Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, March 18
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»ललित»मैं जिंदगी का साथ निभाता चला गया…
    ललित

    मैं जिंदगी का साथ निभाता चला गया…

    Team AvaantarBy Team AvaantarNovember 27, 2025No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठी कथा, मराठी लघुकथा, स्ट्रेस मॅनेजमेंट, तणावमुक्ती, ताणतणाव, आनंदी राहाणे, स्ट्रेस कंट्रोल, तणाव नियंत्रण,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    मयुरेश गोखले

    सकाळी ऑफिसमध्ये जाताना रस्त्यात वाहतूक खोळंबली होती. मेट्रो ट्रेनच्या कामामुळे हल्ली रोजच रहदारीचा सामना करावा लागतो. मेट्रोच्या व्यवस्थापनाला दोष देत रस्ता कापत जात होतो. तेवढ्यात कळलं की, रहदारीचं खरं कारण मेट्रो नसून 10 वीचे बोर्डाचे पेपर आहेत! सर्व पालकवर्ग आपल्या मुलांना परीक्षा केंद्रात सोडून बाहेर गेटवर थांबला होता… काही तिथेच कार पार्क करून कारमध्ये बसले होते. आपल्या 10 वीतल्या मुलांची अतिकाळजी घेणाऱ्या पालकवर्गाला दोष देत मग परत मी रहदारीतून मार्ग काढणे सुरू केले. आणखी थोडं पुढे गेल्यावर एक बस अगदी हळूहळू पुढे जात होती आणि तिच्यामागे गाड्यांची लांब रांग लागली होती. रहदारी खोळंबण्याचं खरं कारण आता सापडलं होतं. आता बसला कसं तरी ओव्हरटेक करून बसचालकाला त्याच्या चुकीची जाणीव करून देणं आणि रहदारी मोकळी करणं ही सामाजिक जबाबदारी ओळखून मी त्या बसला ओव्हरटेक केले आणि समोर पाहतो तर मला धक्काच बसला! एक उसाच्या रसाचा ठेला हळूवार पुढे ढकलत एक माणूस चालला होता… त्याला मागच्या रहदारीशी काही घेणं देणं नव्हतं… मागून वाजणारे कर्कश हॉर्न त्याला ऐकूच येत नाहीये, असे त्याचे भाव होते!

    हेही वाचा – गहिवरला मेघ नभी…

    मेट्रो, 10 वीची परीक्षा, रहदारी, लोकांना होणारा त्रास… या सगळ्यांच्या पलीकडे होतं, त्याचं विश्व! काही क्षण त्याचा खूप राग आला. पण मग नंतर त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून राग तर गेला… निवांत भाव होते त्याच्या चेहऱ्यावर! कसा काय इतका रिलॅक्स राहू शकत असेल तो?  किती लोक त्याच्याकडे पाहून त्याला अर्वाच्य शिव्या देऊन जात होतेय… पण त्याच्या चेहऱ्यावर अजिबात ताण दिसत नव्हता. अगदी आनंदात, रिलॅक्स मूडमध्ये तो ठेला ढकलत चालला होता… थोडं अंतर पुढे गेल्यावर मेट्रोचं काम सुरुt व्हायचं होतं, त्यामुळे रस्ता मोठा होता आणि 15 मिनिटांत रहदारी सुरळीत झाली. मी आपल्या ऑफिसला आलो… आणि तो ठेलेवाला पण आपल्या इच्छित स्थळी पोहोचलाच असेल!

    हेही वाचा – विषाची परीक्षा…

    पण त्या 15 मिनिटांमध्ये तो बरंच काही शिकवून गेला….

    “मैं जिंदगी का साथ निभाता चला गया

    हर फिक्र को धुएं में उडाता चला गया…”

    काही कारण असो किंवा टेंशन असो… रीलॅक्स रहा, आनंदी रहा, फायदा आपलाच आहे! चिंता, तणाव हवेत उडवून टाका… उगाच चीड चीड करून आपलं रक्त का आटवायचं?

    स्ट्रेस कंट्रोल करण्यासाठी अनेक ठिकाणी शिबीर आयोजित केली जातात. बरेच जण पैसे खर्च करून त्यात सहभागी होतात. मी उसाच्या ठेलेवाल्याकडून फुकटात स्ट्रेस मॅनेजमेन्ट शिकलो…

    असो, बहुत काय लिहिणे! आपण सुज्ञ असा…


    मोबाइल – 9423100151

    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026 ललित

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026 ललित

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    By Team AvaantarMarch 16, 2026

    पराग गोडबोले दोन दिवस ऑफिसच्या कामानिमित्त पुण्यनगरीत होतो. पुण्याची आणि माझी नाळ तशी बालपणापासून जोडलेली,…

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026

    कॉलेज मैत्रीण छाया 52 वर्षांनी भेटली, पण…

    March 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn