दर्शन कुलकर्णी
आज, दिनांक : 26 जुलै 2025; वार : शनिवार
भारतीय सौर : 04 श्रावण शके 1947; तिथि : द्वितीया 22:41; नक्षत्र : आश्लेषा 15:51
योग : व्यतिपात 28:05; करण : बालव 10:57
सूर्य : कर्क; चंद्र : कर्क 15:51; सूर्योदय : 06:12; सूर्यास्त : 19:16
पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन
संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – व्यवसायात प्रगती होईल, ज्यामुळे मन आनंदी राहील. कामाशी संबंधित प्रवासात काही महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना बौद्धिक आणि मानसिक तणावापासून मुक्ती मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. कुटुंबासमवेत सहलीला जाण्याची शक्यता आहे.
वृषभ – बऱ्याच काळापासून एखाद्या विशिष्ट कामाशी संबंधित परिणामाची वाट पाहत असाल तर आज ते शुभ परिणाम दिसून येतील. यामुळे तणाव कमी होईल. संध्याकाळी, प्रियजन आणि कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवू शकता, ज्यामुळे मन आनंदी राहील.
मिथुन – कामाच्या ठिकाणी हाती घेतलेले कोणतेही काम अतिशय सहजतेने पूर्ण होईल. परंतु त्यासाठी काही अनावश्यक कामांमध्ये वेळ घालवणे टाळावे लागेल. खर्चाचे बजेट तयार करून त्यानुसार खर्च करणे चांगले ठरेल. एखाद्या मालमत्तेचा किंवा मौल्यवान वस्तूचा सौदा करणार असाल, तर सर्वप्रथम सगळी कागदपत्रे नीट तपासून, खात्री करून घ्या.
कर्क – बाराव्या घरात मिथुन राशीचा गुरु आणि पहिल्या घरात चंद्र असल्याने दिवस चांगला जाणार आहे. प्रत्येक कामात यश मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणीही काम सहजपणे पूर्ण होईल. त्यामुळे तुमचा दबदबा वाढल्याने विरोधकांचे मनोबल कमी होईल. इतरांना मदत करण्यासाठी नेहमीची वाट सोडावी लागेल.
सिंह – दिवस भाग्याचा असेल. कामाच्या ठिकाणी नोकरदार जातकांच्या सन्मानात वाढ होईल. व्यवसायाच्या बाबतीत नशीब तुमच्या बाजूने असेल. त्यामुळे आनंद आणि समृद्धी यात देखील वाढ होण्याची शक्यता आहे. नवीन कामात तुमची रुची वाढू शकते. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे आनंद होईल.
कन्या – कामाच्या ठिकाणी ताण वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मानसिक तणावही जाणवेल. नोकरीच्या ठिकाणी आपल्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांशी गोड बोलून काम करवून घ्यायला लागेल. घरातील वातावरण शांत राहील आणि जीवनातील समस्याही हळूहळू दूर होऊ लागतील.
हेही वाचा – Local train : डोंबिवली ते कसारा प्रवासातील ‘ते’ नातं
तुळ – व्यवसायाच्या संदर्भात घाईघाईने कोणतेही निर्णय घेणे टाळा, अन्यथा, नुकसान होऊ शकते. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. वैयक्तिक जीवनातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा लागेल. त्या तशाच प्रलंबित राहिल्यास व्यावसायिक आयुष्यावरही परिणाम होऊ शकतो.
वृश्चिक – दिवस चांगला जाईल. जे लोक राजकारणात गुंतलेले आहेत, त्यांना एखाद्या उच्च पदावर असलेल्या व्यक्तीशी जवळचे संबंध किंवा मैत्री राखण्याचा फायदा होऊ शकतो. त्यांच्या मदतीने काही महत्त्वाची कामे पुढे जाऊ शकतात. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे पूर्ण लक्ष दिले तर, त्याचा फायदा होऊ शकतो. घरात धार्मिक कार्यक्रमाचेही आयोजन केले जाऊ शकते.
धनु – कामाच्या ठिकाणी गेल्या काही काळापासून विरोधकांमुळे अडथळे येत असतील तर आता त्यांच्यावर मात करता येईल. राजकारणाशी संबंधित लोकांचा पाठिंबा मिळेल, गोड शब्दांचा वापर केल्याने कठीण कामेही सोपी होऊ शकतात. व्यवसायाच्या बाबतीत, व्यवहार करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे अन्यथा मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.
मकर – कामाच्या ठिकाणी तुमच्याद्दलचा आदर वाढू शकतो. एखाद्या खास व्यक्तीकडून भेट मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायाच्या बाबतीत अचानक आर्थिक फायदा होऊ शकतो, ज्यामुळे मन आनंदी राहील. नोकरी करणाऱ्या लोकांना सकारात्मक दिशा मिळू शकते. कामाशी संबंधित प्रवास देखील करावा लागू शकते, त्यातून फायदाच होण्याची शक्यता आहे.
कुंभ – व्यवसायिकांना मोठा आर्थिक लाभ मिळू शकते. यामुळे आर्थिक बाजू बळकट होईल आणि बचत केलेल्या पैशांमध्ये देखील वाढ होईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाची पद्धत आणि गोड बोलण्यामुळे शुभ परिणाम मिळू शकतात. काही अधिकाऱ्यांचे सहकार्यही यशासाठी मदतीचे ठरेल. कामाशी संबंधित प्रवासाला जाण्याची शक्यता आहे.
मीन – कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रम करावे लागतील. काही कामे घाईत उरकावी लागतील, मात्र ते फायद्याचे ठरू शकते. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक होईल. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीही तुमचे कौतुक करतील. मात्र कामाचा ताण वाढल्याने शारीरिक थकवा येऊ शकतो. अशा परिस्थितीत काही काळ विश्रांती घेणे उत्तम.
हेही वाचा – Unreasonable expectations : मुला-मुलींचे विवाह का रखडतात?
दिनविशेष
कवी वासुदेव गोविंद मायदेव
टीम अवांतर
प्रसिद्ध कवी वासुदेव गोविंद मायदेव यांचा जन्म 26 जुलै 1894 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरजवळच्या माभळे येथे झाला. पहिली 22 वर्षे बालपणात आणि शिक्षणात गेली. तर, पुढील 45 वर्षे प्रामुख्याने स्त्री-शिक्षण, मराठी भाषा यांच्या विकासासाठी कार्य केले. 1915 ते 1929 या कालखंडात त्यांनी लिहिलेल्या कविता ‘भावतरंग’ या संग्रहात वाचायला मिळतात. त्यांची सर्वात लोकप्रिय ‘गायी घरा आल्या…’ ही कविता याच संग्रहात आहे. कवी वनमाळी या टोपणनावानेही ते साहित्यक्षेत्रात परिचित होते. अतिशय साधी राहणी, निर्व्यसनी, काटकसरी जीवन त्यांचे होते. त्यांनी काही काळ अनाथ बालिकाश्रमात चिटणीस म्हणून काम केले. तर, हिंगणे स्त्री-शिक्षण संस्था, नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, पुणे सेवासदन तसेच सूतिकासेवा मंदिर या संस्थांची त्यांनी यथाशक्ति सेवा केली. रविकिरण मंडळातील कवी माधवराव पटवर्धन ऊर्फ माधव ज्युलियन, यशवंत, गिरीश, श्री. बा. रानडे आदींना मायदेव हे समकालीन कवी होते. काव्यमकरंद, भावतरंग, भावनिर्झर, सुधा, भावविहार हे काव्यसंग्रह तर, बालविहार, किलबिल, शिशुगीत, क्रीडागीतहे बालगीतसंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. मराठी भाषेतील जुन्या व नव्या कवींचा योग्य सत्कार व योग्य पुरस्कार यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. मराठी वाङ्मयाची चरित्र, कोश, काव्य या दालनांची सेवा केली. वीर सावरकरांचे ‘माझी जन्मठेप’ या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर प्रा. वसंतराव नाईक यांच्याकडून करवून घेताना त्यांनी त्यासाठी मदतही केली. भा. रा. तांबे यांच्या कवितांचेही संपादन मायदेव यांनी केले होते. 1962मध्ये ‘वेचलेले क्षण’ हे आत्मचरित्र त्यांनी लिहिले. मायदेव यांचे 30 मार्च 1969 रोजी निधन झाले.