Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    दिशाहीन नीरजच्या चिंतेने आई गेली थेट ज्योतिषाकडे!

    April 2, 2026

    ….म्हणून ‘सुकून’ शोधणं गरजेचं!

    April 1, 2026

    संध्याकाळ, समुद्र आणि ती…

    April 1, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, April 2
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » संध्याकाळ, समुद्र आणि ती…
    ललित

    संध्याकाळ, समुद्र आणि ती…

    मयुरेश गोखलेBy मयुरेश गोखलेApril 1, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, नरिमन पॉइंटची संध्याकाळ, गर्दीत सापडलेला शांत क्षण, सूर्यास्त बघणारी तरुणी, सनसेट पाहणारी तरुणी, शांत क्षण अनुभवणारी तरुणी
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    हिवाळा संपून उन्हाळा नुकताच सुरू झाला होता. तरीही संध्याकाळची समुद्र किनाऱ्यावरची हवा सुखद होती. आज नरिमन पॉइंटवर गर्दी रोजच्यापेक्षा जरा कमीच होती… आणि तेवढ्यात… ती हळूच समोरून चालत आली. पहिल्याच झटक्यात लक्ष तिच्याकडे गेलं… तिने घातलेला सलवार सूट अगदी देखणा… कपड्यांचा साधेपणा पण त्यातला एलिगन्स लगेच जाणवत होता. तिच्या खांद्यावरून अलगद पडलेला दुपट्टा चालताना हलकासा वाऱ्यावर डुलत होता. तिच्या चालण्यात एक शांत आत्मविश्वास होता. केस क्लिपमध्ये हलकेच बांधलेले… चेहऱ्यावर नैसर्गिक हास्य… डोळ्यांत एक निरागस चमक… हातात साधीशी बांगडी, कानात छोटेसे झुमके…..

    एकूणच, ती फक्त सुंदर दिसत नव्हती तर तिच्या तिथे असण्यामुळे एक शांत, प्रसन्न vibe तयार झाली होती.

    ती पुढे चालत गेली… आणि समुद्राच्या काठाशी जाऊन शांतपणे बसली. तिच्या बाजूला तिची छोटीशी टिफिन बॅग होती. बहुतेक ऑफिसमधून सरळ इथे आली असावी. दिवसाचा सगळा थकवा जणू त्या बॅगेसोबतच तिने बाजूला ठेवला होता…

    हेही वाचा – श्वास तुझा मालकंस…

    समोर क्षितिजावर मावळता सूर्य समुद्रात अलगद विरघळत होता. आकाशात केशरी, गुलाबी  रंगांची उधळण झाली होती… त्या सगळ्या रंगछटांमध्ये ती निवांत बसून ते दृश्य डोळ्यांत साठवत होती… तेवढ्यात वाऱ्याची एक हलकी झुळूक आली आणि तिचे केस अलगद उडाले. तिने सहजच हाताने ते बाजूला केले आणि पुन्हा क्षितिजाकडे नजर लावली. त्या क्षणी तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच शांतता होती — जणू ऑफिसमधला गोंगाट, दिवसाची धावपळ, सगळं काही मागे पडलं होतं… आणि उरला होता फक्त हा शांत क्षण!!!

    काय विचार करत असेल ती?

    कदाचित दिवसभराच्या कामाचा थकवा विसरून काही क्षण स्वतःसाठी काढत असेल… कदाचित उद्याच्या आयुष्याची छोटेसे प्लॅनिंग करत असेल… किंवा कदाचित काहीच नाही !

    हेही वाचा – Love story : उलटून रात्र गेली…

    फक्त या मोकळ्या हवेत, या शांततेत स्वतःला पुन्हा एकदा सापडत असेल… तिच्या डोळ्यांत दिसणारी ती शांत चमक, चेहऱ्यावरचं हलकंसं स्मित… सगळंच खूप काही सांगून जात होतं, पण शब्दांत काहीच मावत नव्हतं.

    सूर्य हळूहळू खाली झुकत गेला… आणि त्या सोबतच त्या क्षणाचं सौंदर्य अजून गहिरं होत गेलं.

    त्या संध्याकाळी, नरिमन पॉइंटवर… ती फक्त सूर्यास्त बघत नव्हती, तर जणू स्वतःसाठी थोडा वेळ जगत होती… 20 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 7 वाजता मुंबईतल्या नरिमन पॉईंट येथे मी अनुभवलेला खरा प्रसंग आहे हा… गर्दीत सापडलेला एक शांत क्षण!

    Avatar photo
    मयुरेश गोखले

    Location: Nagpur, Maharashtra Renowned media anchor and presenter with extensive experience hosting special shows in Maharashtra Official anchor for two leading television channels Interacted with eminent personalities from social, political, and academic spheres Featured in programs like Shankhnaad, Manogat, Awaaz Maharashtracha and many more Creates regular content on YouTube, Facebook, and Instagram with a strong regional connect Known for creating educational, cultural, and historical video content A confident speaker with a natural command on stage and camera Experienced singer with a passion for Bhajans, Abhangs, Ghazals, and Sufi music Professor at Dharampeth College, contributing actively in the academic field Descendant of the legendary nationalist Namdar Gopal Krishna Gokhale Content creation and strategy for digital media platforms Email: mayuresh2609@gmail.com Phone: 9423100151, 8668489210

    Related Posts

    दिशाहीन नीरजच्या चिंतेने आई गेली थेट ज्योतिषाकडे!

    April 2, 2026 ललित

    ….म्हणून ‘सुकून’ शोधणं गरजेचं!

    April 1, 2026 ललित

    लिओनिद रोगोजोव्ह… स्वत:वरच ऑपरेशन करणारा डॉक्टर

    April 1, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    दिशाहीन नीरजच्या चिंतेने आई गेली थेट ज्योतिषाकडे!

    By दीपक तांबोळीApril 2, 2026

    भाग – 2 नीरजने मुंबईतल्या कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनीअरिंगला ॲडमिशन घेतली, पण पहिल्याच वर्षी अभ्यासात त्याची…

    ….म्हणून ‘सुकून’ शोधणं गरजेचं!

    April 1, 2026

    लिओनिद रोगोजोव्ह… स्वत:वरच ऑपरेशन करणारा डॉक्टर

    April 1, 2026

    Bookshelf : सुख आणि आनंद यातला फरक दर्शविणारी ‘ययाती’ कादंबरी

    April 1, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    Latest From Avaantar

    दिशाहीन नीरजच्या चिंतेने आई गेली थेट ज्योतिषाकडे!

    April 2, 2026

    ….म्हणून ‘सुकून’ शोधणं गरजेचं!

    April 1, 2026

    संध्याकाळ, समुद्र आणि ती…

    April 1, 2026

    लिओनिद रोगोजोव्ह… स्वत:वरच ऑपरेशन करणारा डॉक्टर

    April 1, 2026

    Bookshelf : सुख आणि आनंद यातला फरक दर्शविणारी ‘ययाती’ कादंबरी

    April 1, 2026

    Dnyaneshwari : हां गा सूर्य काय शिळा, अग्नि म्हणों येत आहे वोंविळा…

    April 1, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 254
    • अवांतर 180
    • आरोग्य 94
    • पंचांग आणि भविष्य 369
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 188
    • मैत्रीण 17
    • ललित 527
    • शैक्षणिक 74

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    दिशाहीन नीरजच्या चिंतेने आई गेली थेट ज्योतिषाकडे!

    April 2, 2026

    ….म्हणून ‘सुकून’ शोधणं गरजेचं!

    April 1, 2026

    संध्याकाळ, समुद्र आणि ती…

    April 1, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.