Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    आयुष्य… एक वाहता प्रवाह!

    November 25, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : आगी लगलिया रुखीं, देखोनि सैरा पळती पक्षी

    November 25, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 नोव्हेंबर 2026

    November 25, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, November 25
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 04 सप्टेंबर 2025
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 04 सप्टेंबर 2025

    Team AvaantarBy Team AvaantarSeptember 4, 2025No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, दर्शन कुलकर्णी, कुंडली, राशीभविष्य, आजचे राशीभविष्य, ज्योतिष
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 04 सप्टेंबर 2025; वार : गुरुवार
    • भारतीय सौर : 13 भाद्रपद शके 1947; तिथि : द्वादशी 28:07; नक्षत्र : उत्तराषाढा 23:43
    • योग : सौभाग्य 15:20; करण : बव 16:19
    • सूर्य : सिंह; चंद्र : मकर; सूर्योदय : 06:23; सूर्यास्त : 18:51
    • पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन
    • संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127

    वामन जयंती

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    आजचे राशीभविष्य

    मेष – दिवस आनंदाचा असेल. एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. आर्थिक लाभाच्या संधी वाढतील. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल, त्यामुळे मनोबल वाढेल. नवीन नोकरीच्या संधीही फायदेशीर ठरतील. काही व्यवसायांमधील जातकांना चांगला नफा मिळू शकेल, परंतु काही शत्रू काम बिघडवण्याचा प्रयत्नही करतील. आरोग्य चांगले राहील.

    वृषभ – दिवस फारसा चांगला जाणार नाही. नुकसान होण्याची शक्यता आहे. काही बाबतीत संयम बाळगण्याची आवश्यकता आहे. बोलण्यावरही नियंत्रण ठेवावे लागेल. कामाच्या ठिकाणी अनेक प्रकारचे अडथळे येऊ शकतात, त्यामुळे सांभाळून निर्णय घ्या. आर्थिक परिस्थितीत मात्र काही ठळक बदल दिसून येतील. गुंतवणुकीशी संबंधित बाबींमध्ये खूप विचारपूर्वक पावले उचलावी लागतील. कौटुंबिक जीवन चांगले असेल.

    मिथुन – आज नवीन संधी उपलब्ध होतील. कामामुळे दिवसभर व्यग्र रहाल. नफ्याच्या संधी वाढतील, पण अनावश्यक खर्च टाळावे लागतील. नोकरदार जातकांसाठी प्रगतीचे चांगले संकेत आहेत. कोणीतरी आर्थिक मदत मागण्यासाठी येऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल.

    कर्क – दिवस चांगला असेल. आर्थिक स्थिती मजबूत असेल. नोकरदारांना पदोन्नती आणि पगारवाढीचा फायदा मिळू शकतो. आज भागीदारी करणे टाळा, अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते.  व्यावसायिकांना नवीन करार मिळू शकतो, जो भविष्यात फायदेशीर ठरेल. जोडीदाराशी मतभेदाची परिस्थिती निर्माण होऊ शकते.

    सिंह – दिवस अनुकूल असेल. जुन्या गुंतवणुकीतून चांगले फायदे मिळतील. आर्थिक परिस्थितीत लक्षणीय बदल होईल. परंतु व्यवहाराच्या बाबतीत डोळे आणि कान उघडे ठेवावे लागतील. ज्यांना अनेक दिवसांपासून परदेशात जाऊन शिक्षण घ्यायचे आहे, त्यांची इच्छा पूर्ण होईल. संध्याकाळी जोडीदारासोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लॅन बनवू शकता.

    कन्या – दिवस खूप शुभ ठरेल. नफ्याच्या संधींमध्ये वाढ होईल. कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस खूप अनुकूल असेल. विवाहोत्सुकांसाठी चांगले स्थळ चालून येईल. आरोग्य चांगले राहील. मात्र खाण्यापिण्यातला निष्काळजीपणा टाळा. ज्यांच्यावर काही कर्ज आहे , आज त्यातून मुक्त होऊ शकतात.

    हेही वाचा – नात्यांची दिवाळी

    तुळ – आत्मविश्वास वाढेल. व्यक्तिमत्त्वात सुधारणा होईल. काही नवीन प्रकल्प मिळू शकतात. आर्थिक स्थिती सुधारेल. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. जोडीदाराचा भक्कम पाठिंबा मिळेल. आरोग्याच्या छोट्या-मोठ्या कुरबुरी सुरू राहतील. सामाजिक संपर्क वाढेल, त्यांचा भविष्यात फायदा होईल.

    वृश्चिक – आज एखाद्याशी जोरदार वाद होण्याची शक्यता आहे. शत्रूपक्ष वर्चस्व गाजवण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. अशा परिस्थितीत सगळ्याच बाबतीत खूप विचारपूर्वक पावले उचलावी लागतील. अर्थात, धैर्य आणि आत्मविश्वासात वाढ होईल. आर्थिक बाबतीतही विचारपूर्वक निर्णय घ्या. कौटुंबिक जीवनात आनंद आणि समृद्धीचा अनुभव येईल.

    धनु – वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद मिळतील. अनेक दिवसांपासून जे काम पूर्ण होत नव्हते, ते पूर्ण होण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसायात नफा मिळण्याच्या संधी वाढतील. कोणत्याही प्रकारच्या आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत असेल तर, आता त्यातून सुटका होईल.  नात्यांमधील प्रेम अबाधित राहील.

    मकर – नवीन जबाबदाऱ्या अंगावर पडतील. नोकरदार जातकांना कामाच्या ठिकाणी नवीन आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगावी लागेल. एखाद्या जुन्या मित्राची भेट होईल. आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये सावधगिरी बाळगावी लागेल.

    कुंभ – नवीन संधी मिळतील. नोकरदार जातकांना पदोन्नती मिळू शकते, ज्यामुळे आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा दिसेल. मात्र खर्चावरही नियंत्रण ठेवावे लागेल. अनावश्यक खर्च टाळावे लागतील. वैवाहिक जीवनात जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. संततीच्या मागण्यांकडे विशेष लक्ष द्यावे लागेल.

    मीन – आजचा दिवस संमिश्र असेल. कामाच्या ठिकाणी जास्त मेहनत करावी लागू शकते. आर्थिक बाबतीत काळजी घ्यावी लागेल. नवीन संधी मिळण्याची प्रक्रिया सुरू राहील. जे बेरोजगार आहेत त्यांना चांगल्या नोकरीच्या संधी मिळू शकते. नोकरदार जातकांना काही अतिरिक्त जबाबदारी सांभाळावी लागेल.

    हेही वाचा – मुकी होत चाललेली घरे


    दिनविशेष

    हिंदी साहित्यिक धर्मवीर भारती

    टीम अवांतर

    आधुनिक हिंदी साहित्यिक आणि धर्मयुग या हिंदी साप्ताहिकाचे 27 वर्षे संपादकपद सांभाळणारे धर्मवीर भारती यांचा जन्म 25 डिसेंबर 1926 रोजी अलाहाबाद येथे झाला. 1945 मध्ये बी. ए. परीक्षेत हिंदी विषयात सर्वप्रथम येऊन त्यांनी ‘चिंतामणी घोष पदक’ मिळवले. 1947 मध्ये ते प्रथम श्रेणीत एम्. ए. झाले. पुढे धीरेंद्र वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सिद्ध साहित्य’ या विषयावर संशोधन करून त्यांनी पी. एचडी. मिळवली. अभ्युदय पत्रिकेत अर्धवेळ नोकरी करून त्यांनी शिक्षण घेतले. प्रयाग विश्वविद्यालयात हिंदीचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. 1960 पर्यंत तेथे कार्य केल्यावर धर्मयुग या प्रसिद्ध साप्ताहिकाचे संपादक म्हणून ते मुंबईस आले आणि तेव्हापासून पुढे 27 वर्षे धर्मयुगमध्येच प्रमुख संपादक या नात्याने कार्यरत होते.  धर्मवीर भारती बहुमुखी प्रतिभेचे लेखक होते. मात्र मुख्यतः ते कवी म्हणून प्रख्यात होते. 1955 साली त्यांनी लिहिलेले नाटक ‘अंधायुग’  हिंदी साहित्यात एक मैलाचा दगड मानले जाते. कौरव आणि पांडवांमध्ये झालेल्या अंतिम युद्धाची समाप्ती आणि त्यानंतरची जीवनात आलेली मूल्यभ्रष्टता तसेच दारुण दुःख ही या पद्यनाटकाची पार्श्वभूमी आहे. पण यातून भारतींनी स्वातंत्र्यानंतर भारतात निर्माण झालेल्या दारुण आणि शोकजनक परिस्थितीचा वेध घेतला आहे. तर कनुप्रियामध्ये राधेच्या उत्कट प्रणयभावनेतील वेदना व्यक्त करण्यात त्यांच्यातील कवीला कमालीचे यश लाभले. याखेरीज, मुर्दों का गांव, चांद और टूटे हुए लोग, बंद गली की आखिरी मकान हे तीन कथासंग्रह, ऐन पंचविशीत लिहिलेली गुनाहों का देवता किंवा त्यानंतरची सूरज का सातवां घोडा या कादंबऱ्यांमुळे त्यांच्यातील  प्रयोगशील लेखकाची नवी ओळख वाचकांनी झाली. ठेले पर हिमालय, कहनी अनकहनी, पश्यंती हे त्यांचे निबंध संग्रहही वाचकप्रिय झाले. धर्मवीर भारतींनी हिंदी साहित्यातील नव्या वैचारिक तसेच साहित्यिक चळवळीत सक्रिय भाग घेतला आणि नव्या साहित्याच्या प्रतिष्ठापनेसाठी विचारांची बैठक प्राप्त करून दिली. अशा या साक्षेपी साहित्यिक, संपादकाचे 4 सप्टेंबर 1997 रोजी निधन झाले.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 नोव्हेंबर 2026

    November 25, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 नोव्हेंबर 2026

    November 24, 2026 पंचांग आणि भविष्य

    जन्मकुंडलीतील 1ला भाव: जीवनाचा सखोल आरसा

    November 23, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 नोव्हेंबर 2026

    By Team AvaantarNovember 25, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 25 नोव्हेंबर 2026; वार : बुधवार भारतीय सौर : 04…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 नोव्हेंबर 2026

    November 24, 2026

    जन्मकुंडलीतील 1ला भाव: जीवनाचा सखोल आरसा

    November 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 नोव्हेंबर 2026

    November 23, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    आयुष्य… एक वाहता प्रवाह!

    November 25, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : आगी लगलिया रुखीं, देखोनि सैरा पळती पक्षी

    November 25, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 नोव्हेंबर 2026

    November 25, 2026

    री-लॉगइन

    November 24, 2026

    अशी ही वटपौर्णिमा!

    November 24, 2026

    आनंदाची दिवाळी की मुक्या प्राण्यांच्या वेदना?

    November 24, 2026

    POPULAR CATEGORY

    [category_count_style]
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtra

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    आयुष्य… एक वाहता प्रवाह!

    November 25, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : आगी लगलिया रुखीं, देखोनि सैरा पळती पक्षी

    November 25, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 नोव्हेंबर 2026

    November 25, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.