Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    आरूच्या ‘त्या’ प्रश्नाने शिव गोंधळलाच!

    June 21, 2026

    Bookshelf : ‘मेधावी’… कथाविश्वाची झलक दाखवणारे पुस्तक

    June 21, 2026

    पितृदिन विशेष… ज्यांच्या आधारावर आपण उभे राहतो!

    June 21, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, June 22
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » आरूच्या ‘त्या’ प्रश्नाने शिव गोंधळलाच!
    ललित

    आरूच्या ‘त्या’ प्रश्नाने शिव गोंधळलाच!

    शोभा भडकेBy शोभा भडकेJune 21, 2026No Comments10 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी आर्टिकल, मराठीलेख, मराठीकथा, मी मराठी, अभिजात मराठी, प्रेमकथा, शिव आराधना, राम आराधना, राम सिया, शिव सिया, दिनकररावांची नाराजी, शिव आरू प्रेमकहाणी, पूर्वी पवन प्रेमकहाणी, शिव आरूचे देवदर्शन, आरूला कुत्र्याच्या पिलाची आठवण, शिवकडून आरूचे कौतुक, राम सियाचे देवदर्शन, आरू सुधा स्नेहबंध, प्रेमळ सासू सुधा, प्रेमळ सून आरू, प्रेमळ सून आराधना
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    भाग – 31

    “ओ… मी राहीले ना,” पवन राम आणि सियाच्या मागे निघाला तोच मागून पूर्वीचा आवाज आला.

    पवनने मागे वळून पाहिले आणि डोक्यालाच हात लावला आणि हसतच तिच्या जवळ आला…

    “ओ, तुम्हाला हसायला काय झालं? आह… आई गं…” कळवळून पूर्वी त्रासिक सुरात म्हणाली.

    “अगं ये, ये… काय करतेस? टोचला का बघू! थांब जरा मी काढतो…” पवनने तिचा हात हातात घेऊन पाहू लागला, तर बोटाला काटा टोचून त्यातून रक्त आलं होतं…

    तर झालं असं होतं… गाडीतून आत्या मामा-मामी बाकीचे घराकडे उतरले आणि पवन, पूर्वी राम, सिया मंदिराकडे गेले. पवनने गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली होती. खरंतर पूर्वीला वाटलं की, राम किंवा पवन तिला उतरायला सांगेल… पण तसं काहीच झालं नाही. पवन तो गाडीतून उतरून बाजूला झाला आणि गावाकडे मित्र दिसले तर दोन शब्द बोलावे म्हणून त्यांच्याकडे तो गेला… तोवर राम आणि सिया पण खाली उतरले. नंतर पवनने राम आणि सियाला पुढे जायला सांगितल आणि तो त्यांच्या मागे चालू लागला, ते पाहून पूर्वी घाईघाईत उतरायला गेली आणि उतरताना तिची ओढणी बोराटीच्या झुडपाला अडकली, तेच काढता काढता ती पवनला ओरडली होती… “मला येऊ द्या” म्हणून!

    पवनने मागे वळून पाहिले, तेव्हा पूर्वी हाताने ओढणी खेचत होती, पण ओढणी काही निघत नव्हती आणि त्यामुळे ती वैतागली होती… तेच पाहून पवनने डोक्यावर हात मरून घेतला आणि तिच्या जवळ आला… तिचं ओढणी खेचणं सुरूच होतं आणि त्यातच त्या बोराटीचा काटा तिच्या बोटात रुतला आणि ती वेदनेने कळवळली…

    “हे…  हे… सगळं तुमच्यामुळे झालं! गाडी थोडी बाजूला लावता येत नव्हती का?” ती त्रासिक स्वरात म्हणाली.

    “मी… माझ्यामुळे? तुला नीट बघून उतरता येत नव्हतं का?” तो तिच्या बोटावरचं रक्त हाताने पुसूत मोठे डोळे करून म्हणाला. त्याची नजर तिच्या निरागस चेहऱ्यावरच खिळलेली होती, हे पाहून पूर्वी नजर चोरत म्हणाली, “अं… असं बघू नका माझ्याकडे! माझी ओढणी काट्यातून काढा ना…” हृदयाची धडधड अचानक वाढली तिची…

    “अं… हो, एकच मिनिट,” नजर हटवून तो ओढणी काढू लागला.

    “झालं! चल पुढे…” आता तो नजर चोरत म्हणाला आणि बाजूला झाला.

    ती मात्र त्याच्याकडेच पाहत पुढे निघाली… गालात हसू घेऊन! त्याचं मात्र आता तिच्याकडे लक्ष नव्हतं… असतं तर कळालं असतं, दिसल असतं तिच्या चेहऱ्यावरचं लाजरं हासू!

    हेही वाचा – आता पूर्वी अन् पवनची प्रेमकहाणी फुलू लागली…

    “पवन तिथं काय करतोयस? नारळ घेऊन ये ना…” रामने त्याला आवाज दिला, तसं ‘हो आलोच’ म्हणून गाडीत ठेवलेली नारळाची पिशवी घेऊन तो मंदिरात गेला.

    रामने नारळ वाढवला आणि पुजाऱ्याच्या हातात दिला… तो स्वतः गाभाऱ्यात गेला आणि नारळ वाहून हात जोडून बाहेर आला. मग सिया आणि रामने एकत्र दर्शन घेतलं आणि मंदिरातून बाहेर आले. त्यांच्या मागेच पूर्वी आणि पवन दोघे पण आले.

    0000

    इकडे सरपोतदार मेंशनमध्ये शिव आणि आराधनाची पूजा पार पडली होती आणि दोघांनी गुरुजींचे आशीर्वाद घेऊन मग आजी आणि आईचा आशीर्वाद घेतला. दिनकरराव या सगळ्यांचा भाग झाले नाहीत… ते कामाचं निमित्त सांगून निघून गेले. आजी पण त्या दोघांना, गावी जाऊन कुलदेवीचं दर्शन घेऊन या, सांगून त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या.

    आता फक्त तिथे शिव, आराधना, समर, भावना आणि सुधा एवढेच होते. घरात लग्नाची.. आजच्या पूजेची अजिबात रौनक नव्हती. लग्न कार्य म्हटलं की, गावी पाहुण्यांचा राबता असायचा… आणि इथे असं काहीच नव्हतं! आरूला तर सगळंच सुनंसुनं वाटत होतं. आत्ता तिला तिच्या गावाकडची आणि तिच्या घरची आठवण येत होती. त्यात दादाचं लग्न… लग्नानंतरचे होणारे खेळ या सगळ्यांची किती हौस होती तिला आणि तिच्या मनासारखं असं काहीच घडलं नव्हतं… आता ती खूप जास्त उदास झाली होती. भावनाला पण तिची अवस्था समजून येत होती.

    “हा गोड चेहरा असा सुकला का आहे?” सुधा यांनी आरूजवळ येत तिच्या गालावर हात ठेऊन प्रेमानें विचारलं.

    “तुमचं घर लई मोठं आहे… घरात मोठमोठ्या आणि महागाच्या वस्तू आहेत. एवढा मोठा टीव्ही पण आहे… पण तरीही मला हे घर नाही आवडलं आई… माफ करा,” हळू आवाजात तिने आपल्या मनात सलणारी गोष्ट शेवटी बोलून दाखवलीच. डोळ्यातून पाणीही गालावर ओघळून आलं.

    ते ऐकून सुधा यांना पण वाईट वाटलं. शिवनेही तिच्याकडे पाहिलं… खरंच चेहरा सुकला होता तिचा!

    “तुझी आत्या सांगत होती की, आमची आरू खूप बोलक्या स्वभावाची, हसून-खेळून स्वतःसोबत घराला पण आनंदित करणारी मुलगी आहे.  मग ही गोड मुलगी हे घरसुद्धा आनंदाने भरून टाकेल… करशील ना? या निर्जीव वस्तूंमध्ये जान भरशील ना?” सुधांनी प्रेमळ नजरेने पाहात तिला विचारलं.

    “हो, करेन…” तिच्यावर सुधा यांनी किती मोठी जबाबदारी टाकली आहे, हे तर तिच्या लक्षात नव्हतं आलं, सासूबाईंचं प्रेमळ बोलणं ऐकून आपसूकच तिच्या तोंडून ‘हो’ निघालं आणि आपल्या आईचे कधी काळी बोललेले शब्द आठवले आणि खुदकन गालात हसली.

    “काय गं काय झालं? माझ्या बोलण्यावर हसतेस का?” सुधांनी विचारलं. तिच्या चेहऱ्यावर स्माईल पाहून खरंतर त्यांना तसंच शिव आणि भावनाला पण बरं वाटलं होतं.

    “काही नाही… आई मला म्हणत होती की, नवऱ्याच्या घरी काम नाही केलं, दुपारपर्यंत झोपलीस तर, सासू पाठीवर रट्टे देईल! पण तुम्ही किती प्रेमाने बोलता! आई पण मला कधी एव्हढ्या शांतपणे बोलली नाही… आणि तुम्हाला बघून असं वाटतंय, आई जे जे म्हणत होती ना – सासू असं करील तसं करील, रोज रोज माझा उद्धार होईल नवऱ्याच्या घरी गेल्यावर… – असं आणि बरच काही ती बोलत असते, पण तसं काहीच होणारं नाही… आता मला असं वाटतं म्हणून हासू आलं,” आरू नॉनस्टॉप बडबडत होती…

    मघाशी दिसत असलेला उदासपणा तर कुठल्या कुठे पळून गेला होता. शिव तर थक्क होऊन पाहात होता तिच्याकडे…

    “अशीच आहे आमची आरू. हेचं तिचं खरं रूप आहे, जे या दोन-तीन दिवसांत जणू हरवूनच गेलं होतं,” भावना शिवच्या जवळ जाऊन म्हणाली.

    “हं… आणि मला हीच आराधना आवडते!” तो त्याच्याच धुंदीत म्हणाला.

    “आम्हा सगळ्यांनाच माहीत आहे, हे दादा,” समर हासत म्हणाला… तसा शिव भानावर आला… सगळेच त्याच्याकडे पाहून हसत होते.

    “काय… ते मी आपलं असंच म्हणजे… ते… हे… उशीर होतोय… मी गाडी काढतो,” गडबडून जात शिव बाहेरच निघून गेला.

    “काकू, दादा लाजला वाटतं!” समर पुन्हा त्याची कळ काढत म्हणाला.

    “बास झालं. आरू बेटा सांगितलेलं सगळ लक्षात आहे ना? सगळं व्यवस्थित कर हां… जा आता तो वाट पाहात असेल,” सुधा तिला समजावत म्हणाल्या.

    “ताई, तू खरंच नाही येऊ शकत का?” आरूने भावनाला विचारलं. तिच्या चेहऱ्यावर भीती दिसत होती.

    शिवसोबत देवदर्शनाला एकटीला जायला तिला जिवावर आलं होतं. शिवने आज सोबत जीवनला घेतलं नव्हतं, त्यामुळे तो स्वतःच ड्राइव्ह करणार होता. समरने त्याला चिडवल्यामुळे तो पटकन बाहेर निघून आला आणि गाडीपाशी पायाची अडी टाकून उभा होता… डोळ्यावर ब्लॅक गॉगल… एक हात खिशात आणि दुसऱ्या हाताने मोबाइल कानाला लावला होता… खूपच हँडसम आणि स्टायलिश दिसत होता तो!

    हेही वाचा – शिव आणि आरूच्या लग्नात दिनकररावांनी हुंडा म्हणून…

    हाताची चुळबूळ करतच आरू बाहेर आली होती आणि तिची नजर गाडीला टेकून उभ्या राहिलेल्या शिववर पडली… ती त्याला पाहताच राहिली… आज पहिल्यांदाच ती त्याला एकटक पाहात होती! अर्थात, याकडे त्याच लक्ष नव्हतं ती वेगळी गोष्ट…

    आतमध्ये तो जे म्हणाला होता, “मला हीच आराधना आवडते” ते तिनेही ऐकलं होतं. नकळत तिच्या चेहऱ्यावर लाजेची लाली पसरली होती… नवख्या पण हव्याहव्याशा वाटणाऱ्या भावनेने… मनात हलचल जाणवली होती… आणि आताही त्याला पाहून का कुणास ठाऊक पण हृदयाची स्पंदने वाढली होती… नजर तिच्याही नकळत त्याच्यावरच स्थिर झाली होती.

    “काय होतंय मला? त्यांना पाहतच रहावं असं का वाटतंय? काय म्हणाले ते आतमध्ये? मी आवडते त्यांना, खरंच मी आवडत असेल का त्यांना? नाही… त्यांनी फक्त वहिनीसाठी माझ्यासोबत लग्न केलं आहे. त्यांना जर मी खरंच आवडत असते तर माझी अशी गावात बदनामी केली नसती!” या विचारानेच आत्तापर्यंत लाजेने लाल झालेला तीचा चेहरा उदास झाला… आणि तिने त्याच्यावरची नजर फिरवून घेतली.

    “क्याक… क्याक…” अचानक चालता चालता तिचा पाय कशावर तरी पडला आणि ती घाबरून बाजूला झाली. पण या सगळ्यात ती साडीत पाय अडकून ती पडणार, तोच तिला मागून कोणीतरी पकडलं…

    “सांभाळून… लक्ष कुठे आहे तुझं?” असं म्हणत शिवने तिला मागून धरत, दोन्ही हातांनी नीट उभं केलं.

    “माझं सोडा… ते पिल्लू… त्याला लागलं का, हे मला बघू द्या आधी,” असं म्हणतच तिने त्याच्यापासून बाजूला होत, खाली वाकून त्या पिल्लाला उचलून घेतलं.

    “सॉरी… सॉरी… माफ कर मला… माझ्या लक्षातच नाही आलं तू रस्त्यात असा बसला आहेस ते! पण असं नसतं बसायचं… बाजूला कुठेतरी बसायचं ना…” ती त्याला उचलून घेऊन त्याच्या शेपटीला बघत म्हणाली. कारण, तिचा पाय त्याच्या शेपटीवर पडला होता, त्यामुळे तो विव्हळला होता.

    ती अगदी एखाद्या व्यक्तीला बोलत असल्यासारखी त्या पिल्लासोबत बोलत होती… एक तर त्याला आपल्यामुळे त्रास झाला म्हणून तिलाच वाईट वाटत होतं आणि ते तिच्या चेहऱ्यावरही उमटलं होतं… पुनः तो रस्त्यात बसला होता, त्यामुळेच आपलं लक्ष गेलं नाही.. असे सांगत त्याची चूक पण त्याला दाखवून देत होती.

    तिच्या या चेहऱ्यावरचे बदलते भाव पाहून थक्क होत शिव हे सर्व पाहात होता. तिचा स्वभावच असा होता. कोणासाठीही ती हळवी व्हायची, मग तो माणूस असो किंवा मुकं जनावर! प्रत्येकाबाबत तिला जिव्हा होता…

    “येsss .. आपण ओळखतो का एकमेकांना? थांब थांब…” अचानक त्याला पाहून तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य झळकलं आणि अचानक तिला काहीतरी आठवलं… जणू ते कुत्र्याचं पिल्लू तिला उत्तर देणारं होतं म्हणून त्याला ‘थांब थांब’ म्हणत ती इकडे तिकडे पाहू लागली. जणू कोणाला तरी शोधत होती.

    “आराधना, काय चाललंय तुझं? कोणाला शोधतेयस? उशीर होतोय आपल्याला…”

    त्याच्या लक्षात आलं होतं, तिला काय आठवलं आणि कोणाला शोधत आहे ते! तसं तो घाई करत तिला जरा आवाज चढवून म्हणाला.

    “ते… मी… काही नाही याला कुठे सोडू?” ती काहीतरी बोलणार होती, पण आपल्यावर रोखलेली त्याची धारदार नजर पाहून आणि स्वरातील राग लक्षात घेऊन तिने ओठांवरील शब्द रोखून धरले.

    “वेट…” असं म्हणत त्याने वॉचमनला आवाज देऊन त्याच्याकडे त्या पिल्लाला द्यायला सांगितलं आणि त्याला त्याच्या जागेवर नेऊन ठेवायला सांगितलं.

    “चल!” असं म्हणत त्याने तिला पुढे चालायचा इशारा केला. तसं ती गुपचूप त्याच्या पुढे निघाली आणि गाडीपाशी येऊन दरवाजा उघडू लागली… तो उघडतं नव्हता… मग त्यानेच कार अनलॉक करत पुढे होऊन तिच्यासाठी दरवाजा उघडला…

    पण ती बसायचं सोडून त्याच्याकडेच पाहात उभी राहिली… काहीतरी विचारायचं होतं, पण विचारू की, नको या विचारात…

    “काय? काही विचारायचंय?” त्याने तिच्या मनातलं ओळखून भुवया उंचावत विचारलं.

    ” अं… ते… तुम्हाला टीव्ही बघायला आवडतो ना? आणि तुम्ही सारखं टीव्ही बघत असाल…” शेवटी मनात आलेला प्रश्न तिने विचारलाच!

    ती दरवाज्यासमोर त्याच्याकडे तोंड करून उभी होती… तो दरवाज्याचे हॅण्डल पकडून नजरेने तिच्याकडे पाहात उभा होता… त्याला कळतच नव्हतं आत्ता या स्विचवेशनमध्ये तिला असा विचित्र प्रश्न कसा काय पडला? याचाच तो विचार करत होता… आणि तो तिच्या प्रश्नाच उत्तर कधी देतोय… म्हणून ती त्याच्याकडे पाहात होती…

    “नसेल सांगायचं तर नका सांगू! पण एवढं काय वाकडं  तोंड करताय?”

    तो काही न बोलता… चेहऱ्यावर चमत्कारिक भाव ठेवत, तिच्याकडे पाहात आहे जाणवून ती, स्वतःच तोंड वाकडं करत म्हणाली आणि वळून गाडीत बसली.

    “काय आहे ही मुलगी… काय प्रश्न होता हा आणि कशामुळे?” बिचारा शिव स्वतःच गोंधळात पडला… आणि मी कधी वाकडं तोंड केलं? असा विचार सुरू होता…

    ए आराधना… काय सुरू आहे, तुझ्या मनात आणि डोक्यात कधी काय प्रश्न येतात, मला कळेल का? मला नीट सांग… नाही, मला आज तुझ्याशी बोलायचंच आहे काही गोष्टी स्पष्ट…” तो तसाच बाहेर उभा राहून, आत वाकून तिच्या चेहऱ्याजवळ चेहरा आणत म्हणाला.

    त्याच्या अचानक जवळ येण्याने आणि बोलण्याने दचकून छातीवर हात ठेवत ती मागे सरकली ..

    “अहो, माझ्या मनात कुठं काय आहे? मला वाटलं म्हणून विचारलं मी! ते टीव्हीमध्ये असंच हीरो हीरोईनसाठी गाडीचं दार उघडत असतो… आता तुम्ही तसंच केलं ना? मग तुम्ही पण टीव्हीमध्ये पाहिलं असेल ना? म्हणून मी… माफ… माफ करा…” ती घाबरून म्हणाली.

    कारण तो तिच्या खरंच खूप जवळ होता आणि लग्नाच्या आधी जेव्हा दोघे गाडीत होते, तेव्हाच त्याचं जवळ येणं आठवलं… आणि त्यानंतर तिची झालेली हालत तिला आठवली… आताही भीतीने तिची छाती वर-खाली होत होती… श्वास फुलला होता… आणि शिव तिच्याकडेच पाहात होता… त्याच्या नजरेला नजर नको द्यायला म्हणून आराधनाने डोळेच मिटून घेतले!

    आणि “वेडी” असं स्वतःशीच पुटपुटत त्याने तिच्या बाजूच दार लावल आणि तो दुसऱ्या बाजूने ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसला…

    दरवाजा बंद झाल्याचा आवाज आला तसं तिने हळूच डोळे उघडून बाजूला पाहिलं, तर तो नव्हता…

    क्रमशः

    शिव आराधना देवदर्शनाला जात आहेत… फक्त दोघांचा पहिला वाहिला प्रवास कसा असेल.. पाहूया पुढच्या भागात..

    Avatar photo
    शोभा भडके

    मूळ गाव कांबी, जिल्हा बीड. मूळ राहण्याचे ठिकाण बीड. मी लेखनाला सुरुवात करायच्या आधी फक्त एक वाचक होते. म्हणून प्रतिलिपी ॲपवर कथा वाचनच करत होते. तेव्हा ध्यानीमनीही नव्हतं मी एखादी स्टोरी लिहू शकेन. पण वाचन करत करता मनात आलं आणि लिहू लागले. लिहिलेलं वाचकांना आवडत गेलं, तसं माझा लिहिण्याचा हुरूप वाढत गेला... आज लेखनामुळे आर्थिकदृष्ट्या पण स्वावलंबी झाले आणि स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली.

    Related Posts

    Bookshelf : ‘मेधावी’… कथाविश्वाची झलक दाखवणारे पुस्तक

    June 21, 2026 ललित

    रंगभूमी… उत्सुकता नटराज ग्रुपच्या ‘मत्स्यगंधा’ची!

    June 20, 2026 ललित

    आबा आणि मित्रमंडळींची पार्टी

    June 20, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    Bookshelf : ‘मेधावी’… कथाविश्वाची झलक दाखवणारे पुस्तक

    By डॉ. अस्मिता हवालदारJune 21, 2026

    डॉ. अमित महाजन यांच्या ‘मेधावी : एक स्वैर अनुवाद’ या पुस्तकात जगभरातल्या प्रसिद्ध कथालेखकांच्या निवडक…

    रंगभूमी… उत्सुकता नटराज ग्रुपच्या ‘मत्स्यगंधा’ची!

    June 20, 2026

    आबा आणि मित्रमंडळींची पार्टी

    June 20, 2026

    श्रीने जुईलीला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या, पण…

    June 20, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    आरूच्या ‘त्या’ प्रश्नाने शिव गोंधळलाच!

    June 21, 2026

    Bookshelf : ‘मेधावी’… कथाविश्वाची झलक दाखवणारे पुस्तक

    June 21, 2026

    पितृदिन विशेष… ज्यांच्या आधारावर आपण उभे राहतो!

    June 21, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 21 ते 27 जून 2026

    June 21, 2026

    Dnyaneshwari : नातरी इक्षुदंडु, पाळितया गोडु 

    June 21, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 21 जून 2026

    June 21, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 335
    • अवांतर 191
    • आरोग्य 122
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 462
    • फिल्मी 53
    • फूड काॅर्नर 226
    • मैत्रीण 21
    • ललित 722
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    आरूच्या ‘त्या’ प्रश्नाने शिव गोंधळलाच!

    June 21, 2026

    Bookshelf : ‘मेधावी’… कथाविश्वाची झलक दाखवणारे पुस्तक

    June 21, 2026

    पितृदिन विशेष… ज्यांच्या आधारावर आपण उभे राहतो!

    June 21, 2026
    Most Popular

    हेच पक्ष कार्यकर्त्याचं वास्तव!

    June 18, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.