प्राजक्ता अनंत काथे
(ज्योतिष शास्त्री आणि होरा मार्तंड)
मेष
हा आठवडा तुमचा आत्मविश्वास आणि उत्साह वाढवणारा आहे. आर्थिक प्रगती होईल. वरिष्ठांचे सहकार्य मिळू शकेल. कुटुंबातील सगळ्यांबरोबर वेळ घालवू शकाल. तब्येतीची काळजी घ्या, पथ्य पाळा. महिलांनी मुलांना समजून घ्यावे, त्यांच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे. विद्यार्थ्यांच्या मनाप्रमाणे गोष्टी घडतील, प्रामाणिक प्रयत्न करा.
वृषभ
या आठवड्यात आर्थिक लाभ आणि मानसिक समाधान मिळू शकेल. व्यवसायात प्रगती होईल. नवीन मित्र आणि ओळखीने फायदा होण्याची शक्यता आहे. आरोग्य उत्तम राहील. प्रवास करावा लागेल. संयम आणि सकारात्मक धोरण ठेवावे लागेल. या राशीच्या महिलांच्या मैत्रिणींबरोबर भेटीगाठी होतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासात शिस्त बाळगावी, यश नक्की मिळेल.
मिथुन
या आठवड्यात उत्तम घडामोडी घडू शकतील. मित्र आणि सहकाऱ्यांचे चांगले सहकार्य मिळू शकेल. नातेवाईकांशी संवाद साधू शकाल. आईकडून मार्गदर्शन मिळेल आणि ते फायदेशीर असेल. महिलांना धाकट्या भावंडांची काळजी राहील. विद्यार्थी वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतील, तुमचे विचार योग्य प्रकारे मांडू शकाल.
कर्क
या आठवड्यात करिअरमध्ये स्थिरता येईल. वरिष्ठांकडून कौतुक होण्याची शक्यता आहे. नातेसंबंध आणखी दृढ होतील. आर्थिक प्रश्न सुटू शकतील. आरोग्याबाबत काळजी घ्या. जुने आजार परत बळावू शकतात, पथ्ये पाळा. महिलांना मनाप्रमाणे खरेदी करता येईल, आनंदी राहाल. विद्यार्थ्यांनी घरात वाद घालू नये, संयम बाळगावा.
सिंह
हा आठवडा यशदायी ठरू शकेल. नवे प्रकल्प, योजना पूर्णत्वास नेऊ शकाल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान मिळण्याची खूप शक्यता आहे. आर्थिक लाभ मिळू शकेल. आरोग्य उत्तम राहील. महिलांच्या बाबतीत नातेसंबंध उत्तम राहतील. प्रवास आनंददायी होऊ शकेल. विद्यार्थ्यांना कल्पना साकार होण्यास मदत मिळेल, केलेल्या कामाचे समाधान मिळेल.
हेही वाचा – निरामय आरोग्यासाठी पैशाचा यथायोग्य विनियोग आवश्यक
कन्या
या आठवड्यात संयमाने आणि विचारपूर्वक निर्णय घेणे गरजेचे आहे. कामात सातत्य ठेवावे लागेल. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. महिलांनी नात्यात संयम ठेवावा, कुटुंबात शांतता राहील. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आत्मपरीक्षण आणि ध्येय ठरवण्यासाठी योग्य काळ आहे.
तुळ
या आठवड्यात कामात संतुलन राखल्यास यश नक्की मिळू शकेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मित्रपरिवाराबरोबर वेळ घालवू शकाल, आनंदी राहाल. महिलांचे आरोग्य चांगले राहील. घरगुती वातावरण आनंदी राहील. विद्यार्थ्यांना कला क्षेत्रात उत्तम वाव मिळेल, यशाचा आनंद मिळेल.
वृश्चिक
या आठवड्यात साहस आणि धाडस करू शकाल. त्यामुळे आत्मविश्वास वाढू शकेल. प्रवास कराल, प्रवासात वेगवेगळे अनुभव मिळू शकतात. विरोधकांपासून सावध राहावे. महिलांना नातेसंबंधात ताण जाणवेल. संवाद साधून प्रश्न सोडवा. विद्यार्थी महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतील, सातत्याने यश मिळेल.
धनु
या आठवड्यात वैज्ञानिक क्षेत्रात प्रगती होऊ शकेल. आरोग्य चांगले राहील. आर्थिक प्रगती होऊ शकेल. कामातील आव्हाने सहजरित्या पूर्ण करू शकाल. महिलांचा सामाजिक कार्यातील सहभाग वाढेल. विद्यार्थ्यांना नवीन स्वप्ने साकार होताना दिसतील.
मकर
या आठवड्यात कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. संयमाने परिस्थिती हाताळली तर, यश मिळेल. आर्थिकबाबतीत जपून वागा. आरोग्याकडे लक्ष द्या. थकवा जाणवू शकतो. महिलांच्या बाबतीत नातेसंबंधांमध्ये मतभेद संभवतात. कामात शिस्त पाळा. विद्यार्थ्यांना केलेल्या कामाचे श्रेय मिळेल, मेहनत करा.
कुंभ
या आठवड्यात नोकरी-व्यवसायात नवीन प्रयोग यशस्वी होतील. आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य सुधारेल. मित्रांशी मतभेद टाळा. महिलांचा कामातील उत्साह वाढण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांच्या नवीन योजनांना गती मिळेल. अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतील.
हेही वाचा – दांडूमारम्मा मंदिर… वर्षातून फक्त नवरात्रीतच होते देवीची पूजा!
मीन
या आठवड्यात कामात यश मिळू शकेल. सगळी कामे पटापट होतील. अडकलेले पैसे मिळतील. प्रवास घडेल, प्रवासात आनंद मिळू शकेल. आत्मिक समाधान मिळू शकेल. महिला नवीन संधी आणि कल्पना हाती घ्यावी. विद्यार्थ्यांना मित्राचा आधार मिळण्याची शक्यता आहे, आनंदी राहाल.