दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 10 नोव्हेंबर 2025; वार : सोमवार
- भारतीय सौर : 19 कार्तिक शके 1947; तिथि : षष्ठी 24:07; नक्षत्र : पुनर्वसु 18:47
- योग : साध्य 12:04; करण : गरज 12:55
- सूर्य : तुळ; चंद्र : मिथुन 13:02; सूर्योदय : 06:41; सूर्यास्त : 18:02
- पक्ष : कृष्ण; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येकाचे प्रेम आणि सहकार्य लाभेल. परंतु आपला प्रभाव कमी होईल, असे काही कृत्य घडणार नाही, याकडे लक्ष द्या. वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवा. प्रकृती चांगली राहील. कुटुंबीय आणि मित्रांबरोबर आनंदी क्षण मिळवाल. तुम्हाला आज मानसिक शांततेचा अनुभव होईल.
वृषभ – सकारात्मक दृष्टिकोन आणि विश्वास यामुळे अवतीभवतीच्या लोकांवर प्रभाव पडण्याची शक्यता आहे. दीर्घकालीन अशी गुंतवणूक टाळा. मित्रमैत्रीणींबरोबर फिरायला जा आणि काही आल्हाददायक क्षण अनुभवा. आपल्या जोडीदाराच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याचा तुमच्या नातेसंबंधावर परिणाम होऊ शकतो.
मिथुन – पारंपरिक पद्धतीच्या गुंतवणूक योजनेत बचतीचे पैसे गुंतवलेत तर फायदा होईल. नोकरदारांनी कामावर लक्ष केंद्रीत करावे, अन्यथा वरिष्ठांची नाराजी ओढावू शकते. कुटुंबात संवाद साधताना शब्दांचा जपून वापर करा. कोणी दुखावले जाणार नाही, याची काळजी घ्या. आनंदाचे क्षण पालकांसोबत शेअर करा, पालकांना थोडे बरे वाटेल.
कर्क – चांगल्या गोष्टी घेण्यासाठी तुमचे मन सज्ज राहील. जमीन सौद्यासाठी अनुकूल दिवस आहे, चांगला फायदा होऊ शकतो. जोपर्यंत एखादी गोष्ट पूर्ण करण्याची खात्री नसेल तोपर्यंत कोणताही वायदा करू नका. कर आणि विमाविषयक कामकाजाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. जोडीदार आज तुमची जास्त काळजी घेईल.
सिंह – कुटुंबीय आणि मित्रमंडळींकडून पाठिंबा मिळाल्याने आज तुम्ही उत्साहाने आणि आत्मविश्वासाने वाटचाल कराल. आपले दु:ख बर्फाप्रमाणे वितळून जाईल. आपल्या व्यवसायात स्थिरस्थावर झालेल्या अनुभवी लोकांशी जवळीक साधा, ते तुम्हाला भविष्याची दिशा दाखवतील. घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल.
हेही वाचा – हत्तीचे स्मशान!… वास्तव काय?
कन्या – काही महत्त्वाच्या योजना मार्गी लागल्यामुळे आपणास नव्याने अर्थसहाय्य उपलब्ध होईल. तुमच्या प्रयत्नांमुळे कामाच्या ठिकाणी तुमची विशेष दखल घेतली जाईल. हट्टीपणाने सुखाच्या मागे धावताना वेळेचा अपव्यय होत असल्याचे लक्षात घ्या. प्रवास-करमणुकीचाही योग असून त्यानिमित्त नवीन ओळखी होतील.
तुळ – नवीन करार लाभदायक वाटण्याची शक्यता आहे, पण अपेक्षेनुसार लाभ होण्याची शक्यता कमी आहे. पैसे गुंतवताना घाईगडबडीने कोणताही निर्णय घेऊ नका. वादविवाद किंवा कार्यालयातील राजकारण, तुम्ही या सगळ्याला पुरून उराल. तुमच्या कामाची स्तुती होईल. काही जातकांना जुन्या मित्रांशी गाठीभेटी घेता येतील.
वृश्चिक – अत्यंत व्यग्र दिवस असेल. इतर दिवसांपेक्षा आजचा दिवस आर्थिक दृष्टीने चांगला राहील, पर्याप्त धन प्राप्ती होईल. चांगल्या करिअरसाठी निवडलेला पर्याय वास्तवात आणण्याचा प्रयत्न कराल. पण तत्पूर्वी आपल्या पालकांना त्याबाबत कल्पना द्या, अन्यथा नंतर ते आक्षेप घेतील. सकारात्मक विचारांच्या आणि पाठिंबा देणाऱ्या मित्रांना विश्वासात घ्या.
