दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 03 नोव्हेंबर 2026; वार : मंगळवार
- भारतीय सौर : 12 कार्तिक शके 1948; तिथि : नवमी 11:54; नक्षत्र : मघा 27:25;
- योग : शुक्ल 09:53; करण : वणिज 23:25;
- सूर्य : तुळ; चंद्र : सिंह; सूर्योदय : 06:38; सूर्यास्त : 18:05;
- पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन
टीम अवांतर
प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांचा जन्म 3 नोव्हेंबर 1933 रोजी बंगालमधील शांतिनिकेतन येथे वास्तव्यास असणाऱ्या एका बंगाली कुटुंबात झाला. नोबेल पारितोषिक जिंकणारे पहिले आशियाई कवी आणि लेखक रवींद्रनाथ टागोर यांनी अमर्त्य यांना त्यांचे नाव दिले.
कलकत्ता विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात बी. ए. ची पदवी त्यांनी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन मिळवली. पुढील शिक्षणासाठी त्यांनी इंग्लंडमधील ट्रिनिटी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी भारतातील जादवपूर विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठ तसेच इंग्लंडमधील लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि पुढे हार्वर्ड विद्यापीठ अशा प्रतिष्ठित शिक्षण संस्थांमध्ये प्राध्यापक म्हणून अध्यापन केले. त्यांच्या विद्वत्तेमुळे त्यांना ट्रिनिटी कॉलेज, केंब्रिजचे ‘मास्टर’ होण्याचा बहुमानही मिळाला.
हेही वाचा – वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – प्रभाव, करिअर
गरिबी, दारिद्र्य, दुष्काळ, सामाजिक न्याय आणि मानवी विकास या विषयांवर त्यांनी केलेले संशोधन आधुनिक अर्थशास्त्राला नवी दिशा देणारे ठरले. याशिवाय त्यांच्या या विचारांमुळे जगभरातील सरकारे आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचा आर्थिक विकासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला.
1969 मध्ये दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत असतानाच त्यांनी ‘कलेक्टिव्ह चॉइस अँड सोशल वेल्फेअर’ या नावाचा ग्रंथ लिहिला, ज्यात व्यक्तींचे हक्क आणि सामाजिक स्थितीचा परामर्श घेण्यात आला होता.
त्यांनी अर्थशास्त्राला मानवी संवेदनांची जोड दिली असून कल्याणकारी अर्थशास्त्रात त्यांचे मोठे योगदान आहे. यामुळेच दुष्काळ केवळ अन्नधान्याच्या कमतरतेमुळे पडत नाही, तर लोकांची खरेदी क्षमता आणि वितरण या दोन महत्त्वाच्या घटकांवर अवलंबून असतो, असा सिद्धांत त्यांनी मांडला.
कल्याणकारी अर्थशास्त्रातील योगदानासाठी 1998 साली त्यांना अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले. याशिवाय 1999 मध्ये भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या ‘भारत रत्न’ पुरस्कारानेदेखील त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. सेन यांना जगभरातील विद्यापीठांकडून 90 हून अधिक मानद पदव्या मिळाल्या आहेत. 2019 मध्ये, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सने ‘इनइक्वॉलिटी स्टडीज’ या विषयासाठी अमर्त्य सेन चेअरच्या निर्मितीची घोषणा केली.
आजचे राशिभविष्य
मेष – आजचा दिवस अत्यंत व्यस्त असेल. अनेक कामे हातावेगळी करायची असल्याने थोडासा गोंधळ होईल. पण तुम्ही ही परिस्थिती व्यवस्थित हाताळाल. त्यामुळे संध्याकाळी कुटुंबासोबत वेळ घालवण्याची आणि स्वादिष्ट जेवणाचा आनंद घेण्याची संधी मिळेल. मात्र स्वतःच्या खाण्यापिण्याच्या सवयींबाबत निष्काळजी राहू नका. थोडी संवेदनशीलता आणि संयम यामुळे घरात सुखद वातावरण टिकून राहील.
