Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    आले जल गेले जल झाले जल आरपार…

    April 26, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 26 एप्रिल ते 02 मे 2026

    April 26, 2026

    Dnyaneshwari : सा विस्मितु पाहे कोडें, तंव पुढां होतें चतुर्भुज रूपडें

    April 26, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, April 26
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » आजची तरुण पिढी…
    अवांतर

    आजची तरुण पिढी…

    Team AvaantarBy Team AvaantarApril 26, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी साहित्य, मराठी आर्टिकल, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी कथा, मराठी लेख, तरुण पिढी, पिढ्यांमधील बदल, पिढ्यांमधील अंतर, नव्या पिढीबद्दल मुक्त चिंतन, नवी पिढी बिघडली, नवी पिढी घडली, नव्या पिढीसमोरील आदर्श, पिढीगणित समाजसुधारक,
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    संगीता भिडे

    “अहो, मी आज ‘आजची तरुण पिढी’ या विषयावर बोलणार आहे.”

    “त्यात काय आहे विशेष असं बोलायला?” इति ‘अहो’.

    “तरी पण…” – मी.

    “मग सांगा – आजची तरुण पिढी बिघडली… संपला विषय!”

    “अहो, पण मग आपला मुलगा?”- अस्मादिक.

    “तो? तो तर पारच -” ‘बिघडलाय’ या अर्थाचे नुसतेच हातवारे आणि “तोही तुमच्यामुळे” – ‘अहों’ची ग्वाही.

    या पुढला सुखसंवाद सांगण्यात अर्थ नाही, पण मी मात्र त्यामुळे खूपच अंतर्मुख झाले. सहजच माझ्या पिढीच्या तारुण्याकडे वळून पाहिलं आणि एक संवाद जसाच्या तसा आठवू लागला. मी कॉलेजला असताना भालप्रदेशावर कुंकू बऱ्याच उंचावर लावत असे. एका संसृ्कतीरक्षक काकांनी लगेच मला टोकलं, “हल्ली कुंकू बरंच वर वर चाललंय?” उगाचच गप्प बसणं स्वभावात नाही. उत्तर देऊन मोकळी झाले, “काका, कुंकू वर चाललंय हे तर खरंच, पण मला वाटतं, माझ्या पुढल्या पिढीपर्यंत ते पुन्हा खाली येईल, बरं का काका!” आणि खरंच आश्चर्य म्हणजे हे कुंकू आता दोन भुवयांच्या मधे विराजमान झालं आहे.

    हेही वाचा – Local train : डोंबिवली ते कसारा प्रवासातील ‘ते’ नातं

    थोडक्यात काय? तर, प्रत्येक कालची पिढी आजच्या तरुण पिढीच्या नावाने ‘ती बिघडली’ म्हणून कंठशोष करत असते आणि उद्या काय होणार, या चिंतेने कपाळाला हात लावून बसते. खरं म्हणजे काल, आज आणि उद्या या संकल्पना इतक्या सापेक्ष आहेत की, अगदी आदिकालापासून आजपर्यंत एकजात सर्व पिढ्या बिघडल्या आहेत, असाच निष्कर्ष काढावा लागेल. मग ‘बिघडणे’ म्हणजे नक्की काय आणि नेमकं काय समजायचं? जिथे जिथे पूर्वापार चालत आलेल्या चालीरीती, रूढी, परंपरा, नितीनियम, वेष, इत्यादी बदलण्याचा, मोडून काढण्याचा प्रयत्न होतो, तिथे तिथे ती व्यक्ती, तो समाज आणि राष्ट्र सुद्धा ‘बिघडले’ या सदरात मोडू लागलेत आणि म्हणूनच फुले, आंबेडकर, आगरकर, सावरकर इत्यादी मंडळी आज आमच्यासाठी ‘समाज सुधारक’ असली तरी, त्यांच्या काळात बिघडलेलीच माणसं होती. परिणामी, महात्मा फुले, सावित्रीबाई यांना जनतेने भिरकावलेले दगड झेलावे लागले, आगरकर यांची त्यांच्या जिवंतपणी प्रेतयात्रा काढण्यात आली तर, सावरकरांना वाळीत टाकण्याची भाषा होऊ लागली. अशी कितीतरी उदाहरणे आहेत.

    मला तर अधिक पुढे जाऊन असं म्हणावसं वाटतं, ‘बिघडणे’ हे जर ‘घडणे’साठी उद्युक्त होत असेल तर, हा प्रत्येक व्यक्तीचा, समाजाचा, आणि राष्ट्राचाही एक अंगीभूत गुणधर्म आहे, असं समजायला काय हरकत आहे? परिणामी, व्यक्तीची, तो राहतो त्या समाजाची, राष्ट्राची प्रगतीपथावर वाटचाल झालेली दिसते. असं जर आहे तर, ‘बिघडणे’ या गोष्टीचा एवढा बाऊ कशासाठी करायचा? आणि आजच्या तरुण पिढीवर ती बिघडली म्हणून कालच्या पिढीने शिक्का तरी का मारायचा? याला एकच उत्तर संभवतं, बिघडण्याला सुद्धा दोन बाजू असतात – एक ईष्ट आणि दुसरी अनिष्ट!

    दुर्दैवाने अनिष्ट बाजूच प्रत्येक पिढीगणिक वाढत चालली आहे, हे मात्र खरंय. उदाहरणेच द्यायची झाली तर याला कौटुंबिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, अध्यात्मिक वा अन्य कोणतेही क्षेत्र अपवाद नाही. प्रत्येक क्षेत्रातच परमार्थापेक्षा स्वार्थाला महत्त्व अधिक मिळू लागलंय. ‘साधी राहणी, उच्च विचारसरणी’ ही जीवनशैली मागे पडून ‘उच्च राहणी, नीच विचारसरणी’ प्रतिष्ठा मिळवू पाहतेय.

    मुलाने पित्यासमोर अपेय पान करणे, विद्यार्थ्याने शिक्षकावर प्राणघातक हल्ला करणे, विरोधी व्यक्तीला हल्ला करून संपवून टाकणे ‌यासारख्या बाबींचा कोणालाही विधिनिषेध उरलेला नाही. एकूण जीवनच चंगळवादी, भोगवादी बनविणे हे निश्चितच अधोगतीचे आणि वैचारिक अध:पतनाचे गमक आहे.

    वैज्ञानिक साधनांची सहज उपलब्धता असून सुद्धा पिढीगणिक अभ्यासू वृत्ती, सेवाभाव, आदरभाव, श्रमप्रतिष्ठा इत्यादी गोष्टींची घसरणच चालू असल्याचे दिसते. झटपट पैशाच्या भूताने तर तरुण पिढीला एवढे ग्रासले आहे की, भ्रष्टाचार, अनाचार हाच शिष्टाचार होऊ पाहतोय. बेबंद, नीतीशून्य कटू फळ आजच्या पिढीला लागलेले बघताना नक्कीच अतीव वेदना होतात.

    हेही वाचा – अनोखा बंधूभाव

    हे सर्व चित्र खरं असलं तरी, आजच्या तरुण पिढीवर संपूर्ण जबाबदारी निश्चितच टाकता येत नाही. कारण प्रत्येक पिढी आपल्या पहिल्या पिढीच्या खांद्यावर उभी असते. साहजिकच आजच्या तरुण पिढीचे क्षितिज कालच्यापेक्षा रुंदावलेले असते. दुर्दैवाने टिळक, गांधी, नेहरू, बोस, आगरकर, आंबेडकर, सावरकर इत्यादींसारखे कर्तृत्ववान हिमालय, क्षितिजावर दूरवर नजर टाकूनही दृष्टिपथात येत नाहीत. समोर आदर्श आहे तो, वाटेल तेवढी खुनाखुनी करून, स्मगलिंग करूनही हीरो ठरलेल्या फिल्मी नायकाचा, राजकारणाचा उपयोग देशहितापेक्षा स्वहितासाठी करणाऱ्या स्वार्थी पुढाऱ्यांचा, स्वतःच्या संपत्तीचे विसर्जन न करता ती वाढवण्याच्या मागे लागलेल्या साम्यवादी विचारवंतांचा, ‘बिना सहकार नाही उद्धार’ असे म्हणून निर्धनांना अधिक निर्धन बनवणाऱ्या सहकारसम्राटांचा, जातीयतेचे निर्मूलन करण्याऐवजी त्यालाच खतपाणी घालणाऱ्या ढोंगी समाज धुरीणांचा, विद्यार्थ्यांना पदव्या विकत देणाऱ्या शिक्षणमहर्षींचा, स्वतः ऐषारामात राहून जनतेला अध्यात्माचे काढे पाजणाऱ्या अध्यात्मवाद्यांचा!

    तात्पर्य, आजची तरुण पिढी बिघडली, तिने अनिष्ट वळण घेतलं, हे जरी खरं असलं तरी ही पिढी हाताबाहेर गेली आहे, असं मला तरी वाटत नाही. कारण या पिढीला इष्ट दिशा दाखवणं तुमच्या- आमच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, समाजधुरिणांच्या आणि राज्यकर्त्यांच्याच हातात आहे; याचं भान जर योग्य वेळी आलं तर अजूनही योग्य तो बदल होऊ शकतो. मात्र यासाठी प्रत्येक व्यक्तीने बुद्धिनिष्ठ, तर्कनिष्ठ, विवेकनिष्ठ आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन ठेवणे नितांत आवश्यक आहे. अजूनही आमच्या राष्ट्रात, समाजात, कुटुंबात संख्येनं कमी असले तरी उत्कृष्ट उपदेशक, मार्गदर्शक, दिशादर्शक व्यक्ती आहेत. त्यांच्या कार्याकडे आमच्या पाल्यांचे, विद्यार्थ्यांचे लक्ष वेधणे हे निश्चितपणे कालच्या म्हणजे आमच्या पिढीचे कर्तव्य आहे, एवढे जरी आम्हाला करता आलं तरी मला वाटतं, ‘आजची तरुण पिढी बिघडली आहे,’ असा कंठशोष न करता ‘आम्ही बिघडलो, तुम्ही बी बिघडाना’ असेच आजच्या तरुण पिढीला आम्ही ताठ मानेने सांगू शकू… आणि स्वातंत्र्यसूर्याचा उषःकाल होता होता, भवताली जी काळरात्र झाली आहे, याची चिंता न वाटता ‘रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल’ असा विश्वास आम्ही देऊ शकू.

    इति अलम्!

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    पुस्तके… ज्ञानाचा अक्षय्य वारसा आणि जीवनाचे दीपस्तंभ

    April 23, 2026 अवांतर

    World Book Day… सर्वांगीण विकासासाठी नियमित वाचन आवश्यक

    April 23, 2026 अवांतर

    नावात तर सर्वकाही आहे, पण सांगायचं कसं?

    April 13, 2026 अवांतर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अवांतर

    पुस्तके… ज्ञानाचा अक्षय्य वारसा आणि जीवनाचे दीपस्तंभ

    By माधवी जोशी माहुलकरApril 23, 2026

    दरवर्षी 23 एप्रिल हा दिवस ‘जागतिक पुस्तक दिन’ (World Book Day) म्हणून साजरा केला जातो.…

    World Book Day… सर्वांगीण विकासासाठी नियमित वाचन आवश्यक

    April 23, 2026

    नावात तर सर्वकाही आहे, पण सांगायचं कसं?

    April 13, 2026

    ब्रँडी… उरल्या फक्त आठवणी!

    April 6, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    आले जल गेले जल झाले जल आरपार…

    April 26, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 26 एप्रिल ते 02 मे 2026

    April 26, 2026

    Dnyaneshwari : सा विस्मितु पाहे कोडें, तंव पुढां होतें चतुर्भुज रूपडें

    April 26, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 26 एप्रिल 2026

    April 26, 2026

    आजची तरुण पिढी…

    April 26, 2026

    एकीकडे जमदग्नी नाना तर, दुसरीकडे आदिनाथ… गौरीसमोर पेच!

    April 25, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 279
    • अवांतर 184
    • आरोग्य 106
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 397
    • फिल्मी 46
    • फूड काॅर्नर 199
    • मैत्रीण 18
    • ललित 580
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    आले जल गेले जल झाले जल आरपार…

    April 26, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 26 एप्रिल ते 02 मे 2026

    April 26, 2026

    Dnyaneshwari : सा विस्मितु पाहे कोडें, तंव पुढां होतें चतुर्भुज रूपडें

    April 26, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    आले जल गेले जल झाले जल आरपार…

    April 26, 2026
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.