Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 27 सप्टेंबर 2026

    September 27, 2026

    ग म भ न

    September 26, 2026

    बाबा जरा आमच्यासारखं जगून तर बघा!!

    September 26, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, September 27
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 27 सप्टेंबर 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 27 सप्टेंबर 2026

    Team AvaantarBy Team AvaantarSeptember 27, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, दर्शन कुलकर्णी, कुंडली, राशीभविष्य, आजचे राशीभविष्य, ज्योतिष
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 27 सप्टेंबर 2026; वार : रविवार
    • भारतीय सौर : 05 आश्विन शके 1948; तिथि : प्रतिपदा 20:58; नक्षत्र : उ. भाद्रपदा 11:07;
    • योग : वृद्धि 11:16; करण : बालव 09:42;
    • सूर्य : कन्या; चंद्र : मीन; सूर्योदय : 06:27; सूर्यास्त : 18:32;
    • पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    महालयारंभ

    प्रतिपदा श्राद्ध

    सूर्याचा हस्त नक्षत्र प्रवेश, वाहन : उंदीर

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    ‘किंग ऑफ रोमान्स’ यश चोप्रा

    टीम अवांतर

    हिंदी चित्रपट सृष्टीतील किंग ऑफ रोमान्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिग्दर्शक यश चोप्रा यांचा जन्म 27 सप्टेंबर 1932 रोजी ब्रिटिश भारतातील पंजाब प्रांतातील लाहोर येथे झाला. त्यांचे वडील ब्रिटिश पंजाब प्रशासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागात लेखापाल होते. मात्र यश यांचा बराचसा काळ प्रामुख्याने त्यांचे दुसरे भाऊ, बी. आर. चोप्रा यांच्या लाहोरमधील घरात गेला. पुढे यश चोप्रा यांनी जालंधरच्या दोआबा कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. सुरुवातीला त्यांना इंजीनियरिंगमध्ये करिअर करायचे होते. भारताच्या फाळणीनंतर ते लुधियाना येथे स्थलांतरित झाले.

    चित्रपट निर्मितीच्या आवडीमुळे पुढे ते  मुंबईला आले, जिथे त्यांनी सुरुवातीला आय.एस.जोहर यांच्याकडे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आणि नंतर  दिग्दर्शक-निर्माता भाऊ, बी.आर. चोप्रा यांच्यासाठी काम केले, तर त्यांचा दुसरा भाऊ, धरम चोप्रा, त्यांचा कॅमेरामॅन म्हणून काम करत होता.

    हेही वाचा – रक्तदाब कमी झालाय… कसे ओळखायचे?

    1959 मध्ये ‘धूल का फूल’ या हिंदी चित्रपटाव्दारे यश यांना दिग्दर्शनाची पहिली संधी मिळाली. याची निर्मिती त्यांचे मोठे भाऊ बी. आर. चोप्रा यांनी केली होती. या चित्रपटाला समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आणि तो त्या वर्षातील चौथा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. या यशाने प्रोत्साहित होऊन, चोप्रांनी ‘धर्मपुत्र’ नावाचा पुढील चित्रपट बनवला. या चित्रपटाद्वारे शशी कपूर यांनी नायक म्हणून पदार्पण केले. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटासाठी दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

    याशिवाय चोप्रा बंधूंनी 1965 मध्ये ‘वक्त’ चित्रपट बनवला, ज्यामध्ये सुनील दत्त, राज कुमार, शशी कपूर, साधना, बलराज साहनी, मदन पुरी, शर्मिला टागोर, अचला सचदेव आणि रहमान यांच्यासह अनेक कलाकारांचा समावेश होता. हा चित्रपट देखील व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरला. ‘लॉस्ट-अँड-फाउंड’ प्रकारातील हा एक ‘फाउंड फिल्म’ म्हणून ओळखला जातो. इतरही अनेक ट्रेंड्स हिंदी चित्रपट सृष्टीत सुरू करणारा हा चित्रपट, भारतीय सिनेमातील पहिल्या मल्टी-स्टारर चित्रपटांपैकी एक होता. या चित्रपटासाठी यश चोप्रा यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

    1969 साली आलेल्या राजेश खन्ना, नंदा अभिनीत इत्तेफाक या चित्रपटाने यश चोप्रा यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठीचा त्यांचा दुसरा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. याच काळात त्यांनी आपल्या भावापासून वेगळे होत आपली वेगळी कंपनी ‘यशराज फिल्म्स’ ची स्थापना केली. 1973 साली प्रदर्शित झालेला दाग हा त्यांचा पहिला स्वतंत्र चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठी तिसरा फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाला.

    नंतर त्यांनी शशी कपूर आणि अमिताभ बच्चन अभिनीत आणि सलीम-जावेद यांनी पटकथा लिहिलेले अनेक कल्ट क्लासिक्स दिग्दर्शित केले. ज्यात  दीवार आणि त्रिशूल यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. या चित्रपटांनी 70 च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि 80 च्या दशकात एक नवीन ट्रेंड सेट केला, ज्यामुळे बच्चन ‘अँग्री यंग मॅन’ म्हणून प्रस्थापित झाले.

    चोप्रा यांनी या जोडीला घेऊन आणखी दोन चित्रपटांची निर्मिती, दिग्दर्शन आणि पटकथा लिहिली. त्यांच्या पूर्वीच्या ॲक्शन-प्रधान चित्रपटांच्या विरुद्ध, हे संगीतमय रोमँटिक ड्रामा होते ज्यात, कभी कभी आणि सिलसिला यांचा समावेश आहे. चोप्रा यांनी जावेद अख्तर यांना या चित्रपटापासून गीतकार होण्याचा सल्ला दिला. याशिवाय खाण दुर्घटनेवर आधारित ‘काला पत्थर’ या ॲक्शन ड्रामामध्ये परत एकदा अमिताभ, शशी  जोडीने त्यांच्या दिग्दर्शनाखाली अभिनय केला. हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला आणि त्याला अनेक फिल्मफेअर पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले.

    हेही वाचा – आत्मसन्मान

    1980 च्या दशकात मात्र यश चोप्रा यांच्या चित्रपटांना हवे तसे यश मिळेनासे झाले. मशाल, फासले, विजय यांसारख्या चित्रपटांमध्ये दिग्गज कलाकार असून देखील हे चित्रपट फारसे चालले नाहीत. मात्र 1989 साली आलेल्या चांदनी या चित्रपटाने हे चित्र पालटले. त्याच्या साउंडट्रॅकच्या प्रचंड यशामुळे बॉलीवूड चित्रपटांमधील हिंसाचाराचे युग संपुष्टात आणण्यास आणि हिंदी चित्रपटांमध्ये संगीत परत आणण्यास मदत झाली. या चित्रपटाला 1989 सालचा ‘ सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट या श्रेणीत राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला , तर चोप्रा यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून फिल्मफेअर पुरस्कारासाठी आठवे नामांकन मिळाले.

    त्यानंतर आलेल्या लम्हे या चित्रपटाला समीक्षकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रशंसा मिळाली, त्याचे संगीत उत्कृष्ट होते आणि परदेशी बाजारपेठेत तो सर्वात मोठा बॉलीवूड हिट चित्रपटांपैकी एक होता; तथापि, त्याच्या वादग्रस्त कथानकामुळे तो भारतात अयशस्वी ठरला. तरीही या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासह पाच फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आणि चोप्रा यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नववे नामांकन मिळाले.

    त्यानंतर 1993 मधील डर या चित्रपटाने चोप्रा यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठी फिल्मफेअर पुरस्काराच्या दहाव्या नामांकनासोबतच, सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवून दिला. 1995 मध्ये, चोप्रा यांनी मेटाव्हिजन नावाचे टेलिव्हिजन प्रोडक्शन हाऊस सुरू केले. या कंपनीने मेरी आवाज सुनो हा सिंगिंग रिॲलिटी शो, मेरी पसंद  हा टॉक शो आणि हमको इश्क ने मारा ही टेलिफिल्म तयार केली.

    2012 मध्ये दिग्दर्शनातून निवृत्ती जाहीर करण्यापूर्वी त्यांनी दिल तो पागल है, वीर-झारा, आणि जब तक है जान या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. दुर्दैवाने जब तक है जान या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असतानाच डेंग्यूमुळे 21 ऑक्टोबर 2012 रोजी त्यांचे निधन झाले. चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानाबद्दल, भारत सरकारने त्यांना 2001 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार आणि 2005 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. 2006 मध्ये, ब्रिटिश अकादमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्सने त्यांना आजीवन सदस्यत्व प्रदान केले, हा सन्मान मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 26 सप्टेंबर 2026

    September 26, 2026 पंचांग आणि भविष्य

    शनीचा कर्मयोग

    September 25, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 सप्टेंबर 2026

    September 25, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 26 सप्टेंबर 2026

    By Team AvaantarSeptember 26, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 26 सप्टेंबर 2026; वार : शनिवार भारतीय सौर : 04…

    शनीचा कर्मयोग

    September 25, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 सप्टेंबर 2026

    September 25, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 सप्टेंबर 2026

    September 24, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 27 सप्टेंबर 2026

    September 27, 2026

    ग म भ न

    September 26, 2026

    बाबा जरा आमच्यासारखं जगून तर बघा!!

    September 26, 2026

    माहेरपण

    September 26, 2026

    रक्तदाब कमी झालाय… कसे ओळखायचे?

    September 26, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : जी एकार्णवाचां ठाईं, पाहतां थेंबाचा पाडु नाहीं

    September 26, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 449
    • अवांतर 214
    • आरोग्य 151
    • पंचांग आणि भविष्य 600
    • फिल्मी 69
    • फूड काॅर्नर 257
    • मैत्रीण 30
    • ललित 949
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 27 सप्टेंबर 2026

    September 27, 2026

    ग म भ न

    September 26, 2026

    बाबा जरा आमच्यासारखं जगून तर बघा!!

    September 26, 2026
    Most Popular

    Homeopathy : होमिओ आख्यान

    September 20, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.