Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    माणसांचे खरे अंतरंग उलगडणारा राहू

    October 30, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : पैं मंडळ आणि चंद्रमा, दोन्ही नव्हती सुवर्मा

    October 30, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 ऑक्टोबर 2026

    October 30, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, October 30
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » माणसांचे खरे अंतरंग उलगडणारा राहू
    पंचांग आणि भविष्य

    माणसांचे खरे अंतरंग उलगडणारा राहू

    अस्मिता दीक्षितBy अस्मिता दीक्षितOctober 30, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी लेख, मराठी कथा, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी लेखक, अस्मिता दीक्षित, लेखिका अस्मिता दीक्षित, ज्योतिष अस्मिता दीक्षित, ज्योतिषशास्त्र, पत्रिकेतील ग्रह, राहूची दशा, अंतरंग उलगडणारा राहू, राहूमुळे अविश्वास, राहूमुळे गैरसमज, राहू चंद्रग्रहण, Rahu, true inner self of human beings
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    || श्री स्वामी समर्थ ||

    संथ असणाऱ्या पाण्यात खडा टाकला तर जे होते, तेच राहू दशा सुरू झाली की, आपल्या आयुष्याचे होते. राहू या भावात चांगला आणि राहू या नक्षत्रात चांगला, हे सबकुछ झूठ आहे. राहू, केतू हे राक्षस आहेत आणि त्यांना कितीही आंजरले गोंजारले तरी, त्यांचे मूळ स्वभाव गुणधर्म जाणार नाहीत. प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात, तशाच राहूला सुद्धा आहेत.

    राहू हा चंद्राला ग्रहण लावतो, म्हणजे नेमके काय होते? आयुष्यात अशा घटना घडायला सुरुवात होते, ज्यामुळे आपल्याला मानसिक त्रास होतो, आपली शांत झोप उडते, मन सैरभैर होते आणि नक्की काय चाललंय तेच समजेनासे होते. आपल्या मनाच्या ठिकऱ्या उडाल्या की, राहूचा विजय झालाच म्हणून समजा; कारण तेच तर त्याचे घ्येय आहे. मन शांत नसेल, तर काहीच सुचणार नाही, प्रत्येक गोष्ट निरस वाटू लागेल आणि जगण्यातील एकंदरीत सगळाच आनंद विरून जाईल.

    लहानपणापासून ज्या भावंडासोबत, मित्रांसोबत लहानाचे मोठे झालो, त्यांच्याशी अगदी क्षुल्लक गोष्टीवरून वितुष्ट येईल. वास्तविक ज्या कुटुंबात आपण लहानाचे मोठे झालो, त्यातील प्रत्येक व्यक्ती आपल्याला पूर्णतः ओळखते, मग असे गैरसमज होतातच कसे? कुठल्याही लहान गोष्टीवरून गैरसमज कुणामध्ये होतील? तर, जे एकमेकांना अनभिज्ञ आहेत! पण इथे तर एकाच कुटुंबातील व्यक्ती एकमेकांची तोंड पाहिनाशी झालेली आहेत. समज-गैरसमज मनाला त्रास देत राहतात… एक दोन नाही तर पूर्ण 18 वर्षं. आयुष्यभर एकमेकांशिवाय राहू न शकणारे भाऊ-बहीण एकमेकांपासून दुरावतात. एकाच शहरात राहून एकमेकांची तोंडे पाहात नाहीत. अगदी एकमेकांच्या नावाने अंघोळ करतात, म्हटले तर वावगे ठरू नये.

    हेही वाचा – मिथुनेचा शुक्र… सोशल बटरफ्लाय

    मित्र-मैत्रिणी, जवळची सगळी माणसे लहान-सहान, अत्यंत क्षुल्लक कारणांनी हळूहळू दूर व्हायला लागतात. मग फोन बंद होतात… आपण केला तरी तितकेच बोलणे मोजकेच! त्यात भावनिकता लोप पावलेली असते. सगळ्या संवेदना नष्ट होतात, प्रेमाचा ओलावाही नसतो… फक्त आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणार. ज्या दिवशी तुम्ही समोरच्या व्यक्तीला फोन करायचे बंद होणार, त्या दिवसापासून तुमचा संबंध संपला! कारण, समोरून कधीही फोन येणार नाही. तुम्हाला हौस असेल तर, करत राहा फोन. राहू आपली मज्जा बघत राहणार. आपल्याला समजायला लागते की, आपण एकटे पडत चाललो आहोत आणि हा एकटेपणा अत्यंत भयंकर असतो. आपण मनापासून जगतो, सामोरच्यासाठी खूप काही सातत्याने करत असतो आणि मानसिक गुंतवणूक ती तर विचारूच नका! आयुष्यभराची साथसोबत असलेली माणसे हळूहळू आपल्यापासून इतकी दुरावतात… कारण काहीच नसते. दोन व्यक्तींमधील गैरसमजाची एक अदृश्य भिंत… हे गैरसमज संपत नाहीत, ते दूर होत नाहीत, अशी स्थिती राहूच निर्माण करतो. राहू भोग भोगायला लावतो.

    या सगळ्या घटना मन अत्यंत उदास, विषण्ण करतात आणि शेवटी भावनिकदृष्ट्या आपण कोलमडून पडतो. आपली तब्येत ढासळू लागते, आर्थिक सुबत्ता कमी होते, कामात लक्ष लागत नाही आणि काहीच नकोसे वाटते. लक्षात ठेवा, जीवन हे एकटेपणाने नाही, तर आपल्या आप्त, मित्र, नातेवाईक यांच्यासोबत जगण्यासाठी आहे.

    आपण आजवर प्रत्येकासाठी किती काय काय केले, वेळप्रसंगी कसे मदतीला धावून गेलो, कशाचाही विचार न करता पैसाही खर्च केला हे सर्व आठवत राहते; पण त्याचा काहीच उपयोग नसतो आणि या गोष्टी बोलूनही दाखवायच्या नसतात, त्या ज्याच्या त्याने समजून घ्यायच्या असतात.

    आपली कुणालाही आठवण येत नाही… अगदी आपण आहोत की मेलो, याची विचारपूस पण कुणी करत नाही. ही सर्व परिस्थिती निर्माण करण्यात राहू अत्यंत माहीर आहे. आपल्या मनात यायच्याही कितीतरी आधी त्याने गोष्टी घडवून आणलेल्या असतात.

    ‘गैरसमज’ हे मोठे विष आहे आणि ते आपल्याही नकळत आपल्याविरुद्ध आपल्याच लोकांच्या मनात भरवून राहूने आपला डाव साधलेला असतो. कसला डाव? तर आपले मानसिक खच्चीकरण करण्याचा! हेच ते चंद्रग्रहण जे मनाला लागते… आपल्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचे या जगातून निघून जाणे, याही घटना राहू दशेत घडतात. पैशांचा अपव्यय आणि माणसे दुरावतात, ते वेगळेच.

    अनाठायी पैसा खर्च होतो आणि मन चिंताग्रस्त राहते. पैसा भरपूर येतो, पण टिकत नाही. त्याला असंख्य वाटा फुटतात. राहूच्या दशेत काहीच राहात नाही. ओंजळीतून सर्व काही निघून जाते. पैसा गेला, पुन्हा कष्ट करून मिळवता येतो; पण आयुष्यभर जोडलेल्या माणसांचे काय? माझी माझी म्हणून जपलेली माणसे आपल्या हृदयाच्या कोपऱ्यातून क्षणात निघून जातात. असंख्य प्रश्न मनाला भेडसावू लागतात. याच माणसांना मी आपले मानले होते, माझी माणसे म्हणून त्यांच्यासोबत आज इतका आयुष्याचा प्रवास केला होतो… ते सर्व खोटं होतं का? नात्यांवरचा विश्वास उडतो आणि मग वास्तवाची जाणीव होते, तशी परमेश्वराची आठवण येते.

    सगळे दुरावतात पण देव नाही. त्यामुळे सगळ्यांपासून दूर गेलो की, महाराजांच्या, देवाच्या समीप जातो. क्षमायाचना सुरू होतात… राहूचा जप करा… त्याचे रत्न घाला… हे करा आणि ते करा… पण त्याने जे झाले, ते खरंच परत येणार आहे का? मनावर असलेले दु:खाचे, वेदनेचे असंख्य ओरखडे पुसले जाणार आहेत का? कधीच नाही! पुन्हा नव्याने तीच नाती जोडली जातील? कदाचित नाही. आता हे सर्व बरोबर घेऊनच जगायचे आहे.

    फसवणूक, विश्वासघात हे राहूचे दुसरे नाव आहे जणू. जवळच्या नातेवाईकाने, मित्राने, सहकाऱ्याने… कुणीही असो, त्याने केलेला विश्वासघात… मग तो पैशांचा व्यवहार असो किंवा जमीनजुमल्याचा व्यवहार असो… इतके बेमालून फसतो की, आपला आपल्यावरचा विश्वास उडावा! कधी स्वप्नात सुद्धा येणार नाही, अशा व्यक्ती आपल्याला फसवून आयुष्यातील मोठे धडे शिकवता. ज्यांच्यावर आपला, आपल्याहीपेक्षा अधिक विश्वास असतो, त्यांच्याकडून झालेली फसवणूक आपल्याला अंतरबाह्य हादरवून टाकते. जगायचे कुणासाठी आणि विश्वास ठेवायचा तरी कुणावर? शेवटी एकच उत्तर – परमेश्वरावर! तो आपलाच आहे आणि आपलाच राहणार.

    राहूच्या दशेत कुठल्याही कागदावर सही डोळसपणे करा, कुणालाही जामीन राहताना विचार करा, प्रेमाचे उमाळे अगदी आपल्या मुलांसाठीही नकोत… राहूच्या दशेत नको त्या व्यक्तींना आपणच जवळ करतो आणि फसतो. समाजात आपले नाव बदनाम करणाऱ्या व्यक्ती राहूच्या दशेत भेटतात. सामाजिक जीवन बदलते, मित्र-मैत्रिणी दूर होतात, गैरसमज तसेच राहतात आणि सगळेच दुरावतात. आपल्याकडे पाहण्याचा दृष्टीकोनसुद्धा लोकांचा थोडा विचित्र होत जातो आणि आपल्या लोक टाळतात. आपल्याला हे का होत आहे, हेच समजत नाही! कारण आपण जसे असतो तसेच असतो… आपण बदललेले नसतो तर, राहूने परिस्थिती बदललेली असते.

    आज आपण राहूबद्दल वेगळा विचार करूया. किबहुना, राहू देखील कदाचित हेच सुचवत असावा. आयुष्यभर आपल्याला ओळखणारी, आपली म्हणवणारी माणसे आपल्याबद्दलच्या फालतू गैरसमजातून दूर जाऊच कशी शकतात? आपली बिनबुडाची नाती संपुष्टात येतात, जी आपण डोक्यावर घेऊन आयुष्यभर फिरत होतो… यातच राहूच्या असामान्य ताकदीची ओळख आपल्याला होते. काहीही म्हणा, राहूचे खेळ आपल्याला अंतर्मुख करायला भाग पाडतात. नात्यांची खरी ओळख करून देतात. तुम्ही कुणासाठीही कितीही काहीही करा, या जगात आपले कुणीही नाही… त्यामुळे स्वतःसाठी जगा आणि या नात्यांच्या गुंत्यात अडकू नका, हेच तर राहूला सांगायचे नाही ना? असाही विचार अनेकदा करावासा वाटतो.

    या विश्वात आपण एकटे येणार आणि एकटेच जाणार, हेच जणू सांगण्यासाठी राहूने हा खेळ मांडलेला असावा, असेही अनेकदा वाटते. आपण ज्या लोकांसाठी जीव ओवाळून टाकतो, ती क्षणात परकी कशी होऊ शकतात? मग आजवर काय ओळखले आपण एकमेकांना? एखादी चूक होऊ शकते, पण आपल्या नात्यात इतकीही परिपक्वता नाही की आपण एकमेकांना माफ करू शकत नाही! आपण ज्या नात्यांच्या जीवावर उड्या मारतो, ती किती कच्ची आणि तकलादू आहेत, हेच राहू आपल्यासमोर आणायचा प्रयत्न करत असतो. राहूचे खेळ त्यालाच माहिती!

    हेही वाचा – शनीचा कर्मयोग

    आजवर असंख्य वेळा राहूचे लेख आपण वाचले, पण आज याच राहूचा असाही वेगळा विचार मला करावासा वाटला, म्हणून हा लेखन प्रपंच. ज्यांनी ज्यांनी राहू दशा भोगली आहे, त्यांना माझे म्हणणे नक्कीच पटेल.

    अखंड विश्वाला आधुनिक तंत्रज्ञानाची मोहिनी दाखवणारा राहू हा पूर्णतः वाईट नाही. त्याने तर, जग जवळ आणले आहे. आजचे UPI, सोशल मीडिया, प्रगत युग राहूचा करिष्मा आहे. प्रत्येक वाईट गोष्टीतूनही काहीतरी शिकण्यासारखा धडा मिळतो तो हा असा! राहूला पूर्णतः समजून घेणे कठीण आहे. अदृश्य शक्ती आपल्या अवती-भोवती आहे, पण आपण तिला ओळखू  शकत नाही. इथे प्रत्येक माणसात राहू आहे. आपल्यासमोर गोड बोलणारी, मागून आपलीच निंदा करणार… हे गृहीत धरून चालले तर त्रास कमी होणार! सतर्क रहाणे, कमी बोलणे हा राहूसाठी सर्वोत्तम उपाय आहे.

    राहू काय शिकवतोय? अंतर्मुख व्हा आणि विचार करा. कुणीही आपले नाही, पण आपल्या अत्यंत समीप आहे, तो आपला देव. आज किती वेळ देतो आपण त्याला? सगळे विश्व फसवे आहे, पण देव कधीही आपल्याला अंतर देणार नाही, दिलेही नाही. उर्वरित आयुष्य त्याच्या चरणाशी समर्पित केले, तर झालेला त्रास, वेदना, दाह नक्कीच सुसह्य होईल, यात शंका नसावी.


    पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230

    antarnad18.blogspot.com

    Avatar photo
    अस्मिता दीक्षित

    जवळपास 18 वर्षं IT क्षेत्रात recruitment मध्ये कार्यरत होते. त्यानंतर केसरी टूर्समध्ये 3 वर्षं लेखन केले. तसेच, ‘antarnad18.blogspot.com’ हा स्वतःचा ब्लॉग सुरू केला. लोकमत, सकाळ या दैनिकांमध्ये लेखन केले. ज्योतिष शास्त्राचे कुतूहल पहिल्यापासून होते, त्यामुळे 1999पासून या शास्त्राचे अध्ययन केले आणि अविरत करत आहे. माझे परमगुरु श्री गजानन महाराज आणि श्री स्वामी समर्थ यांच्या सेवेत रुजू आहे. त्यांची कृपा आहे म्हणून सर्व चालले आहे, हा ठाम विश्वास आहे. गेली 10 वर्षं ‘हसत खेळत ज्योतिष शिकूया’ या कार्यशाळांचे झूमच्या माध्यमातून आयोजन करत आहे.

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 ऑक्टोबर 2026

    October 30, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 29 ऑक्टोबर 2026

    October 29, 2026 पंचांग आणि भविष्य

    घराचे मुख्य प्रवेशद्वार, पितृपद आणि दरवाजाचा रंग

    October 28, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 ऑक्टोबर 2026

    By Team AvaantarOctober 30, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 30 ऑक्टोबर 2026; वार : शुक्रवार भारतीय सौर : 08…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 29 ऑक्टोबर 2026

    October 29, 2026

    घराचे मुख्य प्रवेशद्वार, पितृपद आणि दरवाजाचा रंग

    October 28, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 28 ऑक्टोबर 2026

    October 28, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    माणसांचे खरे अंतरंग उलगडणारा राहू

    October 30, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : पैं मंडळ आणि चंद्रमा, दोन्ही नव्हती सुवर्मा

    October 30, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 ऑक्टोबर 2026

    October 30, 2026

    तिची पेन्शन… स्वाभिमानाची नवी ओळख

    October 29, 2026

    सत्याचा विजय होतोच, पण…

    October 29, 2026

    गुरूमंत्र… शिष्याची श्रद्धा आणि गुरूंची व्याकुळता

    October 29, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 2
    • अध्यात्म 488
    • अवांतर 217
    • आरोग्य 165
    • पंचांग आणि भविष्य 654
    • फिल्मी 76
    • फूड काॅर्नर 262
    • मैत्रीण 34
    • ललित 1027
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtra

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    माणसांचे खरे अंतरंग उलगडणारा राहू

    October 30, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : पैं मंडळ आणि चंद्रमा, दोन्ही नव्हती सुवर्मा

    October 30, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 ऑक्टोबर 2026

    October 30, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.