Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    त्याच्या आठवणींची खोल दरी…

    March 26, 2026

    Recipe : स्वादिष्ट बहुरंगी खीर अन् खीरमोहन

    March 26, 2026

    रामनवमी विशेष… कौसल्येचा राम!

    March 26, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, March 27
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » त्याच्या आठवणींची खोल दरी…
    ललित

    त्याच्या आठवणींची खोल दरी…

    स्नेहा सुतारBy स्नेहा सुतारMarch 26, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी साहित्य, मराठी आर्टिकल, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी कथा, मराठी लेख, मराठी लेखक, प्रियकराची आठवण, प्रियकराचे विस्मरण, प्रियकराकडून अपेक्षाभंग, प्रियकराच्या फोनची प्रतीक्षा, ती आणि तो, प्रेमकथा, गोव्याची प्रेमकथा, प्रियकराची बेपर्वाई
    फोटो सौजन्य - चॅट जीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    भाग – 7

    आईने हाक मारली तशी ती भानावर आली. वाचत असलेल्या पुस्तकातली नायक, नायिका आज भेटणार होते. कॉफी शॉपमध्ये… नायिकेची तयारी चाललेली. पुन्हा आईची हाक ऐकू आली. तिने पुस्तक बंद करून ठेवलं. त्या आधी पान क्रमांक लक्षात ठेवला. एकवार पुस्तकाच्या मुखपृष्ठावरून तिने हात फिरवला. Too good to be true – प्राजक्ता कोळी. या पुस्तकाचं मुखपृष्ठ तिला खूप आवडलेलं. पुन्हा आता आईची निर्वाणीची हाक ऐकू आली म्हणून ती लवकर उठून गेलीच नाहीतर, मग ओरडा ठरलेलाच.

    आईने किचनमध्ये ताटं मांडायला घेतलेली. तीही मदतीला लागली. जेवणं होऊन तिने भांडी घासायला घेतली. आईने किचन आवरायला घेतलं. सगळं आवरून थोडावेळ सगळे बोलत बसले. आन्टीकडली मिठाई पण डेझर्ट म्हणून सर्वांनी संपवली. टीव्हीवर  कसलीतरी सीरियल चालू होती. तिला काही त्यात इंटरेस्ट नव्हता… “मी जाते गं जरा, वाचत बसते.” तिने आईला म्हटलं आणि ती तिच्या रूममध्ये आली.

    खिडकीत बसून तिने मोबाइल हातात घेतला. बॅटरी फुल झालेली… म्हणे, दहा मिनिटांत कॉल करतो! दोन तीन तास उलटलेत त्यानंतर. या माणसाला खरंच माझ्याबद्दल काहीच वाटत नसेल? इतकं कोरडं सगळं? नक्की काय आहे हा माणूस? एक क्षण पण आठवलं नसेल याला, की मी पण याच्या आयुष्यात आहे? काय रे असा!!?? माझी तळमळ तुझ्यापर्यंत पोहोचत नाहीये? म्हणतात ना की, मनापासून आठवण काढली तर, त्या माणसाला ते जाणवतं. मग तुला काहीच कसं जाणवत नाही? तुला माहिताय, मी कित्येकदा हाका मारत राहते तुला मनातल्या मनात… ओरडून ओरडून! कुठेतरी माझ्या हाका, माझे waves तुझ्यापर्यंत पोहोचतील. हा वारा, हे आकाश, ही जमीन… सर्वांना सांगते मी… जे जे तुझ्यापर्यंत पोहोचू शकतील. माझी तळमळ त्याच्यापर्यंत पोहोचवा. काहीच उपयोग होत नाही रे, कशाचा! ना मी कुणाला हे सांगू शकत, ना कुणाला तुझ्यापर्यंत पोहोचवू शकत. ना कुठल्या माणसाला, ना या दुव्यांना… तुझ्यापर्यंत पोहोचू तरी कशी? हे सगळं विश्वच माझ्याविरुद्ध उभं ठाकलंय जणू! आणि महत्त्वाचं म्हणजे, हे सगळं आटूनही जात नाहीये. ही वाटणारी ओढ, हे प्रेम… हे जे काही वाटतंय ना तुझ्याविषयी, हे कमीच होत नाहीये. संपून जावं ना सगळं… असे कितीतरी माणसं फाट्यावर मारून जगतात सगळं. तुझंच घे ना! हेच तर तू वागतोस. फाट्यावर मारतोयस! मला, माझ्या प्रेमाला, माझ्या तळमळीला, माझ्या या भावनांना… असा कसा वागू शकतोस? मला का नाही जमत आहे हे? का नाही?

    हेही वाचा – घरी येताना आठवली लीला अन् पूजाची कहाणी!

    तिने डोकं गच्च पकडलं. काहीच कळेना झालं काय करावं. फेसबुक उघडून तिने बघितलं. तो ऑनलाइन होता. दोन-चार कुठले कुठले पोस्ट पण शेअर केलेले होते. पोस्ट उघडून बघायला, शेअर करायला जेवढा वेळ लागत असेल, तेवढा पण वेळ नसेल याच्याकडे माझ्यासाठी? किंवा माझी आठवणच नसेल याला? बरं, आपण एखाद्याला प्रेमाची कबुली देतो, त्याला आपण एवढ्या लवकर विसरून जावं, असं एकाएकी? अचानक? कसं काय होऊ शकतं… प्रेम म्हणजे अत्तर. दरवळत राहतं आपल्यात. एवढं कोरडं असू शकतं ते? एवढं??? मग तो म्हणतो तू लहान पोरांसारखी काय वागतेस? Mature नाही वागत तू… म्हणजे आपण ज्याच्यावर इतका आपला जीव ओवाळून प्रेम करतो त्याला आठवणं, त्याची काळजी करणं, त्याच्याशी चार शब्द बोलणं म्हणजे पोरकटपणा? त्याचे भावनिक काहीच बंध नाही उरत? आणि मित्र मित्र होतो तोवर तू असा दगड होतास ते ठीक. आता तर तसं नव्हतं ना… त्यापलीकडे होतं हे. मी तर मोकळी झालेलेच सगळं मनातलं सांगून; आता तू ही झालेलास ना रे? ते काय होतं?

    एकाएकी तिला खूप रडू आलं. वेळ जात राहिली. बेडरूमबाहेरच्या एकेक लाइट्स बंद होऊ लागल्या. खिडकीबाहेर रस्त्यावरची रहदारी मंदावू लागली. रस्त्यावरचे दिवे तेवढे मी मी म्हणून काळोखावर राज्य करू लागले. ती उठली आणि तिने खिडकीचा पडदा बंद करून घेतला आणि ती बेडवर आली. जवळच्या इअरफोनचे बड्स तिने कानात घातले आणि सलीलची प्लेलिस्ट ऑन केली. कितीतरी वेळ तिला झोपच आली नाही. कूस बदलत गेली, कितीतरी उसासे झाले, कधी उशीवर सरीही येऊन गेल्या…

