Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 01 मे 2026

    May 1, 2026

    एप्रिल फूल… कोणी कोणाला केले?

    April 30, 2026

    नमन नटवरा… जयवंत सरांच्या निराशेचे कारण काय?

    April 30, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, May 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Dnyaneshwari : मोह धरिलिया ऐसें होईल । जे असती प्रतिष्ठा जाईल…
    अध्यात्म

    Dnyaneshwari : मोह धरिलिया ऐसें होईल । जे असती प्रतिष्ठा जाईल…

    Team AvaantarBy Team AvaantarAugust 18, 2025No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter Eleven, अकरावा अध्याय, अध्याय अकरावा,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ. स. 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.

    अध्याय दुसरा

    तो तूं कीं आजि एथें । सांडुनिया वीरवृत्तीतें । अधोमुख रुदनातें । करितु आहासी ॥12॥ विचारीं तूं अर्जुनु । कीं कारुण्यें कीजसी दीनु । सांग पां अंधकारें भानु । ग्रासिला आथी ॥13॥ ना तरी पवनु मेघासी बिहे । कीं अमृतासी मरण आहे । पाहें पां इंधनचि गिळोनि जाये । पावकातें ॥14॥ कीं लवणेंचि जळ विरे । संसर्गें काळकूट मरे । सांग महाफणी दर्दुरें । गिळिजे कायी ॥15॥ सिंहासी झोंबे कोल्हा । ऐसा अपाडु आथी कां जाहला ।

    परी तो त्वां साच केला । आजि एथ ॥16॥ म्हणोनि अझुनि अर्जुना । झणें चित्त देसी या हीना । वेगीं धीर करूनियां मना । सावधान होईं ॥17॥ सांडीं हें मूर्खपण । उठीं घे धनुष्यबाण । संग्रामीं हें कवण । कारुण्य तुझे ॥18॥ हां गा तू जाणता । तरी न विचारिसी कां आता । सांगे झुंजावेळें सदयता । उचित कायी ॥19॥ हे असतिये कीर्तीसी नाशु । आणि पारत्रिकासी अपभ्रंशु । म्हणे जगन्निवासु । अर्जुनातें ॥20॥

    क्लैब्यं मा स्म गमः पार्थ नैतत् त्वय्युपपद्यते । क्षुद्रं ह्रदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परतप ॥3॥

    म्हणोनि शोक न करीं । तूं पुरता धीरु धरीं । हे शोच्यता अव्हेरीं । पंडुकुमरा ॥21॥ तुज नव्हे हें उचित । येणें नासेल जोडलें बहुत । तूं अझुनिवरी हित । विचारी पां ॥22॥ येणें संग्रामाचेनि अवसरें । एथ कृपाळुपण नुपकरे । हे आतांचि काय सोयरे । जाहले तुज ॥23॥ तूं आधींचि काय नेणसी । कीं हे गोत्र नोळखसी । वायांचि काय करिसी । अतिशो आतां ॥24॥ आजिंचे हें झुंज । काय जन्मा नवल तुज । हें परस्परें तुम्हां व्याज । सदाचि आथी ॥25॥ तरी आतां काय जाहलें । कायि स्नेह उपनलें । हें नेणिजे परि कुडें केले । अर्जुना तुवां ॥26॥ मोह धरिलिया ऐसें होईल । जे असती प्रतिष्ठा जाईल । आणि परलोकही अंतरेल । ऐहिकेंसी ॥27॥ हृदयाचे ढिलेपण । एथ निकयासी नव्हे कारण । हें संग्रामीं पतन जाण । क्षत्रियांसी ॥28॥  ऐसेनि तो कृपावंतु । नानापरी असे शिकवितु । हे ऐकोनि पंडुसुतु । काय बोले ॥29॥

    हेही वाचा – Dnyaneshwari : मग धनुष्यबाण सांडिले । न धरत अश्रुपात आले…

    अर्थ

    तोच तू (अर्जुन), आज या वेळी आपली वीरवृत्ती टाकून, खाली मान घालून रडत आहेस. ॥12॥ विचार कर. तू अर्जुन आणि करुणेने तुला दीन करून सोडावे! सांग बरे, अंधकार सूर्याला कधी ग्रासील काय? ॥13॥ अथवा वारा मेघाला कधी भ्याला आहे का? किंवा अमृताला मरण आहे का? अरे विचार कर. लाकडूच अग्नीला गिळून टाकील का? ॥14॥ किंवा मिठाने पाणी विरेल का? दुसऱ्याच्या संसर्गाने कालकूट मरेल काय? सांग बरे, बेडूक महासर्पाला गिळील का? ॥15॥ कोल्हा सिंहाबरोबर झोंबी (लढाई) करील काय? असे अघटित कधी घडले आहे काय? पण तो अघटित प्रकार तू (मात्र) आज येथे खरा करून दाखविलास. ॥16॥ म्हणून, अर्जुना, अजून तरी या अनुचित गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस; तू लवकर आपल्या मनाला खंबीर करून सावध हो. ॥17॥ हा मूर्खपणा सोडून दे. ऊठ, धनुष्यबाण हाती घे, युद्धाच्या वेळी ही कोण करूणा तुझी? ॥18॥ अरे, तू जर चांगला जाणता आहेस; तर मग आता विचार करून का पाहात नाहीस? युद्धच्या वेळी कारुण्य उचित आहे काय? बोल. ॥19॥ जगन्निवास (पुढे) अर्जुनाला म्हणाला, (या वेळची तुझी दया) ही (तुझ्या) असलेल्या कीर्तीचा नाश करणारी आणि परलोकाला मुकवणारी आहे. ॥20॥

    हे पार्था, हा दुबळेपणाला प्राप्त होऊ नकोस; हा तुला शोभत नाही. असा हृदयाचा क्षुद्र ढिलेपणा टाकून देऊन, हे अर्जुना, (युद्धाला) उठ. ॥3॥

    म्हणून शोक करू नकोस; तू पुरता धीर धर; अर्जुना, हा खेद टाकून दे. ॥21॥ तुला हे योग्य नाही. (आजपर्यंत) जे काय पुष्कळ (यश वगैरे) तू जोडले आहेस, त्याचा यामुळे नाश होईल. तू अजून तरी आपल्या हिताचा विचार कर. ॥22॥ लढाईच्या या ऐन प्रसंगी कृपाळूपणा कामाचा नाही. हे तुझे आताच का सोयरे झाले आहेत? ॥23॥ यापूर्वीच तू हे जाणत नव्हतास का ? किंवा, या भाऊबंदांची ओळख तुला नव्हती का? आताच (त्यांच्याबद्दल) विनाकारण हा फाजील कळवळा का? ॥24॥ आजचे हे युद्ध तुला जन्मात नवीन का आहे? तुम्हा एकमेकांना लढावयास निमित्त हे नेहेमीचेच आहे. ॥25॥ मग आताच काय झाले ? ही ममता कोठून उत्पन्न झाली, हे मला काहीच कळत नाही; पण अर्जुना, वाईट केलेस तू. ॥26॥ अशी ममता धरल्यास असे होईल की, असलेला मोठेपणा जाईल आणि तू इहलोकासह परलोकास अंतरशील. ॥27॥ या वेळी अंत:करणाचा ढिलेपणा हा काही चांगले होण्याला कारण होणार नाही; लढाईत ढिलेपणा ठेवल्याने क्षत्रियांना अधोगती असते, हे लक्षात ठेव. ॥28॥ याप्रमाणे त्या कृपाळू श्रीकृष्णाने अनेक प्रकारांनी अर्जुनाला बोध केला. तो बोध ऐकून अर्जुन काय म्हणाला? ॥29॥

    हेही वाचा – Dnyaneshwari : शूरवृत्तीचा ठावो । क्षत्रियांमाजीं रावो…

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Dnyaneshwari : ऐसें महात्म्यया हरीचें सहज, फांकतसे सर्वांगीचें तेज

    April 30, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : अनावरें मुखें समोर देखे, तयाभेणें पाठीमोरा जंव ठाके

    April 29, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : आपण आंग आपण अलंकार, आपण हात आपण हातियेर

    April 28, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    Dnyaneshwari : ऐसें महात्म्यया हरीचें सहज, फांकतसे सर्वांगीचें तेज

    By Team AvaantarApril 30, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा तो विश्वतोमुख स्वभावें । आणि तेचि दाखवावयालागीं पांडवें । प्रार्थिला आतां…

    Dnyaneshwari : अनावरें मुखें समोर देखे, तयाभेणें पाठीमोरा जंव ठाके

    April 29, 2026

    Dnyaneshwari : आपण आंग आपण अलंकार, आपण हात आपण हातियेर

    April 28, 2026

    Dnyaneshwari : पैं ज्ञानदृष्टीचेनि अवलोकें, परि वदनांचा शेवटु न टके

    April 27, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 01 मे 2026

    May 1, 2026

    एप्रिल फूल… कोणी कोणाला केले?

    April 30, 2026

    नमन नटवरा… जयवंत सरांच्या निराशेचे कारण काय?

    April 30, 2026

    Kitchen Tips : प्रोटिनयुक्त मोदक, टेस्टी पिठले, झटपट कटाची आमटी…

    April 30, 2026

    ठोकताळा वेळ वाचवतो, पण…

    April 30, 2026

    Dnyaneshwari : ऐसें महात्म्यया हरीचें सहज, फांकतसे सर्वांगीचें तेज

    April 30, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 283
    • अवांतर 184
    • आरोग्य 106
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 402
    • फिल्मी 47
    • फूड काॅर्नर 201
    • मैत्रीण 18
    • ललित 594
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 01 मे 2026

    May 1, 2026

    एप्रिल फूल… कोणी कोणाला केले?

    April 30, 2026

    नमन नटवरा… जयवंत सरांच्या निराशेचे कारण काय?

    April 30, 2026
    Most Popular

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 01 मे 2026

    May 1, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.