Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 10 मे 2026

    May 10, 2026

    प्रसादची हीच ती सखी!

    May 10, 2026

    वाचनातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ

    May 9, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, May 10
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 27 सप्टेंबर 2025
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 27 सप्टेंबर 2025

    Team AvaantarBy Team AvaantarSeptember 27, 2025No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    आज, दिनांक : 27 सप्टेंबर 2025; वार : शनिवार

    भारतीय सौर : 05 आश्विन शके 1947; तिथि : पंचमी 12.03; नक्षत्र : अनुराधा 25:07

    योग : प्रीति 23:44; करण : कौलव 25:16

    सूर्य : कन्या; चंद्र : वृश्चिक; सूर्योदय : 06:28; सूर्यास्त : 18:30

    पक्ष : शुक्ल; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन

    संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127

    सूर्याचा हस्त नक्षत्र प्रवेश

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    आजचे राशीभविष्य

    मेष – आज शुभ संयोग घडून येतील. मध्यरात्रीनंतर होणारा चंद्राचा वृश्चिक राशीतला प्रवेश तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेला बळकटी देईल, तसेच एखाद्या शुभ कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी देईल. दुपारनंतर व्यवसायाशी संबंधित एखादा मोठा करार होण्याची शक्यता आहे. सरकारी पातळीवर किंवा उच्चपदस्थांकडून विशेष सन्मान मिळू शकेल.

    वृषभ – वृषभ राशीचे जातक नवीन योजनांवर लक्ष केंद्रित करतील. आज एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याची संधी मिळू शकते, ज्यामुळे मनाला शांती मिळेल. एखाद्या कायदेशीर वादातही यश मिळू शकते. दिवसभरात एखाद्या गुंतागुंतीच्या प्रश्नाला तोंड द्यावे लागू शकते. ऑफिसचे वातावरण अनुकूल असेल आणि सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल.

    मिथुन – आजचा दिवस सर्जनशील कामांसाठी उत्तम आहे. तुम्हाला मनःशांती मिळेल आणि आवडती कामे पूर्ण करण्याची भरपूर संधी मिळेल. आज नवीन सकारात्मक कल्पनाही मनात येऊ शकतात. एखाद्या समस्येबाबत वरिष्ठांकडून मार्गदर्शन घेणे शहाणपणाचे ठरेल.

    कर्क – प्रत्येक काम समर्पण आणि कठोर परिश्रमाने करण्याचा दिवस आहे. याचे तत्काळ परिणाम दिसू शकतात. अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण होतील आणि काही महत्त्वाच्या बाबींवर वरिष्ठांशी चांगली चर्चा होऊ शकते. कार्यालयामध्ये दिवस चांगला जाईल. दिवसाच्या अखेरीस एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल.

    सिंह – आजचा दिवस व्यग्र राहील. तरीही, आध्यात्मिक सराव आणि अभ्यासासाठी वेळ काढणे फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून काही अडचणी येऊ शकतात, ते तुमच्या कामात काही अडथळे निर्माण करू शकतात, परंतु तुम्ही धीर धरला पाहिजे. संध्याकाळ एखाद्या शुभ कार्यात घालवली जाईल.

    हेही वाचा – ताडोबा आणि वाघोबा…

    कन्या – कन्या राशीच्या जातकांना संभाषण करताना संयम आणि सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. आजूबाजूच्या लोकांशी काही वाद होऊ शकतात, म्हणून जास्त काळजीपूर्वक शब्दांचा वापर करा. काही शुभ आणि धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन करू शकता. आज नशीब तुमच्या बाजूने असू शकते. काही दीर्घकाळ प्रलंबित कामांमध्येही प्रगती होऊ शकते.

    तुळ – आजचा दिवस फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी जुने वाद मिटू शकतील. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. मालमत्ता किंवा जमिनीशी संबंधित बाबी तुम्हाला त्रास देऊ शकतात. कुटुंबातील सदस्य किंवा शेजारी यांच्यामुळे तणावाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आपल्या कामावर लक्ष केंद्रित करून शहाणपणाने वागण्याची आवश्यकता असेल.

    वृश्चिक – आज देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर असेल. आर्थिकदृष्ट्या दिवस शुभ राहील. आज दिवसभर नफा मिळवण्याच्या संधी मिळत राहतील. कौटुंबिक स्तरावर आनंद आणि स्थिरता असेल. व्यवसायात किंवा नोकरीत काहीतरी नवीन करण्याची संधी मिळू शकते, ज्यामुळे भविष्यात मोठा फायदा होऊ शकेल.

    धनु – आज सावधगिरी आणि विवेकाने वागावे लागेल. कमी जोखीम असलेल्या व्यवसायात लक्षणीय नफा मिळण्याची शक्यता आहे. नवीन उपक्रम राबवणे फायदेशीर ठरू शकते. जवळच्या व्यक्तीसाठी पैशांची व्यवस्था करावी लागण्याची शक्यता आहे. आज एक सर्वोत्तम संधी समोर येणार आहे, मात्र ती तुम्ही ओळखली पाहिजे.

    मकर – मकर राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. भागीदारीतील व्यवसाय नफा मिळवून देऊ शकतो. आजच्या दिवसात दैनंदिन घरकामाशी निगडीत बाकीची कामे पूर्ण करून घ्या, जेणेकरून पुढच्या आठवड्यातील दगदग कमी होईल. कायदेशीर नियमांचे पालन करा आणि कामात प्रामाणिक रहा. तुमच्या मल्टीटास्किंग स्वभावामुळे चिंता वाढू शकते.

