Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    रामनवमी विशेष… कौसल्येचा राम!

    March 26, 2026

    Dnyaneshwari : पैं गा भक्तासि माझें कोड….

    March 26, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 26 मार्च 2026

    March 26, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, March 26
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » साप्ताहिक राशीभविष्य : 08 ते 14 जून 2025
    पंचांग आणि भविष्य

    साप्ताहिक राशीभविष्य : 08 ते 14 जून 2025

    Team AvaantarBy Team AvaantarJune 8, 2025No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठी साहित्य, मराठीलेखक, मराठीआर्टिकल, मराठीस्टोरी, राशीभविष्य, बाराराशी, राशीफळ, राशीअंदाज, Weekly horoscope, horoscope, राशी,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    धनंजय जोशी

    (‘ज्योतिष आणि वास्तू’विषयक सल्लागार)

    संपर्क – 8850453833


    मेष

    मेष राशीच्या लोकांना हा आठवडा संमिश्र असेल, असे ग्रहसंकेत दर्शवत आहे. स्पर्धा, विरोधक, प्रतिपक्ष, शत्रू अशा सर्वांची आठवड्याच्या सुरुवातीस काळजी करायला लागू शकते. जसजसा आठवडा पुढे सरकेल, तसतसे छोटे-मोठे तोटे देखील सहन करायला लागू शकतात. थोडक्यात सांगायचे झाले तर, ‘कधी ऊन कधी सावली’ अशी वाटचाल या आठवड्यात असणार आहे.

    वृषभ

    नोकरीच्या ठिकाणी होणारे राजकारण, त्यातून उद्भवणारे प्रश्न समोर आणणारा असा हा आठवडा आहे. घरातील सदस्यांच्या तब्येतीमुळे देखील या तणावात वाढ होऊ शकते. यातून मार्ग काढायचा असल्यास ‘जगा आणि जगू द्या’ या तत्वाचा अवलंब करणे सगळ्यात उत्तम ठरेल. लहान मुलांना परिवारातील मोठ्या सदस्यांचा उत्तम सहवास लाभेल.

    मिथुन

    लहान मुलांविषयीची चिंता, लहान मुलांचे विचार मनात घोळत राहतील. शिस्त आणि संस्कार हे ऐरणीवर असलेले विषय ठरू शकतात. कलाकारांना आपली बुद्धी आणि ज्ञान यांची सांगड घालून नवीन कलाविष्कार करण्यास उत्तम काळ ठरू शकतो. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या महिलांना या आठवड्यात काही चांगल्या संधी मिळू शकतात.

    कर्क

    कर्क राशीच्या लोकांना या आठवड्यात लाभातून होणारे सुख अनुभवायला मिळू शकते. महिलांना या आठवड्यात घर आणि घरातील मुले यांच्याकरिता जास्त वेळ देता येईल. घराचे सुशोभीकरण अथवा घरात काही बदल करून घेण्याच्या दृष्टीने सुरू केलेली कामे या आठवड्यात पूर्णत्वाला जातील.

    सिंह

    मुळातली सत्ता गाजवायची वृत्ती असलेल्या सिंह राशीच्या जातकांना या आठवड्यात आपल्या सत्तेचा पुरेपूर उपभोग घेता येईल. उत्तम वक्तृत्व आणि बुद्धिमत्ता याची सांगड घातली जाऊन आपापल्या कार्यक्षेत्रात आपण वर्चस्व गाजवाल. लहान मुलांनी संधी उपलब्ध झाल्यास वक्तृत्व स्पर्धेत सहभागी व्हायला उत्तम काळ.

    कन्या

    कन्या राशीच्या पुरुषांनी या आठवड्यात आपल्या जोडीदाराच्या मनाची विशेष काळजी घ्यावी. जोडीदाराला यातना अथवा दुःख होईल, असे काहीही बोलू अथवा करू नये. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा उत्तम जाणार आहे. उत्तम लाभ होतील आणि झालेल्या लाभाचा योग्य प्रकारे विनियोग या आठवड्यात कराल. स्त्रियांनी दया, क्षमा, शांती ही त्रिसूत्री उराशी बाळगून पुढे चालावे.