धनु – कोणाच्याही मदतीविना तुम्ही धन कमावण्यात सक्षम आहात, फक्त स्वतःवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे. तुम्ही केलेल्या चांगल्या कामाबद्दल आज कामाच्या ठिकाणी तुमचा सन्मान केला जाईल. नोतवाईक आणि मित्रमंडळींकडून अनपेक्षितपणे भेटवस्तू मिळतील. स्वास्थही उत्तम राहील.
मकर – लहान व्यवसाय करणाऱ्या जातकांना आज तोटा होऊ शकतो. तथापि, घाबरण्याची आवश्यकता नाही जर तुमची मेहनत योग्य दिशेत आहे तर, चांगले फळ नक्कीच मिळेल. कोणताही निर्णय घेण्याआधी संतुलित विचार करा. मित्राबाबत गैरसमज झाल्याने बिकट प्रसंग उद्भवू शकतो, काळजी घ्या. घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल.
कुंभ – आहार नियंत्रणात ठेवा आणि तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम करा. दुसऱ्यांच्या सल्ल्यावर विश्वास ठेवून गुंतवणूक केलीत तर आर्थिक तोटा होण्याची शक्यता आहे. तुमच्या मनमिळावू स्वभावामुळे कामाच्या ठिकाणी तुमचा मत्सर करणारे मवाळ होतील. तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत एक आरामदायी दिवस घालवाल.
हेही वाचा – कथालेखक आणि कथाकथनकारांचा शोध
मीन – तुमच्या विचारांवर ज्यांचा असाधारण प्रभाव आहे, अशा विशेष व्यक्तीची ओळख मित्रामुळे होऊ शकते. शेअर बाजारातील गुंतवणुकीतून तोटा होण्याची शक्यता आहे, त्यामुळे व्यवहारात सावधगिरी बाळगा. गुपचूप केलेले व्यवहार तुमच्या प्रतिष्ठेला बाधा आणू शकतात. उदार आणि स्नेहपूर्वक वागण्याचा कोणी गैरफायदा घेत नाहीत ना, हे पाहणे अत्यंत गरजेचे आहे.
दिनविशेष
कथालेखिका आणि समीक्षक कुसुमावती देशपांडे
टीम अवांतर
प्रसिद्ध मराठी कथालेखिका आणि समीक्षक कुसुमावती देशपांडे यांचा जन्म 10 नोव्हेंबर 1904 रोजी अमरावती येथे झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव कुसुम जयवंत होते. मुंबई, नागपूर व लंडन विद्यापीठांत शिक्षण. बी. ए. (ऑनर्स) झाल्यावर नागपूर महाविद्यालयात (पूर्वीच्या मॉरिस कॉलेजात) 1931 ते 1955पर्यंत इंग्लिशचे अध्यापन केले. श्रेष्ठ मराठी कवी अनिल (आ. रा. देशपांडे) यांच्याशी त्यांचा 1929 मध्ये प्रेमविवाह झाला. उभयतांच्या प्रेमजीवनाचे दर्शन घडविणारा पत्रव्यवहार कुसुमानिल (1972) या नावाने प्रसिद्ध झालेला आहे. दीपकळी (1935), दीपदान (1941), मोळी (1946), दीपमाळ (1958), असे त्यांचे चार लघुकथासंग्रह प्रकाशित झाले. देशपांडे यांचे मराठी साहित्यावरील समीक्षात्मक निबंध 1954 मध्ये साहित्य अकादमीने ‘मराठी कादंबरीचे पहिले शतक’ या नावाने दोन खंडांमध्ये प्रकाशित केले. मराठी कादंबरीचा टीकात्मक इतिहास, तिच्यातील प्रवृत्तींचे तसेच परंपरांचे स्पष्टीकरण आणि कादंबरी या साहित्यप्रकाराच्या अंतिम मूल्यांचे दिग्दर्शन त्यात आढळते. त्यांनी लहान मुलांसाठीही लिहिले आहे. त्यापैकी थेंबाची गोष्ट पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाली. ‘साहित्य अकादेमी’ च्या त्या सभासद होत्या. ग्वाल्हेरला 1961 मध्ये भरलेल्या त्रेचाळिसाव्या मराठी साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. 17 नोव्हेंबर 1961 रोजी नवी दिल्ली येथे हृदयविकाराने त्यांचे निधन झाले.


