Wednesday, August 6, 2025

banner 468x60

HomeअवांतरPanchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 06 ऑगस्ट 2025

Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 06 ऑगस्ट 2025

दर्शन कुलकर्णी

आज, दिनांक : 06 ऑगस्ट 2025; वार : बुधवार

भारतीय सौर : 15 श्रावण शके 1947; तिथि : द्वादशी 14:08; नक्षत्र : मूळ 12:59

योग : वैधृती 07:16; करण : कौलव 26:22

सूर्य : कर्क; चंद्र : धनु;  सूर्योदय : 06:16; सूर्यास्त : 19:11

पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन

संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127

प्रदोष

वेद कन्सल्टन्सी / 9987433660


आजचे राशीभविष्य

मेष – कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून दबाव आणला जाईल. मात्र त्याचवेळी नवीन कामाची जबाबदारीही तुमच्याकडे सोपवण्यात येईल. गुंतवणुकीच्या नवीन संधी निर्माण होतील. वैयक्तिक प्रश्न सोडवण्यात यशस्वी व्हाल. आर्थिकदृष्ट्या दिवस चांगला जाईल. जीवनसाथीची साथ मिळेल.

वृषभ – आज एखादे मोठे स्वप्न पूर्ण होऊ शकते. कोणतेही ध्येय साध्य करण्यात यशस्वी  होऊ शकता. व्यावसायिकांना आर्थिक फटका बसू शकतो. व्यवसायासाठी पदरचे पैसे खर्च करावे लागू शकतात. नोकरदार जातकांसाठी वरिष्ठांचा चांगला मूड कामाच्या ठिकाणी संपूर्ण वातावरण आनंददायी बनवू शकतो.

मिथुन – आज मानसिक शांती मिळेल. कौटुंबिक जीवनातील नातेसंबंधांमध्ये सुधारणा होईल. मुलांचे आरोग्य चांगले राहील. व्यावसायिकांसाठी दिवस चांगला राहणार आहे. आर्थिकदृष्ट्या स्थिती चांगली बनेल. प्रवासाची शक्यता आहे. मात्र प्रवासात बाहेरचे पदार्थ खाणे, पाणी पिणे शक्य तितके टाळा.

कर्क – जवळच्या व्यक्तीला आर्थिक मदत करावी लागू शकते. मात्र जोडीदाराच्या पाठिंब्यामुळे आर्थिक लाभही होतील. दीर्घकालीन गुंतवणूक टाळा. बाहेर जाऊन मित्रांसोबत काही आनंदाचे क्षण घालवण्याचा प्रयत्न करा. यातून तुम्हाला ज्ञान मिळेल. कौटुंबिक पातळीवर सगळे काही आलबेल असेल.

सिंह – जास्त काम करणे टाळा. कठोर स्वभावाचा जवळच्या व्यक्तीला त्रास देऊ शकतो. घाईघाईत पैसे खर्च करू नका. व्यवसायाची परिस्थिती चांगली राहील. वरिष्ठ सहकारी आणि नातेवाईक यांचे मोलाचे सहकार्य मिळेल. जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात.

कन्या – बऱ्याच काळानंतर अडकलेले पैसे परत मिळू शकतात. ऑफिसमधील कामात व्यग्र असल्यामुळे जोडीदारासोबतचे नाते तणावपूर्ण बनेल. मात्र तरीही कामावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असेल. वाहन चालवताना काळजी घ्या. व्यवसाय विस्तार होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – Skin Care : मिश्र, संवेदनशील त्वचा आणि त्यावर वापरायची उत्पादने

तुळ – आत्मविश्वास आणि ऊर्जा दोन्हीही सकारात्मक पातळीवर असतील. गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळू शकतो. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. भौतिक सुखसोयी वाढतील. प्रवासाची शक्यता आहे. व्यावसायिक यशही मिळू शकते.

वृश्चिक – अनेक स्रोतांकडून आर्थिक लाभ होतील. चांगल्या बातमीमुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. काही जातकांचे प्रेमसंबंध जुळून येतील. काही महत्त्वाच्या कामात यश मिळू शकेल. जोडीदारासोबत पुरेसा वेळ घालवण्याची संधी मिळेल.

धनु – आरोग्य चांगले राहणार आहे. बचतीच्या दृष्टीने चांगला दिवस आहे. कौटुंबिक समस्या प्राधान्याने सोडवा. कामाच्या ताणामुळे मन अस्वस्थ बनेल. आर्थिक आणि व्यावसायिकदृष्ट्या दिवस चांगला जाणार आहे.

मकर – एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीच्या सल्ल्याने आर्थिक गुंतवणूक करणे योग्य ठरेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आरोग्याबद्दल काळजी वाटत राहील. वैवाहिक जीवन चांगले असेल. एखाद्या खास व्यक्तीकडून एखादे सरप्राइज मिळू शकते. व्यवसायाची स्थिती चांगली राहील.

कुंभ – करिअरशी संबंधित नवीन संधी मिळू शकतात. आर्थिकदृष्ट्या, दिवस चांगला जाणार आहे. एखाद्या जवळच्या व्यक्तीशी मतभेद होऊ शकतात. त्यामुळे जिभेवर नियंत्रण ठेवा. शेअर बाजारात गुंतवणूक करणे टाळा.

मीन – आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले असेल. व्यवसायातील परिस्थिती सुधारेल. व्यवसायात सुधारणा होण्याची चिन्हे आहेत. वैवाहिक जीवनाला एक सुंदर वळण मिळेल. मात्र मनात अनेक विचारांचा गोंधळ निर्माण होईल.

हेही वाचा – Friendship Day : ‘दिखावू’ नको, तर ‘टिकाऊ’ फ्रेंडशीप हवी


दिनविशेष

हिरोशिमा दिन

टीम अवांतर

80 वर्षांपूर्वी, 6 ऑगस्ट 1945 या दिवशी अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा या शहरावर ‘लिटल बॉय’ नावाचा जगातील पहिला अणुबॉम्ब टाकला. ‘उगवत्या सूर्याचा देश’ म्हणून ओळख असणारा जपान दुसऱ्या महायुद्धात शरण येत नाही, या कारणामुळे अमेरिकेने 6 ऑगस्टच्या सकाळी एनोला गे बी-29 या बॉम्बरच्या मदतीने ‘लिटल बॉय’ हा  युरेनियम गन टाईप अणुबॉम्ब हिरोशिमावर टाकला. हिरोशिमा शहराच्या 2000 फूट उंचावर त्याचा स्फोट झाला. यामुळे याचा परिणाम पाच चौरस मैल एवढ्या भागावर झाला. या हल्ल्यात 1 लाख 40 हजार नागरिकांना जीव गमवावा लागला, असा अंदाज व्यक्त केला जातो. त्यातील निम्म्याहून अधिकजण तत्काळ मृत्युमुखी पडले तर त्यानंतर पुढे अनेक महिने भाजलेल्या जखमांमुळे, उत्सर्जित किरणांमुळे झालेल्या आजारांमुळे, अपुऱ्या आहारामुळे अनेकांचा मृत्यू झाला. यातूनही जे जगले त्यांना कायमचे अपंगत्व आले. त्यानंतर तीनच दिवसांनी म्हणजे 9 ऑगस्ट 1945 रोजी नागासाकीवर दुसरा अणुबॉम्ब टाकण्यात आला. त्या बॉम्बचे नाव होतं ‘फॅट मॅन’. या हल्ल्यात अंदाजे 80 हजार नागरिकांचा मृत्यू झाला. त्यानंतर 15 ऑगस्ट 1945 रोजी जपानने शरणागती पत्करली. पण तोपर्यंत या दोन्ही अणुस्फोटांनी जपानच्या मानसिकतेवर मोठा आघात केला. जगात अशा प्रकारचा विद्ध्वंस पुन्हा होऊ नये आणि जगात शांतता नांदावी यासाठी 6 ऑगस्ट हा दिवस ‘हिरोशिमा दिन’ म्हणून मानला जातो. अणुसंहार किती भीषण असू शकतो याची आठवण हा दिवस करुन देतो. अणुबॉम्बची दाहकता अनुभवलेल्या जपानमध्ये त्यानंतर अण्वस्त्रविरोधी भावनेने जोर धरला, आजही ही चळवळ प्रभावशाली आहे. पण चीनच्या वाढत्या आक्रमकतेमुळे आणि उत्तर कोरियाच्या धोक्यामुळे जपानने स्वसंरक्षणासाठी अण्वस्त्रे विकसित करावीत, ही भावनादेखील आता जोर धरू लागली आहे. या घटनेला 80 वर्ष झाली असली तरी आपल्या हातून झालेल्या या महाभयंकर संहाराबद्दल अमेरिकेने अजूनपर्यंत जपानची माफी मागितलेली नाही.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!