Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Bookshelf : ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ कादंबरीचा आवाका मोठा

    April 21, 2026

    रिटर्न गिफ्ट

    April 21, 2026

    घटस्फोटाची याचिका? नव्हे, अतिअपेक्षांचा मृत्यूलेख!

    April 21, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, April 21
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » रिटर्न गिफ्ट
    ललित

    रिटर्न गिफ्ट

    दिलीप कजगांवकरBy दिलीप कजगांवकरApril 21, 2026No Comments8 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी लेखन,  रिटर्न गिफ्ट, नेहाची साडी खरेदी, राजची साडी खरेदी, नेहाची राजला मदत, राजकडून नेहाला साडी गिफ्ट, राजने नेहाला केले प्रपोज, नेहाच्या वाढदिवशी लग्नाची मागणी, राज नेहा प्रेमकहाणी,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    जवळ जवळ दोन तास नेहा साड्या बघत होती, परंतु आवडलेल्या साड्या तिच्या बजेटमध्ये बसत नव्हत्या आणि बजेटमध्ये बसणाऱ्या साड्या तिला आवडत नव्हत्या. वैतागून सेल्समन म्हणाला. “मॅम, एकतर तुम्ही तुमचे बजेट वाढवा, नाहीतर सिलेक्शन क्रायटेरिया बदलवा.” नेहाला दहा हजार रुपयांची एक साडी खूप आवडली होती, परंतु तिचे बजेट फक्त आठ हजार रुपयांचे होते. “दादा, तुम्ही शेठजींना विचारून पहा ना काही डिस्काऊंट मिळेल का?” नेहाने विनवले.

    त्याचवेळी दुकानात एकटाच आलेला एक रुबाबदार तरुण, सेल्समनला म्हणाला. “मला साडी घ्यायची आहे. कोण दाखवेल?”

    “सर, पाचच मिनिटे थांबा. या मॅमचे झाले की, तुम्हाला साड्या दाखवतो. तुम्ही इथेच बसा.”

    “आमच्याकडे कोणतंही डिस्काऊंट दिलं जात नाही…” शेठजींनी सांगितले. “पण जर तुमचा आज वाढदिवस असेल तर तुम्हाला 10% डिस्काऊंट किंवा तुमच्याकडे एबीसी बँकेचे क्रेडिट कार्ड असेल तर आम्ही तुम्हाला 20% डिस्काऊंट देऊ शकतो.”

    “माझा वाढदिवस पुढच्या रविवारी आहे आणि माझ्याकडे कोणतेही क्रेडिट कार्ड नाही…” म्हणताना नेहा हिरमुसली.

    “मॅम, माझ्याकडे एबीसी बँकेचे क्रेडिट कार्ड आहे. तुम्ही ते वापरा. तुम्हाला 20% डिस्काऊंट मिळेल. म्हणजेच, साडी तुम्हाला हव्या असलेल्या किमतीत मिळेल.” तो तरुण म्हणाला.

    हेही वाचा – सदानंद सर अन् सावित्रीबाईंची स्वप्नपूर्ती!

    “खरंच!” म्हणताना नेहा आनंदली. “सर, मी तुमचे मनापासून आभार मानते.”

    तेव्हा त्या तरुणाने सांगितले, “मॅम, मला एक साडी घ्यायची आहे आणि मला साड्यांमधलं काहीच माहीत नाही. तुमचं सिलेक्शन उत्तम आहे. साडी सिलेक्ट करायला तुम्ही प्लीज मला मदत कराल का?”

    “का नाही… अवश्य करीन…” नेहा म्हणाली.

    “तुम्हाला साडी कोणासाठी घ्यायची आहे.” नेहाने विचारले.

    “रिनूसाठी. म्हणजे रीनासाठी.” तो तरुण म्हणाला.

    “रीना ताई कशा आहेत? म्हणजे त्यांची उंची, रंग वगैरे…”

    “बिलकुल तुमच्यासारखीच उंची, रंग आणि झीरो फिगर. फरक एवढाच. तिचा शोल्डरकट नाही तर, बॉबकट आहे.”

    “सर, तुमचे बजेट किती?” सेल्समनने विचारले.

    “70-75 हजार रुपये,” तो तरुण म्हणाला.

    सेल्समनने मोठ्या आदराने त्या तरुणाकडे बघितले आणि अतिशय आकर्षक साड्या दाखवायला सुरुवात केली. नेहा मन लावून आणि बारकाईने साड्या पाहत होती. अनेक साड्यांपैकी दोन साड्या नेहाने बाजूला काढल्या. दोन्ही साड्या खरोखरच खूप छान होत्या आणि विशेष म्हणजे त्या तरुणाने सांगितलेल्या बजेटमधीलच होत्या!

    “सर, तुम्ही रीना ताईंना व्हीडिओ कॉल करून या दोन साड्या दाखवा आणि त्या पसंत करतील ती साडी घ्या.”

    “नाही, नाही… मला रिनूला सरप्राइज द्यायचे आहे. त्यामुळे व्हीडिओ कॉल करता येणार नाही.”

    “मॅम, मी दोन्हीही साड्या तुमच्या अंगावर कशा दिसतात ते दाखवतो. मग तुम्ही सिलेक्ट करा.” सेल्समन म्हणाला.

    दोन्हीही साड्या नेहावर खूपच खुलून दिसत होत्या.

    “सर, रीना ताईंसाठी ही साडी घ्या,” नेहा म्हणाली.

    “दादा, या दोन्ही साड्या पॅक करा,” तो तरुण म्हणाला.

    “सर, रीना ताईंसाठी या दोन्ही साड्या सारख्याच होतील,” नेहा म्हणाली. “तुम्हाला दोन साड्या घ्यायच्या असतील तर आपण दुसरी साडी घेऊ.”

    “मॅम, एक साडी रिनूसाठी आणि दुसरी माझ्या खास मैत्रिणीसाठी!” तो तरुण नि:संकोचपणे म्हणाला.

    “सर थांबा. मी दोन्ही साड्या व्यवस्थित चेक करून घेते,” नेहा म्हणाली.

    नेहाने पहिली साडी चेक केली आणि म्हणाली. “ही ठीक आहे.” दुसरी साडी चेक करताना नेहा किंचाळली. साडीच्या बॉर्डरवरून वेगाने हात फिरवताना साडीच्या प्राइस टॅगवर नीट न लावलेल्या पिनमुळे नेहाच्या नाजूक बोटाला मोठी दुखापत झाली आणि त्यातून रक्त येऊ लागले. नेहाचे रक्त साड्यांच्या ढिगाऱ्यावर पडणार तेवढ्यात त्या तरुणाने नेहाचा हात हातात घेतला आणि त्यावर खिशातील पांढरा स्वच्छ हातरुमाल दाबून धरला.

    पटकन संकोचून तो म्हणाला, “सॉरी मॅम. मी तुमची परवानगी न घेताच तुमचा हात हातात घेतला.”

    “अहो सर, बरं झालं तुम्ही त्यांचा हात हातात घेतला. नाही तर त्यांच्या हातातील रक्त साड्यांवर पडले असते आणि शेठजींनी मोठी नुकसानभरपाई मागितली असती. प्रत्येक साडी सत्तर-पंच्याहत्तर हजारांच्या घरातील आहे.”

    साड्या घेतल्यावर तो तरुण म्हणाला. “मॅम, मी तुम्हाला घरी सोडतो.”

    संकोचूनच नेहा तयार झाली. आलिशान गाडी चालवताना तो तरुण म्हणाला. “मॅम, आपण आधी क्लिनिकमध्ये जाऊया आणि ड्रेसिंग करून इंजेक्शन घेऊ या.”

    “नको सर. क्लिनिकमध्ये गेलो तर 200-300 रुपये खर्च होतील. आधीच बजेटपेक्षा थोडी महाग साडी घेतली आहे त्यामुळे मला आता खूप काटकसर करायला लागणार आहे.”

    “काय करता तुम्ही?” त्या तरुणाने उत्सुकतेने विचारले.

    “सर, मी एका छोट्या कंपनीत रिसेप्शनिस्ट आहे. महिन्याला 20 हजार रुपये पगार मिळतो. त्यातून घरभाडे, किराणा, ऑफिसला जाण्या-येण्याचा आणि इतर खर्च जाऊन जेमतेम दोन ते तीन हजार रुपये शिल्लक राहतात. मी घरी जाऊन बोटावर हळद लावीन. तेवढेच पैसे वाचतील.”

    “काळजी करू नका मॅम. क्लिनिकला पैसे लागणार नाहीत.”

    “सर, पण माझ्यामुळे तुम्हाला घरी जायला उशीर होईल आणि रीना ताई चिडल्या तर!”

    “चिडायला रीना काही माझी बायको नाही. मावस बहीण आहे,” सरांनी स्पष्टीकरण दिले.

    “ज्या मैत्रिणीसाठी तुम्ही इतकी महाग साडी घेतली, ती तुमची खूप जवळची मैत्रीण असणार. त्याही रीना ताईंसारख्याच सुंदर आहेत का? काय करतात त्या? इथेच असतात का?” नेहाच्या प्रश्नांना कोणतेही उत्तर मिळाले नाही.

    “आपण इतका वेळ बोलतोय, परंतु आपल्याला एकमेकांचे नाव देखील माहीत नाही,” सर म्हणाले.

    “मी राज.”

    “मी नेहा.”

    “सर, तुम्ही काय करता,” नेहाने विचारले.

    तेव्हढ्यात गाडी थांबवत सर म्हणाले, “क्लिनिक आलेच.”

    क्लिनिकवर बोर्ड होता… ‘डॉक्टर राज M. D. जनरल प्रॅक्टिशनर’

    राजने हळूवारपणे ड्रेसिंग करून इंजेक्शन दिले.

    “उद्या सकाळी परत ड्रेसिंग करू या. नो फी…” राज म्हणाला.

    नेहा संकोचली. राजने नेहाला घरी सोडले. साडी कपाटात ठेवताना नेहाच्या लक्षात आले की, तिने साडीचे पैसे राजला दिलेच नव्हते.

    सकाळी नेहा क्लिनिकला लवकरच पोहोचली. पैसे देण्याच्या घाईबरोबरच कसली तरी ओढही होती… राजने ड्रेसिंग केले, पण नाराजीनेच साडीचे पैसे घेतले.

    “नेहा, पुढच्या रविवारी संध्याकाळी मी एक छोटीशी पार्टी देणार आहे. तू जर फ्री असशील तर येशील का?… माफ करा नेहा मॅम. मला ‘तू’ नाही ‘तुम्ही’ म्हणायचे होते.”

    “सर, मला अहो जाहो आवडत नाही. तुम्ही मला ‘तू’च म्हणा आणि जरूर येईन मी,” नेहा म्हणाली.

    संध्याकाळी ऑफिसमधून येताना बस सिग्नलला थांबली असताना बाजूलाच राजची कार येऊन थांबली. “बाय राज,” म्हणत एक खूप सुंदर तरुणीला गाडीतून बाहेर पडताना नेहाने बघितले. नेहाच्या मनात आले. कदाचित ती राजची बहीण रीना असेल का? नाही, नक्कीच नाही. रीनाचा बॉबकट असल्याचे राजने सांगितले होते आणि हिचे केस तर लांब आहेत. राजची ती खास मैत्रीण तर नसेल ना!

    एक मात्र नक्की. नेहाच्या मनात राजने विशेष स्थान निर्माण केले होते.

    नेहाच्या ऑफिसच्या सहकाऱ्यांनी रविवारी संध्याकाळी एकत्र मुव्ही बघायचे ठरविले. अनवधानाने नेहाने येण्याचे मान्य केले. राजबरोबर जायचे की, मुव्हीला जायचे? नेहाच्या मनात द्वंद्व सुरू झाले. मुव्हीला गेले नाही तर, अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागेल. राजबरोबर जायचे नसेल तर, त्याला कळविणार तरी कसे? त्याचा नंबरही नव्हता नेहाकडे.

    नेहाला उत्तर सापडले. ऑफिसच्या सहकाऱ्यांना अर्धसत्य सांगायचे. ‘डॉक्टरांबरोबर जायचे’ ऐवजी ‘डॉक्टरांकडे जायचे’ सांगायचे.

    रविवारी ठरल्यावेळी नेहा तयार होती. मागच्या आठवड्यात घेतलेल्या साडीवर नेहा खूपच सुंदर दिसत होती. राज अगदी वेळेवर आला. गाडीत बसल्यावर नेहाने मैत्रिणीला डॉक्टरांबरोबर ऐवजी डॉक्टरांकडे जाते सांगून स्वतःची सुटका करून घेतली. नेहाने सांगितलेल्या अर्धसत्यावर दोघेही खळखळून हसले.

    कारमधील रेडिओ एक गाजलेले गीत ऐकवत होता.

    भेट तुझी ती काल परवाची
    पाया बनली मम जीवनाची
    भीड मुरडली उभ्या जगाची
    दिशा गवसली मला उद्याची

    राजने नेहाकडे पाहिले. ती कुठेतरी हरवली होती…

    राजच्या आलिशान गाडीने लवकरच मध्यवस्ती सोडली आणि गाडी एका आलिशान फाइवस्टार हॉटेलपाशी येऊन थांबली.

    राजने बुक केलेल्या प्रशस्त सूटमध्ये ते गेले. राजने दोघांसाठी कॉफी मागवली. कॉफी आणणाऱ्या मुलाच्या कानात राज काहीतरी कुजबुजला. हे नेहाच्या चाणाक्ष नजरेतून सुटले नाही.

    गप्पा मारता मारता कॉफी संपली.

    “राज सर, अजून कोणीच आले नाही. कोण कोण येणार आहेत पार्टीला? काय वेळ दिली आहे तुम्ही त्यांना? रीना ताई येणार आहे का? आणि तुमची ती खास मैत्रीण पण येणार आहे का?” नेहाने विचारले.

    “कोणीही येणार नाही. फक्त आपण दोघेच,” राज म्हणाला.

    तेवढ्यात लाइट गेले…

    “सर, आपण बाहेर रिसेप्शनमध्ये जाऊन बसूया.” नेहा म्हणाली.

    “लाइट इतक्यात येतीलच. मोठ्या हॉटेल्समध्ये जनरेटर असतो…” राज म्हणाला.

    “नेहा, चल आपण आत जाऊया…” तिचा हात घट्ट पकडत राज म्हणाला.

    “आत कुठे?” घाबरलेल्या नेहाने विचारले.

    “तुझ्यासाठी छान सजवलेल्या बेडरूममध्ये…” राज म्हणाला.

    “नको नको…” नेहा ओरडून म्हणाली.

    नेहा विरोध करत होती, तरीही राजने जवळ जवळ ओढतच तिला बेडरूममध्ये नेले. नेहा खूप घाबरली होती. थरथरत होती. तिच्या तोंडातून एक शब्दही बाहेर पडत नव्हता… सगळे काही अनपेक्षित होते. राजवर नको तेवढा विश्वास टाकून, ऑफिसातील मैत्रिणीला अर्धसत्य सांगून ती राजबरोबर आली होती.

    तेवढ्यात लाइट आले.

    बेडरूम खरोखरच खूप छान सजवली होती. प्रशस्त वातानुकूलित रूम, भिंतींवर मोहक गुलाबी रंग, छानसे ड्रेसिंग टेबल, मंद प्रकाश देणारे रंगीबेरंगी दिवे, हलकेसे संगीत, पांढरा स्वच्छ सोफा, किंग साइज बेड, गुबगुबीत उशा आणि जाडजूड ब्लँकेट…

    “सर, खूप व्यवस्थित प्लॅन करून फसवलेत मला. वाटलं नव्हतं, तुम्ही इतके नीच असाल म्हणून,” नेहा ओरडून म्हणाली.

    हेही वाचा – म्हातारा-म्हातारी आणि मृत्यूपत्र!

    नेहाच्या ओरडण्याकडे दुर्लक्ष करत राजने पडद्यामागून काचेचा टीपॉय ओढला.

    टीपॉयवर होता ‘हॅपी बर्थडे नेहा’ असे लिहिलेला छानसा केक…

    इतकी कल्पकता आणि प्लॅनिंग! नेहा अवाक झाली. राजबद्दल करून घेतलेल्या गैरसमजातून त्याला “नीच” म्हटल्यामुळे नेहा मनोमनी शरमली.

    “सर, प्लीज माफ करा मला.” नेहा ओशाळून म्हणाली.

    नेहाचे पाणावलेले डोळे राजने रुमालाने पुसले.

    “सर, रागावलात?”

    “छे छे. मुळीच नाही. पुढे मागे लग्न करणार, तेव्हा असे खोचक बोलणे ऐकायची सवय करावीच लागणार…” राज म्हणाला.

    “सर, तुमच्या त्या खास मैत्रिणीला भेटण्याची उत्सुकता आहे मला. कधी भेटवाल?”

    “लवकरच…” राज म्हणाला.

    नेहाच्या खांद्यांवर थोपटत राज म्हणाला. “कम ऑन नेहा. आता केक कापूया का?”

    नेहाने केक कापला. प्रथम राजने नेहाला आणि नंतर नेहाने राजला केक भरवला.

    राजने दिलेला गिफ्ट बॉक्स उघडून नेहा ओरडली, “सर, काही तरी चूक झाली. ही तुमच्या खास मैत्रिणीसाठी घेतलेली साडी तुम्ही मला देताय.”

    “खरंय नेहा. ती मैत्रीण आता मैत्रीण राहिली नाही, तिला कोणीतरी मागणी घालणार आहे…”

    “पण सर, तिचेही तुमच्यावर प्रेम असेल ना?”

    “नेहा, तेच तर माहीत नाही मला.”

    “सर, बी क्विक. विचारा तिला. वेळ वाया घालवू नका. नंतर आयुष्यभर पश्चात्ताप करावा लागेल.”

    राजने नेहाचा हात हातात घेत विचारले, “देशील का ‘हा हात’ मला कायमचा? होशील का माझी? …आणि हो, तूच ती माझी खास मैत्रीण. पहिल्या भेटीतच आवडलेली. तुझ्या पसंतीची ही साडी मी तुझ्यासाठीच घेतली. काय सुंदर दिसत होतीस तू या साडीत. हा बघ. याच साडीतील तुझा फोटो. तुला न विचारता काढलेला!”

    नेहा नि:शब्द होती. पण तिच्या आनंदाश्रूंनी दिलेले उत्तर हेच राजला मिळालेले “रिटर्न गिफ्ट” होते.

    राज गुणगुणत होता…

    भेट तुझी ती काल परवाची
    पाया बनली मम जीवनाची
    भीड मुरडली उभ्या जगाची
    दिशा गवसली मला उद्याची

    “राज अरे, दिशा उद्याची नाही तर उभ्या आयुष्याची गवसली…” प्रथमच सरांना “अरे राज” संबोधत नेहाने रिटर्न गिफ्टची गोडी अजूनच वाढविली होती.

    Avatar photo
    दिलीप कजगांवकर

    तंत्रज्ञान क्षेत्रातील चार दशकांचा अनुभव आणि साहित्यविश्वातील संवेदनशील लेखन यांचा सुरेख संगम. शिक्षणाने बी.ई., एम.बी.ए. आणि कॉस्ट अकाऊंटंट असलेले दिलीप कजगांवकर हे सर्टिफाइड प्रोजेक्ट मॅनेजर, सर्टिफाइड क्वालिटी मॅनेजर आणि सिक्स सिग्मा ब्लॅक बेल्ट आहेत. इंजिनिअरिंग व इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रात त्यांना सुमारे 40 वर्षांचा समृद्ध व्यावसायिक अनुभव आहे. ग्रीव्ह्ज, महाराष्ट्र स्कूटर्स, पथेजा ग्रुप, झेन्सार, हेक्सावेअर, कॅपजेमिनी, इन्फ्रासॉफ्ट व टेस्टिंगएक्स्पर्ट यासारख्या नावाजलेल्या कंपन्यांमध्ये त्यांनी विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. लेखन, कथाकथन आणि कवितेची त्यांना विशेष आवड आहे. 2012 साली प्रकाशित झालेला “वाचावेसे” हा त्यांचा काव्यसंग्रह रसिक वाचकांच्या विशेष पसंतीस उतरला. त्यांच्या कथा आणि कविता विविध वृत्तपत्रे आणि मासिकांत नियमितपणे प्रसिद्ध होत असतात. त्यांच्या लेखनात माणूस, नातेसंबंध आणि जीवनातील सूक्ष्म भावविश्व यांचे प्रामाणिक दर्शन घडते. गेली अनेक वर्षे विविध दिवाळी अंकांत त्यांच्या कथा प्रकाशित होत आहेत. तसेच, गेली दोन वर्षे दर मंगळवारी व शुक्रवारी “विश्वास रेडिओ” (नाशिक) तसेच आकाशवाणी पुणे आणि जळगाव येथून त्यांच्या कथा प्रसारित होत आहेत. विविध संस्थांकडून त्यांना “महाराष्ट्र भूषण”, “साहित्य रत्न” यासारख्या मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ते विविध कार्यक्रमांत 30 मिनिटांपासून 2 तासांपर्यंत आपल्या कथांचे प्रभावी कथाकथन करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतात. त्यांनी स्वतः कथन केलेल्या तसेच दत्ता सरदेशमुख, सचिन दातार, मुकुंद जोशी, डॉ. सुचिता पाटील, डॉ. जयश्री अय्यंगार, विनया देशपांडे आणि अर्चना कापरे यांसारख्या दिग्गजांनी सादर केलेल्या त्यांच्या अनेक कथा युट्यूबवर उपलब्ध आहेत. आपल्या साहित्यिक प्रवासात दादर येथील जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूशनचे माजी संचालक, डोंबिवली स्थित आदरणीय व्ही. एस. वाणी सर यांच्या लाभलेल्या मौल्यवान मार्गदर्शनाचा ते आवर्जून उल्लेख करतात.

    Related Posts

    Bookshelf : ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ कादंबरीचा आवाका मोठा

    April 21, 2026 ललित

    घटस्फोटाची याचिका? नव्हे, अतिअपेक्षांचा मृत्यूलेख!

    April 21, 2026 ललित

    काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली

    April 21, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    Bookshelf : ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ कादंबरीचा आवाका मोठा

    By डॉ. अस्मिता हवालदारApril 21, 2026

    भाग – 1 ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक भालचंद्र नेमाडेंची पहिली कादंबरी कोसला लोकप्रिय आहे. ‘हिंदू…

    घटस्फोटाची याचिका? नव्हे, अतिअपेक्षांचा मृत्यूलेख!

    April 21, 2026

    काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली

    April 21, 2026

    …अन् संदीपने स्वतःचा स्वाभिमान वाचवला!

    April 20, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Bookshelf : ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ कादंबरीचा आवाका मोठा

    April 21, 2026

    रिटर्न गिफ्ट

    April 21, 2026

    घटस्फोटाची याचिका? नव्हे, अतिअपेक्षांचा मृत्यूलेख!

    April 21, 2026

    काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली

    April 21, 2026

    Dnyaneshwari : अर्जुना तुवां एक दावा म्हणितलें, आणि तेंचि दावूं तरी काय दाविलें

    April 21, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 21 एप्रिल 2026

    April 21, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 274
    • अवांतर 182
    • आरोग्य 103
    • थर्ड अंपायर 4
    • पंचांग आणि भविष्य 392
    • फिल्मी 45
    • फूड काॅर्नर 197
    • मैत्रीण 18
    • ललित 571
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Bookshelf : ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ कादंबरीचा आवाका मोठा

    April 21, 2026

    रिटर्न गिफ्ट

    April 21, 2026

    घटस्फोटाची याचिका? नव्हे, अतिअपेक्षांचा मृत्यूलेख!

    April 21, 2026
    Most Popular

    Bookshelf : ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ कादंबरीचा आवाका मोठा

    April 21, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.