Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    संस्कार… माणुसकी आणि सहिष्णुतेचे!

    March 24, 2026

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 27 ऑगस्ट 2025
    वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 27 ऑगस्ट 2025

    Team AvaantarBy Team AvaantarAugust 27, 2025No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    आज, दिनांक : 27 ऑगस्ट 2025; वार : बुधवार

    भारतीय सौर : 05 भाद्रपद शके 1947; तिथि : चतुर्थी 15:43; नक्षत्र : चित्रा अहोरात्र

    योग : शुभ 12:33; करण : बव 28:48

    सूर्य : सिंह; चंद्र : कन्या 19:20; सूर्योदय : 06:22; सूर्यास्त : 18:57

    पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन

    संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127

    श्रीगणेश चतुर्थी

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    आजचे राशीभविष्य

    मेष – सर्जनशीलता आणि भविष्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारण्यासाठी उत्तम दिवस आहे. वैयक्तिक ध्येयासाठी काम करत असाल किंवा करिअरमध्ये प्रगती करत असाल, तर मोठी स्वप्ने पाहण्याची आणि उच्च ध्येये गाठण्याची वेळ आली आहे.

    वृषभ – नशिबाची उत्तम साथ मिळणार आहे. आर्थिक निर्णय घेण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. शिस्त आणि चिकाटी यांची मोठी मदत मिळेल. स्वतःवर विश्वास ठेवा, जोखीम घेण्यास घाबरू नका.

    मिथुन – नियमित व्यायाम आणि आहाराबाबत विशेष काळजी घेत दिनचर्या निरोगी ठेवा. काही कारणांमुळे नैराश्य येत असेल तर, त्यासाठी समुपदेशकाची मदत घेण्यास अजिबात संकोच करू नका. ताण घेऊ नका.

    कर्क – ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ हे कर्क जातकांसाठी तंतोतंत लागू पडणारे आहे. चांगला लौकिक होईल, अशी एखादी मोठी कामगिरी तुमच्या हातून घडेल. तुम्ही करत असलेल्या प्रत्येक प्रयत्नांना यश मिळेल. एक नवा उत्साह अंगात संचारेल.

    सिंह – सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. तुमचे सामाजिक वर्तुळ सक्रिय आणि मदतीला धावून येणारे असेल, त्यामुळे तुमच्या निर्णयांबाबत अधिक आत्मविश्वास असेल. विवाहोत्सुक जातकांना जोडीदार भेटण्याची शक्यता आहे.

    कन्या – आज धनाची आवक वाढेल. फक्त ते लगेच खर्च करू नका. आलेल्या पैशांची लगेच गुंतवणूक करू नका. आज एखाद्या खास व्यक्तीबद्दल काळजी वाटेल. जोडीदाराला एखाद्या आवडत्या कामात मदत करा.

    हेही वाचा – पालकांची जबाबदारी : नीटनिटकेपणा अन् स्पर्धेसाठी प्रोत्साहन

    तुळ – आज आर्थिक परिस्थिती सकारात्मक असेल. कोणताही वाद, संघर्ष हे अंगभूत मुत्सद्देगिरी आणि निष्पक्षता यासारख्या गुणांचा वापर करून सहजपणे सोडवता येतील. आज जोडीदारासोबतचे संबंध खूपच सकारात्मक असतील.

    वृश्चिक – आज भौतिक सुखसोयींमध्ये वाढ होईल. त्यासोबत लहान वादही त्रास देऊ शकतात, त्यामुळे जिभेवर नियंत्रण ठेवा. जोखमीच्या गोष्टींमध्ये पैसे अजिबात गुंतवू नका, आर्थिक नुकसान होण्याची चिन्हे आहेत.

    धनु – शारीरिक आणि मानसिक संतुलन साधता येईल. इतरांशी दृढ संबंध निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे. निष्पक्षतेची तीव्र भावना ही करिअरच्या वाढीसाठी तुमची मोठी ताकद आहे. आरोग्य आणि आर्थिक परिस्थिती यात सकारात्मक वाढ होणार आहे.

    मकर – दैनंदिन जीवनात निरोगी सवयी आणि दिनचर्येचा समावेश करून सकारात्मक उर्जेचा फायदा घ्या. तुमच्या मूल्यांशी आणि आकांक्षांशी जुळणारी स्मार्ट, कॅल्युलेटीव्ह अशी गुंतवणूक करा. सकारात्मक संबंध निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करा.

    कुंभ – आज, स्वतःच्या दीर्घकालीन ध्येयांवर आणि प्राधान्यांवर लक्ष केंद्रित करा. स्वतःच्या तब्येतीची काळजी घेण्यास प्राधान्य द्या. संवादाचे महत्त्व समजून येईल. सकारात्मक, मंगलमय वातावरणाचा फायदा घेत, स्वतःच्या भावना मोकळेपणाने व्यक्त करायला लागा. खर्च कमी करा.

    मीन – या राशीच्या जातकांना इतके भान आहे की, ते कोणत्याही परिस्थितीला खूप चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकतात. यालाच जगण्याची कला म्हणतात. आरोग्याची काळजी घ्या. प्रेमाच्या बाबतीत नशिबाची उत्तम साथ मिळेल. संततीची प्रगती सामान्य असेल.

    हेही वाचा – एका संपाची कहाणी


    दिनविशेष

    इतिहास संशोधक सेतुमाधव पगडी

    टीम अवांतर

    इतिहास संशोधक, लेखक, वक्ते, तत्त्वचिंतक, समीक्षक, कार्यक्षम मुलकी अधिकारी, प्रशासक आणि महाराष्ट्र सरकारच्या ‘गॅझेटियर्स’चे संपादक अशी ओळख असणाऱ्या सेतुमाधव पगडी यांचा जन्म 27 ऑगस्ट 1910 रोजी निलंगा येथे झाला. गुलबर्गा, उस्मानाबाद आणि पुणे येथे शिक्षण झाल्यानंतर त्यांनी 1928 आणि नंतर 1930 मध्ये अनुक्रमे बनारस हिंदू विद्यापीठ, अलाहाबाद विद्यापीठ येथून कला पदवी प्राप्त केली. सतत सुरू असणारे संशोधन, लेखन, अभ्यास, प्रवास यांच्या मदतीने सातत्याने साठ वर्षे इतिहासाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून जवळपास मराठी आणि इंग्रजी भाषेत त्यांनी 66 ग्रंथ लिहिले. 1957 साली त्यांनी उर्दू भाषेचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. मराठ्यांच्या इतिहासासंबंधी फारसी कागदपत्रांचा अभ्यास आणि अनुवादाचे महत्त्वाचे काम त्यांनी पार पाडले. 1960 ते 70 या दशकात उर्दू आणि फारसी भाषेतील जवळपास 40 ग्रंथांचा अनुवाद त्यांनी केला. 1987मध्ये त्यांना मराठवाडा विद्यापीठाकडून D.Litt पदवी प्रदान करण्यात आली. 1992 साली भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कार त्यांना मिळाला. शिवाजी महाराजांवर त्यांनी लिहिलेले पुस्तक आजही प्रमाण मानले जाते. मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, फारसी अशा जवळपास 17 भाषा त्यांना अवगत होत्या. ‘जीवनसेतू’ हे आत्मचरित्र लिहिण्याआधी विविध भाषांमधील‌ किमान शंभर आत्मचरित्रे त्यांनी वाचून काढली. अशा या अभ्यासू संशोधकाचे 14 ऑक्टोबर 1994 रोजी निधन झाले.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026 वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविषय; 23 मार्च 2026

    March 23, 2026 वास्तू आणि वेध

    साप्ताहिक राशीभविष्य : 22 ते 28 मार्च 2026

    March 22, 2026 वास्तू आणि वेध
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    By Team AvaantarMarch 24, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 24 मार्च 2026; वार : मंगळवार भारतीय सौर :  03…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविषय; 23 मार्च 2026

    March 23, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 22 ते 28 मार्च 2026

    March 22, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 22 मार्च 2026

    March 22, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    संस्कार… माणुसकी आणि सहिष्णुतेचे!

    March 24, 2026

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 246
    • अवांतर 174
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 184
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn