Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Take care… काळजी घे
    फिल्मी

    Take care… काळजी घे

    Team AvaantarBy Team AvaantarMay 11, 2025No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखन, मराठीआवृत्ती, मराठीसाहित्य, मराठीलेखक, मराठीमनोरंजन, मराठीवेबसाइट, काळजी, टेक_केअर, हर्षा_गुप्ते
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    मित्रमैत्रिणींनो, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते!

    खरंतर, आपण कोणाला भेटलो, फोनवर बोलणं झालं की, निरोप घेताना किंवा देताना एक मॅनर्स म्हणून ‘टेक केअर’ (Take Care) म्हणायची पद्धत रूढ झालीय. काही मनापासून म्हणणारे आहेत, तर काही सवयीने म्हणणारे आहेत. माहीत नाही, पण कधी-कधी कोणाचं टेक केअर ऐकलं की मनापासून बरं वाटतं. कदाचित, ते कोणीतरी म्हणावं, अशी अपेक्षा काही कारणाने आपल्यामध्ये निर्माण झालेली असते. आता एखाद्या आजारी व्यक्तीला आपण भेटायला गेलो आणि त्या व्यक्तीला Take care म्हटलं म्हणून तो स्वत:ची काळजी घेणार का? तर नाही. हे दोन जादुई शब्द (magic words) आहेत, समोरच्या व्यक्तीला मानसिक उभारी देण्यासाठी! एखादी व्यक्ती अशीही असू शकते, जी म्हणेल, मोठी शहाणी, तू Take care नाही म्हणालीस तर काय, मी स्वत:ची काळजी घेणार नाही का?

    मला एक सवय आहे, रिक्षा, टॅक्सी, बसमधून उतरताना ड्रायव्हरला ‘थँक्स’ म्हणायची! पण कोविडनंतर ‘थँक्स, टेक केअर’ (Thanks, Take care) असे म्हणायची सवय लागली. त्या ड्रायव्हरच्या चेहऱ्यावर खुशीचं हास्य तर फुलतेच!

    पण, तसा टेक केअर मला खूपच भोवलाय. कोविडच्या आधी मी ‘स्टार प्रवाह’ची ‘तुझ्या इश्काचा नाद खुळा’ ही सीरियल करत होते, तेव्हा मला डायबिटीसचे निदान झाले. माझा जास्त वेळ शूटिंगमध्ये जायचा. माझी काळजी घेणाऱ्या नवऱ्याने सेटवर मुलांना कळवलं की, तुमच्या माईला डायबिटीस झालाय. त्यामुळे जरा तिची काळजी घ्या. कारण आपली बायको अतरंगी आहे, पथ्यपाणी कितपत सांभाळेल, याची त्याला पूर्ण कल्पना होती. पण मला यातलं काही माहीत नव्हतं. सेटवर लंच ब्रेकमध्ये सगळेजण माझ्यावर नजर ठेवायला लागले. सुनीला करंबेळकर तर म्हणाली सुद्धा की, तुमची प्लेट मी भरून आणणार.

    तर, मी भरून आणलेल्या ताटात, काय किती घेतलंय, यावर सर्वच नजर ठेवायला लागले. ‘आज भात जास्त घेतलायस. आण इथे मी कमी करून आणतो किंवा आणते…’, ‘गुलाबजाम दोन नाही, एकच खायचा…’ ‘बटाटे तर नाहीच खायचे.’ ‘पोळी का आणलीस? भाकरी आहे ना?’ ओम, सूर्या, ज्योती, संचित, अक्षय, अभिजीत केळकर, हृषिकेश… सगळेच माझी काळजी घ्यायला लागले.

    सुरुवातीला चिडचिड व्हायची. डायबिटीस आणि त्याचं पथ्य दोन्ही नवीन होतं ना! मग हळूहळू अंगवळणी पडत गेलं. सेटवर आता प्रॉडक्शनवाले, स्पॉटबॉय सगळेच मी काय खाते, किती खाते यावर लक्ष ठेवायला लागले. एखाद्या सीनमध्ये जर धावपळ असेल तर, मला जखम तर होणार नाही ना, याकडे दिग्दर्शकाची टीमही लक्ष द्यायला लागली. मुलं कधीकधी पटकन अंगावर ओरडायची सुद्धा! पण ते माझ्या प्रेमापोटीच. या सगळ्याची सवय झाली… आवड निर्माण झाली. मी कोणीतरी स्पेशल असल्यासारखे वाटायला लागले. तोंडाने तो शब्द न उच्चारता सगळेच माझी ‘केअर’ घेत होते.

    आता नवी सीरियल करतेय. ‘पिंगा गं पोरी पिंगा’… कलर्स मराठीवर. तिथे पाच मुली प्रमुख भूमिकेत आहेत. मी त्यांची ‘Land Lady’. त्या माझ्या पेइंग-गेस्ट. सगळ्या मुली मस्त आहेत. कामात अन् स्वाभावातही! एकमेकींना सांभाळून घेतायत. अचानक त्यांनाही कळलं की, मला डायबिटीस आहे. झालं माझं काम भारी! पाचही जणी माझ्यावर दुर्बिणीने नजर ठेवून असतात. वेफर्स काय खातेस? आज भात केवढा वाढून घेतलायस? किती ते गोड खाणार? शुगर वाढेल गं! आम्हाला हवी आहेस गं तू!

    मला पुन्हा वावगं वाटायला लागलं. कारण मला कोणी हे नको करूस… ते नको करूस… म्हटलं की खूप राग येतो. पण आता पुन्हा एकदा त्या मुलींच्या रागवण्याला, त्यांच्या ‘Take care’वर मी खूश झालेय.

    बरेचदा शूटला जाताना-येताना मालवणीच्या रिक्षा येतात. एकदा रात्री मी तशाच रिक्षाने घरी आले आणि नेहमीच्या सवयीप्रमाणे मी म्हणाले – ‘थँक्स, टेक केअर’ (Thanks, take care)…

    त्या ड्रायव्हरने विचारले की, ‘मॅडम, आप अॅक्टर हो ना, क्राइम पेट्रोल वाले?’ मी जरा खूशच झाले. त्याला विचारले, ‘बेटा, आप देखते हो क्या क्राइम पेट्रोल?’ तो मुलगा म्हणाला, ‘नाही. माझ्याकडे टीव्हीसुद्धा नाही. पण आम्ही सगळे मालवणीतले रिक्षावाले जेव्हा रिक्षा स्टँडवर उभे असतो, तेव्हा बरेचजण तुमच्याबद्दल बोलत असतात… एक अॅक्टर हैं क्राइम पेट्रोल वाली, चारकोप मे रहती हैं. रिक्षा से उतरने के बाद ‘थँक्स और टेक केअर’ बोलती है. हाँ वह खाला तो मेरी रिक्षा में भी बैठी हैं…’

    किती मस्त मला ना पाहता, ना ओळखता फक्त माझी सवय मला फेमस करतेय… ‘Take care’

    वातावरण खराब होतंय. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी बरेचदा योग्य नसतात. झोपेचं चक्र वेडंवाकडं होतं. मानसिक तणाव असतात. म्हणूनच, स्वत:च्या जिवाची, शरीराची नीट काळजी घ्या.

    Take care…

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026 फिल्मी

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026 फिल्मी

    माझं बालपण… गिरगाव ते बदलापूर व्हाया कॉटनग्रीन!

    March 3, 2026 फिल्मी
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फिल्मी

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    By हर्षा गुप्तेMarch 24, 2026

    नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. ‘सावधान इंडिया’ ही जोरदार चाललेली सीरियल.…

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    माझं बालपण… गिरगाव ते बदलापूर व्हाया कॉटनग्रीन!

    March 3, 2026

    एक अकेला इस शहर में…

    February 27, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026

    Dnyaneshwari : आरंभीं बीज एकलें, मग तेंचि विरूढलिया बुड जाहलें…

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 245
    • अवांतर 173
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 184
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn