Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    साप्ताहिक राशीभविष्य : 16 ते 22 ऑगस्ट 2026

    August 16, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : पैं पाणियाचिये भूमिके, पाणी तळपे कौतुकें

    August 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 16 ऑगस्ट 2026

    August 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, August 16
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » साप्ताहिक राशीभविष्य : 16 ते 22 ऑगस्ट 2026
    पंचांग आणि भविष्य

    साप्ताहिक राशीभविष्य : 16 ते 22 ऑगस्ट 2026

    प्राजक्ता काथेBy प्राजक्ता काथेAugust 16, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठी साहित्य, मराठीलेखक, मराठीआर्टिकल, मराठीस्टोरी, राशीभविष्य, बाराराशी, राशीफळ, राशीअंदाज, Weekly horoscope, horoscope, राशी, साप्ताहिक राशीभविष्य, प्राजक्ता काथे
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    मेष

    • हा आठवडा सुखदायी आणि आरामदायी आहे. नोकरदारांना नवीन गृहवास्तू खरेदी करण्याचा योग आहे. आईचे आशीर्वाद मिळतील. कामाची जागा बदलण्याचे देखील योग आहेत. व्यावसायिक वर्गाला दूरगामी मोठी गुंतवणूक करता येईल. अनावश्यक खर्च टाळणे गरजेचे आहे. मुलांच्या शिक्षणासाठी पैसे खर्च होतील. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी, जुने दुखणे पुन्हा सुरू होऊ शकते. विद्यार्थ्यांनी आळस आणि उदासीनता सोडून अभ्यासाला लागावे.

    वृषभ

    • हा आठवडा खूप व्यग्र राहील. नोकरदारांना छोटे प्रवास करावे लागतील. निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन आनंदी रहाल. कामाच्या बाबतीत ताण जाणवणार नाही, सुलभता राहील. व्यावसायिक वर्गाला जुन्या मित्रांच्या ओळखीतून मोठे काम मिळेल. प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. महिलांनी वरिष्ठांशी वाद घालू नये. विद्यार्थ्यांना चांगला मार्ग सापडेल, नवीन गोष्टी करून पाहाल.

    मिथुन

    • या आठवड्यात कुटुंबाची चांगली साथ मिळेल. नोकरदारांना बढती तसेच वेतनवाढीचा योग आहे. मात्र, कोणालाही चुकीची माहिती दिली जाणार नाही, याची काळजी घ्या. व्यावसायिक वर्गाला मोठी गुंतवणूक करता येईल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून फायदा मिळू शकतो. महिलांनी प्रवासात आपल्या वस्तू सांभाळाव्यात. तसेच, गरज असेल तिथेच बोलावे. विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल आणि आरोग्यही उत्तम राहील.

    कर्क

    • आध्यात्मिक तसेच शारीरिक बळ वाढेल. नोकरदारांच्या दृष्टीने भाग्यदायक घटना घडतील. अडकलेली कामे मार्गी लागतील. स्वतःला सिद्ध करू शकाल. एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देऊ शकाल. मुलांच्या बाबतीत चांगल्या घटना घडल्याचे व्यावसायिक वर्गाला पाहायला मिळेल. आर्थिक व्यवहारासंदर्भात योग्य निर्णय घ्या. महिलांनी मालमत्तेच्या वादात सामोपचाराने निर्णय घ्यावा, कोणाला दुखवू नका. विद्यार्थ्यांनी सात्त्विक आहार घ्यावा. व्यसनांपासून लांब राहावे.

    सिंह

    • या आठवड्यात अतिविचार करू नका. नोकरदारांनी आर्थिक गुंतवणूक करताना सर्व कागदपत्रे तपासून पाहावीत. कार्यक्षेत्रात प्रगती करू शकाल. बढतीचे योग आहेत. व्यावसायिक वर्गाने निर्णय घेताना भागीदार तसेच स्टाफला विश्वासात घ्यावे. या आठवड्यात जास्त वेळ आणि ऊर्जा खर्च होईल. मनात एकटेपणाची भावना निर्माण होऊ शकते. महिलांनी आरोग्याची तपासणी करून घ्यावी, मेडिटेशन करणे योग्य ठरेल. विद्यार्थ्यांनी सूर्याची उपासना आणि योगसाधना करावी.

