Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » साप्ताहिक राशीभविष्य : 4 ते 10 मे 2025
    वास्तू आणि वेध

    साप्ताहिक राशीभविष्य : 4 ते 10 मे 2025

    Team AvaantarBy Team AvaantarMay 4, 2025No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठी साहित्य, मराठीलेखक, मराठीआर्टिकल, मराठीस्टोरी, राशीभविष्य, बाराराशी, राशीफळ, राशीअंदाज, Weekly horoscope, horoscope, राशी,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    धनंजय जोशी

    (‘ज्योतिष आणि वास्तू’विषयक सल्लागार)

    संपर्क – 8850453833


    मेष राशी

    येता आठवडा हा संमिश्र राहील. संभाषणात अथवा बोलताना आपल्यामुळे कोणी दुखावणार नाही, याची काळजी घ्या. घरातल्या गोष्टींमध्ये मन उत्तम रमेल. परदेशगमनाचे योग येऊ शकतात. स्त्रियांनी आलेला पैसा राखून ठेवण्याकडे कल ठेवावा. मेष राशीच्या सर्वांनीच उष्णतेचे विकार होणार नाहीत, याची विशेष काळजी घ्यावी.

    वृषभ राशी

    या आठवड्यात छोट्या प्रवासाचे अनेक योग येऊ शकतात. आपले विचार शब्दांतून प्रभावीपणे व्यक्त करण्याचा उत्तम काळ. मित्र, भाऊ, बहीण यांच्या सुखदायी भेटी होण्यासाठी उत्तम ग्रहमान आहे. लहान मुलांसाठी अभ्यास आणि शिक्षणाचे आराखडे तयार करण्यासाठी उत्तम काळ ठरू शकतो.

    मिथुन राशी

    बोलणे आणि आहार याबाबतीत संयम बाळगण्याची गरज आहे. आठवड्याच्या पूर्वार्धात पैसा येणे आणि उत्तरार्धात खर्च होणे, अशी परिस्थिती उद्भवू शकते. कलाकारांसाठी नवीन संधी चालून येतील आणि त्यामध्ये उत्तम कामगिरी पार पाडण्याचे योग दिसत आहेत. स्त्रियांनी काळजी करण्यापेक्षा काळजी घेणे, हे जास्त सयुक्तिक ठरेल.

    कर्क राशी

    देवदर्शन अथवा धार्मिक कार्यांसाठी प्रवास घडू शकतो. प्रवासातले छोटे अडथळे वगळता उत्तम लाभ होईल. नोकरी अथवा व्यवसायात वरिष्ठांची मर्जी उत्तम सांभाळाल. आठवड्याच्या सुरुवातीला स्वतःबद्दलच्या विचारांमध्ये गुंतलेले मन हे आठवड्याच्या उत्तरार्धात घर आणि परिवार यांना प्राधान्य देताना दिसत आहे. विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाच्या बाबतीत तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे, हितकारक ठरेल.

    सिंह राशी

    आकस्मिक धनलाभ होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास आलेला पैसा हा यथायोग्य विचार करूनच वापरावा. परदेशगमनाबाबत विचार सुरू असल्यास उत्तम नियोजन करणे अत्यंत लाभदायी ठरेल. जमीन जुमल्याबद्दलचे करार करण्यासाठी अथवा ते होण्यासाठी उत्तम संधी चालून येऊ शकते. कामाच्या ठिकाणी संमिश्र काळ आहे.  स्त्रिया आणि लहान मुलांनी मानसिक स्वास्थ्य जपणे जास्त गरजेचे आहे.

    कन्या राशी

    आनंददायक आणि उत्तम कार्यांमध्ये पैसा खर्च होऊ शकतो. व्यवसाय धंद्यामध्ये थोडा अडचणींचा काळ येऊ शकतो. आठवड्याच्या उत्तरार्धात आप्तेष्ट आणि मित्रांच्या भेटीगाठी घडू शकतील. बराच काळ प्रलंबित असलेले येणे येऊ शकते. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या अध्ययनावर विशेष लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. स्त्रियांना जोडीदाराकडून उत्तम साथ मिळेल.

    तूळ राशी

    आठवड्याच्या पूर्वार्धात व्यवसायातून उत्तम धनलाभ होऊ शकतो. आठवड्याच्या उत्तरार्धात परदेश गमनाबाबत विचार मनात येतील. होतकरू तरुणांना नोकरीसंदर्भाने नवीन संधी चालून येईल. व्यापाऱ्यांसाठी व्यापार वृद्धीशी संबंधित काही नवी दालने उघडण्यासाठी उत्तम काळ. लहान भावंडांची मर्जी सांभाळा.

    वृश्चिक राशी

    वृश्चिक राशीच्या जातकांचे नोकरी अथवा व्यवसायाच्या ठिकाणी मन उत्तम रमेल. वडिलांचा सहवास लाभून त्यांच्याबरोबर उत्तम काळ घालवण्याची संधी चालून येईल. आठवड्याच्या उत्तरार्धात भाग्य चमकेल, अशी ग्रह स्थिती आहे. गर्भवती महिलांना कोणत्याही बाबतीत शंका असल्यास डॉक्टरांशी विचारविनिमय करणे उत्तम.

    धनू राशी

    अध्यात्म आणि देवाधर्माच्या विषयात मन उत्तम रमेल. गृहसौख्याच्या बाबतीत संमिश्र काळ. नोकरदारवर्गासाठी नोकरीत बदलीबाबत काही संकेत मिळू शकतात. कलाकारांच्या प्रतिभेला व्यक्त होण्यासाठी उत्तम संधी चालून येईल. पराक्रमाला विवेकाची जोड मिळणे, अत्यंत आवश्यक आहे. धनू राशीच्या लहान  मुलांना गुरूकडून उत्तम मार्गदर्शन मिळण्यासाठी चांगला काळ. स्त्रियांसाठी कर्माला दैवाची साथ मिळवून उत्कर्ष साधण्यासाठी अनुकूल काळ.

    मकर राशी

    आठवड्याच्या सुरुवातीच्या काळात मनात असलेल्या चिंता, जसजसा आठवडा पुढे जाईल तसतशा कमी होतील. कागदपत्रे आणि कायदा याबाबतीत विशेष जागरूक राहणे, गरजेचे आहे. लहान मुलांच्या कलागुणांना उत्तम संधी प्राप्त होऊ शकते. नोकरीच्या ठिकाणी वावरताना आणि व्यवहार करताना जागरूक राहण्याची गरज. स्त्रियांनी पैशांचे व्यवहार करताना जोडीदाराला अथवा घरातल्या वरिष्ठांना विश्वासात घेणे उपयुक्त ठरेल.

    कुंभ राशी

    नवीन व्यवसाय सुरू करण्यासंदर्भात अनेक विचार मनात येतील. यथायोग्य विश्लेषण करून पुढचे पाऊल उचलणे, हे  उत्तम ठरेल. जोडीदाराशी सुसंवाद साधणे आवश्यक आहे. व्यवसायात मन उत्तम रमेल. आठवड्याच्या उत्तरार्धात व्यवसायातून उत्तम धनप्राप्ती होऊ शकते. स्त्रियांसाठी स्वयंपाकात नवनवीन प्रयोग करण्यासाठी उत्तम काळ. आपण बोलताना कोणाचं मन दुखावणार नाही, याची विशेष काळजी या आठवड्यात घ्यावी.

    मीन राशी

    आरोग्यसंदर्भात नवीन उपक्रम हाती घेण्याचे मनसुबे जर असतील तर, त्यांचा जरूर श्री गणेशा करावा. येणारा आठवडा हा संमिश्र काळ ठरू शकतो. तंत्र शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आलेल्या संधीचा यथायोग्य फायदा करून घ्यावा. नोकरीसंदर्भात चांगली बातमी कळण्याची शक्यता. स्त्रियांनी निर्णय घेताना संभ्रम होत असल्यास योग्य व्यक्तीकडून सल्ला घेऊन पुढे जाणे हितकारक ठरेल.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026 वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविषय; 23 मार्च 2026

    March 23, 2026 वास्तू आणि वेध

    साप्ताहिक राशीभविष्य : 22 ते 28 मार्च 2026

    March 22, 2026 वास्तू आणि वेध
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    By Team AvaantarMarch 24, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 24 मार्च 2026; वार : मंगळवार भारतीय सौर :  03…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविषय; 23 मार्च 2026

    March 23, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 22 ते 28 मार्च 2026

    March 22, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 22 मार्च 2026

    March 22, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026

    Dnyaneshwari : आरंभीं बीज एकलें, मग तेंचि विरूढलिया बुड जाहलें…

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 245
    • अवांतर 173
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 184
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn