Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    संस्कार… माणुसकी आणि सहिष्णुतेचे!

    March 24, 2026

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 22 नोव्हेंबर 2025
    वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 22 नोव्हेंबर 2025

    Team AvaantarBy Team AvaantarNovember 22, 2025No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 22 नोव्हेंबर 2025; वार : शनिवार
    • भारतीय सौर : 01 अग्रहायण शके 1947; तिथि : द्वितीया 17:10; नक्षत्र : ज्येष्ठा 16:46
    • योग : सुकर्मा 11:28; करण : तैतिल 30:19
    • सूर्य : वृश्चिक; चंद्र : वृश्चिक 16:46; सूर्योदय : 06:48; सूर्यास्त : 17:59
    • पक्ष : शुक्ल; मास : मार्गशीर्ष; ऋतू : हेमंत; अयन : दक्षिणायन
    • संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    आजचे राशीभविष्य

    मेष – आजचा दिवस कठोर परिश्रम आणि संधी दोन्ही घेऊन येईल. अनेक दिवसांपासून रखडलेल्या कामात प्रगती होईल. कामावर तुमची कामगिरी लक्षात घेतली जाईल. आर्थिक बाबतीत थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. अनावश्यक खर्च टाळा. नातेसंबंधांमध्ये मोकळेपणाने राहणे महत्त्वाचे आहे, अन्यथा गैरसमज होऊ शकतात.

    वृषभ – काम थोडे संथ गतीने चालेल, पण तुमचा संयम तुमची ताकद बनेल. जोडीदाराकडून पाठिंबा मिळेल. कुटुंबात शांततेचे आणि खेळीमेळीचे वातावरण असेल, ज्यामुळे मानसिक शांती मिळेल. एखादी मोठी खरेदी करायची इच्छा होईल पण बजेटनुसार निर्णय घ्या.

    मिथुन – तुमचे संवाद कौशल्य विशेषत्वाने बहरेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या मतांचा आदर केला जाईल. नवीन लोकांच्या भेटी होणे फायदेशीर ठरेल. तुम्हाला महत्त्वाच्या कामासाठी प्रवास करावा लागू शकते. एखादा मित्र किंवा भावंडांपैकी कोणाला तरी तुमच्या मदतीची गरज भासेल. आज तुम्ही सर्व गोष्टी व्यवस्थितपणे मार्गी लावू शकाल.

    कर्क – आज मूड थोडा भावनिक बनेल, मात्र तुमचे लक्ष कामावर राहील. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची चिन्हे आहेत, एखादा प्रलंबित निधी परत मिळू शकेल. मनातील भावना कुटुंबातील सदस्यांसोबत शेअर करण्याची संधी तुम्हाला मिळेल. थोडा थकवा किंवा डोकेदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे. तब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे.

    सिंह – आत्मविश्वास ही तुमची सर्वात मोठी ताकद असेल. कामाच्या ठिकाणी नेतृत्व दाखवण्याची संधी मिळेल, सहकारी आणि वरिष्ठ तुमच्या निर्णयांचा आदर करतील. कामाच्या ठिकाणी मोठी जबाबदारी मिळू शकते. वैवाहिक जीवन चांगले राहील. एखाद्या जुन्या ओळखीच्या व्यक्तीकडून एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल.

    हेही वाचा – तू भेटशी नव्याने…

    कन्या – आज जबाबदाऱ्या जास्त असतील, पण तुम्ही त्या निश्चयाने पूर्ण कराल. वरिष्ठ तुमच्या कामावर खूश असतील. कुटुंबाकडून आलेली एखादी छोटीशी विनंती आज पूर्ण करू शकाल, त्यामुळे वातावरण सुधारेल. खर्च वाढू शकतो, मात्र तो आवश्यक वस्तूंवरच खर्च होईल.

    तुळ – हातात खूप कमी वेळ आहे, अशा प्रकारे कामात खूप व्यग्र राहाल. छोट्या छोट्या गोष्टींवरून ताण घेऊ नका. आज तुम्ही सर्व गोष्टी व्यवस्थितपणे हाताळाल. उत्पन्न वाढीसाठी तुमच्याजवळील नावीन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा. कोणतीही कागदपत्रे किंवा महत्त्वाचे दस्तऐवज सांभाळून ठेवा.

    वृश्चिक – आज नवीन संधींचा लाभ होऊ शकतो, विशेषतः तुमच्या नोकरी आणि करिअरच्या दृष्टीने. व्यावसायिक देखील चांगला नफा कमावतील. भेट किंवा संवादातून महत्त्वपूर्ण फायदे मिळू शकतात. नातेसंबंधांमध्ये प्रामाणिकपणा आज खूप उपयुक्त ठरेल. मन हलके आणि सकारात्मक राहील.

    धनु – आज नशीबाची तुमच्यावर कृपा असेल. प्रलंबित कामे अचानकपणे सहजतेने पूर्ण होतील. एखाद्याने उधार घेतलेले पैसे परत मिळू शकतात किंवा नवीन उपक्रम सुरू करण्याची संधी मिळू शकते. वैवाहिक नात्यात प्रेम आणि समजूतदारपणा वाढेल. दिवसाच्या शेवटी एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.

    मकर – मन अनेक गोष्टींबद्दल संवेदनशील असू शकते, मात्र भावनांमध्ये वाहून जाणे टाळा. तुमचे करिअर आणि आर्थिक व्यवहार योग्य दिशेने सुरू आहेत, काळजी करण्याची गरज नाही. एखाद्या जुन्या मित्राशी किंवा ओळखीच्या व्यक्तीशी फोनवरून संपर्क होईल, ज्यामुळे मूड सकारात्मक बदलेल.

