Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    निरामय आरोग्य लेखमालेचा थोडक्यात आढावा

    August 15, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : जेथ नभाचेनि पाडें, समत्वा उणें न पडे

    August 15, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 ऑगस्ट 2026

    August 15, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, August 15
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 ऑगस्ट 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 ऑगस्ट 2026

    Team AvaantarBy Team AvaantarAugust 15, 2026Updated:August 15, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, दर्शन कुलकर्णी, कुंडली, राशीभविष्य, आजचे राशीभविष्य, ज्योतिष
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 15 ऑगस्ट 2026; वार : शनिवार
    • भारतीय सौर : 24 श्रावण शके 1948; तिथि : तृतीया 17:28; नक्षत्र : उत्तरा फाल्गुनी 27:25;
    • योग : शिव 07:08, सिद्ध 29:20; करण : वणिज 29:05;
    • सूर्य : कर्क; चंद्र : सिंह 09:34; सूर्योदय : 06:18; सूर्यास्त : 19:07;
    • पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    स्वातंत्र्य दिन

    अश्वत्थमारुती पूजन

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    लोककवी वामनदादा कर्डक

    टीम अवांतर

    मराठी शाहीर, कवी आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते वामनदादा कर्डक यांचा जन्म 15 ऑगस्ट 1922 साली नाशिक जिल्ह्याच्या  सिन्नर तालुक्यातील देशवंडी या छोट्याशा खेड्यात झाला. कर्डकांनी लहानपणी गुरे चारणे, जत्रेत कुस्ती खेळणे, शिवडी येथे गिरणी कामगार म्हणून नोकरी करणे, मातीकाम, सिमेंट काँक्रीटचे काम, चिक्की विकणे, आइसफ्रूट विकणे, खडी फोडणे, टाटा ऑइल मिलमध्ये नोकरी यासारखी मिळतील ती कामे केली. त्यांना वाचनाचा अफाट छंद होता. याशिवाय, त्यांनी लल्लाट लेख या नाटकात घुमा या पात्राची भूमिका देखील साकार केली होती.

    पुढे आईसोबत पोटाची खळगी भरण्याकरिता वामनदादा मुंबईत आले. शिवडीच्या बीडीडी चाळीत राहत असताना ते समता सैनिक दलात सामील झाले. तोपर्यंत वामनदादांना अक्षर ओळख झाली नव्हती. पुढे ते देहलवी नावाच्या मास्तरांकडून बाराखडी, मुळाक्षरे शिकले. जोडाक्षरे ते दुकानाच्या पाट्या, बोर्ड वाचून शिकले. हळूहळू त्यांचे लेखन, वाचन वाढू लागले.

    हेही वाचा – भैरू आणि पारू

    वामन कर्डक यांचे मराठी आणि हिंदी वाचन सुरू होते. मुळात त्यांना चित्रपट कथाकार, अभिनेता व्हायची खूप इच्छा होती. त्यासाठी ते अनेक चित्रपट कंपन्यांमध्ये गेले. शेवटी त्यांना मिनर्व्हा फिल्म कंपनीत एक्ट्रा म्हणून प्रवेश मिळाला. याशिवाय, ते कारदार स्टुडिओ, रणजीत स्टुडिओ यामध्येही कामाला जायचे. जेव्हा काम नसेल तेव्हा ते राणी बागेत तासनतास बसायचे. 1943 साली असेच एकदा राणी बागेत बसले असता वामनदादांना पहिल्यांदाच एका हिंदी गीताचे विडंबन सुचले. लिहून झालेले गीत त्यांनी चाळीतील लोकांसमोर गाऊन दाखवले. लोकांना प्रशंसा केली, टाळ्या वाजवल्या आणि इथूनच वामन कर्डक कवी झाले. त्यानंतर 2004पर्यंत वामनदादांच्या गीतलेखन आणि गायनाचा कार्यक्रम चालू होता. त्यांच्या प्रकाशित आणि अप्रकाशित मिळून साधारणतः दहा हजारावर गीतरचना आहे. त्यांनी काही चित्रपट गीतेही लिहिली.

    वामनदादा तरुणपणी आंबेडकरी चळवळीत आले आणि आंबेडकरमयच बनले. वामनदादांनी तबला-पेटी आणि मोजक्या साथीदारांसह पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. कधी बस, कधी बैलगाडी तर कधी पायी असे ते गावोगाव फिरले आणि आंबेडकरी विचारांच्या पिढ्या त्यांनी घडवल्या. 1943 साली नायगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पहिल्यांदा पाहण्याची संधी वामनदादांना मिळाली. चाळीसगाव, मनमाड, टिळकनगर अशा ठिकाणी त्यांनी आंबेडकरांच्या भाषणांच्या दरम्यान कवितांचे गायन देखील केले.

    वामनदादांना पुढे दिल्लीची डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप मिळाली. याशिवाय, महाराष्ट्र राज्य शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार, महाराष्ट्र शासनाच्या रंगभूमी परीनिरीक्षण मंडळाचे तीन वर्षांचे सदस्यत्व, महाराष्ट्र साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचे सदस्यत्व, साहित्य, संस्कृती मंडळाची ‘उत्कृष्ट कविरत्‍न’ ही गौरववृत्ती, ’युगांतर प्रतिष्ठान’तर्फे ‘युगांतर पुरस्कार’, जामखेडच्या भाई फुटाणे प्रतिष्ठानचा ‘संत नामदेव पुरस्कार यासारखे अनेक पुरस्कार आणि मानसन्मान मिळाले. 1993 मध्ये, वर्धा येथे भरलेल्या पहिल्या अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. 15 मे 2004 रोजी त्यांचे निधन झाले.


    आजचे राशिभविष्य

    मेष – आज इतरांशी संभाषण करताना संतुलन राखा. नोकरीत बदल होण्याची चिन्हे आहेत. प्रगतीच्या काही उत्तम संधीही निर्माण होऊ शकतात. प्रियजनांच्या पाठिंब्यामुळे व्यवसायात फायदा होईल. नवीन काही प्रोजेक्ट मिळण्याची अपेक्षा आहे. गुंतवणूक करताना सगळ्या बाजूंचा नीट विचार करा. आरोग्य सामान्य असेल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यात मोठे यश मिळण्याची शक्यता आहे.

    वृषभ – वादविवादांपासून आज दूर रहा. एखाद्या मित्राला भेटण्याची संधी मिळेल. बौद्धिक क्षेत्रात तुम्हाला आदर आणि सन्मान मिळू शकतो. घरातील सुखसोयी वाढू शकतात. भौतिक संपत्तीत वाढ होईल. व्यवसायात कायदेशीर प्रकरणात अडकण्याची शक्यता आहे. आरोग्य चांगले असेल. संततीच्या शिक्षणाबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेऊ शकता.

    मिथुन – अनेक दिवसांपासूनचे तुमचे एखादे स्वप्न आज साकार होऊ शकते. जमीन, इमारत किंवा वाहन खरेदी करणे शक्य आहे. तुमचे मन सकारात्मक असेल. आत्मविश्वास वाढेल. संगीतातील तुमची आवड वाढू शकते. मित्राच्या पाठिंब्यामुळे तुमचे उत्पन्न वाढू शकते. विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या समस्या अंगावर काढू नका.

    कर्क – मनावर आज संयम राखण्याचा प्रयत्न करा. कुटुंबात शांतता टिकवून ठेवा. व्यवसायात उत्पन्न वाढण्यास मदत होऊ शकते. एखादी नवी, मोठी ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यासाठी मोठा खर्च होईल. जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी परदेशी जाण्याची संधी मिळेल. त्यासाठी सगळी कागदपत्रे तयार ठेवा.

    सिंह – आज तुम्हाला आत्मविश्वासाची कमतरता भासेल. व्यवसायात कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल. एखादा नवीन व्यवसाय सुरू करू शकता ज्यात मोठे व्यावसायिक यश मिळेल. राजकीय लाभ मिळतील. विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यात यश मिळेल. स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. बाहेरचे पदार्थ खाणे आज टाळा.

    कन्या – आर्थिक प्रगतीची आज चिन्हे आहेत. व्यवसायात खर्च वाढेल. व्यवसाय विस्तारासाठी वडिलांकडून पैसे मिळू शकतात. प्रवास शक्य आहे. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. ध्यानधारणा करा. विद्यार्थ्यांना त्यांचा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पालकांकडून सहकार्य मिळेल.

    तुळ – आज सकारात्मक मानसिकता असेल, पण संयमाची कमतरता भासेल. कुटुंबासोबत एखाद्या धार्मिक स्थळी तीर्थयात्रेला जाऊ शकता. आईकडून व्यवसायासाठी आर्थिक मदत मिळू शकेल. व्यवसायासाठी बजेट बनवणे फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

    वृश्चिक – बोलताना आज संयम बाळगावा. अनावश्यक राग टाळावा. कामाच्या ठिकाणी तुमच्या वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल. प्रगतीचा मार्ग सुकर होईल. व्यवसायात उत्पन्न वाढेल. कामातील अडथळे दूर होतील. विद्यार्थी शिक्षणासाठी घरापासून लांब जातील. स्वतःच्या आरोग्यासाठी वैद्यकीय सल्ल्याने आवश्यक त्या टेस्ट करून घ्या.

    हेही वाचा – समजून घेणं

    धनु – आजचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. कौटुंबिक बाबींमुळे तुम्हाला अस्वस्थ वाटेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. पालकांकडून विद्यार्थ्यांना आर्थिक पाठिंबा मिळेल. व्यावसायिक खर्च वाढतील. मात्र हेच खर्च नंतर नफ्याचे प्रमाण वाढवणारे ठरतील. आरोग्य सामान्य असेल. फक्त गार पेयांपासून लांब रहा.

    मकर – आज आर्थिक प्रगती होईल. तुमची मनःस्थितीत दोलायमान राहू शकतात. शैक्षणिक आणि बौद्धिक कार्यांमुळे समाजात तुमच्याबद्दलचा आदर आणि सन्मान वाढू शकतो. कौटुंबिक जीवन सुखी असेल. प्रियजनांकडून तुमच्या निर्णयांना पाठिंबा मिळेल. संततीच्या आरोग्याकडे लक्ष ठेवा.

    कुंभ – अनपेक्षितपणे आज आर्थिक लाभ होऊ शकतो. करिअरविषयक एखादी चांगली बातमी मिळेल. मानसिकदृष्ट्या अस्वस्थता  राहील. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. जोडीदाराकडून पाठिंबा मिळेल. खर्च जास्त होईल. शैक्षणिक कार्यासाठी तुमचा सन्मान मिळेल. व्यवसायात चांगला नफा होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष देणे गरजेचे आहे.

    मीन – आर्थिकदृष्ट्या दिवस चांगला असेल. आज गोड बोलणे आणि डोके शांत ठेवून समाजात वावरणे, आवश्यक असेल. व्यवसायातील आव्हाने कठीण असतील, पण नफ्याच्या संधीही मिळतील. वाहनसुख मिळेल. आरोग्याच्या जुन्या समस्या परत डोके वर काढण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाहेरचे पदार्थ खाणे टाळा. संततीकडून एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 14 ऑगस्ट 2026

    August 14, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 13 ऑगस्ट 2026

    August 13, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 12 ऑगस्ट 2026

    August 12, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 14 ऑगस्ट 2026

    By Team AvaantarAugust 14, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 14 ऑगस्ट 2026; वार : शुक्रवार भारतीय सौर : 23…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 13 ऑगस्ट 2026

    August 13, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 12 ऑगस्ट 2026

    August 12, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 ऑगस्ट 2026

    August 11, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    निरामय आरोग्य लेखमालेचा थोडक्यात आढावा

    August 15, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : जेथ नभाचेनि पाडें, समत्वा उणें न पडे

    August 15, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 ऑगस्ट 2026

    August 15, 2026

    आराध्याने शोधला ‘क्षितिज 9’ प्रोजेक्टचा हायजॅकर!

    August 14, 2026

    भैरू आणि पारू

    August 14, 2026

    आनंदाच्या राज्यातले चार मित्र

    August 14, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 396
    • अवांतर 204
    • आरोग्य 139
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 533
    • फिल्मी 63
    • फूड काॅर्नर 248
    • मैत्रीण 24
    • ललित 851
    • शैक्षणिक 84
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    निरामय आरोग्य लेखमालेचा थोडक्यात आढावा

    August 15, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : जेथ नभाचेनि पाडें, समत्वा उणें न पडे

    August 15, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 ऑगस्ट 2026

    August 15, 2026
    Most Popular

    ज्योतिषशास्त्र… कारक ग्रहाचा भाव सुद्धा महत्त्वाचा!

    August 8, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.