    कुंभ – आज आरोग्याबाबत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. बदलत्या हवामानामुळे शारीरिक स्वास्थ्य बिघडू शकते. त्यामुळे खाण्याच्या सवयींबाबतचा निष्काळजीपणा टाळा. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला राहील. घाईघाईने घेतलेला निर्णय त्रासदायक ठरू शकतो. त्यामुळे विचार न करता कोणताही निर्णय घेणे टाळा.

    हेही वाचा – दुसरा दु:खी, आपण सुखी!

    मीन – मीन राशीसाठी आजचा दिवस फायदेशीर ठरेल. व्यवसायात विचारपूर्वक निर्णय घेतल्यास त्याचे सकारात्मक परिणाम मिळू शकतात. संयमाने आणि नम्रतेने कोणतीही समस्या सोडवू शकता. आज, असे काही साध्य करू शकता जे तुम्ही यापूर्वी कधीही साध्य केले नसेल. गरजू व्यक्तीला मदत करणे शुभ ठरेल.


    दिनविशेष

    ठुमरी गायिका शोभा गुर्टू

    टीम अवांतर

    प्रसिद्ध ठुमरी गायिका शोभा गुर्टू यांचा जन्म 8 फेब्रुवारी 1925 रोजी शिरोडकर या सांगीतिक परंपरा असणाऱ्या घराण्यात बेळगाव (कर्नाटक) येथे झाला. आई मेनकाबाई शिरोडकर या नृत्य आणि गायन करीत. त्यांनी उस्ताद भूर्जीखाँ यांच्याकडून जयपूर-अत्रौली घराण्याचे संगीताचे धडे घेतले. शिवाय, त्या ठुमरी गायकही होत्या, त्यामुळे भानुमतींना (शोभा गुर्टू यांचे माहेरचे नाव) लहानपणापासून आईकडून गाण्याचे बाळकडू मिळाले. पुढे जयपूर घराण्याचे नत्थनखाँ यांच्याकडे ख्यालाचे तर, घम्मनखा यांच्याकडे ठुमरी, दादरा, गझल आणि अन्य उपशास्त्रीय संगीताचे शिक्षण भानुमतींनी घेतले. त्यांचा विवाह बेळगाव पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी आणि संगीतातील विद्वान आणि सतारवादक नारायणराव गुर्टू यांचा मुलगा विश्वनाथ गुर्टू यांच्याशी झाला. विवाहानंतर त्या शोभा गुर्टू झाल्या. ठुमरी, दादरा, कजरी, सावन, झुला, चैती, फाग, होरी, बारामासा, मांड असे विविध संगीतप्रकार त्या कुशलतेने गात. तसेच, गझल आणि भजन हे गानप्रकारही त्या अत्यंत भावपूर्ण रीतीने सादर करीत. सुरुवातीला त्या रागदारीमधील एखादी बंदिशही गात असत. बेगम अख्तर यांच्या गायनाचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. ‘छोटी अख्तरी’ असेही त्यांना संबोधले गेले. त्यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले. तांबडी माती, सहकार सम्राट, धन्य ते संताजी धनाजी, कलावंतीण आणि झाकोळ  या मराठी चित्रपटांकरिता त्यांनी पार्श्वगायन केले. हिंदीमध्ये त्यांनी पाकीजा या चित्रपटाकरिता पहिल्यांदा पार्श्वगायन केले. याशिवाय ‘मैं तुलसी तेरे आँगन की’ या चित्रपटात गायलेली ‘सैय्याँ रूठ गये में मनाऊँ कैसे’ ही ठुमरी विशेष प्रसिद्ध झाली. या गाण्यास फिल्मफेअर पुरस्काराचे नामांकनही मिळाले होते. त्यांनी देशविदेशात अनेक ठिकाणी ठुमरीचे कार्यक्रम सादर केले. त्यांच्या सांगीतिक कार्यकर्तृत्वाला अनेक मानसन्मान लाभले. त्यापैकी संगीत नाटक अकादमी पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार, लता मंगेशकर पुरस्कार आदी सन्मान उल्लेखनीय. पंडित बिरजू महाराज यांच्याबरोबर त्यांनी गायनाचे अनेक कार्यक्रम केले. सरला भिडे, शुभा जोशी, धनश्री पंडित, बिरेश्वर गौतम ही त्यांची शिष्यमंडळी त्यांची परंपरा पुढे नेत आहेत. शोभा गुर्टू यांचे मुंबई येथे 27 सप्टेंबर 2004 रोजी निधन झाले.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 10 मे 2026

    May 10, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 मे 2026

    May 9, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 मे 2026

    May 8, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 10 मे 2026

    By Team AvaantarMay 10, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 10 मे 2026; वार : रविवार भारतीय सौर : 20…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 मे 2026

    May 9, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 मे 2026

    May 8, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 07 मे 2026

    May 7, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 10 मे 2026

    May 10, 2026

    प्रसादची हीच ती सखी!

    May 10, 2026

    वाचनातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ

    May 9, 2026

    वाढत चाललेला गुंता अन्…

    May 9, 2026

    बालपणीचा मैतर पांडूची गोष्ट

    May 9, 2026

    Dnyaneshwari : ज्या मज संहाररुद्र वासिपे, ज्या मजभेणें मृत्यु लपे

    May 9, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 292
    • अवांतर 185
    • आरोग्य 109
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 413
    • फिल्मी 48
    • फूड काॅर्नर 204
    • मैत्रीण 18
    • ललित 613
    • शैक्षणिक 79
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 10 मे 2026

    May 10, 2026

    प्रसादची हीच ती सखी!

    May 10, 2026

    वाचनातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ

    May 9, 2026
    Most Popular

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 10 मे 2026

    May 10, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.