    कुंभ – ऊर्जा आणि गतीने कामे हातावेगळी कराल. जे काही काम हाती घ्याल, त्यात यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा दिवस चांगला आहे. एखाद्या कठीण विषयाबाबत सोप्या भाषेत आकलन होईल, अशाप्रकारे एखाद्या शिक्षकाकडून शिकवले जाईल. प्रवास किंवा बाहेर जाण्याच्या योजना आखल्या जाऊ शकतात. कौटुंबिक जीवनातील सकारात्मकता वाढेल.

    हेही वाचा – गहिवरला मेघ नभी…

    मीन – कामे वेळेवर पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला उपयुक्त ठरू शकतो. कुटुंब आणि जोडीदाराकडून मोठा पाठिंबा मिळेल. काही खर्च होतील, परंतु ते बहुतेक आवश्यक गरजांसाठीच असतील.  मानसिक शांतीत वाढ होईल.


    दिनविशेष

    पहिल्या भारतीय महिला रसायनशास्त्रज्ञ असीमा चॅटर्जी

    टीम अवांतर

    पहिल्या भारतीय महिला रसायनशास्त्रज्ञ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या असीमा चॅटर्जी यांचा जन्म 23 सप्टेंबर 1917 रोजी झाला. 1938 साली कलकत्ता विद्यापीठातून रौप्य पदकासह सेंद्रिय रसायनशास्त्रातील एम. एस्सी. पदवी आणि नंतर तिथूनच 1944 साली  डी. एस्सी. झाल्या. विशेष म्हणजे, ही पदवी मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. संशोधनाचाच पिंड असणाऱ्या असीमा 1947 साली अमेरिकेला रवाना झाल्या. तेथे त्यांनी एल. एम. पार्कस्, एल्. झेक मैस्टर या शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केले. तिथून पुढे त्या युरोपला गेल्या आणि झुरिक विद्यापीठातील 1937 सालचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ पॉल करीट यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संश्लेषणात्मक सेंद्रिय रसायनशास्त्रज्ञ (सिंथेटिक ऑरगॅनिक केमिस्ट्री) या विषयात संशोधन केले. 1950 मध्ये त्या भारतात परतल्या. भारतीय औषधी वनस्पतींवर त्यांनी विपुल संशोधन केले. वनस्पतींपासून मिळणाऱ्या अल्कालॉईड्स आणि कौमारीन्स या रासायनिक पदार्थाच्या संशोधनावर त्यांचा विशेष भर होता. मिरगी किंवा फिट्स येणे या आजारावर ‘आयुष-56’ हे औषध ‘मार्सिलिया मिन्युटा’ या वनस्पतीशास्त्रीय नाव असलेल्या वनस्पतीपासून त्यांनी वेगळं केलं. याशिवाय चार वनस्पतींपासून हिवतापविरोधी औषध मिळविले. या औषधांची त्यांनी पेटंट्सही मिळवली. चॅटर्जी यांनी 1973 ते 1977 या काळात ‘भारतीय वनौषधी’ या ग्रंथाच्या सहा खंडांचे संपादन केले. ‘कौन्सिल ऑफ सायंटिफिक ॲण्ड इंडस्ट्रियल रिसर्च’ने प्रकाशित केलेल्या ‘द ट्रिटाईज ऑफ इंडियन मेडिसिनल प्लॅन्ट्स’च्या सहा खंडांच्या त्या मुख्य संपादिका होत्या. यात जवळपास 700 औषधी वनस्पतींची माहिती देण्यात आली आहे. नागार्जुन पारितोषिक आणि सुवर्णपदक, इंडियन नॅशनल सायन्स अकादमीचे सदस्यत्व, शांतीस्वरूप भटनागर पारितोषिक, सर पी. सी. रे. पारितोषिक, हरी ओम ट्रस्टचे सर सी. व्ही. रामन पारितोषिक, प्रो. पी. के. बोस पारितोषिक, भारतीय विज्ञान काँग्रेसचे सर आशुतोष मुखर्जी स्मरणार्थ सुवर्णपदक असे गौरव त्यांना प्राप्त झाले. बेंगाल चेंबर्स ऑफ कॉमर्सने ‘वुमन ऑफ द ईयर’ म्हणून 1975 साली त्यांचा गौरव केला. याच वर्षी भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ हा पुरस्कार प्रदान केला. 1982 मध्ये त्यांची राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली. संशोधनाला वाहून घेतलेल्या या विज्ञानविदुषीने 23 नोव्हेंबर 2006 रोजी जगाचा निरोप घेतला.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026 वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविषय; 23 मार्च 2026

    March 23, 2026 वास्तू आणि वेध

    साप्ताहिक राशीभविष्य : 22 ते 28 मार्च 2026

    March 22, 2026 वास्तू आणि वेध
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    By Team AvaantarMarch 24, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 24 मार्च 2026; वार : मंगळवार भारतीय सौर :  03…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविषय; 23 मार्च 2026

    March 23, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 22 ते 28 मार्च 2026

    March 22, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 22 मार्च 2026

    March 22, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    संस्कार… माणुसकी आणि सहिष्णुतेचे!

    March 24, 2026

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 246
    • अवांतर 174
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 184
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn