Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    संकर्षण… अखेर कोर्टाचा निकाल आलाच!

    July 6, 2026

    कन्हैय्या आणि त्याच्या आठवणी…

    July 6, 2026

     सार्थ ज्ञानेश्वरी : जिये वृत्तीचिया आवडी, बुद्धी होय वेडी

    July 6, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, July 7
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » कन्हैय्या आणि त्याच्या आठवणी…
    ललित

    कन्हैय्या आणि त्याच्या आठवणी…

    सतीश बर्वेBy सतीश बर्वेJuly 6, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीवाचन, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, कन्हैया कुत्रा, प्रेमळ कन्हैया कुत्रा, सर्वांचा लाडका कन्हैया, कन्हैयाच्या आठवणी
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    त्याला जाऊन आज आठवडा झाला. पण ती गोष्ट मन मानायला तयार नाही. वाटलं येईल कुठून तरी आणि पायाशी घुटमळत बसेल, जोवर मी डोके कुरवाळून त्याचे लाड करत नाही! माझा बेस्ट फ्रेंड होता तो. खऱ्या मित्रांपेक्षाही जवळचा. सगळे लाड आणि हट्ट पुरवून घ्यायचा. आमच्या घरातील एक हक्काचा बनला होता तो!

    काही वर्षांपूर्वी एक दिवस दुपारचा भाजी मार्केटमधून आमच्या माईच्या मागोमाग थेट बंगल्यात आला पाहुणा म्हणून. झाले विक्रमला म्हणजे माझ्या धाकट्या भावाला तो फार आवडला. त्याने बाबांजवळ हट्ट धरून त्याला बंगल्यात ठेऊन घेतला. बघता बघता घरातील सगळ्यांनाच त्याचा लळा लागला. त्याच्या काळ्यासावल्या रंगावरून माईने त्याचे नाव ‘कन्हैया’ ठेवले! त्याचा काही हट्ट नसायचा. घरात जे जेवण बनायचे, ते तो आवडीने खायचा. तो ज्या दिवशी आला, तो दिवस पकडून त्याचा वाढदिवस सुद्धा आम्ही मोठ्या आनंदात साजरा करायचो दरवर्षी… बंगल्याच्या मुख्य दरवाजाजवळ त्याचा खडा पहारा असायचा.

    विक्रमने हट्ट धरून त्याला घरी ठेवला खरा पण त्याचा उत्साह काही दिवसांतच मावळला आणि मग कन्हैयाची जबाबदारी आपसूकच माझ्यावर आली… त्याचे खाणेपिणे, आठवड्याची आंघोळ, रोज सकाळ आणि रात्री त्याला फिरवून आणणे ही सगळी काम माझ्या रोजच्या दिनचर्येमध्ये समाविष्ट झाली. मी नसलो कधीतरी तर मात्र विक्रम रडतखडत का होईना, पण माझी कामं करायचा. विक्रमची खरी कसोटी लागायची जेव्हा कामानिमित्त माझे मुंबई बाहेर जाणे व्हायचे. बऱ्याचदा मी पहाटे निघून रात्री उशिराने परतायचो. प्रवासाची बॅग मी काढली भरायला की, कन्हैय्याला अंदाज यायचा… मग आदल्या रात्री त्याचे जास्त लाड करायला लागायचे मला. त्याला जवळ घेऊन मी सांगायचो की, ‘बाबा रे मी उद्या नाहीये तर विक्रमकडून तुझं सगळे नीट करून घे.’

    मी पहाटे निघालो की, दरवाजाच्या आवाजाने हा देखील अंगणातील त्याच्यासाठी बांधलेल्या लाकडी घरातून उठायचा. त्याच्याशी दोन शब्द बोलल्याखेरीज माझा पाय बंगल्यातून निघत नसे. मी रात्री उशिराने येईस्तोवर स्वारी जागी असायची आणि मी बंगल्यात शिरताच माझ्या अंगावर असा काही झेपावायचा की, जणू काही तो सांगायचं की, ‘आधी माझ्याशी बोल आणि मगच घरात जा.’

    हेही वाचा – लढाई… व्यवहार की भावना?

    एकदा मी असाच दोन दिवसांनी येणार होतो, तेव्हा तर कन्हैय्याने कमालच केली होती. रात्री बिलकुल जेवत नव्हता. शेवटी विक्रमने मला व्हिडीओ कॉल केला. मी कन्हैय्याशी बोललो. त्याला कळात नव्हते की, नक्की आवाज कुठून येतो आहे. पण त्याचे जेवण संपेपर्यंत माझा व्हिडीओ कॉल सुरू होता.

    खरंच पाळीव प्राण्याचं जग किती वेगळे असते! आपल्यासारखे त्यांना बोलता येत नाही. पण तरी देखील त्यांच्या भावना ते तुमच्यापर्यंत कशाही करून पोहोचवतातच, एवढे मात्र खरे! रविवार म्हणजे त्याचे आणि माझे वेगळेच विश्व असायचे. आम्ही दोघेही रविवारची आतुरतेने वाट बघायचो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आमच्या दोघांची धमाल सुरू असायची. माईसुद्धा मला लटके रागावून म्हणायची की, “राहुल अरे, त्याचे ठीक आहे, पण तूसुद्धा लहान मुलासारखे वागतो आहेस.”

