Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    पुस्तके… ज्ञानाचा अक्षय्य वारसा आणि जीवनाचे दीपस्तंभ

    April 23, 2026

    World Book Day… सर्वांगीण विकासासाठी नियमित वाचन आवश्यक

    April 23, 2026

    जगायला नेमका किती मेंदू लागतो?

    April 23, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, April 23
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » पुस्तके… ज्ञानाचा अक्षय्य वारसा आणि जीवनाचे दीपस्तंभ
    अवांतर

    पुस्तके… ज्ञानाचा अक्षय्य वारसा आणि जीवनाचे दीपस्तंभ

    माधवी जोशी माहुलकरBy माधवी जोशी माहुलकरApril 23, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, मराठी कथा, मी मराठी, मराठी लेख, अभिजात मराठी, जागतिक पुस्तक दिन, वाचन संस्कृतीचे महत्त्व, पुस्तक ज्ञानरुपी ठेवा, ऐतिहासिक दस्तावेज, पुस्तकांचे स्थान अढळ, पुस्तके म्हणजे अनुभवांचे संचित, पुस्तक मूक मित्र, आयुष्य समृद्ध करणारी पुस्तके, वाचाल तर वाचाल
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दरवर्षी 23 एप्रिल हा दिवस ‘जागतिक पुस्तक दिन’ (World Book Day) म्हणून साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे केवळ पुस्तकांचे वाचन करण्यासाठी नसून, मानवी संस्कृतीतील ज्ञानाचा वारसा जपणाऱ्या लेखकांचा सन्मान करण्याचा आणि वाचन संस्कृती वाढविण्याचा एक सुंदर सोहळा आहे.

    पुस्तके… आपले मूक मित्र

    धावपळीच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात आपण अनेकदा शांतता शोधत असतो. पुस्तक हे अशा वेळी एक उत्तम सोबती ठरते. पुस्तकाच्या पानांत दडलेले शब्द आपल्याला कधी इतिहासाच्या सफरीवर नेतात, तर कधी भविष्यातील विज्ञानाची स्वप्ने दाखवतात. जेव्हा आपण एखादे पुस्तक वाचतो, तेव्हा आपण केवळ अक्षरे वाचत नसून एका वेगळ्या विश्वात प्रवेश करतो. ‘वाचाल तर वाचाल’ – हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश आजही तितकाच प्रभावी आहे.

    हातातील मोबाइल बाजूला ठेवून, पुस्तकाचा तो विशिष्ट सुवास अनुभवत वाचन करण्यात जी मजा आहे, ती कशातच नाही. पुस्तके ही जगातील एकमेव अशी गोष्ट आहे, जी वाटल्याने कधीही कमी होत नाही, उलट ती देणाऱ्याचे आणि घेणाऱ्याचे आयुष्य समृद्ध करतात. वाचन समृद्ध असेल तर, सुशिक्षित आणि सुसंस्कृत समाज घडतो अन् त्यामुळे संपूर्ण देशाची प्रगती होतो. वाचनामुळे व्यक्तिमत्व विकासही अधिक संपन्न होतो. त्यामुळे विविध विचारवंतांची निरनिराळ्या विषयांवरची पुस्तके वाचायलाच हवी.

    आपल्याकडे इतिहासकालीन ‘नालंदा’ विद्यापीठाचा किती समृद्ध वारसा होता? परंतु तो जाळला गेला आणि कितीतरी मोठी तसेच ज्ञानाने संपन्न असलेल्या ऐतिहासिक ग्रंथालयाची कधीही भरून न निघणारी हानी झाली. त्या विद्यापीठामध्ये जगभरातील तत्त्वज्ञानाची, वेदकालीन ग्रंथांची, इतिहासाची पुस्तके संग्रहीत करून ठेवली होती, परंतु आक्रांतांच्या विनाशकारी आक्रमणाने ही ग्रंथसंपदा जळून खाक झाली आणि भारतातील एक समृद्ध संस्कृती लोप पावली.

    हेही वाचा – अमृताहूनी गोड माझी माय मराठी!

    खरं तर, विद्यादानासारखे दान नाही! ज्ञान वाटल्याने ते अजून वाढते, हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. आता एआयच्या (AI) जमान्यात नवीन पिढीला सगळ्या गोष्टी त्वरित हातामध्ये उपलब्ध होत आहेत, परंतु अगदी संक्षिप्त रूपात! एखाद्या विषयाचा मागोवा घ्यायचा असेल तर, त्या विषयाच्या मुळाशी जाऊन त्याचा सखोल अभ्यास करावा लागतो, तरच तो विषय समजून घेणं सोपं होतं. परंतु आजकाल सर्वच गोष्टी त्वरित आणि कमी वेळेत (शॅार्टकटमध्ये) हव्या असल्याने लांबलचक लेखन किंवा जास्त पानांची पुस्तके वाचण्याचा लोक कंटाळा करतात, या गोष्टीची खंत वाटते; परंतु त्याचसोबत पुस्तके वाचणारी मंडळीही आपल्या लेखांमधून, कथा, कादंबऱ्यांमधून सामाजिक तसेच वैज्ञानिक विषयांवर, राजकारणावर लिहित असतात, ज्यामुळे सामान्य माणूस देखील आपसूकच त्या पुस्तकांकडे आकर्षित होतो.

    ज्ञानाची भूक ही नेहमी मोठीचं असावी! ज्ञानरूपी सागर विशाल आणि अथांग आहे. या सागरातील काही ज्ञानाचे कण आपल्याला वेचता आले तर, आपलेचं वैयक्तिक आयुष्य सुचारू आणि समृद्ध होईल, यात शंका नाही! त्यामुळे पुस्तके वाचत रहा आणि पुस्तकासारखा मित्र नेहमी सोबत ठेवा! पुस्तक स्वप्नरंजन आहे, पुस्तक विरंगुळा आहे, पुस्तक दुःखावर फुंकर घालणारा सखा आहे, पुस्तक अडचणीत मार्ग दाखवणारा मार्गदर्शक आहे, पुस्तक गुरू आहे – जे संकटांवर मात करायला शिकवतं, पुस्तकं हसायला शिकवतं तसंच रडायलाही भाग पाडतं… अशा कितीतरी गोष्टी आहेत, ज्या आपल्या जीवनात महत्त्वाच्या असतात, ज्यामुळे त्या आपल्या कायम स्मरणात राहतात. त्या मह्त्त्वाच्या गोष्टींमध्ये पुस्तकांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल!

    हेही वाचा – चाळ नावाचे एकत्र कुटुंब!

    आज आपण ई-बुक्स, ऑडिओ बुक्स आणि सोशल मीडियाच्या जगात वावरत आहोत. माध्यम कोणतेही असो, मुळातील ‘वाचन’ टिकणे गरजेचे आहे. या जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने आपण एक छोटा पण महत्त्वाचा संकल्प करू शकतो :

    1. दिवसातील किमान 15 ते 20 मिनिटे वाचनासाठी राखून ठेवा.
    2. आपल्या मित्र-मैत्रिणींना किंवा मुलांना एखादे आवडीचे पुस्तक आवर्जून भेट द्या.
    3. आपल्या घरातील कपाटात पुस्तकांसाठी एक छोटा कोपरा (Home Library) तयार करा.

    शेवटी इतकेच म्हणावेसे वाटते की, तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले आणि माहितीची साधने कितीही बदलली, तरी पुस्तकांचे स्थान अढळ आहे. पुस्तक हे केवळ कागदावरचे शाईचे ठसे नसून, ते एका पिढीने दुसऱ्या पिढीला सोपवलेले अनुभवांचे संचित आहे. ज्या समाजात वाचन संस्कृती रुजते, तोच समाज वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ होतो.

    ज्याचे घर पुस्तकांनी सजलेले असते, त्याचे मन विचारांनी श्रीमंत असते!

    Avatar photo
    माधवी जोशी माहुलकर

    एम.ए.(इंग्रजी) बी.एड. असून सध्या नागपूरमध्ये स्थायिक आहेत. लग्नाआधी चार वर्षे मेडिकल रीप्रेझेन्टेटिव्ह म्हणून अकोला येथे कार्यरत. तीन वर्षे शिक्षिका. वाचन, प्रवास करणे, वेगवेगळ्या विषयांवर लिखाण तसेच चर्चा करणे, गायन याची आवड. गायनात गंधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण. पती Additional S.P. Anti corruption Bureau Nagpur येथे कार्यरत.

    Related Posts

    World Book Day… सर्वांगीण विकासासाठी नियमित वाचन आवश्यक

    April 23, 2026 अवांतर

    नावात तर सर्वकाही आहे, पण सांगायचं कसं?

    April 13, 2026 अवांतर

    शेवटची महाराणी!

    April 13, 2026 अवांतर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अवांतर

    World Book Day… सर्वांगीण विकासासाठी नियमित वाचन आवश्यक

    By सुधीर करंदीकरApril 23, 2026

    आज 23 एप्रिल… म्हणजे ‘जागतिक पुस्तक दिन’ (World Book Day). युनेस्कोद्वारा (UNESCO) घोषित हा दिवस…

    नावात तर सर्वकाही आहे, पण सांगायचं कसं?

    April 13, 2026

    शेवटची महाराणी!

    April 13, 2026

    ब्रँडी… उरल्या फक्त आठवणी!

    April 6, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    पुस्तके… ज्ञानाचा अक्षय्य वारसा आणि जीवनाचे दीपस्तंभ

    April 23, 2026

    World Book Day… सर्वांगीण विकासासाठी नियमित वाचन आवश्यक

    April 23, 2026

    जगायला नेमका किती मेंदू लागतो?

    April 23, 2026

    Dnyaneshwari : एथ कां पां हा उगला, म्हणोनि कृष्णें जंव पाहिला

    April 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 एप्रिल 2026

    April 23, 2026

    आमची ही नववी फॉरेन टूर, असे पाठक म्हणताच…

    April 22, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 276
    • अवांतर 184
    • आरोग्य 104
    • थर्ड अंपायर 4
    • पंचांग आणि भविष्य 394
    • फिल्मी 45
    • फूड काॅर्नर 198
    • मैत्रीण 18
    • ललित 574
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    पुस्तके… ज्ञानाचा अक्षय्य वारसा आणि जीवनाचे दीपस्तंभ

    April 23, 2026

    World Book Day… सर्वांगीण विकासासाठी नियमित वाचन आवश्यक

    April 23, 2026

    जगायला नेमका किती मेंदू लागतो?

    April 23, 2026
    Most Popular

    पुस्तके… ज्ञानाचा अक्षय्य वारसा आणि जीवनाचे दीपस्तंभ

    April 23, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.