Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : पृथ्वी सगळीचि गिळूं, आकाश वरिच्यावरि जाळूं

    May 18, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 मे 2026

    May 18, 2026

    शिव आणि दिनकरराव वाद पाहून आरू हादरली

    May 17, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, May 18
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 मे 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 मे 2026

    Team AvaantarBy Team AvaantarMay 18, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, अधिक मास
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 18 मे 2026; वार : सोमवार
    • भारतीय सौर : 28 वैशाख शके 1948; तिथि : द्वितीया 17:54; नक्षत्र : रोहिणी 11:32;
    • योग : सुकर्मा 21:48; करण : बालव 07:46, तैतिल 28:03;
    • सूर्य : वृषभ; चंद्र : वृषभ 22:05; सूर्योदय : 06:03; सूर्यास्त : 19:06;
    • पक्ष : शुक्ल; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    धनिष्ठानवक समाप्ती

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    कूल मॉमचा ट्रेंड आणणाऱ्या अभिनेत्री रिमा

    टीम अवांतर

    अभिनेत्री रिमा (लागू) यांचा जन्म 25 फेब्रुवारी 1958 रोजी झाला. त्यांची आई मंदाकिनी भडभडे यादेखील अभिनेत्री होत्या.  पुण्यातील हुजूरपागा शाळेत शिकत असताना विद्यार्थी दशेतच रिमा यांनी अभिनय क्षेत्रात आपली नोंद घेतली जाईल, अशा भूमिका करायला सुरुवात केली. ‘हिरवा चुडा’, ‘हा माझा मार्ग एकला’ अशा चित्रपटांतून ‘बेबी नयन’ नावाने बालकलाकार म्हणून रीमा यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आणि लवकरच त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीलाही सुरुवात झाली.

    चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याआधी रिमा युनियन बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करत होत्या. तेव्हा त्या आंतरबँक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेत असे, जिथे त्यांची प्रतिभा चमकू लागली. त्यांच्या समवयस्कांकडून प्रोत्साहन आणि आवडीने प्रेरित होऊन, अखेर पूर्णवेळ अभिनय करण्यासाठी त्यांनी बँकेतील नोकरी सोडली.

    एक उत्तम अभिनेत्री म्हणून भारतातल्या नाट्य-चित्रपट प्रेक्षकांना रिमा यांचं नाव सुपरिचित होतं. 70-80 च्या दशकात मराठी रंगभूमीवर आणि नंतर मराठी, हिंदी चित्रपटांत त्यांनी विविध भूमिका केल्या. सिंहासन या मराठी चित्रपटातून त्यांनी चित्रपट कारकीर्दीला सुरूवात केली. 1980 सालच्या आक्रोश, कलयुग या दर्जेदार चित्रपटांपासून त्यांच्या हिंदी चित्रपट प्रवासाला सुरुवात झाली. पुढे ‘रिहाई’सारखी धीट, वेगळ्या वाटेवरची भूमिका त्यांनी साकारली.

    हेही वाचा – लक्ष्मी आणि गृहलक्ष्मी

    ‘घर तिघांचं हवं’, ‘चल आटप लवकर’, ‘झाले मोकळे आकाश’, ‘तो एक क्षण’ ‘पुरुष’, ‘बुलंद’, ‘सविता दामोदर परांजपे’, ‘विठो रखुमाय’, ‘शांतेचे कार्ट चालू आहे’, ‘छापाकाटा’ अशी त्यांची बरीच नाटकं प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. त्यांची मुलगी मृण्मयी लागू हीसुद्धा अभिनेत्री आणि दिग्दर्शिका आहे.

    दूरदर्शनवरील ‘खानदान’, ‘श्रीमान श्रीमती’, ‘तू तू मै मै’, ‘दो और दोन पांच’ यासारख्या मालिकांमुळे रिमा घराघरांत पोहोचल्या. याशिवाय झी मराठीवरील ‘श्रावणसरी’ या मालिकेच्या दोन कथांचे दिग्दर्शनही त्यांनी केले होते.

    ‘मैने प्यार किया’, ‘हम आपके है कौन’, ‘कुछ कुछ होता है’, ‘कयामत से कयामत तक’, ‘कल हो ना हो’ यासारख्या चित्रपटांमधून शाहरुख खान, सलमान खान, काजोल, जुही चावला यांची ‘ग्लॅमरस आई’ म्हणून त्या सगळ्यांनाच आवडल्या. पण, ‘वास्तव’मधील रघुभाईची कणखर आईही त्यांनी तितक्याच ताकदीने साकारली होती. हिंदी चित्रपटसृष्टीत सोशिक आणि कायम दुःखात बुडालेल्या अभागी आईच्या ऐवजी ग्लॅमरस, आधुनिक काळातील कूल मॉमचा ट्रेंड त्यांनी लोकप्रिय केला.

    रिमा यांनी ’अनुमती’ या पुरस्कारप्राप्त चित्रपटात अतिशय महत्त्वाची भूमिका केली होती. गजेंद्र अहिरे यांनी दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटातली त्यांची भूमिका अनेक चित्रपट महोत्सवांमधून नावाजली गेली. 2002 मध्ये आलेल्या ‘रेशमगाठ’ या उत्कृष्ट मराठी चित्रपटातील भूमिकेसाठी रिमा यांना उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्काराने गौरविले होते. मराठी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या मोलाच्या योगदानाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाकडून त्यांना व्ही. शांताराम या  विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले होते. याशिवाय रिमा यांना हिंदी चित्रपटांमधील उत्कृष्ट सहाय्यक भूमिकेसाठी तब्बल 4 वेळा फिल्मफेअर पुरस्कारांचे नामांकन मिळाले होते, ज्यामध्ये वास्तव, मैंने प्यार किया, आशिकी, हम आपके है कौन यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे. 18 मे 2017 रोजी त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.


    आजचे राशीभविष्य

    मेष – धावपळ आणि तणावामुळे तुम्ही आज थकून जाणार आहात, पण एनर्जी राखणे महत्त्वाचे आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. तुम्ही नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आजचा दिवस फारसा अनुकूल नाही. इतरांवर गरजेपेक्षा जास्त विश्वास ठेवणे हानिकारक ठरू शकते. कुटुंबाला दिलेले वचन कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला पूर्ण करावे लागू शकते.

    वृषभ – तुमची सर्जनशील विचारसरणी लोकांना आकर्षित करेल, ज्यामुळे तुमचा मित्र परिवार वाढू शकतो. वाढलेल्या खर्चामुळे बजेटमध्ये थोडी गडबड होऊ शकते, त्यामुळे सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अविवाहित जातकांची विवाहाबद्दलची बोलणी आज अंतिम टप्प्यात येतील. एखाद्या व्यक्तीला नवीन नोकरी मिळाल्याने कुटुंबात उत्साहाचे वातावरण निर्माण होईल.

    मिथुन – आज शब्दांवर नियंत्रण ठेवणे हे सर्वात महत्त्वाचे ठरेल. सामाजिक कार्यक्रमात बोललेल्या कोणत्याही गोष्टीबाबत गैरसमज होऊ शकतो, म्हणून विचारपूर्वक बोला. ऑनलाइन खरेदी करताना सावधगिरी बाळगा, कारण फसवणूक होण्याची शक्यता आहे. मालमत्तेसंबंधीचे निर्णय सखोल चौकशी केल्यानंतरच घ्या. आज मन वारंवार भरकटू शकते, त्यामुळे स्वतःला एकाग्र ठेवण्याचा प्रयत्न करा.

    कर्क – आज सुखसोयी आणि आनंदात वाढ होण्याची चिन्हे आहेत. कुटुंबातील सदस्य तुमच्या अपेक्षा पूर्ण करतील. दूरच्या नातेवाईकाकडून एखादी चांगली बातमी मिळू शकते. कठोर परिश्रमांमुळे यश खेचून आणाल. भूतकाळातील एखादा आर्थिक व्यवहार काहीशी चिंता निर्माण करू शकतो. नवीन वाहन खरेदी करण्याचा किंवा नवीन प्रॉपर्टी घेण्याचा विचार करू शकता.

    सिंह – आज नशीब तुमच्या बाजूने असू शकते आणि अपेक्षित लाभाची चिन्हे दिसत आहेत. त्याचबरोबर स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक असेल. काही लोक तुमच्या दयाळूपणाचा गैरफायदा घेण्याची शक्यता आहे, परंतु तुम्ही आपला मार्ग सोडू नका. जोडीदाराचा पाठिंबा प्रत्येक पावलावर तुमचा आत्मविश्वास वाढवेल, आर्थिक समस्याही सुटू शकतात. विद्यार्थ्यांनी अभ्यासात शिस्त राखणे गरजेचे आहे.

    कन्या – आईसोबत चिंता शेअर केल्याने दिलासा मिळेल. वाहन चालवताना विशेष सावधगिरी बाळगा, कारण अपघात होण्याची शक्यता आहे. जोडीदारासाठी काहीतरी खास खरेदी केल्याने नात्यात गोडवा निर्माण होईल. राजकारण किंवा सामाजिक क्षेत्रात तुमची प्रतिष्ठा अधिक मजबूत होऊ शकते. कुटुंबातील सदस्य तुमच्या सन्मानार्थ एखादे खास सरप्राईज आयोजित करू शकतात.

    तुळ – तुमच्या कष्टाचे फळ मिळेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाची वरिष्ठांकडून दखल घेतली जाईल. अनेक काळापासून प्रलंबित असलेली उधार दिलेली रक्कम परत मिळाल्याने दिलासा मिळेल. विरोधक त्रास देण्याचा प्रयत्न करू शकतात, परंतु हुशारीने तुम्ही त्यांना नामोहरम कराल. लहान मुलांची एखादी गोड मागणी तुमचे मन जिंकेल. एकूणच, आजचा दिवस सकारात्मक आणि सुखद असेल.

    वृश्चिक – आज, नवीन आणि उत्कृष्ट कल्पना सुचू शकतात, ज्यामुळे व्यवसायात मोठा नफा मिळू शकेल. परदेशी व्यापाराबाबत चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. नवीन लोकांच्या भेटीगाठी घेणे भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती आणि वेतनवाढीसह नवीन जबाबदारी सोपविली जाण्याची शक्यता आहे. हरवलेली, मौल्यवान वस्तू सापडल्याने आनंद होईल.

    हेही वाचा – मुंबईची भेळपुरी अन् कोलकात्याची झालमुरी!

    धनु – तुमचा जोडीदार एखाद्या गोष्टीमुळे नाराज होऊ शकतो, त्यामुळे नात्यात प्रेम आणि सामंजस्य टिकवून ठेवा. उत्पन्नाच्या बाबतीत सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे. जवळच्याच व्यक्तीकडून फसवणूक होऊ शकते. घरी एखाद्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन होण्याचीही शक्यता आहे. विद्यार्थ्यांना मानसिक तणावातून दिलासा मिळेल. शिवाय शिक्षकांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल.

    मकर – आज, सकारात्मक बदल तुमच्या जीवनात नवीन ऊर्जा भरू शकतात. संततीकडून चांगली बातमी मिळण्याचे संकेत आहेत. व्यवसायात नवीन करार होण्याची शक्यता आहे. मेहनतीमुळे प्रलंबित कामे पूर्ण होण्यास मदत होईल. जीवनशैली सुधारण्याचे तुमचे प्रयत्न यशस्वी होऊ शकतात. स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. कुटुंबात नवीन पाहुण्याच्या आगमनाने आनंद परत येईल.

    कुंभ – प्रवास किंवा स्थळदर्शनातून अशी मौल्यवान माहिती मिळू शकते, जी भविष्यात फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी मतभेद निर्माण होऊ शकतात, तथापि, अशा परिस्थितीत संयम आणि समजूतदारपणा दाखवा. आई-वडिलांच्या आशीर्वादाने कामाला सुरुवात केल्यास यश मिळू शकते. घरासाठी नवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याची शक्यता आहे.

    मीन – आज व्यवसायात काही आव्हाने येऊ शकतात, पण संयमाद्वारे त्यातून मार्ग सापडतील. इतरांच्या सल्ल्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवणे बंद करा. सरकारी कामे पूर्ण करण्यासाठी जास्त परिश्रम करावे लागू शकतात. वैवाहिक जीवनात वेळ आणि समजूतदारपणाची गरज लागेल. जुन्या मित्राला भेटल्याने आनंद मिळू शकतो. वडिलांचे आरोग्य, विशेषतः डोळ्यांच्या समस्यांमुळे तुमची चिंता वाढू शकते.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    साप्ताहिक राशीभविष्य : 17 ते 23 मे 2026

    May 17, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 17 मे 2026

    May 17, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 मे 2026

    May 16, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    साप्ताहिक राशीभविष्य : 17 ते 23 मे 2026

    By Team AvaantarMay 17, 2026

    मेष या आठवड्यात केलेली मध्यस्थी लाभदायक ठरेल. गुरु-शुक्र सहयोगामुळे घरात शुभवार्ता समजतील. नोकरदारांना कामांची जबाबदारी…

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 17 मे 2026

    May 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 मे 2026

    May 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 मे 2026

    May 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : पृथ्वी सगळीचि गिळूं, आकाश वरिच्यावरि जाळूं

    May 18, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 मे 2026

    May 18, 2026

    शिव आणि दिनकरराव वाद पाहून आरू हादरली

    May 17, 2026

    मुंबईची भेळपुरी अन् कोलकात्याची झालमुरी!

    May 17, 2026

    लक्ष्मी आणि गृहलक्ष्मी

    May 17, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 17 ते 23 मे 2026

    May 17, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 301
    • अवांतर 186
    • आरोग्य 111
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 423
    • फिल्मी 48
    • फूड काॅर्नर 209
    • मैत्रीण 19
    • ललित 631
    • शैक्षणिक 80
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Dnyaneshwari : पृथ्वी सगळीचि गिळूं, आकाश वरिच्यावरि जाळूं

    May 18, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 मे 2026

    May 18, 2026

    शिव आणि दिनकरराव वाद पाहून आरू हादरली

    May 17, 2026
    Most Popular

    Dnyaneshwari : पृथ्वी सगळीचि गिळूं, आकाश वरिच्यावरि जाळूं

    May 18, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.