    मग मी माईला ठणकावून सांगायचो की, “माई रविवारी आम्हाला काहीच बोलायचे नाहीस तू. आज आमच्या दोघांचा दिवस आहे. आज घड्याळ बंद आहे. आम्ही मनसोक्त मजा करणार.” मी खरंच कन्हैय्यासोबत बंगल्याच्या आवारात अगदी धुडगूस घालायचो. जरी माई रागावली असली तरी, आमच्या दोघांतील भावनिक नाते तिला अचंबित करायचे. आमचे दोघांचे बागडणे ती कौतुकाने पाहात राहायची.

    असा हा आमचा लाडका कन्हैया काही आजाराचे निमित्त होऊन एक दिवस अचानक आम्हाला सोडून गेला. तो तर घरातीलच सदस्य होता. कोणी कोणाचे सांत्वन करायचे, असे झाले होते त्या दिवशी! सगळ्यात जास्त धक्का माईला बसला होता, कारण तीच जास्त वेळ त्याच्या सोबत घालवायची. संबंध घरावर शोककळा पसरली होती. आमच्या नकळत आमच्या मोठया कॉलनीमध्ये कन्हैय्या कितीजणांचा लाडका होता, हे त्याला शेवटचे बघण्यासाठी आलेल्या बच्चे कंपनी आणि तरुण मुलामुलींकडे बघून आम्हाला कळले.

    हेही वाचा – दुसऱ्यांना जगण्याची ताकद देणारा ‘अन्नसोहळा’

    एक अध्याय संपला होता…

    कन्हैयाशिवाय जगणे पुढचे कितीवरी दिवस आम्हाला किती जड गेले, ते आमचे आम्हालाच ठावूक. आजही माई त्याच्या आवडीचे काही केले घरात तर, त्याच्या वाटणीचे एका ताटात ठेऊन ते ताट ती अंगणात ठेवते. पक्षी येऊन ते खातात आणि त्यावेळी माईचे डोळे पाण्याने भरून येतात…

    Avatar photo
    सतीश बर्वे

    वय वर्षे 65. Adhesive क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवर दबदबा असणाऱ्या भारतीय कंपनीच्या कायदा विभागात प्रदीर्घ काळासाठी काम करून निवृत्त. लेखनाचा वारसा आईकडून आलेला आहे. फेसबुकवरील 7-8 वाचक समुहात विपुल लेखन करून अल्पावधीतच लोकप्रिय होऊन स्वतःचा वाचक वर्ग तयार केला आहे. प्रवासाची आवड. डोळे आणि कान उघडे सतत उघडे ठेवल्याने माझ्या कथेतील बरीच पात्रं आणि प्रसंग मला सापडत गेले. मनमोकळ्या स्वभावाने मी सतत माणसं जोडत गेलो आणि त्यांच्या आयुष्यात मिसळून गेलो.

    Related Posts

    संकर्षण… अखेर कोर्टाचा निकाल आलाच!

    July 6, 2026 ललित

    Bookshelf : उद्या… कादंबरी वाचल्यावर निराशा दाटते

    July 5, 2026 ललित

    सिया लक्ष्मी बनून आली अन् रामचं स्वप्न पूर्ण झालं…

    July 5, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    संकर्षण… अखेर कोर्टाचा निकाल आलाच!

    By Team AvaantarJuly 6, 2026

    हिमाली मुदखेडकर भाग – 7 चार वर्षे… एका न्यायालयीन प्रकरणासाठी हा कालावधी कदाचित फार मोठा…

    Bookshelf : उद्या… कादंबरी वाचल्यावर निराशा दाटते

    July 5, 2026

    सिया लक्ष्मी बनून आली अन् रामचं स्वप्न पूर्ण झालं…

    July 5, 2026

    वर्दे सर 40 वर्षं अज्ञातवासात का होते?

    July 4, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    संकर्षण… अखेर कोर्टाचा निकाल आलाच!

    July 6, 2026

    कन्हैय्या आणि त्याच्या आठवणी…

    July 6, 2026

     सार्थ ज्ञानेश्वरी : जिये वृत्तीचिया आवडी, बुद्धी होय वेडी

    July 6, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 06 जुलै 2026

    July 6, 2026

    Bookshelf : उद्या… कादंबरी वाचल्यावर निराशा दाटते

    July 5, 2026

    सिया लक्ष्मी बनून आली अन् रामचं स्वप्न पूर्ण झालं…

    July 5, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 351
    • अवांतर 193
    • आरोग्य 127
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 479
    • फिल्मी 55
    • फूड काॅर्नर 231
    • मैत्रीण 23
    • ललित 761
    • शैक्षणिक 82
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    संकर्षण… अखेर कोर्टाचा निकाल आलाच!

    July 6, 2026

    कन्हैय्या आणि त्याच्या आठवणी…

    July 6, 2026

     सार्थ ज्ञानेश्वरी : जिये वृत्तीचिया आवडी, बुद्धी होय वेडी

    July 6, 2026
    Most Popular

    नूतन… डोळ्यांतून बोलणारी कविता!

    July 5, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.