दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 29 सप्टेंबर 2026; वार : मंगळवार
- भारतीय सौर : 07 आश्विन शके 1948; तिथि : तृतीया 17:10; नक्षत्र : अश्विनी 09:03;
- योग : हर्षण 27:19; करण : बव 28:03;
- सूर्य : कन्या; चंद्र : मेष; सूर्योदय : 06:28; सूर्यास्त : 18:30;
- पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
अंगारक संकष्ट चतुर्थी, चंद्रोदय 08:14
तृतीया श्राद्ध
भरणी श्राद्ध
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
विचारवंत, लेखक हमीद दलवाई
टीम अवांतर
भारतीय पत्रकार, समाजसुधारक, विचारवंत, कार्यकर्ते, लेखक आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळ आणि इंडियन सेक्युलर सोसायटीचे संस्थापक हमीद दलवाई यांचा जन्म 29 सप्टेंबर 1932 रोजी बॉम्बे प्रेसिडेंसी (आता महाराष्ट्र ) मधील मिरजोली गावात झाला. त्यांचे माध्यमिक शिक्षण चिपळूणमध्ये तर पुढील उच्च शिक्षण मुंबई येथील रुपारेल आणि इस्माईल युसुफ या महाविद्यालयांत झाले. महात्मा जोतीराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राममनोहर लोहिया यांच्या विचारांचा त्यांच्यावर खोल प्रभाव होता.
दलवाई यांनी ‘मौज’, ‘सत्यकथा’ आणि ‘ वसुधा’ यांसारख्या मासिकांमध्ये लघुकथा लिहायला सुरुवात केली. पुढे हमीद दलवाई हे काही मोजक्या धार्मिकदृष्ट्या धर्मनिरपेक्ष लोकांपैकी एक ठरले. त्यांनी धर्म-विशिष्ट कायद्यांऐवजी समान नागरी हक्कांसाठी प्रयत्न केले आणि भारतातून तिहेरी तलाक रद्द करण्यासाठी लढा दिला. त्याआधी मुस्लीम समाजातले विवाह आणि घटस्फोट हे कायद्याच्याच चौकटीत व्हावे असा त्यांचा आग्रह होता. इतकंच नव्हे तर बहुपत्नीत्व आणि हलालासारख्या प्रथाही बंद व्हाव्यात असं त्यांना वाटत असे. 1960 च्या दशकात त्यांनी तिहेरी तलाकविरोधातली आपली भूमिका मुस्लीम समाजाला सांगण्यास सुरुवात केली.
हेही वाचा – वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – अंतर्ज्ञान, अचानक धनलाभ
18 एप्रिल 1966 रोजी हमीद दलवाईंनी अवघ्या सात मुस्लीम महिलांसह (त्यापैकी तीन त्यांच्याच घरातील होत्या) विधानभवनावर मोर्चा काढला होता. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याकडे त्यांनी निवदेन सादर केलं. तिहेरी तलाक रद्द व्हावा यासाठी दलवाई यांनी आंदोलन उभं केलं होतं. हे आंदोलन अधिक व्यापक करण्यासाठी त्यांनी 22 मार्च 1970 रोजी मुस्लीम सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
या संस्थेच्या माध्यमातून, हमीद यांनी मुस्लिम समाजात, विशेषतः महिलांप्रति असलेल्या वाईट प्रथा सुधारण्यासाठी काम केले. त्यांनी अनेक पीडित मुस्लिम महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी मदत केली. याशिवाय त्यांनी भारतीय मुस्लिम समाजात दत्तक घेण्याची प्रथा स्वीकारली जावी यासाठीही प्रयत्न केला. त्यांनी इंडियन सेक्युलर सोसायटीची स्थापनाही केली. चांगल्या सामाजिक प्रथांसाठी प्रचार करण्यासाठी त्यांनी अनेक सार्वजनिक सभा, मेळावे, अधिवेशने आणि परिषदा यांचेही त्यांनी आयोजन केले.
दलवाई हे उत्तम लेखक देखील होते. लाट हा कथासंग्रह तर इंधन ही कादंबरी ही त्यांची वैशिष्ट्यपूर्ण निर्मिती होती. खेड्यात खोलवर रुजलेल्या अंधश्रद्धा, रूढी, समजुती यांचे अस्वस्थ करणारे चित्रण त्यांच्या कथांतून येते. बुद्धिवादी भूमिकेतून आणि धैर्याने स्वतःच्या समाजाकडे पाहाणारा लेखक असे दलवाईंसंबंधी म्हणता येईल. याशिवाय भारतातील मुस्लीम राजकारण, मुस्लीम पॉलिटिक्स इन सेक्युलर इंडिया, राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान; मुस्लीम जातीयतेचे स्वरूप / कारणे आणि उपाय, इस्लामचे भारतीय चित्र अशी वैचारिक ग्रंथ संपदाही त्यांच्या नावावर आहे.
3 मे 1977 रोजी हमीद दलवाई यांचे निधन झाले. अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनतर्फे जानेवारी 2017 मध्ये मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार हमीद दलवाई यांना प्रदान करण्यात आला.
आजचे राशिभविष्य
मेष – कुटुंबाच्या दृष्टीने आजचा दिवस सुखद असेल. कामाच्या ठिकाणी कामे पूर्ण करण्यास उत्सुक असाल आणि सहकाऱ्यांकडून देखील उत्तम सहकार्य मिळेल. सांघिक कार्याचाही तुम्हाला फायदा होईल. सुखसोयींचाही लाभ मिळेल. सर्जनशील बाबींमध्ये पुढाकार कायम ठेवाल. नवीन व्यावसायिक संधी वाढतील. तुमच्या वैयक्तिक कामगिरीत सुधारणा होईल आणि तुम्ही नवीन काम सुरू करू शकता. तुमचे बोलणे आणि वागणूक प्रभावी असेल. आरोग्याच्या किरकोळ समस्यांकडे वेळीच लक्ष द्या.
वृषभ – आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा असेल. एखाद्या समस्येमुळे मानसिक ताण जाणवू शकतो. कामाच्या ठिकाणी तुम्हाला दबाव जाणवू शकतो. बँकिंग संबंधित कामात यश मिळेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. हट्टीपणा, घाई आणि अहंकार मात्र टाळा. करिअर आणि व्यवसाय सामान्य असेल. व्यवहारात स्पष्टता ठेवा आणि कर्ज घेणे टाळा. कायदेशीर बाबींना गती मिळेल, त्यामुळे कामे वेळेवर पूर्ण करा. स्वतःच्या आरोग्याचीही काळजी घ्या. मधुमेही जातकांनी आपल्या डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी.
मिथुन – व्यावसायिक प्रयत्नांना गती मिळेल. आर्थिक बाबींसंदर्भात संपर्क आणि संवाद दृढ राहील. नोकरी आणि व्यवसाय अधिक चांगल्या स्थितीत असतील. काही कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे वेळेचे नियोजन करावे लागेल. आर्थिक बाबींमध्ये खर्च वाढेल, शिवाय काही अनपेक्षित खर्चांना सामोरे जावे लागू शकते. वैवाहिक जीवन सुखी राहील. वाहन चालवताना काळजी घ्या. लहान अपघात होण्याची शक्यता आहे.
कर्क – आर्थिक बाबींसाठी आजचा दिवस फायदेशीर असेल. व्यवसायात आर्थिक लाभ मिळतील. शासकीय कामात यश मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात असलेल्या जातकांसाठी आजचा दिवस अनुकूल असून, त्यांची प्रतिष्ठा आणि नफा वाढेल. भागीदारीत तुम्हाला पाठिंबा मिळेल. प्रशासकीय आणि शासनाची कामे सुरळीतपणे पूर्ण होतील. वरिष्ठांकडून तुम्हाला पाठिंबा मिळेल. योगाभ्यास आणि प्राणायाम यांचा फायदा होईल.
सिंह – आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा असेल. तुम्हाला संयम बाळगण्याची आणि जोखमीचे व्यवहार टाळण्याची गरज आहे. अल्पकालीन गुंतवणुकीसाठी दिवस अनुकूल नाही. इतरांच्या कामात हस्तक्षेप करणे टाळावे. शासकीय बाबींमध्ये संयम बाळगा, कागदपत्रे सांभाळा. भागीदारीतील व्यवसायात आज अडचणी उद्भवू शकतात. कायद्याच्या चौकटीत राहून त्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करा. पाय दुखणे किंवा मुरगळणे अशी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. वेळेवर वैद्यकीय सल्ला घ्या.
कन्या – आजचा दिवस फायदेशीर ठरेल. तुमचे मनोधैर्य उंचावलेले राहील. प्रतिष्ठा आणि आदर यात वाढ होईल. व्यवसायात फायदा होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल. आज सासरच्या मंडळींकडून लाभ मिळू शकतो. तुमची दीर्घकाळापासूनची इच्छा पूर्ण झाल्याने तुम्हाला आनंद होईल. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीत सुधारणा होईल. आरोग्यही उत्तम असेल.
तुळ – आर्थिक बाबतीत आजचा दिवस फायदेशीर ठरेल. व्यवसायात तुम्हाला एखादा चांगला सौदा मिळेल. सामाजिक संबंधांचाही फायदा होईल. कामाच्या ठिकाणी सहकारी आणि वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल. वैवाहिक जीवनात जोडीदाराकडून सहकार्य आणि पाठिंबा मिळेल. कुटुंबातील वडीलधाऱ्यांकडून मिळालेला सल्ला अवश्य अमलात आणा. यामुळे मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. संध्याकाळ स्वतःच्या छंदासाठी घालवाल. आरोग्य उत्तम राहील.
वृश्चिक – आजचा दिवस फायदेशीर ठरेल. व्यवसायात भावंडांकडून आर्थिक पाठिंबा मिळेल. मालमत्तेच्या बाबतीत फायदा होईल. एखाद्या सरकारी कामात यश मिळेल. आज स्वादिष्ट जेवणाचा देखील आनंद घेता येईल. तुमची धाडसी निर्णय घेण्याची वृत्ती आणि व्यवस्थापन कौशल्ये फायदेशीर ठरतील. पितृपक्षाकडूनही लाभ मिळण्याची शक्यता आहे. डोकेदुखी किंवा अर्धशिशीचा त्रास उद्भवू शकतो. त्यामुळे योग्य औषधोपचार करा.
हेही वाचा – मॅग्नोलिया
धनु – आज धार्मिक कार्यांकडे कल अधिक असेल. कामाच्या ठिकाणी तुमचे काम सुरळीतपणे पार पडेल. आर्थिक परिस्थिती अनुकूल राहील. व्यवसायातील कमाई आनंद घेऊन येईल. कुटुंबाकडूनही पूर्ण पाठिंबा मिळेल. कुटुंबातील नातेसंबंध अधिक दृढ होतील. संततीशी संबंधित आनंदाची बातमीसुद्धा मिळेल. पित्ताचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हलका आहार घ्या.
मकर – नोकरदार जातकांना कामात यश मिळेल. न्यायालयीन प्रकरणात निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे. सांघिक कार्यामुळे कामे वेळेवर पूर्ण होण्यास मदत होईल. भागीदारीच्या कामातून मोठा फायदा होऊ शकतो. एखादे डील करताना बोलण्यात संयम ठेवा कारण आज जोडीदारासोबत मतभेद आणि वाद होण्याची शक्यता आहे. रक्तदाबाचा त्रास असलेल्यांनी वेळेवर आपली औषधे घ्या.
कुंभ – आजचा दिवस शुभ असेल. व्यवसायात आणि कामात नफा तसेच प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील. तुमची एखादी इच्छा पूर्ण होईल, तसेच एखादे प्रलंबित काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. जर भावंडांसोबत संबंध बिघडले असतील, तर ते सोडवण्यात आज यश मिळेल. एखादे मोठे प्रोजेक्ट हाती लागू शकते. आरोग्यही उत्तम असेल. डोळ्यांची मात्र काळजी घ्या.
मीन – आजचा शुभ दिवस असेल. तुम्हाला परकीय स्त्रोतांकडून तुमच्या व्यवस्थापन कौशल्यासाठी लाभ मिळू शकतो. आर्थिकदृष्ट्या, आज बजेटमध्ये संतुलन साधू शकाल. कामाच्या ठिकाणी वेगाने कामे हातावेगळी करू शकाल. पूर्वी केलेल्या कामांचाही नवी कामे मिळवण्यासाठी फायदा होऊ शकतो. जोडीदाराकडून पाठिंबा मिळेल. अविवाहित जातकांना प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. पोटाशी निगडीत आजारांचा आज त्रास होऊ शकतो. त्यामुळे पचायला हलका आहार घ्या.