    तुळ

    भक्ती आणि ज्ञान यांचा अनोखा संगम या आठवड्यात तुळ राशीच्या लोकांना अनुभवायला मिळू शकतो. व्यवसाय करणाऱ्या लोकांना या आठवड्यात उत्तम धनलाभ होऊ शकतो. स्त्रियांना जोडीदाराबरोबर देवदर्शनाला जाण्याचा योग येईल. उच्चशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना हा आठवडा विशेष लाभदायी ठरणार आहे.

    वृश्चिक

    चिंता आणि तणावाचे सावट घेऊन येणारा हा आठवडा आहे. कार्यालयात वरिष्ठांशी बेबनाव होण्याची दाट शक्यता आहे. कायदेविषयक बाबींबद्दल चिंता वाढू शकतात. जसजसा आठवडा पुढे सरकेल तसतशा काही चिंता कमी होतील. महिलांनी घरात अथवा कार्यालयात दुसऱ्या महिलेकडून आपली फसवणूक होणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी.

    धनु

    लाभदायक घटनांनी सुरू होणारा हा आठवडा जसजसा पुढे सरकेल, तशा काही चिंता घेऊन येईल. संभाषणाच्या वेळी शब्दांचा वापर जपून करावा, अन्यथा अर्थाचा अनर्थ होण्याची शक्यता आहे. धनु राशीच्या लोकांना आपल्या जोडीदाराच्या बुद्धीकौशल्य, ज्ञानाचा अभिमान वाटेल, असे काही प्रसंग अनुभवायला मिळून शकतात. वैद्यकीय उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी विषयातील तांत्रिक गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे.

    मकर

    क्रीडा, कला अथवा छंद अशा गोष्टींचे वर्चस्व असणारा हा आठवडा आहे. कलाकारांना आपल्या कलेला उत्तम व्यासपीठ मिळणे अनुभवायला मिळेल. मकर राशीच्या स्त्रियांना आपल्या कलाक्षेत्रात अथवा कार्यक्षेत्रात फायदा अनुभवायला मिळू शकतो.

    कुंभ

    ‘मान दिल्यामुळे मान मिळतो’ हे या आठवड्याचे सूत्र राहणार आहे. गोड बोलून कामे सहज आणि उत्तमरीतीने होऊ शकतात, याकडे विशेष लक्ष द्यावे. अध्यात्म आणि ज्ञान अशा गोष्टीत या आठवड्यात मन उत्तम रमेल. सल्लामसलत हे कार्यक्षेत्र असलेल्या लोकांना या आठवड्यात विशेष आर्थिक लाभ होऊ शकतो. विद्यार्थ्यांना बुद्धीकौशल्य दाखवण्यास वाव मिळवून देणारा हा आठवडा असेल.

    मीन

    घर अथवा नात्यातले प्रश्न सोडवताना तर्क आणि भावना यांची सांगड घालून विषय हाताळावे. वडिलोपार्जित संपत्तीच्या संदर्भाने काही कामे करायची राहिली असल्यास ती कामे या आठवड्यात पूर्ण करण्याची संधी चालून येईल. मीन राशीच्या लहान मुलांच्या आहाराकडे या आठवड्यात विशेष लक्ष द्यावे.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 26 मार्च 2026

    March 26, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 25 मार्च 2026

    March 25, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 26 मार्च 2026

    By Team AvaantarMarch 26, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 26 मार्च 2026; वार : गुरुवार भारतीय सौर : 05…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 25 मार्च 2026

    March 25, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविषय; 23 मार्च 2026

    March 23, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    रामनवमी विशेष… कौसल्येचा राम!

    March 26, 2026

    Dnyaneshwari : पैं गा भक्तासि माझें कोड….

    March 26, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 26 मार्च 2026

    March 26, 2026

    नीरजचा निर्णय ऐकून राजेश अन् जयूला धक्काच बसला!

    March 26, 2026

    …अन् यमुनाकाकीच्या लक्षात आले, ‘शेवटी आहे कोण?’

    March 25, 2026

    आयुष्यात संवादाचा सेतू खूपच महत्त्वाचा, अन्यथा…

    March 25, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 248
    • अवांतर 175
    • आरोग्य 91
    • पंचांग आणि भविष्य 362
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 185
    • मैत्रीण 17
    • ललित 513
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn