें असो परौतें । मग हो का आवडे तें । परि यजी जो देवतांतें । तो देवत्वासीचि ये ॥149॥ येर तनुमनप्राणीं । जे निरंतर माझेयाचि वाहणीं । ते देहाचां निर्वाणीं । मीचि होती ॥150॥

    अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते मामबुद्धयः । परं भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमम् ॥24॥

    परी तैसें न करिती प्राणिये । वायां आपुलां हितीं वाणिये । पैं पोहताती पाणियें । तळहातींचेनि ॥151॥ नाना अमृताचां सागरीं बुडिजे । मग तोंडा कां वज्रमिठी पाडिजे । आणि मनीं तरी आठविजे । थिल्लरोदकांतें ॥152॥ हें ऐसें काइसेया करावें । जे अमृतींही रिगोनि मरावें । तें सुखें अमृत होऊनि कां नसावें । अमृतामाजीं ॥153॥ तैसा फळहेतूचा पांजरा । सांडूनियां धनुर्धरा । कां प्रतीतिपाखीं चिदंबरा । गोसाविया नोहावें ॥154॥ जेथ उंचावतेनि पवाडें । सुखाचा पैसारु जोडे । आपुलेनि सुरवाडें । उडों ये ऐसा ॥155॥ तया उमपा माप कां सुवावें । मज अव्यक्ता व्यक्त कां मानावें । सिद्ध असतां कां निमावें । साधनवरी ॥156॥ परि हा बोल आघवा । जरी विचारीजतसे पांडवा । तरी विशेषें या जीवां । न चोजवे गा ॥157॥

    नाहं प्रकाशः सर्वस्य योगमायासमावृत्तः । मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजमव्ययम् ॥25॥

    कां जे योगमायापडळें । हे जाले आहाती आंधळे । म्हणोनि प्रकाशाचेनिहि देहबळें । न देखती मातें ॥158॥

    हेही वाचा – Dnyaneshwari : हें असो आणिक कांहीं, तया सर्वत्र मीवांचूनि नाहीं…

    अर्थ

    फार काय सांगावे! असे जे भजन आहे, ते जन्म-मरणाला देणारे आहे आणि त्या भजनाने मिळणारा हा ऐहिक पारत्रिक फलभोग क्षणभर दिसणारे स्वप्नच आहे. ॥148॥ हे (फलभोगाची गोष्ट) एका बाजूला राहू दे, मग वाटेल ते का दैवत असेना, परंतु जो ज्या देवतांना भजतो, तो त्या त्या देवत्वास प्राप्त होतो. ॥149॥ दुसरे जे शरीराने, मनाने आणि प्राणाने अखंड माझ्या भजनाच्या मार्गात आहेत, ते देह पडल्यावर मीच होतात. ॥150॥

    अविनाशी, अत्यंत उत्तम आणि श्रेष्ठ असे माझे स्वरूप न जाणणारे, अल्पबुद्धी लोक अव्यक्त असलेल्या मला व्यक्त स्वरूपाने ओळखतात. ॥24॥

    पण लोक तसे करीत नाहीत. व्यर्थ आपल्या हिताचा तोटा करतात. ते त्यांचे करणे तळहातातील पाण्यात पोहण्याप्रमाणे आहे. ॥151॥ किंवा अमृताच्या समुद्रामध्ये बुडी द्यावी आणि मग तोंड का घट्ट मिटून धरावे? आणि मनात तर डबक्यातील पाण्याची आठवण का धरावी? ॥152॥ अमृतात शिरून तोंडात अमृत जाऊ न देता मरावे, असे हे कशाला करावे? तर अमृतामध्ये सुखाने अमर होऊन का राहू नये? ॥153॥ अर्जुना, त्याप्रमाणे फलाशेचा पिंजरा टाकून, आत्मानुभवरूपी पंखाने चिदाकाशात हवा तसा संचार करणारा समर्थ का होऊ नये? ॥154॥ त्या चिदाकाशात जितके आपण उंच जाऊ, तितका आपणाला सुखाने संचार करण्याला हवा तसा विस्तार मिळतो. ॥155॥ त्या अमर्याद स्वरूपाला माप का घालावे? मला निराकाराला साकार का समजावे? मी स्वत:सिद्ध असता माझ्या प्राप्तीकरिता साधने करून का मरावे ? ॥156॥ अर्जुना, पण या सर्व बोलण्याचा विचार केला, तर बहुत करून या जीवांना ही गोष्ट समजत नाही. ॥157॥

    सर्वांना माझे ज्ञान नाही, कारण योगमायेने मी आच्छादित झालो आहे, म्हणूनच हे मूढ जग जन्मरहित आणि नाशरहित अशा मला जाणत नाही. ॥25॥

    कारण की, ते योगमायेच्या पडद्याने आंधळे झाले आहेत, म्हणून (स्वरूप) प्रकाशाने भरलेल्या दिवसाच्या बळाने देखील ते मला पाहात नाहीत. ॥158॥

    क्रमश:

    हेही वाचा – Dnyaneshwari :  पैं जो जिये देवतांतरीं, भजावयाची चाड करी…

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : आतां आपुलेनि कृपाप्रसादें, मिया भगवद्‍गीता वोवीप्रबंधें…

    March 16, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : चंदनातें कायसेनि चर्चावें, अमृतातें केउतें रांधावें…

    March 15, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    By Team AvaantarMarch 17, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा आतां शब्दब्रह्मीं असंख्याके । जेतुला कांहीं अभिप्राय पिके । तेतुला महाभारतें…

    Dnyaneshwari : आतां आपुलेनि कृपाप्रसादें, मिया भगवद्‍गीता वोवीप्रबंधें…

    March 16, 2026

    Dnyaneshwari : चंदनातें कायसेनि चर्चावें, अमृतातें केउतें रांधावें…

    March 15, 2026

    Dnyaneshwari : अर्धोन्मीलित डोळे, वर्षताति आनंदजळें…

    March 14, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn