नमस्कार सर्वांना!
पैशांची तंगी असेल तर प्रत्येकाला मानसिक ताण येतो. आर्थिक समस्या माणसाला चिंतेत पाडतात. मेहनत करून जर पैसे मिळत नसतील तर टेन्शन येतं. हातात पैसे टिकले नाही तर चिडचिड होते. अशा वेळी अनेकजण काळजीत पडतात काही जणांच्या बाबतमीमध्ये असं नेहमी होतं, ते प्रचंड कष्ट करतात, परंतु तरी देखील त्यांच्या हातात पैसा टिकत नाही. महिन्याच्या शेवटी बँक अकाऊंट रिकाम असतं. म्हणूनच आज आपण वास्तुशास्त्रानुसार अशा 5 महत्त्वाच्या टिप्स जाणून घेणार आहोत, ज्यांचा अवलंब केल्याने नवीन आर्थिक संधी मिळण्यास, आर्थिक प्रगती होण्यास किंवा अडकलेले पैसे परत मिळण्यास मदत होते, असे मानले जाते.
1) उत्तर (North) आणि ईशान्य (North-East) दिशा तपासा
सर्वप्रथम घरातील उत्तर (North) आणि ईशान्य (North-East) दिशा तपासा. जर या दिशेला शौचालय (Toilet) असेल, तर वास्तुशास्त्रानुसार त्याचा वापर त्वरित बंद करावा.
हेही वाचा – घराचे मुख्य प्रवेशद्वार, पितृपद आणि दरवाजाचा रंग
2) त्या दिशेला पाण्याचा स्रोत ठेवा
उत्तर किंवा ईशान्य दिशेला पाण्याचा स्रोत असणे शुभ मानले जाते. यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणताही पर्याय ठेवू शकता.
- पाण्याचे कारंजे (Water Fountain)
- मत्स्यालय (Aquarium)
- किंवा काहीच शक्य नसेल, तर पिण्याच्या पाण्याने भरलेला माठ किंवा घडा ठेवू शकता.
3) लहान हिरवी रोपे ठेवा
या दिशेला लहान कुंड्यांमध्ये हिरवी रोपे लावा. या रोपांना दररोज पाणी द्या. वास्तुशास्त्रानुसार ही सकारात्मक ऊर्जा वाढवणारी कृती मानली जाते.
4) ही दिशा स्वच्छ आणि प्रकाशमान ठेवा
उत्तर आणि ईशान्य दिशेचा भाग नेहमी स्वच्छ, नीटनेटका आणि प्रकाशमान ठेवा. या भागात अंधार राहणार नाही, याची विशेष काळजी घ्या.
5) या दिशेला छोटा आरसा लावा
उत्तर किंवा ईशान्य दिशेला लहान आकाराचा आरसा लावा. वास्तुशास्त्रानुसार हा उपाय आर्थिक ऊर्जेला सक्रिय करण्यासाठी उपयुक्त मानला जातो.
हेही वाचा – नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण करणारे वास्तुदोष आणि त्यावरील उपाय
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
https://whatsapp.com/channel/0029VbAtufJ65yDINAO9Ad2H
या लिंकला क्लिक करून WhatsApp Channel जॉइन करा.


