Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    माणसांचे खरे अंतरंग उलगडणारा राहू

    October 30, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : पैं मंडळ आणि चंद्रमा, दोन्ही नव्हती सुवर्मा

    October 30, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 ऑक्टोबर 2026

    October 30, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, October 30
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » सार्थ ज्ञानेश्वरी : पैं मंडळ आणि चंद्रमा, दोन्ही नव्हती सुवर्मा
    अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : पैं मंडळ आणि चंद्रमा, दोन्ही नव्हती सुवर्मा

    Team AvaantarBy Team AvaantarOctober 30, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter Fifteen, पंधरावा अध्याय, अध्याय पंधरावा, विश्वरूप दर्शन, चतुर्भुज रूप, पुरुषोत्तम योग
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    अध्याय चौदावा

    ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहममृतस्याव्ययस्य च । शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्यैकान्तिकस्य च ॥27॥

    अगा ब्रह्म या नांवा । अभिप्रावो मी पांडवा । मीचि बोलिजे आघवां । शब्दीं इहीं ॥404॥ पैं मंडळ आणि चंद्रमा । दोन्ही नव्हती सुवर्मा । तैसा मज आणि ब्रह्मा । भेदु नाहीं ॥405॥ अगा नित्य जें निष्कंप । अनावृत धर्मरूप । सुख जें उमप । अद्वितीय ॥406॥ विवेकु आपलें काम । सारूनि ठाकी जें धाम । निष्कर्षाचें निःसीम । किंबहुना मी ॥407॥ ऐसेसें हो अवधारा । तो अनन्याचा सोयरा । सांगतसे वीरा । पार्थासी ॥408॥ येथ धृतराष्ट्र म्हणे । संजया हें तूतें कोणें । पुसलेनिविण वायाणें । कां बोलसी ॥409॥ माझी अवसरी ते फेडी । विजयाची सांगें गुढी । येरु जीवीं म्हणे सांडीं । गोठी यिया ॥410॥ संजयो विस्मये मानसीं । आहा करूनि रसरसी । म्हणे कैसें पां देवेंसी । द्वंद्व यया ॥411॥ तरी तो कृपाळु तो तुष्टो । यया विवेकु हा घोंटो । मोहाचा फिटो । महारोगु ॥412॥ संजयो ऐसें चिंतितां । संवादु तो सांभाळितां । हरिखाचा येतु चित्ता । महापूरु ॥413॥ म्हणौनि आतां येणें । उत्साहाचेनि अवतरणें । श्रीकृष्णाचें बोलणें । सांगिजैल ॥414॥ तया अक्षराआंतील भावो । पाववीन मी तुमचा ठावा । आइका म्हणे ज्ञानदेवो । निवृत्तीचा ॥415॥

    हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : तेजाचा तेजौनि निघाला, परी तेजींचि असे लागला

    अर्थ

    अमृत, अविकारी, शाश्वत, धर्मरूप, सुख व अद्वितीय असे जे ब्रह्म ते मी (च) आहे (म्हणजे अशा ब्रह्मात व माझ्यात भेद नाही) ॥27॥

    अर्जुना, ब्रह्म या नावाला विषय मी आहे आणि या सर्व शब्दांनी (म्हणजे अमृत, अव्यय, शाश्वत वगैरे शब्दांनी) मीच बोलला जातो. ॥404॥ चंद्र आणि चंद्राचे बिंब ही जशी भिन्न नाहीत त्याप्रमाणे हे चतुर अर्जुना, माझ्यात व ब्रह्मात भेद नाही. ॥405॥ अर्जुना, जे ब्रह्म नित्य. अचल, प्रकट धर्मरूप, अमर्याद सुख व अद्वितीय (असे आहे). ॥406॥ विचार (हा अज्ञान नष्ट करण्याचे) आपले काम करून ज्या ठिकाणी प्राप्त होतो ते स्थान मी आहे. फार काय सांगावे!  सिद्धांताचे पराकोटीचे स्थान ते मीच समज. ॥407॥ अहो महाराज, ऐका. अशा अशाप्रमाणे, तो अनन्य भक्तांचा आवडता (श्रीकृष्ण परमात्मा) वीर जो अर्जुन, त्याला सांगता झाला. ॥408॥ तेव्हां धृतराष्ट्र म्हणाला, संजया, हे तुला कोणी विचारल्यावाचून तू व्यर्थ का बोलतोस? ॥409॥  (माझ्या मुलांच्या) विजयाची बातमी सांगून माझी चिंता दूर कर, तेव्हां संजय मनात म्हणतो की, तू या विजयाच्या गोष्टी सोडून दे. ॥410॥ (धृतराष्ट्राची अशी ही अवस्था पाहून) संजय आश्चर्यचकीत होऊन व त्रासून मनात म्हणाला, अहो, काय आश्चर्य आहे! याचे देवाशी कसे वैर आहे! ॥411॥ तरी तो कृपाळू (श्रीकृष्णपरमात्मा) संतुष्ट होवो आणि यास (धृतराष्ट्रास) हा आत्मानात्मविचार सेवन करण्याचे सामर्थ्य देवो! आणि याचा मोहरूपी महारोग नाहीसा होवो. ॥412॥ संजय आपल्या मनात धृतराष्ट्रासंबंधी असा विचार करीत असता आणि कृष्णर्जुनाच्या संवादाचे मनन करीत असता, त्याच्या चित्ताला आनंदाचा महापूर आला. ॥413॥ म्हणून आता या उत्साहाच्या भरात तो श्रीकृष्णाचे बोलणे सांगेल. ॥414॥ त्या अक्षरातील अभिप्राय मी तुमच्या ठिकाणी पोहोचवीन (तुम्हाला सांगेन) तो तुम्ही ऐका; असे निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर (महाराज) म्हणतात. ॥415॥

    ॥चौदावा अध्याय समाप्त॥

    क्रमश:

    हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : माझें पैलपण जाये, भक्त हें ऐलपण ठाये

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    गुरूमंत्र… शिष्याची श्रद्धा आणि गुरूंची व्याकुळता

    October 29, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : माझें पैलपण जाये, भक्त हें ऐलपण ठाये

    October 29, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : तेजाचा तेजौनि निघाला, परी तेजींचि असे लागला

    October 28, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    गुरूमंत्र… शिष्याची श्रद्धा आणि गुरूंची व्याकुळता

    By डॉ. शिरीष कुलकर्णीOctober 29, 2026

    अनुग्रह कानात सांगितलेला एक मंत्र! पण ती एका आत्म्याने दुसऱ्या आत्म्याला दिलेली प्रकाशाची भेट असते.…

    सार्थ ज्ञानेश्वरी : माझें पैलपण जाये, भक्त हें ऐलपण ठाये

    October 29, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : तेजाचा तेजौनि निघाला, परी तेजींचि असे लागला

    October 28, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : घृताचें थिजलेंपण, न मोडितां घृतचि जाण

    October 27, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    माणसांचे खरे अंतरंग उलगडणारा राहू

    October 30, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : पैं मंडळ आणि चंद्रमा, दोन्ही नव्हती सुवर्मा

    October 30, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 ऑक्टोबर 2026

    October 30, 2026

    तिची पेन्शन… स्वाभिमानाची नवी ओळख

    October 29, 2026

    सत्याचा विजय होतोच, पण…

    October 29, 2026

    गुरूमंत्र… शिष्याची श्रद्धा आणि गुरूंची व्याकुळता

    October 29, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 2
    • अध्यात्म 488
    • अवांतर 217
    • आरोग्य 165
    • पंचांग आणि भविष्य 654
    • फिल्मी 76
    • फूड काॅर्नर 262
    • मैत्रीण 34
    • ललित 1027
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtra

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    माणसांचे खरे अंतरंग उलगडणारा राहू

    October 30, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : पैं मंडळ आणि चंद्रमा, दोन्ही नव्हती सुवर्मा

    October 30, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 ऑक्टोबर 2026

    October 30, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.