दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 28 ऑक्टोबर 2026; वार : बुधवार
- भारतीय सौर : 06 कार्तिक शके 1948; तिथि : तृतीया 25:06; नक्षत्र : कृत्तिका 13:26;
- योग : व्यतिपात 07:17, वरियान 27:40; करण : वणिज 14:37;
- सूर्य : तुळ; चंद्र : वृषभ ; सूर्योदय : 06:36; सूर्यास्त : 18:08;
- पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
भगिनी निवेदिता
टीम अवांतर
आयरिश लेखिका, शिक्षिका, सामाजिक कार्यकर्त्या आणि स्वामी विवेकानंद यांच्या शिष्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भगिनी निवेदिता यांचा जन्म 28 ऑक्टोबर 1867 रोजी उत्तर आयर्लंड येथे झाला. त्यांचे मूळ नाव होते मार्गारेट एलिझाबेथ नोबल. मार्गारेट यांचे प्राथमिक शिक्षण मँचेस्टर येथे झाले. देशाविषयी प्रेम, स्वातंत्र्य लढा आणि जगातील विविध प्रश्न आणि तेथे उत्पन्न होणाऱ्या विविध विचारसरणी यांचा परिणाम त्यांच्या मनावर होत होता.
पुढे त्या लंडन येथे आल्या आणि तिथे त्या शिक्षिका म्हणून काम करू लागल्या. ‘हसत-खेळत बालशिक्षण’ या नव्या प्रयोगाकडे त्यांचे लक्ष वेधले गेले आणि त्यांनी त्याचा सखोल अभ्यास केला. 1892 मध्ये या नव्या पद्धतीने शिक्षण देणाऱ्या शाळेची देखील त्यांनी स्थापना केली.
हेही वाचा – कोऽहम्?
22 ऑक्टोबर १८९५ रोजी स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथील सर्वधर्म परिषदेत भारतीय तत्त्वविचार मांडून स्वतःची छाप उमटविली आणि त्यांचे सर्वदूर कौतुक झाले. त्यानंतर काही काळाने स्वामीजी लंडन येथे आले. त्यांची व्याख्याने ऐकायला मार्गारेट जाऊ लागल्या. त्यांना स्वामी विवेकानंद यांच्या तत्त्वविचारांचे आकर्षण वाटू लागले. एक आदर्श दार्शनिक म्हणून स्वामीजींकडे त्या आदराने पाहू लागल्या. आणि अल्पावधीतच त्या विवेकानंद यांना सद्गुरू असे संबोधू लागल्या. स्वामीजींनी त्यांचे नाव बदलून नवीन नाव भगिनी निवेदिता असे ठेवले. निवेदिता म्हणजे ईश्वरीय कार्याला समर्पित केलेली.
28 जानेवारी 1898 रोजी मार्गारेट भारतात आल्या आणि कलकत्यात राहून त्यांनी आपलेपणाने हिंदू चालीरीती, परंपरा समजावून घेतल्या. त्याच वर्षी मध्य कलकत्त्यात आलेल्या प्लेगच्या साथीच्या निवारणाच्या कामी त्यांनी स्वामीजींना मोठी मदत केली. जनजागृती, स्वच्छता, रोगनिवारण या कामी त्यांनी अपरिमित कष्ट केले. या कार्यामुळे तेथील लोकांच्या मनात भगिनी निवेदितांबद्दल मोठा विश्वास उत्पन्न झाला. 1906 साली बंगालमध्ये जो दुष्काळ पडला होता, त्यावेळी देखील निवेदिता यांनी गावोगावी जाऊन मदत कार्य केले होते.
पुढे भगिनी निवेदिता यांनी ‘बालिका विद्यालया’ची स्थापना केली. लहान मुली, नवविवाहिता, प्रौढा, विधवा स्त्रिया या सर्वांसाठीच ही शाळा होती. या शाळेत मुलींना काय शिकवले जावे याविषयी स्वामीजी निवेदितांना मार्गदर्शन करीत असत. चित्रे काढणे, मूर्ती बनवणे, शिवणे, विणणे अशा विविध गोष्टी शिकून मुलींच्या हृदय आणि बुद्धीचा एकत्र तसेच व्यवहार्य विकास कसा होईल असा विचार या शाळेने राबविला. याखेरीज निवेदिता बेलूर येथील आश्रमातील साधकांना शरीरशास्त्र, वनस्पतीशास्त्र, शिक्षणशास्त्र असे विषयही शिकवीत असत.
1901 पासून निवेदिता यांनी भारतासंबंधी व्याख्याने देण्यास सुरुवात केली आणि लेखनकार्यही केले. या लेखनाचे जे पैसे मिळत ते बालिका विद्यालयासाठी वापरले जात. 4 जुलै 1902 रोजी स्वामी विवेकानंद यांचे झालेले निधन ही निवेदिता यांच्या आयुष्यातील महत्त्वाचीच घटना होती. स्वामीजींची राष्ट्रजागृतीची विचारधारा जागृत ठेवण्याचे महत्त्वाचे काम आता निवेदितांनी हाती घेतले. 1905 साली बनारसला भरलेल्या काँग्रेस अधिवेशनात भाग घेतला आणि स्वदेशी चळवळीला पाठिंबा देऊन स्वदेशीचे व्रत अंगीकारले. त्याच साली लॉर्ड कर्झनच्या बंगाल-फाळणीच्या योजनेला त्यांनी कडवा विरोध केला. जामिनाकरिता हवी असलेली रक्कम काही तासात जमा करून भूपेंद्रदत्त यांना त्यांनी जामिनावर सोडविले.
युरोप तसेच अमेरिकेत असलेल्या भारतीयांना इंग्रज राजवटीविरूद्ध संघटित करण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. भारतात आल्यानंतर त्यांचे अनेक लेख रिव्हू ऑफ रिव्हूज, द प्रबुद्ध भारत, मॉडर्न रिव्हू यांसारख्या नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाले. काली द मदर, द वेब ऑफ इंडियन लाइफ, क्रेडल टेल्स ऑफ हिंदूइझम, इंडियन स्टडीज ऑफ लव्ह अँड डेथ आणि द मास्टर अॅज आय सॉ हिम अशी महत्त्वाची पुस्तके त्यांनी लिहिली. 13 ऑक्टोबर 1911 रोजी त्यांचे निधन झाले.
आजचे राशिभविष्य
मेष – आजचा दिवस संमिश्र असेल. दिवसाचा पूर्वार्ध चांगला आहे, त्यामुळे या काळात महत्त्वाची कामे पूर्ण करा. दिवसाच्या उत्तरार्धात विरोधक आणि शत्रूंपासून सावध रहा. आज एखाद्या कौटुंबिक समस्येमुळे तुम्ही चिंतित असाल. नोकरदार जातकांनी आपल्या कामाबाबत गंभीर असले पाहिजे, कारण कामात विलंब होण्याची शक्यता आहे. आजचा दिवस आर्थिक बाबींसाठी अनुकूल असेल. व्यवसायातून चांगली कमाई होईल. प्रवासासाठी खर्च होण्याची शक्यता आहे.
वृषभ – आजचा दिवस संमिश्र असू शकतो. कामाच्या ठिकाणी काही तांत्रिक समस्या आणि गोंधळाचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे कामात संयम आणि चिकाटी राखणे आवश्यक आहे. इतरांच्या मतांवर आधारित कोणताही निर्णय घेणे टाळावे. कामात अपेक्षित यश न मिळाल्याने मानसिक त्रास होऊ शकतो. व्यवसायातील नवीन गुंतवणुकीबाबत सावधगिरी बाळगा. आज कुटुंबातही समन्वय राखणे आवश्यक आहे. जवळचे नातेवाईक एखाद्या गोष्टीवरून नाराज होऊ शकतात. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. वैवाहिक जीवनासाठी मात्र आजचा दिवस अनुकूल आहे.
मिथुन – आजचा दिवस सामान्य असेल. दैनंदिन कामांमध्ये यश मिळेल आणि नवीन संधींचा अनुभव येईल. कामाच्या ठिकाणी केलेल्या मेहनतीचे फळ मिळेल. आरोग्यही चांगले राहील. कुटुंब आणि नातेवाईकांकडून प्रेम आणि पाठिंबा मिळेल. जोडीदारासोबत आज दिवाळी खरेदीसाठी जाऊ शकता. आतापर्यंत अडकलेले पैसे आज परत मिळू शकतात. मात्र कोणत्याही गोष्टीबद्दल जास्त उत्साहीपणा दाखवू नका, कारण यामुळे नुकसान होऊ शकते.
कर्क – आजचा दिवस खूप चांगला आहे. लाभ आणि प्रगतीसाठी अनेक चांगल्या संधी उपलब्ध होतील. प्रलंबित कामेही पूर्ण होऊ शकतात. विद्यार्थ्यांसाठीही दिवस चांगला आहे. शैक्षणिक स्पर्धांमध्ये त्यांची कामगिरी चांगली होईल अशी अपेक्षा आहे. तंत्रज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांना त्यांच्या प्रयत्नांमध्ये अपेक्षित यश मिळेल. व्यवसायात प्रगती करण्याची चांगली संधी मिळेल. व्यवसायातील तेजीमुळे कमाईत वाढ होईल. संध्याकाळी कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवाल.
सिंह – आजचा दिवस संमिश्र असेल. काही प्रतिकूल प्रसंगांचा सामना करावा लागेल, ज्यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या चिंताग्रस्त असाल. स्वतःच्या कामात सतर्क रहा. काम पूर्ण होईपर्यंत आपल्या योजना कोणाशीही शेअर करू नका. संभाषणांमध्ये व्यावहारिक दृष्टिकोन ठेवा. उत्पन्नाच्या बाबतीत अनेक नवीन संधी आज उपलब्ध होऊ शकतात, ज्यामुळे तुम्हाला यश मिळेल. दिवसाच्या उत्तरार्धात, अधिक उत्साही होऊन कामे हातावेगळी कराल. व्यावसायिकांना एका नवीन प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळू शकते.
कन्या – आजचा दिवस अनुकूल आहे. कामात काही सकारात्मक बदल दिसून येतील. कामाच्या ठिकाणी मित्र आणि सहकाऱ्यांकडून तुम्हाला पाठिंबा मिळेल. स्वतःची बुद्धिमत्ता आणि कार्यक्षमता यामुळे विरोधकांवर मात करता येईल. फक्त कोणावरही आंधळा विश्वास ठेवणे टाळा, कारण त्यामुळे फसवणूक होऊ शकते. शिवाय रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. एखादी इच्छा आज पूर्ण होऊ शकते.
तुळ – खूप चांगले परिणाम घेऊन येणारा आजचा दिवस आहे. कार्यनिष्ठा आणि वागणूक याबद्दल तुमची प्रशंसा होऊ शकते. वरिष्ठ तुमच्यावर नवीन कामे आणि जबाबदाऱ्या देखील सोपवू शकतात. प्रलंबित व्यावसायिक करार आज पूर्ण होण्याची शक्यता आहे; प्रयत्न करत राहा. व्यवसायात काही नवीन योजना राबवाल, उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न कराल. आजचा दिवस तुमच्यासाठी यश आणि समृद्धीचा असेल.
वृश्चिक – आजचा दिवस खूप चांगला आहे. कामात मोठे यश मिळेल आणि योजना देखील लवकर पूर्ण करू शकाल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो, जो भविष्यात खूप फायदेशीर ठरू शकतो. नोकरदार जातकांना कामात यश आणि प्रशंसा मिळू शकते. व्यवसायात चांगली कमाई होण्याची शक्यता आहे, विशेषतः किराणा आणि हॉटेल उद्योगातील जातकांना आजचा दिवस विशेष लाभदायक ठरेल. मालमत्तेशी संबंधित एखादे काम असेल, तर त्यातही यश मिळेल.
हेही वाचा – काय पण एकेक आठवणी असतात!
धनु – संमिश्र परिणाम देणारा असा आजचा दिवस असेल. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची आज विशेष गरज आहे. एखादी जुनी शारीरिक समस्या पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहे. कंबर आणि पाठीत वेदना जाणवू शकतात. कामाच्या ठिकाणी अनुकूल परिस्थिती असेल.स्वत:च्या ध्येयांविषयी आज जरा चिंतित असाल. संध्याकाळी जोडीदारासोबत स्वादिष्ट जेवणाचा आनंद घ्याल. एखाद्या दूरच्या नातेवाईकाकडून चांगली बातमी मिळू शकते.
मकर – मकर राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस संमिश्र असेल. स्वतःच्या आवडीच्या गोष्टी करण्याची संधी मिळू शकते. दिवसाच्या सुरुवातीपासूनच तुम्ही उत्साही आणि ऊर्जावान असाल. मात्र एखाद्या कौटुंबिक समस्येबाबत नको इतकी चिंता वाटू शकते. कुटुंबाच्या पाठिंब्याने एखादे महत्त्वाचे काम पूर्ण होऊ शकते. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल. व्यवसायातूनही चांगली कमाई होण्याची शक्यता आहे. संध्याकाळ तुमच्यासाठी अधिक अनुकूल असेल कारण कुटुंबासोबत तुम्ही आनंदाचे क्षण अनुभवाल.
कुंभ – आपल्या कामावर आणि जबाबदाऱ्यांवर लक्ष केंद्रित करणे आज आवश्यक आहे. कोणतीही गुंतवणूक करणे आज टाळा, कारण त्यामुळे नफ्याऐवजी नुकसान होऊ शकते. नोकरदार जातकांनी आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, अन्यथा चुकांमुळे मोठे नुकसान होऊ शकते. आर्थिक बाबतीत आजचा दिवस खर्चिक ठरू शकतो. काही अनपेक्षित खर्चांमुळे बजेट बिघडेल. स्थावर मालमत्तेचा व्यवहार होणार असेल कागदपत्रांची काळजीपूर्वक तपासणी करा. वैवाहिक जीवनात जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवा.
मीन – तुम्हाला आज कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. ज्यामुळे तुम्हाला तुमची ध्येये साध्य करण्यास मदत होईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा फायदा होईल. काहीतरी नवीन शिकण्याची संधीही मिळेल. संशोधन कार्यात गुंतलेल्यांच्या हाती काहीतरी नवीन माहिती येऊ शकते. व्यावसायिक नवीन संकल्पना फायदेशीर ठरतील का याची चाचपणी करतील. वैवाहिक जीवन सामान्य असेल. महिलांना सासरच्या मंडळींकडून लाभ आणि पाठिंबा मिळेल. एखाद्या धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.


