Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    संस्कार… माणुसकी आणि सहिष्णुतेचे!

    March 24, 2026

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » आज, 14 जुलै 2025 चे पंचांग आणि दिनविशेष
    वास्तू आणि वेध

    आज, 14 जुलै 2025 चे पंचांग आणि दिनविशेष

    Team AvaantarBy Team AvaantarJuly 14, 2025No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    आज, दिनांक : 14 जुलै 2025, वार : सोमवार

    भारतीय सौर : 23 आषाढ शके 1947, तिथि : चतुर्थी 23:59, नक्षत्र : धनिष्ठा 06:48

    योग : आयुष्यान 16:13, करण : बव 12:33

    सूर्य : मिथुन, चंद्र : कुंभ, सूर्योदय : 06:08, सूर्यास्त : 19:19

    पक्ष : कृष्ण, ऋतू : ग्रीष्म, सूर्य अयन : दक्षिणायन

    संवत्सर : विश्वावसू, शालिवाहन शक : 1947, विक्रम संवत : 2081, युगाब्द : 5127

    संकष्ट चतुर्थी चंद्रोदय 10.03


    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    आजचे राशीभविष्य

    मेष – कामाचा थकवा जाणवू शकतो. कार्यालयीन राजकारणापासून दूर रहा. मालमत्ता खरेदी किंवा विक्री करायची असेल तर, आजचा दिवस शुभ असेल. एखाद्या मित्राला किंवा नातेवाईकाला आर्थिक मदत करावी लागेल, परंतु दिलेले पैसे वेळेवर परत मिळतील याची आधी खात्री करा.

    वृषभ – आजचा दिवस आनंदात जाईल. आत्मविश्वासाने नवीन कामाला सुरुवात कराल. घरात शुभ कार्याचे आयोजन केल्याने आनंदाचे वातावरण निर्माण होईल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. नव्या कौटुंबिक जबाबदाऱ्या स्वीकारण्याची तयारी ठेवा.

    मिथुन – सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल. पैशाचा ओघ वाढेल. बऱ्याच काळापासून अडकलेले पैसे परत मिळतील. एखाद्या महत्त्वाच्या विषयावर कुटुंबातील सदस्यांशी चर्चा होऊ शकते. जुन्या मित्रांना भेटण्याचे योग आहेत. विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण कमी होईल.

    कर्क – व्यावसायिक आयुष्यातील वादविवाद टाळा. आत्मविश्वासाने नवीन कामांची जबाबदारी घ्या. कारकिर्दीतील आव्हानांवर मात करण्यासाठी कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घ्या. आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबासमवेत वेळ घालवा. यामुळे तणाव कमी होईल.

    सिंह – आजचा दिवस थोडा तणावपूर्ण असेल. कार्यालयात कामामुळे व्यग्र वेळापत्रक राहिल. व्यवसायात नफा मिळेल. आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगा. पैसे वाचवण्यावर लक्ष केंद्रित करा. उत्पन्न आणि खर्च यांच्यात समतोल ठेवा. जोडीदारासोबत वेळ घालवा.

    कन्या – उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. उत्पन्नात वाढ होईल. जमीन किंवा वाहन खरेदीची शक्यता आहे. एखाद्या धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता. त्यामुळे मानसिक शांती लाभेल. घाईघाईने कोणतेही काम करू नका किंवा निर्णय घेऊ नका.

    हेही वाचा – लोकल ट्रेन आणि मोबाइल एटिकेट्स

    तुळ – कार्यालयातील कामाचा ताण वाढेल, मात्र सहकाऱ्यांबरोबर केलेल्या कामाचे चांगले परिणाम मिळतील. व्यवसायात नफा मिळेल. बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या समस्या संपतील. घरी एखादी चांगली बातमी मिळेल.

    वृश्चिक – व्यावसायिक जीवनात सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल. सांघिक कार्यामुळे चांगले परिणाम मिळतील. गुंतवणुकीबाबतचे निर्णय विचारपूर्वक घ्या. कुटुंबातील सदस्यांशी वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे निरुपयोगी युक्तिवादांपासून दूर रहा.

    धनु – खर्चावर नियंत्रण ठेवा. घरात भावंडांशी वाद होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. कौटुंबिक जीवनातील समस्या तणाव वाढवू शकतात. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवा. धीराने समस्या सोडवा.

    मकर – आर्थिक बाबींमध्ये कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. त्याने आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनातील समस्या प्राधान्याने सोडवण्याचा प्रयत्न करा. घरगुती जबाबदाऱ्या स्वीकारण्याची तयारी ठेवा. प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवाल.

    कुंभ – बऱ्याच काळापासून रखडलेली कामे यशस्वी होतील. अविवाहित लोकांसाठी विवाहाचे प्रस्ताव येतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतील. एखाद्या जुन्या मित्राची भेट घडेल. यामुळे मन आनंदी होईल. पैशाचे व्यवहार करताना थोडीशी सावधगिरी बाळगा.

    मीन – दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. कार्यालयात वादविवाद होण्याची शक्यता आहे. प्रतिकूल परिस्थितीचा सामना करताना धीर धरा. आर्थिक स्थिती सुधारेल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. कौटुंबिक जीवनात शांतता आणि आनंद राहील.


    दिनविशेष

    संगीतकार मदन मोहन

    टीम अवांतर

    संगीतकार मदन मोहन यांचे संपूर्ण नाव मदन मोहन कोहली होते. 25 जून 1924 रोजी इराकच्या बगदाद येथे त्यांचा जन्म झाला. म्हणजे मागील वर्ष हे त्यांचे जन्म शताब्दी वर्ष होते. कामाच्या निमित्ताने इराकमध्ये असलेले त्यांचे वडील कुटुंबकबिल्यासह 1932 साली भारतात परतले. लखनऊ, मुंबई, डेहराडून या ठिकाणी शिक्षण पूर्ण करून मदन मोहन सैन्यात भरती झाले खरे, पण तिथे ते फारसे रमले‌ नाहीत.‌ संगीत क्षेत्रात आपले नशीब आजमावून बघण्यासाठी त्यांनी सैन्यातील नोकरी सोडली आणि लखनऊच्या आकाशवाणी केंद्रात ते नोकरीला लागले. तिथे अनेक दिग्गज संगीतकार, गायक, वादक यांच्या भेटी होत गेल्या. 1948 साली ‘शाहीन’ या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत गायक म्हणून त्यांचा प्रवेश झाला. 1950 साली ‘ऑंखे’ या चित्रपटाला स्वतंत्रपणे संगीत देण्याची संधी त्यांना मिळाली. मात्र चित्रपट फारसा चालला नाही. त्यांना खऱ्या अर्थाने यश मिळाले ते ‘भाई भाई’ या चित्रपटाद्वारे. नंतर त्यांनी अनेक चित्रपटांना संगीत दिले, अनेक गायकांसोबत काम केले, विशेषत: गायिका लता मंगेशकर यांच्यासोबत केलेली गाणी आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. 1970 साली ‘दस्तक’ चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यांच्या आयुष्यातला हा पहिला आणि एकमेव पुरस्कार ठरला. 14 जुलै 1975 रोजी वयाच्या अवघ्या 51व्या वर्षी यकृताच्या आजाराने त्यांचे निधन झाले.

    हेही वाचा – वहिनीची माया

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026 वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविषय; 23 मार्च 2026

    March 23, 2026 वास्तू आणि वेध

    साप्ताहिक राशीभविष्य : 22 ते 28 मार्च 2026

    March 22, 2026 वास्तू आणि वेध
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    By Team AvaantarMarch 24, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 24 मार्च 2026; वार : मंगळवार भारतीय सौर :  03…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविषय; 23 मार्च 2026

    March 23, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 22 ते 28 मार्च 2026

    March 22, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 22 मार्च 2026

    March 22, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    संस्कार… माणुसकी आणि सहिष्णुतेचे!

    March 24, 2026

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 246
    • अवांतर 174
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 184
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn