Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 20 जानेवारी 2026

    January 20, 2026

    पडद्यावर न झळकलेली ‘त्या’ हीरोची आई…

    January 19, 2026

    डॉ. प्रशांत, घार्गे सर अन् सहा एकर जमीन…

    January 19, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, March 18
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»वास्तू आणि वेध»साप्ताहिक राशीभविष्य : 25 ते 31 मे 2025
    वास्तू आणि वेध

    साप्ताहिक राशीभविष्य : 25 ते 31 मे 2025

    Team AvaantarBy Team AvaantarMay 25, 2025Updated:March 18, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठी साहित्य, मराठीलेखक, मराठीआर्टिकल, मराठीस्टोरी, राशीभविष्य, बाराराशी, राशीफळ, राशीअंदाज, Weekly horoscope, horoscope, राशी,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    धनंजय जोशी

    (‘ज्योतिष आणि वास्तू’विषयक सल्लागार)

    संपर्क – 8850453833


    मेष

    मेष राशीच्या लोकांना हा आठवडा छान जाणार आहे. गाडी, घर, जमीन खरेदी असे काही मनात असेल तर, त्या दिशेने पुढे सरकाल. स्वतःकडे लक्ष देत मौजमजा करा. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी छोट्या प्रवासाचे योग येतील.

    वृषभ

    वृषभ राशीच्या लोकांना आठवड्याची सुरुवात थोडी काळजी करायला लावणारी असू शकते. आठवडा पुढे सरकला की, चिंता कमी होईल. स्वतःकडे लक्ष द्याल. व्यायाम, वजन कमी करणे अशा सगळ्या गोष्टींचा मुहूर्त कराल. महिलांना आपल्या कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळू शकतात.

    मिथुन

    मिथुन राशीच्या सर्वांसाठी हा आठवडा शुभवार्ता घेऊन येऊ शकतो. परदेशात जायचे तुमचे बेत असतील तर, या आठवड्यात त्याला गती येईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची मर्जी सांभाळा. भावा-बहिणींच्या भेटीगाठी होतील. विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रसंगात खऱ्याची साथ सोडू नये.

    कर्क

    व्यवसाय, नोकरी अथवा कर्म या सर्व गोष्टींचा दबदबा या आठवड्यात राहणार आहे. आठवड्याच्या उत्तरार्धात धनलाभाचे योग दिसत आहेत. चांदीचा काही दागिना करायचा असल्यास अथवा चांदीचा काही व्यवहार करायचा असल्यास कर्क राशीच्या महिलांनी या आठवड्यात त्याचा विचार करावा.

    सिंह

    कर्तृत्व गाजवण्याची संधी हा आठवडा घेऊन येईल. धार्मिक कार्य, सत्कर्म या गोष्टीत आठवड्याच्या सुरुवातीला मन रमेल. जसजसा आठवडा पुढे सरकेल तसे कर्म मार्गात मन रमेल. स्त्रियांनी या आठवड्यात खर्चाकडे थोडे लक्ष द्यावे. कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांना कलेच्या माध्यमातून अर्थार्जनाचा योग येऊ शकतो.

    कन्या

    कन्या राशीसाठी हा आठवडा चिंता घेऊन येऊ शकतो. त्यातून आठवडा जसा पुढे सरकेल तशी नशिबाची, दैवाची साथ लाभेल आणि गोष्टी सुकर होत जातील. शेअर बाजारातून मिळकत असलेल्या लोकांनी थोडी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. मित्र अथवा भावाबरोबर वाद टाळा. व्यवस्थापन शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना या आठवड्यात उत्तम प्रगती होण्याची संधी चालून येईल, त्याचा फायदा करून घ्यावा.

    तूळ

    प्रतिस्पर्ध्याकडून आठवड्याच्या सुरुवातीला थोडा त्रास संभवतो. आपली कुशाग्र बुद्धी वापरून आलेल्या प्रसंगांना सामोरे जा. नफा-नुकसान सुरूच असते, त्यातून आपले मानसिक स्वास्थ्य बिघडू देऊ नका. स्त्रियांनी घरात आपली मते ठामपणे, पण कोणाला न दुखवता मांडावीत. भविष्यात घडणाऱ्या शुभ गोष्टींचा पाया भरण्याची क्रिया सुरू होईल.

    वृश्चिक

    उत्तम आरोग्य हाच खरा दागिना, हे लक्षात ठेवा. प्रवासात छोटे अडथळे येऊ शकतात. वडिलोपार्जित मालमत्तेशी निगडित बाबींमध्ये दिरंगाई नको. व्यवहार आणि कागदपत्रे या बाबतीत सावधान रहा. या आठवड्यात कोणती पूजा मनात असेल तर महिलांनी त्याचे नियोजन सुरू करावे.

    धनु

    संततीशी निगडित विचारांनी आठवड्याची सुरुवात होईल. जसजसा आठवडा पुढे सरकेल तसतसे हाताखाली काम करणाऱ्या अथवा घरकाम करणाऱ्या माणसांच्या चिंता वाढतील. आईशी बोलून घरातील अनेक समस्या मार्गी लागतील. बऱ्याच दिवसांत बोलणे झाले नसेल तर जरूर बोलून घ्या.

    मकर

    मोठ्या बहिणीला भेटायचे योग येऊ शकतात. घरातील बाबीत मन उत्तम रमेल. आत्मशक्ती वाढवण्याकडे या आठवड्यात विशेष लक्ष द्यावे. विद्यार्थ्यांनी आशा सोडून देऊ नये. एखादा मार्ग बंद झाला तर, दुसरा नक्की सापडतो. सकारात्मक विचार करणे अत्यंत गरजेचे आहे.

    कुंभ

    छोट्या प्रवासाची काही योजना असेल तर, ती या आठवड्यात वास्तवात येऊ शकते. वस्तू कुठे ठेवल्या आहेत, याची नोंद ठेवा. जितकी शिस्त, तितकेच आयुष्य सुकर होणार. नोकरीच्या ठिकाणी आपली बुद्धिमत्ता वापरून आल्या प्रसंगांना सामोरे जा. कला क्षेत्रात असलेल्या विद्यार्थ्यांनी काही खर्च समोर आले तर, ती गुंतवणूक आहे, असा विचार करून त्याच्याकडे पहावे.

    मीन

    नवीन कपडे, नवीन वस्तू घेण्याचे योग या आठवड्यात दिसत आहेत. स्वतःवर खर्च करून त्यातून आनंद प्राप्ती कराल. व्यायाम, उत्तम आहार याकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. कलाकारांनी नवीन प्रयोग करताना सावधानता बाळगावी. स्त्रियांनी सौंदर्य प्रसाधने घेताना हात थोडा आखडता घेतलेलाच उत्तम. पैसा योग्य ठिकाणी खर्च होतोय का, याचा त्रयस्थ म्हणून विचार करावा.

    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 19 जानेवारी 2026

    January 19, 2026 वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 18 जानेवारी 2026

    January 18, 2026 वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 17 जानेवारी 2026

    January 17, 2026 वास्तू आणि वेध
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 19 जानेवारी 2026

    By Team AvaantarJanuary 19, 2026

    दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आज योग्य ती ऊर्जा आणि…

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 18 जानेवारी 2026

    January 18, 2026

    Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 17 जानेवारी 2026

    January 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 16 जानेवारी 2026

    January 16, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 20 जानेवारी 2026

    January 20, 2026

    पडद्यावर न झळकलेली ‘त्या’ हीरोची आई…

    January 19, 2026

    डॉ. प्रशांत, घार्गे सर अन् सहा एकर जमीन…

    January 19, 2026

    Kitchen Tips : कारल्याची भाजी, मसालेदार भाज्या, मिरचीचा ठेचा बनविताना…

    January 19, 2026

    अब्रह्मण्यम्… गुळचट ते झणझणीत!

    January 19, 2026

    Dnyaneshwari : तैसें ॐ हें स्मरों सरे, आणि तेथेंचि प्राणु पुरे…

    January 19, 2026

    POPULAR CATEGORY

      © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

      Facebook X (Twitter) Instagram LinkedIn