Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    मायक्रोवेव्ह येई घरा…!!

    April 10, 2026

    Dnyaneshwari : आतां सामान्य विशेष, हें जाणणें एथ महादोष…

    April 10, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 एप्रिल 2026

    April 10, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, April 10
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » प्रत्येक गृहिणीची सखी…
    ललित

    प्रत्येक गृहिणीची सखी…

    Team AvaantarBy Team AvaantarFebruary 20, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, मराठी कथा, मी मराठी, मराठी लेख, अभिजात मराठी, गृहिणीची गरज, घरकाम करणाऱ्या स्त्रिया, घरकाम करणारीच्या सुट्ट्या, घरकामाला बाई, घरमालकीण कामवाली, कामवाली बाई, कामवाली मावशी,
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    माधवी जोशी माहुलकर

    कोणाच्या रंगरुपावर जाऊ नये, कारण ते काही कोणाच्या हातात नसतं! व्यक्तीमधले गुणविशेष पाहावे, चांगले गुण असतील तर ते निश्चितच दखलपात्र ठरतात. माझ्याकरिता माझ्या घरकाम करणाऱ्या बायका महत्त्वाच्या व्यक्ती आहेत! गेल्या 14 वर्षांपासून माझ्या घरी एक बाई कामाला आहे, त्यामुळे ती आता आमच्या कुटुंबातील सदस्य असल्यासारखी आहे! खरंतर, पहिल्यांदा ती जेव्हा माझ्या घरी कामाला आली, तेव्हा तिला महिन्यावारी घरकामाला बोलावण्याचे माझे काही निश्चित नव्हते. तिला मी केवळ डस्टिंगकरिता बोलावले होते. डस्टिंग करायचे काम म्हणजे काय असतं, हे देखील तिला माहीत नव्हतं! उलट तिला ते काम शिकवताना माझीच अवस्था “आ बैल (नव्हे गाय) मुझे मार…” अशी झाली होती. परंतु नाईलाज असल्याने तिला ते काम देऊन डस्टिंग शिकवले आणि त्यानंतर ती प्रत्येक कामात इतकी तरबेज झाली की, तिचे काम पाहून माझ्या शेजारीपाजारच्यांकडून तिच्याकडे कामाकरिता विचारणा होऊ लागली आणि ते पाहून मला तिचे किती कौतुक करू नि किती नको, अशी झाली… म्हणजे थोडक्यात “ना ना करते प्यार तुम्ही से कर बैठे, करना था इन्कार मगर इकरार, तुम्ही से कर बैठे…!” असा प्रकार होता.

    पण ती माझ्या घरात दाखल झाली ती कायमचीच! आता ति माझ्या घरची विश्वस्त सदस्य झाली आहे. चौदा वर्षांच्या कालावधीमुळे आता माझ्या कुटुंबाचा तिच्याशी एक भावनिक संबंध तयार झाले आहेत. ती आता माझ्या घरी नेहमीकरिता काम करणार हे नक्की! तिने मला शब्दच तसा दिला आहे… तिने देखील आम्हाला तसाच जीव लावला आहे. त्याच विंश्वासार्हतेमुळे आणि प्रेमामुळे माझ्या घराची सर्व दारोमदार तिच्यावर सोडून मी निर्धास्त असते!

    तर सांगायचा मुद्दा असा आहे की, या घऱकाम करणाऱ्या महिला या सर्व गृहिणींच्या जीवाभावाच्या असतात. त्यांनी जर एक-दोन सुट्टीवर जायचे म्हटले तर या बायकांचे मन सारखे त्या बाई, ताई, मावशी यांना उद्देशून म्हणत असते, “बेकरार कर के हमें यूं न जाईये, आप को हमारी कसम लौट आईये…” तरी जर तिने हट्ट करून सुट्टी घेतलीच तर, ती लगेच परत कधी येणार? या विचाराने गृहिणींचा जीव कासाविस होतो. म्हणूनच या गृहिणींच्या मनात कालवाकालव सुरू होऊन परत एकदा तिला त्या विचारापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करते. ती गृहिणी तिची मनधरणी करत म्हणते कशी, “रुक जा ओ जानेवाली रुक जा…” इतके करूनही अनुकूल असे घडले नाही आणि ती सुट्टीवर गेलीच तर दुसऱ्या दिवशी तो कामाचा पसारा आणि स्वयंपाकघराचा रगाडा पाहून भांडी घासताना, स्वयंपाक करताना, कपडे धुतान, घरमालकीण बाईंची करूण अवस्था होते आणि जळी, स्थळी, काष्ठी पाषाणी अशी सर्वत्र फक्त तिची लाडकी कामवाली बाई दिसायला लागते. तिची सारखी आठवण येऊन नकळत मालकीण बाईंच्या तोंडातून हेच शब्द बाहेर पडतात, “वो जब याद आये, बहुत याद आये…” अशा वेळेस ती कुठुन तरी देवदूत बनून यावी, असचं तिला वाटतं.

    हेही वाचा – तोडली बंधने अन् सुटले भोग…

    कामवाल्या बाईची सुट्टी एक दिवसावरून वाढून जर दोन-तीन दिवस लांबली तर, मग घरातील कामं करून करून शिणलेला जीव तिला शोधत, तिचा मागोवा घेत सारखं हेच रडगाणं आळवतो – “तू कहां ये बता… माने ना मेरा दिल दिवाना…” वारंवार तिला फोन करुनही तिने जर काही रीप्लाय केला नाही तर, मग चिड येऊन त्या गृहिणीच्या मुखातून एकच वाक्य बाहेर पडत, “रंजीश ही सही दिल ही दुखाने के लिये आऽऽऽ आ फिरसे मुझे छोडके जाने के लिये आऽऽऽ”

    खरा कहर होतो, जेव्हा कामवाल्या बाईच्या काही कारणास्तव सात-आठ दिवस सलग सुट्ट्या झाल्या की…! त्या दिवसांत तर असं वाटतं की, कोणी पाहुणे वगैरे घरी यायला नको, हृदयाची धडधड त्या सात-आठ दिवसांमधे इतकी वाढलेली असते की, ते सारखं त्या कामवाल्या मावशीला आठवून म्हणत असत, “दिल तडप तडप के कह रहा है, आ भी जा, तू हम से आंख ना चुरा, तुझे कसम है आ भी जा…”

    सात-आठ दिवसांनी तिची सुट्टी संपून कामावर येत असल्याचा तिचा फोन आला की, हृदयाच्या सतारीचे तार झंकारायला लागतात, तिला सुट्टीवरून कामावर परत आल्यावर पहिल्याच दिवशी जास्त काम पुरायला नको म्हणून थोडंसं काम आधी उरकून घेतलं जातं… चेहऱ्यावर त्रासिक भाव न ठेवता स्मितहास्य विलसत ठेवण्याची गरज असते. पहिल्याच दिवशी तिच्यावर रागाने बरसायचं नसतं, ती घरात आल्यावर तिची आस्थेने चौकशी करून गरम गरम आलं घातलेला चहाचा कप समोर करायचा, अशा विविध नोंदी ती घरमालकीण लक्षात ठेवते . तिच्या घरवापसीमुळे अत्यानंदाने मालकीण बाईंचं मन थुई थुई नाचत असतं. तो आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे झळकतो. त्या दिवशी तर त्या घर मालकीणीला तिच्याकरिता एकच गाणं आठवत, “आईये मेहरबां.. बैठीये जानेजां…”

    सुट्टी संपवून कामावर परतलेल्या ताई / बाई / मावशींचा मग दोन-चार दिवसांनी हळूवारपणे समाचार घ्यायला सुरुवात होते. तेव्हाची घर मालकीणीची आणि त्या कामवाल्या बाईची परिस्थिती, “एक सवाल मैं करू… एक सवाल तुम करो…” अशी असते. या सवाल जवाबात मग दोन दिवस कसे निघून जातात, ते त्या दोघींनाही कळत नाही. त्यांची सुख-दुःख आपापसात वाटली जाऊन दोघींचा अबोला मिटतो खरा आणि पुढील काही दिवस सगळं सुरळीत राहतं… अगदी आनंदी आनंद असतो की, परत तिची पुढील महिन्याची सुट्टी या आनंदावर विरजण घालते… ते ऐकून परत मालकीण बाईंच्या कपाळावर आठ्या पडतात, चेहरा त्रासिक होतो! परत तिच्या मनाची अवस्था, “टिक टिक वाजते डोक्यात! धडधड वाढते उरात!” अशी होते. तिची सुट्टी संपून ती कामावर परत येईपर्यंत, त्या घर मालकीणीची नजर प्रत्येक वेळेस दरवाजावर टिकून असते, सकाळी तिच्या कामाच्या वेळी डोळे घडाळ्याच्या काट्याकडे वटारलेले असतात आणि कान सारखा डोअर बेलच्या आवाजाचा कानोसा घेत असतात. फरशीवर पडलेले डाग, कचरा, सिंकमध्ये उलटे-सुलटे उताणे पडलेली भांडी, कपबशा पाहून त्या गृहिणी व्याकुळ होतात.

