Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » साप्ताहिक राशीभविष्य : 22 ते 28 मार्च 2026
    वास्तू आणि वेध

    साप्ताहिक राशीभविष्य : 22 ते 28 मार्च 2026

    प्राजक्ता काथेBy प्राजक्ता काथेMarch 22, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठी साहित्य, मराठीलेखक, मराठीआर्टिकल, मराठीस्टोरी, राशीभविष्य, बाराराशी, राशीफळ, राशीअंदाज, Weekly horoscope, horoscope, राशी,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    मेष

    या आठवड्यात जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. नोकरदारांची आर्थिक स्थिती उत्तम राहील. मौज-मजा आणि घर सजावटीवर खर्च करू शकाल. व्यावसायिक वर्गाच्या बाबतीत तुमचे भागीदार आणि कुटुंबाला तुमचे महत्त्व जाणवेल. त्यामुळे त्यांचा दृष्टिकोन बदलेल. महिलांना घराच्या नूतनीकरणावर खर्च करावा लागेल. तथापि, भौतिक सुविधांवर विचारपूर्वक खर्च करा. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने कुसंगतीपासून दूर राहणे हिताचे ठरेल.

    वृषभ

    या आठवड्यात नोकरीत बढती संभवते. ज्यांना जॉब बदलायचा आहे, अशांनी जरूर प्रयत्न करावेत. नोकरदारांकडे एखादी महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात येईल आणि तुम्ही ती आत्मविश्वासाने पार पाडू शकाल. कामानिमित्त परदेशात जाण्याचा योग आहे. व्यावसायिक वर्गाला नवीन संकल्पनांचा योग्य वेळी वापर करता येईल आणि फायदा होईल. त्याचा परिणाम म्हणून व्यापार वृद्धी दिसू लागेल. महिलांनी कायदेशीर बाबतीत दक्ष राहावे. तर, घरात ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून नोकरी लागण्याची शक्यता आहे.

    मिथुन

    या आठवड्यात मित्रमंडळीत प्रिय व्हाल, कौतुक होईल. नोकरदार कामाच्या ठिकाणी प्रगती साध्य करू शकतील. तुमची आधीची प्रलंबित बिले (व्हाऊचर) पास होतील, अशा रीतीने अनपेक्षित धनलाभ होईल. व्यावसायिक वर्गाला बदलत्या सरकारी धोरणामुळे व्यवसायात निरनिराळे लाभ मिळू शकतील. सरकारी योजनांची अपडेट माहिती ठेवा. मुला-मुलींची प्रगती पाहून महिलांना समाधान मिळेल. तसेच, त्या नवीन वस्तू खरेदी करू शकतील. विद्यार्थ्यांना अनपेक्षित लाभ मिळू शकतील, त्यामुळे आनंदी राहतील.

    कर्क

    या आठवड्यात मानसिकदृष्ट्या अस्वस्थ रहाल. पूर्वी केलेल्या कामाबद्दल नोकरदारांचे कौतुक होईल. त्यांना नवीन जबाबदारी मिळेल. हे पाहून प्रतिस्पर्धी गप्प बसतील. व्यावसायिक वर्गासाठी नवीन खर्च उद्भवू शकतो. सरकारी धोरणाचा फायदा करून घेऊ शकाल. आयात-निर्यात क्षेत्रात लाभ संभवतो. महिलांच्या बाबतीत घरातील वरिष्ठ व्यक्तीकडून त्रास होण्याची शक्यता आहे. अशावेळी सांभाळून बोलणे योग्य ठरेल. अल्पपरिश्रमात विद्यार्थ्यांना लाभ मिळू शकेल.

    सिंह

    या आठवड्यात कलाकारांना मानसन्मान मिळू शकेल. नोकरदारांनी कोणत्याही प्रकारचे मतभेद टाळावेत. काहीही झाले तरी, वाद घालू नका. शांतपणे विचार करून स्वतःचे मत मांडा. इतरांच्या भांडणात देखील पडू नका. व्यावसायिक वर्गाच्या बाबतीत स्पर्धक डोईजड होतील. त्यांच्याकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. अशा परिस्थिती आत्मविश्वास डगमगू देऊ नका, काम चोख करत, पुढे जात रहा. महिलांचे कुटुंबात, भावंडांबरोबर वाद होतील. अशा वेळी सामंजस्याने शांतता ठेवण्याचा प्रयत्न करा. इतरांना समजावून, बोलून प्रश्न सोडवण्यावर भर द्या. विद्यार्थ्यांच्या बाबतीत स्पर्धक कुरघोडी करतील, त्यामुळे सावध रहा. प्रत्येक कृती विचारपूर्वक करा आणि परिस्थितीवर लक्ष ठेवा.

    हेही वाचा – भार्गवने रुंजीला लग्नासाठी प्रोपज केलं, पण…

    कन्या

    या आठवड्यात विनयशील वर्तन ठेवा. बोलताना सांभाळून बोला, गैरसमज होणार नाही, याची काळजी घ्या. नोकरदारांना कोर्ट-कचेरीच्या कामात यश मिळेल. अडकून पडलेली कामे पूर्ण होतील. पण त्याचबरोबर तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. व्यावसायिक वर्गाने कोणतीही जोखीम न घेता सरकारी नियमांचे पालन करावे. कायद्याच्या चौकटीत राहून काम पूर्ण करावे. व्यवसाय समाधानकारकरीत्या सुरू राहील. महिलांनी पथ्य पाळावे. औषधे वेळेवर घ्यावीत आणि व्यायाम करावा. विद्यार्थ्यांना अचानक प्रवास घडेल आणि नवीन ओळखी होतील.

    तुळ

    या आठवड्यात तुमची इच्छापूर्ती होईल. नोकरदारांना नवीन घर घ्यायचे असेल तर, त्यासाठी हा चांगला कालावधी आहे. मनाप्रमाणे घर मिळेल आणि पैशांचा प्रश्नही सुटेल. तसेच, काही सरकारी कामे असतील तर, तीही पूर्ण होतील. व्यावसायिक वर्गाला रखडलेली कामे पूर्ण करता येतील, त्याने व्यापारात लाभ होईल. कुटुंबासाठी मनाप्रमाणे खर्च करू शकाल. महिलांच्या दृष्टीने हा कालावधी उत्साही आणि आनंदी असेल. पण आरोग्याची काळजीही घ्या. विद्यार्थ्यांनी आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींकडे लक्ष द्यावे,

    वृश्चिक

    या आठवड्यात मनाविरुद्ध घटना घडतील. नोकरदारांच्या बाबतीत चमचेगिरी करून सहकारी सवलती घेतील! तुमच्या कामाचे श्रेय दुसरेच घेण्याची शक्यता आहे, त्यामुळे सावध रहा. व्यावसायिक वर्गाची जुनी येणी वसूल होतील. आर्थिक बाजू भक्कम होईल. व्यवसायात थोडी जास्त मेहनत घ्यावी लागेल. महिलांनी महत्त्वाचे काम लांबणीवर टाकू नये. विद्यार्थ्यांनी प्रोजेक्ट डिटेल्स कोणालाही सांगू नये आणि अभ्यासात प्रामाणिक प्रयत्न करावेत.

    धनु

    या आठवड्यात प्रवास घडेल. नोकरदारांच्या बाबतीत कामाचा उत्साह वाढेल. सहकारी तसेच वरिष्ठ सहकार्य करतील. मार्च एंडिंग असल्याने कामाचा ताण जाणवेल. व्यावसायिक वर्गाला कामाचे टार्गेट पूर्ण करता येईल. नवीन ओळखी होतील, त्यातून नवीन माहिती मिळेल. महिलांच्या भावंडांशी गाठीभेटी होतील, त्यामुळे आनंदी रहाल. परदेशी जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी हा योग्य काळ आहे.

    मकर

    या आठवड्यात कामाचा ताण राहील. त्यासाठी वेळेचे नियोजन करावे लागेल. नोकरदारांना ऑफिसचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करावे लागेल. वरिष्ठ खूश होतील. व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वर्गाला नवीन जाहिरात तयार करता येईल. सोशल मीडियाचा व्यवसायात चांगला वापर करून फायदा मिळवू शकाल. महिलांना नवीन वर्षात नवीन आव्हानांना सामोरे जावे लागेल, पण त्याने आत्मविश्वास वाढेल. विद्यार्थ्यांनी उन्हात भटकू नये, पाणी भरपूर प्यावे. तब्येतीची काळजी घ्यावी.

    कुंभ

    या आठवड्यात घरात आनंदी वातावरण असेल. नोकरदारांना नवीन प्रोजेक्टची आव्हाने स्वीकारावी लागतील. यासाठी व्यवस्थित नियोजन करणे हिताचे राहील. आयात-निर्यात व्यवसायाला फटका बसेल, तरी न डगमगता पुढे जात रहा. नवीन संधी समोरून येतील. महिलांच्या बाबतीत घरी मुला-मुलींच्या लग्नाची बोलणी सुरू होतील. म्हणून आनंदी रहाल. विद्यार्थ्यांनी कोणावर अवलंबून न राहता, स्वतः प्रयत्न करावेत.

    हेही वाचा – आराध्याला सापडलेल्या बॉक्समध्ये काय गूढ होतं?

    मीन

    या आठवड्यात घरात वादविवाद होण्याची शक्यता आहे. नोकरदारांना नवीन वर्षात वेगळी जबाबदारी मिळेल. नवीन सहकारी मिळतील, त्यांच्याशी जुळवून घ्यावे लागेल. व्यावसायिक वर्गालाही भागीदारीत अडचणी येऊ शकतात. जुने वाद पुन्हा उद्भवून कटुता येईल. पण त्यामुळे भागीदाराचे खरे रूप समजेल. कोणत्याही बाबतीत महिलांनी शांत राहून अत्यंत विचारपूर्वक निर्णय घ्यावा. विद्यार्थ्यांच्या बाबतीत मित्रमंडळीत गैरसमज होण्याची शक्यता आहे. सांभाळून रहा.

    prajaktakathe3970@gmail.com

    प्राजक्ता काथे

    वाणिज्य शाखेत पदवी (1991), ज्योतिष शास्त्री (2003), हस्तसामुद्रिक प्रवीण (2004), कृष्णमूर्ती ज्योतिष भास्कर (2008), होरा मार्तंड (2016) या पदव्या प्राप्त. 2005पासून पत्रिकेच्या आधारे अभ्यासकरून लोकांच्या अडचणीबाबत मार्गदर्शन करीत आहेत. हस्तसामुद्रिक शास्त्र, कृष्णमूर्ती पद्धती आणि होरा शास्त्र यांचा एकत्रित सखोल अभ्यास असून, जीवनातील प्रश्न आणि आव्हानांचे अचूक विश्लेषण करून, व्यवहार्य मार्गदर्शन देण्याचा दीर्घ अनुभव.

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविषय; 23 मार्च 2026

    March 23, 2026 वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 22 मार्च 2026

    March 22, 2026 वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 21 मार्च 2026

    March 21, 2026 वास्तू आणि वेध
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविषय; 23 मार्च 2026

    By Team AvaantarMarch 23, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 23 मार्च 2026; वार : सोमवार भारतीय सौर : 02…

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 22 मार्च 2026

    March 22, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 21 मार्च 2026

    March 21, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 20 मार्च 2026

    March 19, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026

    Dnyaneshwari : आरंभीं बीज एकलें, मग तेंचि विरूढलिया बुड जाहलें…

    March 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविषय; 23 मार्च 2026

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 245
    • अवांतर 173
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 184
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 359
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn