Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Recipe : विदर्भ स्पेशल उकडपेंडी अथवा उकरपेंडी!

    April 5, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 05 ते 11 एप्रिल 2026

    April 5, 2026

    Dnyaneshwari : जेणें देवांचा मानु गिंवसिला, धर्मासि जीर्णोद्धार केला…

    April 5, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, April 5
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 05 एप्रिल 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 05 एप्रिल 2026

    Team AvaantarBy Team AvaantarApril 5, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 05 एप्रिल 2026; वार : रविवार
    • भारतीय सौर : 15 चैत्र शके 1948; तिथि : तृतीया 11:59; नक्षत्र : विशाखा 24:07;
    • योग : वज्र 14:43; करण : बव 25:02;
    • सूर्य : मीन; चंद्र : तुळ 17:27; सूर्योदय : 06:31; सूर्यास्त : 18:52;
    • पक्ष : कृष्ण; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128.

    संकष्ट चतुर्थी, चंद्रोदय 09:47

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    विदुषी पंडिता रमाबाई

    टीम अवांतर

    परित्यक्त्या, पतिता आणि विधवांच्या-सर्वांगीण उद्धाराकरिता समर्पित भावनेने कार्यरत राहिलेल्ज्ञा विदुषी पंडिता रमाबाई यांचा जन्म 23 एप्रिल 1858 रोजी म्हैसूर संस्थानातील (कर्नाटक राज्य) मंगलोरनजीक गंगामूळ नावाच्या डोंगरावरील वस्तीत झाला. वडील अनंतशास्त्री हे स्त्री शिक्षणाबद्दल आग्रही असल्याने पत्नी लक्ष्मीबाई आणि मुलगी रमाबाई या दोघींनाही त्यांनी वेदादींचे शिक्षण दिले. रमाबाईंना आईकडून, संस्कृत व्याकरण आणि साहित्याचे शिक्षण मिळाले.

    रमाबाईंनी संस्कृतमध्ये प्रावीण्य मिळविले होतेच; पण मराठी, हिंदी, बंगाली आणि कन्नड भाषाही त्या अस्खलितपणे बोलू शकत होत्या. त्याचबरोबर त्यांना गुजराती, तुळू आणि हिब्रू या भाषाही अवगत होत्या. 1878 साली त्यांचे बंधू श्रीनिवासशास्त्री यांच्यासह प्रवास करीत त्या कलकत्त्याला आल्या. तेथे मात्र त्यांच्या विद्वत्तेचा आणि बुद्धिमत्तेचा उचित गौरव झाला. कलकत्त्याच्या सिनेट हॉलमध्ये त्यांना ‘पंडिता’ तसेच ‘सरस्वती’ या बिरुदावली बहाल करण्यात आली. ‘पंडिता’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या रमाबाई या एकमेव महिला होत. बंगाली स्त्रियांनीही त्यांना ‘भारतवर्षीय स्त्रियांचे भूषण’ म्हणून मानपत्र दिले.

    हेही वाचा – सूर्यनमस्कार अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    बालविवाह, पुनर्विवाहास बंदी इत्यादी घातक चालीरीती आणि अन्य दुष्ट रूढी यांतून समाजास मुक्त करण्याच्या उद्देशाने त्यांनी 1882 मध्ये प्रथम पुणे येथे आणि नंतर अहमदनगर, सोलापूर, ठाणे, मुंबई, पंढरपूर, बार्शी इत्यादी ठिकाणी ‘आर्य महिला समाजा’ची स्थापना केली. त्यामार्फत त्यांनी पुरोगामी विचाराची पेरणी सुरू केली. त्यांनी याच वर्षी स्त्रियांसंदर्भातील स्त्रीधर्मनीति नामक पुस्तक लिहिले. मे 1883 मध्ये स्त्रियांच्या उद्धाराकरिता अधिक प्रभावी कार्य करता यावे म्हणून इंग्रजी भाषा तसेच वैद्यक या विषयांच्या शिक्षणाकरिता त्या कन्या मनोरमेसह इंग्लंडला गेल्या.

    हिंदू बालविधवांच्या प्रश्नाचा ऊहापोह करणारे द हायकास्ट हिंदू वूमन हे इंग्रजी पुस्तक त्यांनी लिहिले. स्त्रियांच्या शोषणाच्या मुळाशी असलेल्या पुरुषप्रधान व्यवस्थेची कठोर चिकित्सा रमाबाईंनी त्यांच्या या पुस्तकात केली आहे. एवढेच नव्हे, तर त्या काळातील संपूर्ण देशातील आणि त्यातही महाराष्ट्रातील भौतिक, वैचारिक तसेच सांस्कृतिक व्यवहार ज्या पुरुषप्रधानतेच्या पायावर उभे होते, त्या पुरुषप्रधानतेचे सखोल विश्लेषण, चिकित्सा रमाबाईंच्या या ग्रंथात अभ्यासण्यास मिळते.

    मुंबईत परत आल्यावर त्यांनी विधवांकरिता ‘शारदा सदन’ नावाची संस्था काढली. पुढे केडगाव येथे त्यांनी मुक्तिसदनची उभारणी केली. त्यांनी आश्रमातील स्त्रियांना शेती, विणकाम, मुद्रणकाम इत्यादी कामे शिकविली. ‘मुक्तिसदना’त धान्य, भाजीपाला, फळफळावळ यांचे मुलींच्या साह्याने उत्पन्न काढण्यात येई. दुर्बल व आजारी लोकांकरिता ‘सायं घरकुला’ची व्यवस्था त्यांनी केली. 1919 मध्ये रमाबाईंना त्यांच्या या समाजकार्याबद्दल ‘कैसर-ई-हिंद’ हे सुवर्ण पदक देण्यात आले.

    हेही वाचा – युवराजने मागितली धोनी, कपिल देव यांची माफी; नेमकं काय घडलं?

    महाराष्ट्रात नऊवारी ऐवजी पाचवारी साडी नेसण्यास महिलांनी सुरुवात करण्यामागे पंडिता रमाबाई यांचे प्रयत्न होते. हा फक्त कपड्यापुरता मुद्दा नव्हता, तर स्त्री स्वातंत्र्य आणि स्वनिर्णयाचा हक्क हे मुद्दे महत्त्वाचे होते. दुसऱ्यांकरिता अविरत कष्ट करणाऱ्या या समाजसेविकेचे व्यक्तिगत जीवन मात्र फार दुःखी होते. खंबीर साथ देणारे आई-वडील एकामागोमाग एक गेले, नंतर भक्कम साथ देणाऱ्या मोठ्या भावाचेही निधन झाले. लग्नानंतर अवघ्या दोन वर्षांत त्यांच्या पदरी एक मुलगी टाकून पती स्वर्गवासी झाले. पुढे एकुलत्या एका मुलीच्या मृत्यूचा धक्काही त्यांना पचवावा लागला. 5 एप्रिल 1922 रोजी रमाबाईंचे केडगाव येथेच निधन झाले.


    विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,

    IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c

    या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    साप्ताहिक राशीभविष्य : 05 ते 11 एप्रिल 2026

    April 5, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 04 एप्रिल 2026

    April 4, 2026 पंचांग आणि भविष्य

    Kitchen Tips : दालफ्राय, व्हेज पुलाव, मेथीच्या दाण्याची आमटी करताना…

    April 3, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    साप्ताहिक राशीभविष्य : 05 ते 11 एप्रिल 2026

    By प्राजक्ता काथेApril 5, 2026

    मेष या आठवड्यात सरकारी कामे विनासायास पूर्ण होतील. नोकरदारांसाठी कामाच्या ठिकाणी वातावरण साधारण राहील. तथापि,…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 04 एप्रिल 2026

    April 4, 2026

    Kitchen Tips : दालफ्राय, व्हेज पुलाव, मेथीच्या दाण्याची आमटी करताना…

    April 3, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 03 एप्रिल 2026

    April 3, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    Latest From Avaantar

    Recipe : विदर्भ स्पेशल उकडपेंडी अथवा उकरपेंडी!

    April 5, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 05 ते 11 एप्रिल 2026

    April 5, 2026

    Dnyaneshwari : जेणें देवांचा मानु गिंवसिला, धर्मासि जीर्णोद्धार केला…

    April 5, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 05 एप्रिल 2026

    April 5, 2026

    युवराजने मागितली धोनी, कपिल देव यांची माफी; नेमकं काय घडलं?

    April 4, 2026

    सूर्यनमस्कार अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    April 4, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 258
    • अवांतर 180
    • आरोग्य 97
    • पंचांग आणि भविष्य 375
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 191
    • मैत्रीण 17
    • ललित 533
    • शैक्षणिक 75

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Recipe : विदर्भ स्पेशल उकडपेंडी अथवा उकरपेंडी!

    April 5, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 05 ते 11 एप्रिल 2026

    April 5, 2026

    Dnyaneshwari : जेणें देवांचा मानु गिंवसिला, धर्मासि जीर्णोद्धार केला…

    April 5, 2026
    Most Popular

    Recipe : विदर्भ स्पेशल उकडपेंडी अथवा उकरपेंडी!

    April 5, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.