वृषभ – आज एखाद्या प्रभावशाली व्यक्तीला भेटल्याने भविष्यात नवीन संधी निर्माण होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी तुमच्या कार्यनिष्ठेचे आणि समर्पणाचे कौतुक होईल. आर्थिक बाबतीत दिलासा मिळेल, पैसे कमावण्याच्या चांगल्या संधी निर्माण होऊ शकतात. रखडलेल्या एखाद्या कामाला गती मिळू शकते. तुमची एखादी दीर्घकाळापासूनची इच्छा पूर्ण होण्याचीही शक्यता आहे. अर्थात कामाच्या धावपळीत तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
मिथुन – कामाच्या ठिकाणी योग्य सल्ला आणि मार्गदर्शन मिळाल्यामुळे आज अनेक महत्त्वाची कामे सहजपणे पूर्ण करता येतील. फक्त आपले काम उत्साहाने आणि विवेकबुद्धीने करा. प्रत्येक पाऊल उचलण्यापूर्वी परिणामांचा विचार करणे फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी विवादास्पद विषयावर प्रतिक्रिया देण्याऐवजी, परिस्थिती हुशारीने हाताळा. मालमत्तेवरून कुटुंबात वाद होण्याची शक्यता आहे, परंतु संयम आणि चर्चेने तोडगा निघू शकतो. घाई टाळा, अनुकूल परिस्थिती निर्माण होईल.
कर्क – एका मोठ्या किंवा महत्त्वाच्या व्यावसायिक कराराला अंतिम रूप मिळावे यासाठी काही काळ वाट बघावी लागेल. मात्र आज अपेक्षित परिणाम मिळाले नाहीत म्हणून निराश होण्याऐवजी जोमाने कामाला लागा, कारण लवकरच परिस्थिती बदलेल. क्षुल्लक बाबींवरून इतरांशी वाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे अनावश्यक गुंत्यांपासून दूर रहा. सरकारी कामात विशेष सावधगिरी बाळगा. कागदपत्रे तपासण्यात आणि नियमांचे पालन करण्यात हलगर्जीपणा करू नका. तुमच्या सतर्कतेमुळे अनावश्यक त्रास टाळता येईल.
सिंह – आज जबाबदाऱ्यांमध्ये वाढ होईल. मात्र आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम यामुळे प्रत्येक काम सहजतेने पूर्ण करू शकाल. परदेशात कामासाठी जाण्याची इच्छा असलेल्या जातकांना चांगली बातमी मिळेल, ज्यामुळे भविष्यातील योजनांना नवी दिशा मिळेल. उत्साहाच्या भरात घेतलेले कोणतेही घाईचे निर्णय नंतर समस्या निर्माण करू शकतात हे लक्षात ठेवा. मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर सर्व पर्यायांचा काळजीपूर्वक विचार केल्यानंतरच अंतिम निर्णय घ्या.
कन्या – आज, तुमची प्रतिभा आणि सर्जनशील विचार लक्ष वेधून घेतील. स्वतःची योग्यता सिद्ध करण्याच्या नवीन संधी मिळू शकतील. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर एखादी महत्त्वाची जबाबदारी सोपवल्यास, ती पूर्ण प्रामाणिकपणाने आणि निष्ठेने पार पाडा. आर्थिक बाबींमध्ये संतुलन राखणे महत्त्वाचे ठरेल. तुमचे उत्पन्न चांगले असले तरी, खर्चावर लक्ष ठेवा. संततीच्या आरोग्याबाबत सावधगिरी बाळगा. काम आणि घर यात संतुलन राखा. यामुळे कुटुंबातील सदस्य आनंदी होतील.
तुळ – तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल किंवा कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची अपेक्षा करत असाल, तर आज तुम्हाला काही सकारात्मक संकेत मिळू शकतात. खरेदी करताना आपले बजेट लक्षात ठेवणे उत्तम. जोडीदारासाठी एक छोटेसे सरप्राईज प्लॅन कराल. फक्त आपल्या सभोवतालच्या लोकांवर आंधळा विश्वास ठेवणे टाळा आणि आपल्या वैयक्तिक योजना विचारपूर्वक त्यांच्यासोबत शेअर करा. बराच काळ रखडलेला एखादा व्यवहार किंवा योजना पूर्ण होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक – आजचा दिवस दिलासा, आनंद आणि सकारात्मक बदल घेऊन येऊ शकतो. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे हळूहळू पूर्ण होऊ लागतील, ज्यामुळे तुमच्यावरील मानसिक ताण हलका होईल. प्रवासादरम्यान उपयुक्त माहिती मिळू शकते, ज्यामुळे नवीन संधींची दारे उघडू शकतात. त्यासाठी संभाषणांकडे आणि आजूबाजूच्या घडामोडींवर लक्ष ठेवा. आपलेच म्हणणे खरे असं पटवून देण्याचा आग्रह धरण्याऐवजी, इतरांच्या भावनांचाही विचार करा. परस्पर संवाद आणि सामंजस्य यामुळे घरातील वातावरण आनंदी राहील.
हेही वाचा – पुन:श्च हरीओम
धनु – वेळेवर कामे पूर्ण करण्याची आणि जबाबदाऱ्या गांभीर्याने घेण्याची तुमची सवय तुम्हाला आज इतरांपेक्षा वेगळे ठरवेल. स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा, कोणतीही महत्त्वाची कामे अर्धवट सोडू नका. वैयक्तिक आयुष्यात आनंदाचे काही खास क्षण अनुभवायला मिळतील. जोडीदाराकडून मिळालेली एखादी भेट किंवा सरप्राईज यामुळे दिवस अविस्मरणीय बनेल. संततीचे यश किंवा त्याच्याशी संबंधित एखादी चांगली बातमी कुटुंबात उत्साहाचे वातावरण निर्माण करेल. तुमचे वेळापत्रक व्यस्त असले तरी, कुटुंबातील सदस्यांसाठी वेळ काढा.
मकर – शिक्षण, संशोधन आणि तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या जातकांसाठी आजचा दिवस उत्साहवर्धक असेल. तुमची शिकण्याची इच्छा प्रगतीसाठी नवीन मार्ग खुले करू शकते. विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा आणि पाठिंब्याचा फायदा होईल, ज्यामुळे त्यांना अभ्यासात चांगले यश मिळेल. सरकारी कामात काही विलंब किंवा अतिरिक्त घाई होऊ शकते, त्यामुळे संयम ठेवा आणि आवश्यक प्रक्रिया वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. इतरांवर लगेच विश्वास ठेवण्याऐवजी, वस्तुस्थिती काळजीपूर्वक तपासा.
कुंभ – आजचा दिवस नवीन सुरुवात आणि भविष्यातील योजनांसाठी एक चांगली संधी असा असेल. एखादा नवीन उद्योग किंवा प्रकल्प हाती घेण्याचा विचार करत असाल, तर योग्य तयारी करून पुढे जा. आर्थिक परिस्थिती मजबूत करण्याच्या तुमच्या प्रयत्नांना लवकरच यश मिळेल. स्वतःच्या आरोग्याची काळजी. एखादी शारीरिक समस्या सतत त्रास देत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. योग्य नियोजन, कौटुंबिक पाठिंबा आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे चांगले भविष्य घडवता येते, हे आजचा दिवस तुम्हाला शिकवणार आहे.
मीन – व्यवसाय आणि करिअरमध्ये चा़ंगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. नवीन प्रकल्प हाती घेण्यासाठी किंवा व्यवसाय वाढवण्यासाठी काही अतिरिक्त खर्च करावा लागू शकतो. मात्र त्याआधी तज्ज्ञांशी सल्लामसलत नक्की करा. दीर्घकालीन समस्येवर तोडगा निघाल्याने मोठा दिलासा मिळेल. आज उत्पन्न आणि खर्च यांच्यात संतुलन राखणे महत्त्वाचे आहे. गरजा आणि इच्छा यांमधील फरक समजून घेऊन मगच पैसे खर्च करा. मौल्यवान वस्तू आणि महत्त्वाचे कागदपत्र नीट, सुरक्षित ठेवा. कौटुंबिक जीवनातही आनंदी आणि उत्साही वातावरण असेल.


