नमस्कार मी अभिनेत्री हर्षा गुप्ते. पुन्हा एकदा तुमच्या भेटीला.
आपल्या सगळ्यांनाच Fire brigade. माहिती आहे. आग बंब म्हणायचो आम्ही. म्हणजे आमच्या लहानपणी तसंच सांगितलं होतं ना आम्हाला. आग बंब 2 प्रकारचे असतात 1) शिडी बंब आणि 2) पाण्याचा बंब. काही दुर्घटना घडली की, जोरात घंटानाद करत बंबवाल्यांच्या गाड्या जाताना दिसायच्या. मस्त लाल भडक रंगाच्या. देखण्या वाटायच्या. मोठी झाल्यावर मी पण अशीच एक गाडी घेणार आणि टण टण वाजवत फिरणार अशी माझी इच्छा होती. खरंतर लहानपणी कोणाला कशाच अप्रूप वाटेल काही सांगता येत नाही.
खरं सांगायचं तर लहानपणी या गाड्यांच्या कामांमागचा गंभीरपणा कळत नव्हता. कारण बरेचदा संक्रांतीच्या वेळी पतंग उडवताना मांजामध्ये कावळे, कबुतर अडकायची आणि त्यांना सोडवण्यासाठी तेव्हा या गाड्या यायच्या. आम्ही सगळी मुलं गंमत म्हणून ते बघायला जमा व्हायचो.
हेही वाचा – तारिणी सीरियल अन् मी!
एकदा एक फिल्म पाहिली होती, की सायरन वाजला की हे फायर फायटर्स अगदी जेवता जेवता किंवा आंघोळ करताना बिचारे टॉयलेट मधून पण धावत सुटतात. आणि तिथल्या त्या मोठ्या खांबाला धरून वरून खाली येतात आणि गाडीवर चढतात. Emergency म्हणतात ती हीच. फटाक्यांमुळे आग लागणे, गॅस सिलेंडरचा स्फोट होणे, शॉर्ट सर्किट अशा सगळ्या प्रसंगी हे आग बंबवाले आपल्यासाठी नेहमीच धावून येतात.
काल (1 नोव्हेंबर 2026) विरारला माझ्या सोसायटीमध्ये fire training होत. मी ते दुसऱ्यांदा attend केलं. किती छान समजावून सांगितलं. आगीची कारण कोणती? घरात सुरक्षा कशी ठेवायची. आग लागली तर ती विझवायची कशी, आमच्या प्रत्येक मजल्यावर fire room आहे. तिथला लांबलचक पाईप कसा घरात न्यायचा आणि वापरायचा. फायर एस्टिंगवेशर कसं वापरायचं. प्रत्येक बिल्डिंगला खाली फायर कॉक आणि होर्स पाईपचे बॉक्स आहेत, ते कसे वापरावेत. किती सुरेख माहिती होती. आजकाल प्रत्येक सोसायटीमध्ये हे असे प्रशिक्षण ठेवतातच. जुन्या चाळींमध्ये, इमारतींमध्ये ही सुरक्षा यंत्रणा नसायची. पण हल्ली नियम आणि सुरक्षेचं भान ठेऊन ही योजना राबवतात.
दिवाळी तोंडावर आलेली आहे. सगळ्यांनी जपून रहा. तुमचा आणि इतरांचा जीव वाचवण्यासाठी आग प्रतिबंधक प्रशिक्षणाचा योग्य तो उपयोग करा. येणाऱ्या दीपावलीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.
हेही वाचा – हनी ट्रॅप… आयुष्यातून उठवणारा!
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
https://whatsapp.com/channel/0029VbAtufJ65yDINAO9Ad2H
या लिंकला क्लिक करून WhatsApp Channel जॉइन करा.


