Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 नोव्हेंबर 2026

    November 25, 2026

    री-लॉगइन

    November 24, 2026

    अशी ही वटपौर्णिमा!

    November 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, November 25
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 नोव्हेंबर 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 नोव्हेंबर 2026

    Team AvaantarBy Team AvaantarNovember 25, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, दर्शन कुलकर्णी, कुंडली, राशीभविष्य, आजचे राशीभविष्य, ज्योतिष
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 25 नोव्हेंबर 2026; वार : बुधवार
    • भारतीय सौर : 04 मार्गशीर्ष शके 1948; तिथि : प्रतिपदा 16:51; नक्षत्र : रोहिणी 20:36;
    • योग : शिव 11:59; करण : तैतिल 27:02;
    • सूर्य : वृश्चिक; चंद्र : वृषभ; सूर्योदय : 06:50; सूर्यास्त : 17:59;
    • पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2083; युगाब्द : 5128

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    भारतीय महिला गोलंदाज दीपा मराठे

    टीम अवांतर

    भारतीय महिला क्रिकेट संघातील अष्टपैलू माजी खेळाडू दीपा मराठे यांचा जन्म 25 नोव्हेंबर 1972 रोजी मुलुंड येथे झाला. लग्नाआधीचे त्यांचे नाव होते दीपा कुलकर्णी. त्यांचे पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण लोकमान्य प्राथमिक विद्यालय तर माध्यमिक शिक्षण वामनराव मोरांजन माध्यमिक विद्यालयातून पूर्ण झाले.  क्रिकेटच्या आवडीमुळे 10 वीची परीक्षा दिल्यानंतर त्या माटुंग्याच्या नवयुग क्रिकेट मंडळ या महिलांना प्रशिक्षण देणाऱ्या क्लबमध्ये जाऊ लागल्या.

    लखनौला एक स्थानिक स्पर्धेत नवयुग क्रिकेट मंडळाच्या टीमने भाग घेतला. त्यावेळी दीपा यांनी गोलंदाज म्हणून उत्तम कामगिरी बजावली आणि इथूनच त्यांनी क्रिकेटमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. याच सुमारास त्यांची मुंबईच्या सिनीअर क्रिकेट टीमसाठी निवड झाली.

    हेही वाचा – अशी ही वटपौर्णिमा!

    जे. जे. कॉलेजमधून टायपोग्राफीच्या कोर्सला प्रवेश घेतल्यानंतर त्या जे. जे. च्या महिला क्रिकेट टीममध्ये दाखल झाल्या. त्यावेळी त्या युनिव्हर्सिटी लेव्हलला देखील खेळल्या. महिला क्रिकेट संघासाठी असणाऱ्या राणी झाशी, इंटर झोनल, इंदिरा प्रियदर्शिनी आणि सिनीयर नॅशनल्स अशा महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये देखील दीपा खेळल्या.

    1990 ते 1995 या काळात त्या मुंबईसाठी खेळल्या तसेच मुंबई विद्यापीठाच्या संघाचेही त्यांनी नेतृत्व केले. पुढे 1995 साली एअर इंडियातर्फे करारबध्द होण्यासाठी मागणी आली. 1995 – 96  या संपूर्ण वर्षात महिला क्रिकेटच्या सर्व स्पर्धा एअर इंडियाच्या संघाने जिंकल्या. या स्पर्धेदरम्यान दीपा यांचाही खेळ अतिशय उत्कृष्ट झाला. मग याच्याच जोरावर 1996 साली भारतीय संघात त्यांची निवड झाली.

    1997 ते 2005 या काळात भारताचे प्रतिनिधित्व करताना त्या 5 कसोटी आणि 59 एकदिवसीय सामने खेळल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यांनी 60 विकेट्स घेतल्या असून त्यांचा सर्वोत्तम गोलंदाजीचा मारा 4/1 असा आहे. उजव्या हाताने फलंदाजी आणि डाव्या हाताने गोलंदाजी हे त्यांचे वैशिष्ट्य होते.

    आंतरराष्ट्रीय पातळीवर एकदिवसीय सामन्यात त्यांनी 13 डिसेंबर 1997 रोजी वेस्ट इंडिज विरुद्ध खेळताना पदार्पण केले तर कसोटी पदार्पण 15 जुलै 1999 रोजी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात केले. शेवटचा एकदिवसीय सामना त्या ऑस्ट्रेलिया विरूद्ध 10 एप्रिल 2005 खेळल्या. 2005 च्या महिला क्रिकेट विश्वचषकात उपविजेत्या ठरलेल्या भारतीय संघात त्यांचा सहभाग होता.


    आजचे राशिभविष्य

    मेष – कामाची धावपळ आणि वाढत्या जबाबदाऱ्यांमुळे आज थकवा जाणवू शकतो. मानसिक दडपणही वाढेल. एखादी जुनी शारीरिक समस्या पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहे, त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. गरज भासल्यास योग्य सल्ला घ्या. आर्थिक आणि वैयक्तिक बाबींमध्ये इतरांवर जास्त अवलंबून राहणे हानिकारक ठरू शकते. म्हणून, प्रत्येक महत्त्वाचा निर्णय स्वतःच्या समजुतीने घ्या.

    वृषभ – आज तुमची सर्जनशील विचारसरणी आणि अनोखी शैली इतरांना प्रभावित करेल. वाढत्या खर्चामुळे आर्थिक नियोजनावर थोडा परिणाम होऊ शकतो, त्यामुळे खरेदी आणि इतर गरजेच्या वस्तूंची विचारपूर्वक खरेदी करा.  कुटुंबातील एखाद्या सदस्याला नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. या आनंदाच्या बातमीमुळे घरात उत्साहाचे वातावरण निर्माण होऊ शकते .आज, नवीन संधींचा आनंद घेताना, आर्थिक संतुलन राखणे देखील महत्त्वाचे असेल.

    मिथुन – आज, तुमचे शब्द तुमची सर्वात मोठी ताकद आणि सर्वात मोठी समस्या ठरू शकतात, सार्वजनिक चर्चेदरम्यान बोललेल्या कोणत्याही गोष्टीचा चुकीचा अर्थ लावला जाऊ शकतो, म्हणून आपले शब्द काळजीपूर्वक निवडा.  मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर कागदपत्रे, किंमत आणि कायदेशीर स्थिती यांची सखोल तपासणी केल्यानंतरच पुढे जा. आज एखाद्या महत्त्वाच्या कामात व्यत्यय येऊ शकतो. अशा परिस्थितीत, आपल्या प्राधान्यक्रमांना दिशा द्या आणि आपल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा.

    कर्क – आज तुमच्या कामातील मेहनतीचे फळ तुमचा आत्मविश्वास वाढवेल आणि तुम्हाला नवीन प्रकल्पांसाठी उत्साहित करेल. व्यवसायात एखादा जुना व्यवहार किंवा आर्थिक समस्या अचानक समोर येऊ शकते, ज्यामुळे काही चिंता निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीत, शांत राहा आणि चर्चेद्वारे तोडगा काढण्याचा प्रयत्न करा. आर्थिक परिस्थितीचे योग्य मूल्यांकन करून मगच व्यवसायाशी संबंधित निर्णय घ्या. आज स्वतःच्या इच्छा अधिक चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकाल.

    सिंह – आज अपेक्षित लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात केलेल्या प्रयत्नांना सकारात्मक फळ मिळू शकते. तथापि आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. विद्यार्थ्यांसाठी शिस्त पाळणे आणि नियमित अभ्यास करणे आवश्यक असेल. काही लोक तुमच्या चांगल्या वागणुकीचा किंवा मदत करण्याच्या वृत्तीचा गैरसमज करून घेऊ शकतात, परंतु इतरांच्या मतांमुळे तुमच्या प्रगतीत अडथळा येऊ देऊ नका. आर्थिक अडचणी हळूहळू कमी होण्याची चिन्हे आहेत. आज स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि संतुलित दिनचर्या राखण्याचा प्रयत्न करा.

    कन्या – गाडी चालवताना आज विशेष सावधगिरी बाळगा आणि घाई टाळा. राजकारण किंवा सामाजिक क्षेत्रात असलेल्यांसाठी आजचा दिवस अनुकूल असू शकतो. इतरांमध्ये तुमची ओळख आणि प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. आज प्रियजनांसोबत वेळ घालवणे आणि त्यांच्या भावना समजून घेणे विशेष समाधान देईल. तुम्हाला जोडीदारासाठी एखादी खास भेटवस्तू किंवा आवडती वस्तू खरेदी करण्याचा मोह होऊ शकतो. या छोट्याशा कृतीमुळे तुमच्या नात्यातील प्रेम आणि जवळीक वाढेल.

    तुळ – रखडलेल्या कोणत्याही कामात आज यश मिळण्याची शक्यता आहे.  तथापि, काही विरोधक तुमच्या कामात अडथळा आणण्याचा किंवा त्रास देण्याचा प्रयत्न करू शकतात. अशा परिस्थितीत, घाबरून जाण्याऐवजी, स्वतःच्या बुद्धीवर आणि कार्यक्षमतेवर विश्वास ठेवा. घरातील लहान मुलांसोबत वेळ घालवल्याने मानसिक ताण कमी होईल. एकूणच, आजचा दिवस सकारात्मक असेल. कुटुंबासोबत घालवलेले क्षण तुम्हाला मानसिक शांती आणि भावनिक समाधान देतील.

    वृश्चिक –  जर तुम्ही तुमच्या व्यावसायिक योजनांमध्ये बदल करण्याचा किंवा तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करत असाल, तर या कल्पनांचा गांभीर्याने विचार करणे योग्य ठरेल. परदेशी व्यापार किंवा व्यावसायिक घडामोडींबाबत चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. नवीन लोकांना भेटल्याने असे संबंध निर्माण होऊ शकतात, जे भविष्यात महत्त्वपूर्ण संधींचे दरवाजे उघडतील. वडिलांच्या एखाद्या कृतीने तुम्हाला थोडे दुःख होऊ शकते. मात्र लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी, त्यांची त्यामागची मानसिकता समजून घेण्याचा प्रयत्न करा.

    हेही वाचा – आनंदाची दिवाळी की मुक्या प्राण्यांच्या वेदना?

    धनु – आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा असू शकतो. स्पष्ट संवादामुळे लहानसहान गैरसमज वाढण्यापासून रोखता येतात. उत्पन्न आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित बाबींमध्ये सावधगिरी बाळगा आणि संपूर्ण माहितीशिवाय निर्णय घेणे टाळा. विद्यार्थ्यांचा अभ्यासाशी संबंधित मानसिक ताण कमी होईल आणि शिक्षकांच्या मदतीने अवघड विषय समजणे सोपे होऊ शकते. तुमची एखादी मोठी इच्छा पूर्ण होण्याची चिन्हे आहेत, ज्यामुळे आनंद आणि समाधान मिळेल. आज नातेसंबंध आणि जबाबदाऱ्या या दोन्हींना योग्य महत्त्व द्या.

    मकर – आज काही सकारात्मक बदल नवीन ऊर्जा आणि उत्साह घेऊन येतील. तुमची मेहनत आणि सातत्यपूर्ण प्रयत्न  प्रलंबित कामे पूर्ण करण्यास मदत करतील. तुमची जीवनशैली सुधारण्याचे आणि दैनंदिन दिनचर्येत सकारात्मक बदल करण्याचे प्रयत्न देखील यशस्वी होऊ शकतात. मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका आणि तुमच्या व्यस्त वेळापत्रकात स्वतःसाठी वेळ काढा. आज, कौटुंबिक पाठिंबा आणि तुमची मेहनत अनेक बाबतीत सकारात्मक परिणाम देतील.

    कुंभ – आजचा दिवस संमिश्र असेल. त्यामुळे प्रत्येक परिस्थितीत संतुलन आणि संयम राखणे महत्त्वाचे आहे.  कामाच्या ठिकाणी वाद किंवा मतभेद होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, रागाने प्रतिक्रिया देण्याऐवजी शांत राहून आपला दृष्टिकोन स्पष्ट करणे चांगले.  घरातील गरजा लक्षात घेऊन तुम्ही एखादी नवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याचा विचारही करू शकता. मात्र खरेदी करण्यापूर्वी  बजेट आणि प्रत्यक्ष गरजा यांचे मूल्यांकन नक्की करा. या निर्णयामुळे तुमच्यावरचा अनावश्यक ताण टळेल.

    मीन – आज व्यवसायात काही आव्हाने येऊ शकतात, परंतु संयम आणि योग्य रणनीतीने तुम्ही ती यशस्वीपणे सोडवू शकता. कोणाचाही सल्ला आंधळेपणाने स्वीकारण्याऐवजी, स्वतःच्या विचाराने आणि अनुभवानुसार निर्णय घ्या. सरकारी कामे पूर्ण करण्यासाठी थोडे जास्त प्रयत्न आणि धावपळ करावी लागू शकते. त्यामुळे, आवश्यक कागदपत्रे आणि कार्यपद्धती आगाऊ तयार ठेवा. तुमच्या वडिलांच्या आरोग्याबद्दल काही चिंता असू शकते. त्यांची योग्य ती काळजी घ्या आणि आवश्यक असल्यास योग्य तपासण्यांना प्राधान्य द्या. आज, संयम, कौटुंबिक पाठिंबा आणि योग्य योजनेसह पुढे जाणे फायदेशीर ठरेल.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 नोव्हेंबर 2026

    November 24, 2026 पंचांग आणि भविष्य

    जन्मकुंडलीतील 1ला भाव: जीवनाचा सखोल आरसा

    November 23, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 नोव्हेंबर 2026

    November 23, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 नोव्हेंबर 2026

    By Team AvaantarNovember 24, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 24 नोव्हेंबर 2026; वार : मंगळवार भारतीय सौर : 03…

    जन्मकुंडलीतील 1ला भाव: जीवनाचा सखोल आरसा

    November 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 नोव्हेंबर 2026

    November 23, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 22 ते 28 नोव्हेंबर 2026

    November 22, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 नोव्हेंबर 2026

    November 25, 2026

    री-लॉगइन

    November 24, 2026

    अशी ही वटपौर्णिमा!

    November 24, 2026

    आनंदाची दिवाळी की मुक्या प्राण्यांच्या वेदना?

    November 24, 2026

    धामापूरच्या गजाली आणि पंचकन्या

    November 24, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : आणीकही एक तया, वोळखण असे धनंजया

    November 24, 2026

    POPULAR CATEGORY

    [category_count_style]
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtra

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 नोव्हेंबर 2026

    November 25, 2026

    री-लॉगइन

    November 24, 2026

    अशी ही वटपौर्णिमा!

    November 24, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.