    हेही वाचा – त्याचा फोन अन् तेच नेहमीचंच

    बेडच्या बाजूचा मंद नाइट लॅम्प सगळ्याच गोष्टींच्या सावल्या भिंतीवर पाडत होता. तिने त्यात आपल्या बोटांच्या सावल्यांची भर घातली. तिने बोटांचं पाखरू केलं, हरणं केली. भिंतीवर पण पाखरू, हरणं नाचू लागली. पाखराला तिने हळूच कानात सांगितलं, “जा… त्याला माझी आठवण करून दे…” पाखरू गेलं… उंच आकाशात… कधीच कवेत न येणाऱ्या आकाशाने त्याला हलकेच कवेत घेतलं. आकाशाचा रंग गडद निळा होत गेला… पाखरू त्यात दिसेनासं झालं. कुठे गेलं असेल? पोहोचलं का त्याच्याकडे? त्याने सांगितलं का कानात त्याच्या? आठवण झाली का त्याला माझी?? का विसरतो मला तू… का आठवत नाही मी तुला? कुठल्यातरी उंच टेकडीवर गेली ती. त्या पाखराला शोधायला. हात उंचावून काळाकुट्ट ढग शालीसारखा पांघरू शकेल एवढ्या उंच टेकडीवर. तिथे तिने त्याला शोधलं… निरोप घेऊन गेलेल्या पाखराला शोधलं… दोघंही दिसत नव्हती, सापडत नव्हती… तिने खूप शोधलं… शोधत राहिली वेड्यासारखी. आता त्या टेकडीची वाटही निमूळती होत चाललेली. अगदी माडाच्या खोडावर चालल्यासारखी निमूळती. वरचं निळं अजून गडद होत होतं… सलीलचे सूर कानावर पडत होते –

    तिमिराचे नाही भय, नाही अडवत नदी
    काट्यावर पडे पाय जशी काही फुलघडी
    मोरपंखी रानातली तुला बोलविता सय
    सखे कसे सांग तुला अगदीच नाही भय…

    ती चालत राहिली शून्यात… त्याला शोधत…. इतक्यात रस्ता संपला… उंच टेकडीचं उंच टोक… त्या टोकावर ती बघत राहिली त्या निळ्याकडे… पाखरू… तो… कुणीच दिसलं नाही कुठेच… आणि एवढ्यात तिचा पाय सरकला… पायाखालचे दगड गडबडून घरंगळत गेले… तिचा तोल गेला… आणि ती खोल दरीत कोसळणार इतक्यात…

    दचकून तिला जाग आली!!! ती उठली… भानावर आली. हे पुन्हा एक स्वप्न होतं… कानात इअरफोनवर गाणं चालू होतं…

    सखे कसे सांग तुला अगदीच नाही भय
    सखे कसे सांग तुला अगदीच नाही भय
    आड वेळ, आड वाट, आड रान, आड वय
    सखे कसे सांग तुला अगदीच नाही भय

    क्रमश:

    स्नेहा सुतार

    Related Posts

    नीरजचा निर्णय ऐकून राजेश अन् जयूला धक्काच बसला!

    March 26, 2026 ललित

    …अन् यमुनाकाकीच्या लक्षात आले, ‘शेवटी आहे कोण?’

    March 25, 2026 ललित

    आयुष्यात संवादाचा सेतू खूपच महत्त्वाचा, अन्यथा…

    March 25, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    नीरजचा निर्णय ऐकून राजेश अन् जयूला धक्काच बसला!

    By दीपक तांबोळीMarch 26, 2026

    भाग – 1 “मग काय ठरलं तुझं? कोणत्या फँकल्टीला घेतोय अँडमिशन?” घरात आल्या आल्या राजेशने…

    …अन् यमुनाकाकीच्या लक्षात आले, ‘शेवटी आहे कोण?’

    March 25, 2026

    आयुष्यात संवादाचा सेतू खूपच महत्त्वाचा, अन्यथा…

    March 25, 2026

    मार्था मेसन… अजिंक्य मी, अभेद्य मी!

    March 25, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    त्याच्या आठवणींची खोल दरी…

    March 26, 2026

    Recipe : स्वादिष्ट बहुरंगी खीर अन् खीरमोहन

    March 26, 2026

    रामनवमी विशेष… कौसल्येचा राम!

    March 26, 2026

    Dnyaneshwari : पैं गा भक्तासि माझें कोड….

    March 26, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 26 मार्च 2026

    March 26, 2026

    नीरजचा निर्णय ऐकून राजेश अन् जयूला धक्काच बसला!

    March 26, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 248
    • अवांतर 175
    • आरोग्य 91
    • पंचांग आणि भविष्य 362
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 186
    • मैत्रीण 17
    • ललित 514
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn