Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » साप्ताहिक राशीभविष्य : 18 ते 24 मे 2025
    वास्तू आणि वेध

    साप्ताहिक राशीभविष्य : 18 ते 24 मे 2025

    Team AvaantarBy Team AvaantarMay 18, 2025No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठी साहित्य, मराठीलेखक, मराठीआर्टिकल, मराठीस्टोरी, राशीभविष्य, बाराराशी, राशीफळ, राशीअंदाज, Weekly horoscope, horoscope, राशी,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    धनंजय जोशी

    (‘ज्योतिष आणि वास्तू’विषयक सल्लागार)

    संपर्क – 8850453833


    मेष

    मेष राशीच्या जातकांसाठी येणारा आठवडा हा कार्यक्षेत्राशी निगडित विचारांनी सुरू होईल. जसा आठवडा पुढे सरकेल तशा काही चांगल्या घटना कानावर पडतील. मित्रांच्या भेटीगाठी होतील तसेच धनलाभ होण्याचे देखील उत्तम योग आहे. घरात तणाव निर्माण झाल्यास परिस्थिती कशी निवळेल, यावर स्त्रियांनी जास्त लक्ष केंद्रित करावे.

    वृषभ

    वृषभ राशीच्या लोकांना या आठवड्याच्या प्रारंभी काहीतरी नवीन शिकावे, अशी इच्छा उत्पन्न झाली तर, त्यावर अंमल करणे खूप फायद्याचे ठरेल. मनातील चिंतेचा आपल्या संभाषणावर काही परिणाम तर होत नाही ना, याची काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांनी या आठवड्यामध्ये घरातून मिळणाऱ्या मार्गदर्शनाकडे अत्यंत बारकाईने पाहणे आणि त्यावर विचार करणे गरजेचे आहे.

    मिथुन

    आठवड्याच्या पूर्वार्धात काही अप्रिय घटना कानावर पडल्या तरी शांती ढळू न देता आपल्या कामाकडे लक्ष देणे, मिथुन राशीच्या जातकांना अत्यंत महत्त्वाचे आहे. पूर्वार्धात झालेली घुसमट, ताणतणाव हे आठवड्याच्या उत्तरार्धात मावळतील आणि घटना जितक्या वाईट जाणवत होत्या, तितक्या वाईट नाहीत, याची प्रचिती येईल. स्त्रियांनी नोकरी अथवा व्यवसायाच्या ठिकाणी आपल्या वरिष्ठांशी थोडे जपून बोलावे आणि वागावे.

    कर्क

    कर्क राशीच्या लोकांना या आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या भागीदाराचे अथवा जोडीदाराचे मन जपावे लागेल. प्रश्न बोलून सुटतात, हे लक्षात ठेवा. आठवडा जसा पुढे सरकेल तसा तणाव थोडा वाढल्यासारखा वाटेल; पण संयम हे यावर एकमेव औषध आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणासंदर्भात कोणताही निर्णय घेताना घाई करू नये.

    सिंह

    आरोग्यम् धनसंपदा हे आपल्याला लहानपणापासून शिकवलं गेलेलं आहे. आठवड्याच्या सुरुवातीला तब्येतीकडे थोडे लक्ष द्या. येणारा आठवडा शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपायचा आहे. अध्यात्माचे विचार मनात आले तर, ते कृतीत कसे उतरतील हे पहा. सिंह राशीच्या विद्यार्थ्यांना येणारा आठवडा हा बुद्धीचे कौशल्य दाखवण्याची संधी देणारा आहे; त्या संधीचा यथायोग्य फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा.

    कन्या

    एखादे नाटक अथवा चित्रपट पहायचा बेत या आठवड्यात कराल. मोठ्या मंडळींनी घरातील लहानांबरोबर आपला वेळ कसा जाईल, याचा विचार करावा. कन्या राशीच्या जातकांसाठी जमीन अथवा घर याच्याशी संलग्न असे काही निर्णय घ्यायची संधी या आठवड्यात येऊ शकते. आनंदात, उत्साहात सुरू झालेला आठवडा हा उत्तरार्धात कामाच्या ठिकाणी जास्त लक्ष द्यायला भाग पाडेल.

    तूळ

    या आठवड्याची सुरुवात प्रामुख्याने घर आणि घरातील माणसे यांच्या बद्दलच्या विचारांनी होईल. जस जसा आठवडा पुढे सरकेल तसतसे करमणुकीचे अथवा कौटुंबिक सुखाचे योग येतील. स्त्रियांनी येत्या आठवड्यात घराच्या सजावटीचा काही विचार मनात असेल तर, तो पूर्णत्वास नेण्याकडे जोर द्यावा. विद्यार्थ्यांनी आपला गुरु जे आपल्याला सांगतो ते आपल्या भल्यासाठीच असते, यावर पूर्ण विश्वास ठेवावा.

    वृश्चिक

    एखाद्या जुन्या मित्र-मैत्रिणीची आठवण आल्यास त्यांच्याशी संपर्क साधून दिलखुलास बोलून मोकळे व्हावे. छोट्या छोट्या प्रवासांचे काही योग आल्यास त्यातून फक्त फायदा न पाहता आपल्या अनुभवात होणारी वाढ, या दृष्टिकोनातून त्याकडे पहावे. आठवड्याच्या सुरुवातीला मित्र-मैत्रिणींमध्ये रमणारे मन आठवड्याच्या उत्तरार्धात घर आणि घरातील गोष्टींमध्ये रमेल. विद्यार्थ्यांना वक्तृत्वात उत्तम संधी चालून येतील, त्याचा विद्यार्थ्यांनी पुरेपूर लाभ घ्यावा.

    धनु

    रुचकर पदार्थांची आवड असलेल्या धनु राशीच्या जातकांना या आठवड्याच्या सुरुवातीला एखाद्या मेजवानीचा योग येईल. अर्थार्जनातून धनसंचय कसा होईल, यावर विचार करायला लावणारा हा आठवडा आहे. स्त्रियांनी घरची शिस्त कशी टिकून राहील, याकडे विशेष लक्ष द्यावे.

    मकर

    संमिश्र घटना आणि विचारांनी हा आठवडा सुरू होईल; जसजसा तो पुढे सरकेल तसतशा गोष्टी सुकर होत जातील. मकर राशीच्या जातकांनी या आठवड्यात स्वतःला थोडेसे प्राधान्य देण्याची गरज आहे. दुसऱ्याचा विचार जरूर करावा, पण त्यात स्वतःकडे दुर्लक्ष करू नये. विद्यार्थ्यांना अभ्यासाव्यतिरिक्त गोष्टी शिकण्याची संधी या आठवड्यात चालून येईल. आपल्या कलागुणांना लोकांसमोर आणण्यासाठी स्त्रियांना नवीन व्यासपीठ मिळू शकते.

    कुंभ

    लाभ अथवा मिळकत याच्याशी संलग्न अशा काही संमिश्र बातम्या या आठवड्याच्या सुरुवातीला ऐकायला मिळू शकतात. कानी पडलेली बातमी चांगली अथवा वाईट कशीही असली तरी, त्यावर फार प्रतिक्रिया देणे टाळावे. आपले कार्य आणि आपली क्षमता याच्यावर लक्ष केंद्रित करावे. स्त्रियांची घर सांभाळण्याबाबतीत थोडीशी तारेवरची कसरत होऊ शकते.

    मीन

    कर्माचा सिद्धांत उराशी बाळगून आपल्या कार्यक्षेत्रात आपण वावरावे. पूर्वार्धात घेतलेल्या कष्टांचे चीज होताना आपल्याला आठवड्याच्या उत्तरार्धात अनुभवास येऊ शकते. शिस्त, अनुशासन अशा सर्व गोष्टी आपल्या जीवनशैलीत कशा अंगिकारता येतील, याकडे लक्ष द्यावे. त्यानुसार आवश्यक ते बदल अमलात आणण्याचा आठवडा आहे. महिलांना जोडीदाराची या आठवड्यात उत्तम साथ लाभेल.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026 वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविषय; 23 मार्च 2026

    March 23, 2026 वास्तू आणि वेध

    साप्ताहिक राशीभविष्य : 22 ते 28 मार्च 2026

    March 22, 2026 वास्तू आणि वेध
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    By Team AvaantarMarch 24, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 24 मार्च 2026; वार : मंगळवार भारतीय सौर :  03…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविषय; 23 मार्च 2026

    March 23, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 22 ते 28 मार्च 2026

    March 22, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 22 मार्च 2026

    March 22, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026

    Dnyaneshwari : आरंभीं बीज एकलें, मग तेंचि विरूढलिया बुड जाहलें…

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 245
    • अवांतर 173
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 184
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn