Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    हिरव्या बांगड्या

    June 17, 2026

    स्मोकर्स कफ… शरीराने दिलेली वॉर्निंग बेल!

    June 17, 2026

    Recipe : काकडीचे स्वादिष्ट सांदण अन् खमंग घावन!

    June 17, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, June 17
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » वास्तव अन् आभासी जगामधली धूसर रेषा!
    फिल्मी

    वास्तव अन् आभासी जगामधली धूसर रेषा!

    हर्षा गुप्तेBy हर्षा गुप्तेApril 27, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठी कथा, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, आईची वेडी माया, स्वार्थी मुलगा, स्वार्थी मुलाकडून आईची फसवणूक, मुलाकडून आईची फसवणूक, स्वार्थी जग, वास्तव जग, आभासी जग, वास्तव आणि आभासी जगातील फरक
    फोटो प्रातिनिधीक
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला.

    चाळीत राहणारी, जेवणाचे डबे बनवणारी, सिंगल पॅरेंट… नवरा गेल्यावर खूप कष्ट करून एकुलत्या एका लाडक्या लेकाला शिकवलं, उच्च शिक्षणासाठी परदेशी पाठवलं. मुलानेही उत्तम शिक्षण घेतलं आणि… आईला काहीही न सांगता तिथल्याच मुलीशी लग्न केलं. आता त्याला अचानक आईचा कळवळा आला. तो मायदेशी परत आला. लग्न केल्याचं सांगून माफी मागितली अन् म्हणाला, “इथलं घर, दागिने विकून टाकूयात. ते सगळे पैसे आपण तुझ्या बँक अकाऊंटला ठेवून आपण कायम परदेशी जाऊयात. मी तुझा पासपोर्ट बनवून घेतो.”

    आईच ती यापुढे कायम मुलगा, सून, नातवंड अशा गोतावळ्यामध्ये राहायला मिळणार या आनंदात होकार दिला. पासपोर्ट आला. घर, दागिने विकले. ते सगळे पैसे नव्या बँक अकाऊंटमध्ये भरले गेले. थोडफार शॉपिंग झालं… आणि आता परदेशी जाण्याचा दिवस उजाडला. चाळीतल्या सगळ्यांचा निरोप घेऊन ती दोघे एअरपोर्ट वर आले. आईला तिच्या समानसकट बाहेर बसवून तो चौकशीसाठी आत गेला… एक तास झाला… दोन तास झाले… दहा तास झाले तरी तो बाहेर नाही आला. एका जागी उपाशीतापाशी बसून त्या थकल्या होत्या. तेवढ्यात duty संपवून घरी जाणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याने त्यांची विचारपूस केली आणि त्यांना कळलं की, आयुष्यात त्यांची किती मोठी फसवणूक झालीय ते! तीही कुणाकडून तर त्यांच्या लाडक्या मुलाकडून!!

    हेही वाचा – पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    ही सगळी घटना पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचली. पोलिसांनी त्या काकूंना त्यांच्या जुन्या चाळीत नेऊन सोडलं. शेजाऱ्यांनी आधार दिला. पण कोणाच्या घरी राहण्याची सोय असेल, अशा ठिकाणी नोकरी करणं त्या काकूंनी पसंत केलं!

    हुश्श… ही गोष्ट माझ्या एका सीरियलची होती आणि त्या काकूंचा रोल मी केला होता. एखादा मुलगा असा कसा वागू शकेल आपल्याच आईशी? हा मला पडलेला प्रश्न होता.

    0000

    एका सिनेमाची ऑफर आली. ऋषी कपूर, परेश रावल अशी मोठी स्टार कास्ट होती.  तिथे लग्नाचा सेट लागला होता आणि त्याकरिता बरेच ज्युनियर आर्टिस्ट, डान्सर बोलावले होते. एक खूप सुंदर, गोरीपान म्हातारी डान्सर तिथे होती. म्हातारी म्हणजे फक्त वयाने… उत्साह म्हणजे 16 वर्षांच्या मुलीला लाजवेल एवढा… आणि रूप म्हणजे नजर हटत नव्हती. कुठेतरी पाहिलं असल्यासारख वाटतं होतं…

    ब्रेकमध्ये आमच्या गप्पा झाल्या… त्या बाई पनवेलहून येत होत्या शूटिंगसाठी! कौतुक वाटलं. अजून एक आश्चर्य, त्या ऋषी कपूरना खूप अदबीनं ‘चिंटूजी’ हाक मारायच्या आणि तेही तेवढ्याच आदराने त्यांना ‘आण्टीजी’ म्हणायचे…

    हळूहळू सगळं उलगडत गेलं. त्या आण्टी वयाच्या 13-14व्या वर्षापासून सिनेमात डान्सर म्हणून काम करत होत्या. चेंबूरला त्यांचा बंगला होता. जुन्या हिंदी सिनेमात असायच्या ना तशा लांबलचक गाड्या होत्या त्यांच्याकडे! श्रीमंती होती, पण त्या सिंगल पॅरेंट होत्या. मुलाला शिकवलं, परदेशी पाठवलं. त्याच्या मनाप्रमाणे सगळं केलं. त्याने मात्र आईला फसवून चेंबूरचा बंगला, गाड्या, दागिने विकून सगळा पैसा घेऊन आईला फसवून परदेशी पोबारा केला. आण्टी अक्षरशः रस्त्यावर आल्या. पण बाईने हिंमत नाही हरली! पुन्हा कामं सुरू केली… अपमान सहन केले… म्हणतात ना जिथे फुले वेचली, तिथे गोवऱ्या उचलल्या. पनवेलला एका चाळीत राहतात. बरेचसे ज्युनियर आर्टिस्ट आणि डान्सर त्यांच्या आजुबाजूला राहतात. एकत्र काम करतात. जगतात एकमेकांना जगवतात. कमाल वाटली त्यांची…

    एकेक पायरी चढत त्यांनी आसमान गाठलं. लाडक्या लेकाने रस्त्यावर आणलं, पण बाई जिद्दीची. स्वतः उभी राहिली आणि इतरांना पण हात दिला. आता त्या कामासोबतच समाजकार्य पण करत होत्या.

    मी व्हॅनिटीमधून बाहेर पडले आणि सेटकडे निघाले. अचानक काहीतरी ऐकलं आणि थांबले… त्या आण्टी ऋषी कपूरना सांगत होत्या की, “एक ज्युनियर ॲक्टर आहेत, त्याचं ऑपरेशन व्हायचं आहे. त्यासाठी हॉस्पिटलमध्ये 80 हजार रूपये भरायचेत. तुम्ही काही मदत करू शकाल का?” ऋषीजीनी त्यांच्या सेक्रेटरीला सांगितलं की, “आण्टीना 80 हजारांचा चेक द्या. त्यानंतर देखील काही लागलं तर, त्यांना द्या. मला विचारायला येऊ नका आणि आण्टी सरळ माझ्याकडे येत जा, काही लागलं तर. इतर कोणाकडे हात पसरायची तुम्हाला गरज नाहीये. मी आहे ना!”

    हेही वाचा – हिंदी सीरियलची ऑडिशन अन्…

    खरंच एवढ सोसून सुद्धा ही बाई ताठ उभी आहे. स्वतः तर जगतेय पण सोबतच्या लोकांनाही मदत करतेय. शिवाय, ऋषी कपूर सारखे त्यांना मदत करताहेत. अगदी उजव्या हाताने केलेलं दान डाव्या हाताला कळू न देणारी माणसे! हे सगळ ऐकताना मी मात्र आतून ढासळत होते.

    0000

    मी तर ती सीरियल शूट केली होती आणि तेव्हा मला एवढा त्रास झाला होता. फक्त शूटमध्ये एवढे गुंतले होते… पण ही बाई वैभव उपभोगून आता म्हातारपणी कष्ट सोसतेय! खूप वाईट वाटत होतं… पण त्या मात्र खूश होत्या.

    एक दिवस बातमी आली त्या आण्टी गेल्या. जाताना कमावलेलं सगळं त्यांच्या सहकाऱ्यांसाठी सोडून गेल्या. किती ते मोठ मन.  सलाम त्या आण्टीना आणि ऋषी कपूरना सुद्धा.   आण्टीच्या मुलाबद्दल मात्र कधीच काहीच कळलं नाही. कसा असेल तो मुलगा, ज्याने सख्ख्या आईला भिकेला लावण्याचा प्रयत्न केला!

    Avatar photo
    हर्षा गुप्ते

    मालिका, सिने, नाट्य अभिनेत्री

    Related Posts

    मला कायम जपणारे स्नेहबंध…

    June 15, 2026 फिल्मी

    मुख्याध्यापिकेच्या रोलसाठी ऑडिशनला गेले आणि…

    June 8, 2026 फिल्मी

    देह शुद्ध करूनी भजनी भजावे…

    June 2, 2026 फिल्मी
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फिल्मी

    मला कायम जपणारे स्नेहबंध…

    By हर्षा गुप्तेJune 15, 2026

    नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. शूटिंग दरम्यान मला अजून एक मुलगा…

    मुख्याध्यापिकेच्या रोलसाठी ऑडिशनला गेले आणि…

    June 8, 2026

    देह शुद्ध करूनी भजनी भजावे…

    June 2, 2026

    सेटवरची एनर्जी म्हणजे हरहुन्नरी साईराज!

    June 1, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    हिरव्या बांगड्या

    June 17, 2026

    स्मोकर्स कफ… शरीराने दिलेली वॉर्निंग बेल!

    June 17, 2026

    Recipe : काकडीचे स्वादिष्ट सांदण अन् खमंग घावन!

    June 17, 2026

    Dnyaneshwari : खडकीं जैसें वर्षलें, कां आगीमाजीं पेरिलें 

    June 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 17 जून 2026

    June 17, 2026

    विहिरीतला आवाज…

    June 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 331
    • अवांतर 190
    • आरोग्य 121
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 457
    • फिल्मी 53
    • फूड काॅर्नर 224
    • मैत्रीण 21
    • ललित 710
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    हिरव्या बांगड्या

    June 17, 2026

    स्मोकर्स कफ… शरीराने दिलेली वॉर्निंग बेल!

    June 17, 2026

    Recipe : काकडीचे स्वादिष्ट सांदण अन् खमंग घावन!

    June 17, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.