    हेही वाचा – ज्योतिषशास्त्र… कुंडलीतील महत्त्वाचे सूत्र – भावलग्न आणि होरा लग्न

    कन्या

    • या आठवड्यात मित्रांची साथ मिळेल. नोकरदारांची ओळखीतून कामे पटापट होतील. कामाच्या बाबतीत नियोजन आणि तत्परता उपयोगी पडतील. व्यावसायिक वर्गाने नवीन कर्ज घेऊ नये. संशयी स्वभाव बदलावा. हितशत्रूंपासून सावध राहावे. जे असेल ते स्पष्ट बोलणे अधिक योग्य ठरेल. तब्येतीची काळजी घ्यावी. महिलांच्या मनातील इच्छा पूर्ण होऊ शकतात. विद्यार्थ्यांच्या बाबतीत नात्यात वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जास्त बोलू नका, संयम ठेवा.

    तुळ

    • या आठवड्यात कामाचा व्याप वाढणार आहे. रवी स्वतःच्या राशीत येत असून लाभस्थानी आहे. नोकरदारांच्या बाबतीत आधी केलेल्या कष्टांचे चीज होईल. नवीन जबाबदारी मिळू शकते. कामानिमित्त प्रवास कराल. आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करावे, इतरांच्या वादात पडू नका. व्यावसायिक वर्गाला व्यापारात फायदा होईल. अडकलेली कामे पूर्ण करू शकाल. पैशांचा ओघ कायम राहील. मोठी गुंतवणूक करू शकाल. महिलांनी नको ते धाडस करू नये. तसेच, कामाचा व्याप वाढणार आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासात मन एकाग्र करावे, मोबाइलच्या मोहजालात अडकू नका.

    वृश्चिक

    • हा आठवडा भाग्यकारक आहे. नोकरदारांनी कामाचे नियोजन करावे. थोरामोठ्यांचे आशीर्वाद उपयोगी येतील. रवी सिंह राशीत आल्याने कर्माचे फळ मिळेल. व्यावसायिक वर्गाला प्रवास करता येईल. प्रवासात चांगल्या ओळखी होतील. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकाल. महिलांना आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांनी आवडीनुसार अभ्यासाची शाखा निवडावी, त्याचबरोबर मेहनत करावी लागेल.

    धनु

    • हा आठवडा संमिश्र फळ देणारा आहे. नोकरदारांच्या दृष्टीने घराच्या बाबतीत चांगल्या घटना घडतील. वडिलोपार्जित संपत्तीसंबंधित प्रश्न सोडवू शकाल. कामात सुलभता राहील. व्यावसायिक वर्गाला अडकलेले पैसे मिळतील; पण पैसे खर्च होण्याचे मार्ग आधीच ठरलेले असतील. कर्ज फेडू शकाल. महिलांना आध्यात्मिक प्रगती करता येईल. घरातील वातावरण आनंदी राहील. विद्यार्थ्यांनी कुसंगतीपासून दूर राहावे.

    मकर

    • या आठवड्यात रवी सिंह राशीत येत असून अष्टम भावात आहे, त्यामुळे आरोग्याच्या तक्रारी राहतील. नोकरदारांवर कामाचा खूप ताण असेल. बरोबरची मंडळी रजेवर गेल्यामुळे कामाचा आणखी लोड वाढू शकतो. वेळेचे नियोजन करावे लागेल. व्यावसायिक वर्गाची फसवणूक होण्याची शक्यता आहे. कुठेही सही करताना कागदपत्रे नीट वाचून घ्या. कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. महिलांसाठी श्रावण महिना आनंदी आणि व्यग्र राहील. विद्यार्थ्यांना सहलीला जाण्याचा योग आहे, मित्रांबरोबर मजा करू शकाल.

    कुंभ

    • या आठवड्यात घरात जोडीदाराचे वर्चस्व राहील. नोकरदारांची सर्व कामे सुरळीत पार पडतील. केलेल्या कष्टांचे चीज होईल. काही बक्षीस मिळू शकते. व्यावसायिक वर्गाच्या बाबतीत भागीदारीच्या व्यवसायात पार्टनरचे वर्चस्व राहील. त्याने केलेला अभ्यास आणि घेतलेले निर्णय योग्य ठरतील. महिलांसाठी घरात आनंदी वातावरण राहील, कामे सहज पूर्ण करू शकाल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे काम करता येईल. पॉकेटमनी जास्त मिळू शकते.

    हेही वाचा – निरामय आरोग्य लेखमालेचा थोडक्यात आढावा

    मीन

    • या आठवड्यात रवी षष्ठ स्थानात आहे. जुने आजार डोके वर काढून त्रास होण्याची शक्यता आहे. नोकरदारांना कामाच्या ठिकाणी जास्त काम करावे लागेल; पण श्रेय मिळणार नाही. तुमच्या स्वभावाचा कोणी गैरफायदा घेऊ शकतो, त्यामुळे सावध रहावे. व्यावसायिक वर्गाचे नवीन करार सफल होतील. उत्पादनाच्या जाहिरातीचा फायदा दिसू लागेल. उत्साहात कामे पूर्ण कराल. नवीन गुंतवणूक करू शकाल. महिलांना पोटदुखी आणि अपचनाचे त्रास उद्भवू शकता, अशावेळी पथ्य पाळावे. विद्यार्थ्यांना पार्ट-टाइम नोकरी मिळण्याची शक्यता आहे.

    prajaktakathe3970@gmail.com

    प्राजक्ता काथे

    वाणिज्य शाखेत पदवी (1991), ज्योतिष शास्त्री (2003), हस्तसामुद्रिक प्रवीण (2004), कृष्णमूर्ती ज्योतिष भास्कर (2008), होरा मार्तंड (2016) या पदव्या प्राप्त. 2005पासून पत्रिकेच्या आधारे अभ्यासकरून लोकांच्या अडचणीबाबत मार्गदर्शन करीत आहेत. हस्तसामुद्रिक शास्त्र, कृष्णमूर्ती पद्धती आणि होरा शास्त्र यांचा एकत्रित सखोल अभ्यास असून, जीवनातील प्रश्न आणि आव्हानांचे अचूक विश्लेषण करून, व्यवहार्य मार्गदर्शन देण्याचा दीर्घ अनुभव.

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 16 ऑगस्ट 2026

    August 16, 2026 पंचांग आणि भविष्य

    ज्योतिषशास्त्र… कुंडलीतील महत्त्वाचे सूत्र – भावलग्न आणि होरा लग्न

    August 15, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 ऑगस्ट 2026

    August 15, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 16 ऑगस्ट 2026

    By Team AvaantarAugust 16, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 16 ऑगस्ट 2026; वार : रविवार भारतीय सौर : 25…

    ज्योतिषशास्त्र… कुंडलीतील महत्त्वाचे सूत्र – भावलग्न आणि होरा लग्न

    August 15, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 ऑगस्ट 2026

    August 15, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 14 ऑगस्ट 2026

    August 14, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    साप्ताहिक राशीभविष्य : 16 ते 22 ऑगस्ट 2026

    August 16, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : पैं पाणियाचिये भूमिके, पाणी तळपे कौतुकें

    August 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 16 ऑगस्ट 2026

    August 16, 2026

    जेन झी

    August 15, 2026

    भिऊ नकोस, मी आहे!

    August 15, 2026

    ज्योतिषशास्त्र… कुंडलीतील महत्त्वाचे सूत्र – भावलग्न आणि होरा लग्न

    August 15, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 397
    • अवांतर 204
    • आरोग्य 139
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 536
    • फिल्मी 63
    • फूड काॅर्नर 248
    • मैत्रीण 24
    • ललित 853
    • शैक्षणिक 84
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    साप्ताहिक राशीभविष्य : 16 ते 22 ऑगस्ट 2026

    August 16, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : पैं पाणियाचिये भूमिके, पाणी तळपे कौतुकें

    August 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 16 ऑगस्ट 2026

    August 16, 2026
    Most Popular

    ज्योतिषशास्त्र… कुंडलीतील महत्त्वाचे सूत्र – भावलग्न आणि होरा लग्न

    August 15, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.