Saturday, August 2, 2025

banner 468x60

Homeवास्तू आणि वेधआजचे पंचांग आणि दिनविशेष : 04 जून 2025

आजचे पंचांग आणि दिनविशेष : 04 जून 2025

दर्शन कुलकर्णी

 

आज, भारतीय सौर : 14 ज्येष्ठ शके 1947

अर्थात,

दिनांक : 04 जून 2025

वार : बुधवार

तिथि : नवमी  23:53

नक्षत्र : उत्तरा 27:34

योग : वज्र 08.27

करण : बालव 10:21

सूर्य : वृषभ

चंद्र : सिंह 07:34

सूर्योदय : 06:00

सूर्यास्त : 19:13

पक्ष : शुक्ल

मास : ज्येष्ठ

ऋतू : ग्रीष्म

सूर्य अयन : उत्तरायण

संवत्सर : विश्वावसू

शालिवाहन शक : 1947

विक्रम संवत : 2081

युगाब्द : 5127


वेद कन्सल्टन्सी / 9987433660


आजचे राशीभविष्य

मेष – भाऊ किंवा बहिणीमुळे धनलाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत काही कुरबुरी होतील; परंतु त्याचा मन:शांतीवर विपरीत परिणाम होऊ देऊ नका.

वृषभ – आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यास लाभदायक दिवस. कुटुंबाला पुरेसा वेळ द्या. तुम्ही काळजी करता हे त्यांना दाखवून द्या. त्यांच्यासोबत वेळ व्यतीत करा.

मिथुन – स्वत:बद्दल अभिमान वाटावा, अशा गोष्टी घडण्यासाठी एकदम योग्य दिवस आहे. कला तसेच नाट्य क्षेत्रांशी संबंधित व्यक्तींना नवीन संधी मिळतील आणि त्यांना आपली कलात्मकता उत्कृष्टपणे दाखविता येईल.

कर्क – तुम्ही प्रकाशझोतात राहाल आणि यश तुमच्या आवाक्यात येईल. सहकुटूंब सामाजिक कार्य केल्याने प्रत्येकाला आनंद मिळेल.

सिंह – आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मोकळा वेळ मुलांच्या सहवासात घालवा. कल्पना अपयशी ठरणार नाहीत याची जोवर खात्री होत नाही, तोपर्यत त्या इतर कोणालाही सांगू नका.

कन्या – भागीदारी तत्वावर नवीन व्यवसाय सुरू करायला चांगला दिवस. यामुळे घसघशीत फायदा होऊ शकतो. खेळ आणि आऊटडोअर अ‍ॅक्टिव्हिटीमधील सहभाग तुमचा हरवलेला उत्साह, ऊर्जा परत मिळविण्यास सहाय्यभूत ठरेल.

तुळ – प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागल्यामुळे उदास होऊ नका. जीवनात सुखाची किंमत कळण्यासाठी थोडेसे दु:ख असावे लागते. मूड बदलण्यासाठी एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हा.

वृश्चिक – परदेशात व्यापार करणाऱ्यांना चांगला धनलाभ होण्याची शक्यता आहे. तेलकट आणि तिखट आहार मात्र टाळा.

धनु – रक्तदाबाचा विकार असणाऱ्यांनी प्रवास करताना काळजी घेणे गरजेचे आहे. व्यावसायिक करारांबाबत काळजीपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे.

मकर – कमतरतेवर काम करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आजचा दिवस योग्य आहे. मात्र स्वतःसाठी वेळ काढा. आहार नियंत्रणात ठेवा आणि तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम करा.

कुंभ – त्रस्त आणि व्यग्र अशा कामाच्या वेळापत्रकामुळे चटकन राग येईल. आज केलेली गुंतवणूक समृद्धी आणि आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल. नातेवाईक आणि मित्रमंडळींकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळतील.

मीन – संयम बाळगा. निरंतर प्रयत्न आणि समजून घेण्याच्या स्वभावामुळे हमखास यशप्राप्ती होणार आहे. मान्यवर, श्रेष्ठ व्यक्तींबरोबरच्या चर्चेमुळे काही चांगल्या नव्या कल्पना आणि योजना सुचतील. मात्र कोणालाही पैसे उधारीवर देऊ नका.


दिनविशेष

प्रसिद्ध अभिनेत्री नूतन

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नूतन हिचा जन्म 4 जून 1936 रोजी झाला. हिंदी चित्रपटनिर्माते कुमारसेन समर्थ आणि प्रसिद्ध अभिनेत्री शोभना समर्थ यांची नूतन ही ज्येष्ठ कन्या होती. शोभना समर्थ निर्मित-दिग्दर्शित हमारी बेटी (1950) चित्रपटाद्वारे नूतनचे बालकलाकार म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले. त्यावेळी ती 14 वर्षांची होती. नूतन अभिनित सीमा, बारिश, पेइंग गेस्ट, दिल्ली का ठग, सोने की चिडिया, छलिया, मिलन, मंझिल, तेरे घर के सामने, सरस्वतीचंद्र, सौदागर असे अनेक चित्रपट लोकप्रिय ठरले. यशस्वी अभिनेत्रीचा लौकिक असतानाच नूतनने 1959मध्ये भारतीय सैन्यातील लेफ्टनंट कमांडर रजनीश बहल यांच्याशी विवाह केला. त्यावेळी तिने चित्रपटसंन्यास घेण्याचा निर्णयही घेतला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे पाच फिल्मफेअर पुरस्कार जिंकण्याचा विक्रम तिच्या नावावर होता. भारत सरकारने 1974 साली ‘पद्मश्री’पुरस्कार देऊन या अभिनेत्रीचा सन्मान केला. 21 फेब्रुवारी 1991 तिचा कर्करोगाने मृत्यू झाला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!