    हेही वाचा – सावळ्याची सावली!

    खरंतर, ती कामवाली बाईच एक अशी व्यक्ती आहे, जिला त्या गृहिणींचे मन समजत असतं. घरामध्ये घरमालकीण एकटी असताना तीच एक अशी असते की, जी काही दुखलं खुपलं तर तिला मदत करत असते, “सर जो तेरा चकराए, या दिल डूबा जाए, आ जा प्यारे पास हमारे काहे घबराए…” तेल मालीश करून देईन” असे म्हणते. “ताई, तुम्ही जरा आराम करा बरं! मी सगळं व्यवस्थित आवरून घेते,” असा दिलासा देणारी तीच तिची जीवाभावाची कामवाली बाई असते. अपार्टमेंटमधल्या इतर बायकांचे किस्से सांगून आपल्या मालकीणबाईचे मन रिझविणारी तीच असते. ही कामवाली बाई म्हणजे प्रत्येक गृहिणीची सखी असते, जी प्रसंगी तिच्याकरिता तिच्या पाठीशी ठामपणे उभी राहणारी तिची “व्हॅलेनटाइन” असते.

    खरंच, घरमालकीण आणि कामवाल्या बायकांचं नातंच “तुझं माझं जमेना अन् तुझ्यवाचून करमेना!” असं विचित्र आहे! दर महिन्याला घराघरातील गृहिणी आणि कामवाल्या बायकांचा हा रुसव्या-फुगव्याचा खेळ पाहून वैतागलेले नवरे मात्र दरवेळेस ही बदलती परिस्थिती पाहून अचंबित होत राहतात. आपल्या बायकोचे आणि कामवाल्या बाईचे अनोखं नातं त्यांच्या आकलनशक्तीच्या बाहेर असतं. यावर ते सर्व नवरे एकाच विचाराने ग्रासलेले दिसतात की, “हे असं कसं? स्त्री ऐसे भी एक दुसरे की व्हॅलेन्टाईन्स हो सकती है?” आश्चर्यचकित होऊन मनातल्या मनात ते म्हणत देखील असतील,”अजीब दास्तां हैं ये, कहां शुरू कहां खतम, ये मंजिले है कौनसी… ना वो समझ सके ना हम…”

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    मायक्रोवेव्ह येई घरा…!!

    April 10, 2026 ललित

    समाजात मिसळलो तरच… रवीला मिळाला धडा!

    April 9, 2026 ललित

    ऑफिस मीटिंगमध्ये स्वत:लाच चिमटा काढला…

    April 9, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    मायक्रोवेव्ह येई घरा…!!

    By माधवी जोशी माहुलकरApril 10, 2026

    इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाचा फटका भारताला बसला आहे. अनेक ठिकाणी गॅस सिलिंडरचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवू लागल्याने…

    समाजात मिसळलो तरच… रवीला मिळाला धडा!

    April 9, 2026

    ऑफिस मीटिंगमध्ये स्वत:लाच चिमटा काढला…

    April 9, 2026

    सोनाराने कान टोचताच, नीरज…

    April 9, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    मायक्रोवेव्ह येई घरा…!!

    April 10, 2026

    Dnyaneshwari : आतां सामान्य विशेष, हें जाणणें एथ महादोष…

    April 10, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 एप्रिल 2026

    April 10, 2026

    Ayurveda : वसंतातील सामान्य आजार आणि प्रभावी घरगुती उपाय

    April 9, 2026

    समाजात मिसळलो तरच… रवीला मिळाला धडा!

    April 9, 2026

    ऑफिस मीटिंगमध्ये स्वत:लाच चिमटा काढला…

    April 9, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 263
    • अवांतर 180
    • आरोग्य 99
    • थर्ड अंपायर 2
    • पंचांग आणि भविष्य 379
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 192
    • मैत्रीण 17
    • ललित 545
    • शैक्षणिक 76
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेक... आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    - मनोज शरद जोशी
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    मायक्रोवेव्ह येई घरा…!!

    April 10, 2026

    Dnyaneshwari : आतां सामान्य विशेष, हें जाणणें एथ महादोष…

    April 10, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 एप्रिल 2026

    April 10, 2026
    Most Popular

    मायक्रोवेव्ह येई घरा…!!

    April 10, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.