Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    मायक्रोवेव्ह येई घरा…!!

    April 10, 2026

    Dnyaneshwari : आतां सामान्य विशेष, हें जाणणें एथ महादोष…

    April 10, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 एप्रिल 2026

    April 10, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, April 10
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » साप्ताहिक राशीभविष्य : 08 ते 14 फेब्रुवारी 2026
    पंचांग आणि भविष्य

    साप्ताहिक राशीभविष्य : 08 ते 14 फेब्रुवारी 2026

    Team AvaantarBy Team AvaantarFebruary 8, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठी साहित्य, मराठीलेखक, मराठीआर्टिकल, मराठीस्टोरी, राशीभविष्य, बाराराशी, राशीफळ, राशीअंदाज, Weekly horoscope, horoscope, राशी,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    मेष

    या आठवड्याच्या सुरुवातीला थोडी चिंता राहील. नोकरदार नवीन संकल्प हाती घेतील आणि ते ठरलेल्या वेळेत पूर्ण करू शकतील. आपल्या कार्यक्षेत्रात प्रगती करू शकाल. जास्त अधिकार प्राप्त होतील. व्यावसायिक वर्गाने व्यवसायात भागीदाराच्या मताला प्राधान्य द्यावे; ते व्यवसायासाठी फायदेशीर ठरेल. महिलांना जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. भविष्यात मेहनतीशिवाय पर्याय नाही.


    वृषभ

    या आठवड्यात सकारात्मक घटना घडतील. नोकरदारांना अनपेक्षित प्रमोशन मिळण्याची आणि पगारवाढ होण्याची शक्यता आहे. कामाच्या स्वरुपात बदल घडेल. व्यावसायिक वर्गाला भांडवलासाठी आर्थिक मदतीची गरज भासेल; बँकेकडून ती मदत मिळेल. नवीन करार होतील, व्यवसायात वाढ होईल. महिलांच्या बाबतीत घरात मंगलकार्य ठरण्याचे योग आहेत, मनाप्रमाणे खर्च करू शकाल. विद्यार्थ्यांना नवीन मार्ग मिळतील. तसेच, शिक्षणात आणि कार्यक्षेत्रात संधी मिळतील.


    मिथुन

    या आठवड्यात विवाहेच्छुक तरुणांची लग्ने ठरतील. नोकरदारांच्या दृष्टीने कामाच्या ठिकाणी आनंदी वातावरण राहील. वरिष्ठ आणि सहकारी यांचे सहकार्य मिळेल. बुद्धिजीवी व्यक्तींचे उपक्रम यशस्वी ठरतील. व्यावसायिक वर्गाला नवीन संधी मिळतील. नवीन करारांवर सही करू शकाल. कामासाठी परदेशी प्रवास होईल. महिलांनी कुटुंबातील वादविवादांपासून लांब राहण्याचा प्रयत्न करावा. तुमच्या पुढाकारामुळे कुटुंबात शांतता राहील. विद्यार्थ्यांना मित्रांसोबत प्रवास करता येईल, निसर्गाचा आनंद घ्याल.


    कर्क

    या आठवड्यात भाग्योदय होईल. नोकरदारांसाठी नोकरीतील स्थिती सामान्य राहील, मात्र जास्त जबाबदारी स्वीकारावी लागेल. कामाचा ताण राहील. व्यावसायिक वर्गाचे नवीन प्रकल्प प्रगतीपथावर राहतील. इतरांशी स्पर्धा करू नका; पुढे जात राहा. महिलांचा सहकुटुंब प्रवास घडेल, प्रवासात खाणे सांभाळा. विद्यार्थ्यांनी वाहनाची काळजी घ्यावी, सर्व कागदपत्रे नीट सांभाळावीत.


    सिंह

    या आठवड्यात प्रवास घडण्याची शक्यता आहे. नोकरदारांना काम व्यवस्थित होण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. वरिष्ठ खूश राहतील. जे नोकरी शोधत आहेत, त्यांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक वर्गाच्या बाबतीत परिस्थिती समाधानकारक राहील. तज्ज्ञ लोकांचे मार्गदर्शन मिळेल. महिलांच्या दृष्टीने या आठवड्यात अनेक गोष्टी लाभदायक घडतील. प्रभावशाली व्यक्तींचा सहवास लाभेल. विद्यार्थ्यांना आपल्या क्षेत्रात घवघवीत यश मिळेल, नवीन संधी मिळतील.

    हेही वाचा – आसपासच्या हृदयद्रावक घटना अन् मातेची तगमग


    कन्या

    या आठवड्यात स्वतःवर खर्च कराल. नोकरदारांना कामात चांगला उरक राहील. कोणत्याही कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी ती नीट वाचून, समजून घ्यावीत. घाईत निर्णय घेणे टाळा. आजूबाजूला काही विपरीत घटना घडल्यामुळे व्यावसायिक व्यक्तीची मानसिक स्थिती बिघडण्याची शक्यता आहे. तथापि, व्यवसायाबाबतचे निर्णय योग्य ठरतील. महिलांनी स्वतःची काळजी घ्यावी, स्वयंपाक करताना दुखापत होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना हवा तसा निकाल लागेल, भाग्योदय होईल.


    तुळ

    हा आठवडा शुभ घटनांचा काळ आहे. आतापर्यंत केलेल्या चांगल्या कर्माचे फळ मिळेल. नोकरदारांना महत्त्वाची जबाबदारी स्वीकारावी लागेल. कामात बदली होण्याची शक्यता आहे. अधिकारात वाढ होईल. व्यावसायिक वर्गाला स्पर्धकांवर विजय मिळविता येईल. विरोधक शांत राहतील. आधीची थकलेली येणी वसूल होतील. महिलांच्या कर्तृत्वाच्या कक्षा रुंदावतील, सर्वत्र कौतुक होईल. विद्यार्थ्यांनी कर्तव्यापासून मागे हटू नये, अभ्यासात लक्ष द्यावे.


    वृश्चिक

    हा आठवडा अनुकूल आहे. नोकरदारांना आर्थिक बाबतीत चांगले यश मिळेल. कुसंगत टाळा. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. व्यावसायिक वर्गाला व्यवसाय विस्तार करता येईल, जोडधंदा सुरू करू शकता. महिलांना आपल्या क्षेत्रात प्रगती करता येईल, आरोग्य चांगले राहील. विद्यार्थ्यांनी चांगल्या मित्रांसोबत राहावे; व्यसनी मित्रांची संगत टाळावी. कोणालाही पैसे उसने देऊ नका.


    धनु

    या आठवड्यात नवीन वास्तू घेण्याचा योग आहे. नोकरदारांचे वरिष्ठांबरोबर चांगले संबंध राहतील. कामे सुरळीत आणि विनासायास होतील. कुटुंबात वातावरण छान राहील. तुमच्या शब्दाला मान राहील. व्यावसायिक वर्गाचा व्यवसाय सुस्थितीत राहील. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. नवीन गुंतवणूक करू शकाल. महिलांना कोर्टविषयक प्रकरणात तडजोड करावी लागेल; पण प्रश्न सुटतील. विद्यार्थ्यांना मित्रांसोबत मतभेद मिटतील आणि सहकार्य मिळेल.


    मकर

    या आठवड्यात जुने मित्र भेटतील. नोकरदारांना कामाच्या ठिकाणी तेच तेच काम केल्याने कंटाळा येऊ शकतो. काम जास्त आणि मोबदला कमी अशी परिस्थिती उद्भवू शकते. व्यावसायिक वर्गाला प्रवास घडेल; प्रवासात नवीन काही शिकायला मिळेल. ओळखीतून नवीन व्यावसायिक कल्पना मिळतील. महिलांसाठी कुटुंबात आनंदी आणि उत्साही वातावरण राहील. विद्यार्थ्यांनी पाळीव प्राण्यांपासून सावध राहावे. तसेच, वेळेचे नियोजन करून अभ्यास सुरू करावा.


    कुंभ

    या आठवड्यात नवीन संधी उपलब्ध असतील. नोकरदारांच्या बाबतीत कामाच्या ठिकाणी सामान्य परिस्थिती असेल. तब्येतीची कुरबुर राहील; पथ्य सांभाळणे आणि व्यायाम करणे हितावह ठरेल. व्यावसायिक वर्गाला मोठे आर्थिक लाभ मिळतील. काही फायद्याचे सौदे होतील. कामगारांचे सहकार्य मिळेल. राजकीय व्यक्तीकडून विशेष फायदा होण्याची शक्यता आहे. महिलांना नोकरीत मानसन्मान मिळू शकेल, वेतनवाढ होईल. विद्यार्थ्यांना नवीन संकल्पना राबवता येतील, स्पर्धेत भाग घेऊ शकता.

    हेही वाचा – गोफ… सुखद आठवणींचा!


    मीन

    हा आठवडा सामान्य जाईल. नोकरदारांना कामाचा ताण जाणवेल. नवीन ठिकाणी नोकरी शोधत असाल तर ती मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक वर्गाच्या दृष्टीने व्यवसाय विस्तारासाठी योग्य कालावधी आहे. सोशल मीडियाचा वापर करून व्यवसायवृद्धी करता येईल. महिलांनी कोणाच्याही गोड बोलण्याला भुलू नये; फसवणूक होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना कॅम्पसमधून नोकरी मिळण्याची शक्यता आहे.


    prajaktakathe3970@gmail.com

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 एप्रिल 2026

    April 10, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 09 एप्रिल 2026

    April 9, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 एप्रिल 2026

    April 8, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 एप्रिल 2026

    By Team AvaantarApril 10, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 10 एप्रिल 2026; वार : शुक्रवार भारतीय सौर : 20…

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 09 एप्रिल 2026

    April 9, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 एप्रिल 2026

    April 8, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 एप्रिल 2026

    April 7, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    मायक्रोवेव्ह येई घरा…!!

    April 10, 2026

    Dnyaneshwari : आतां सामान्य विशेष, हें जाणणें एथ महादोष…

    April 10, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 एप्रिल 2026

    April 10, 2026

    Ayurveda : वसंतातील सामान्य आजार आणि प्रभावी घरगुती उपाय

    April 9, 2026

    समाजात मिसळलो तरच… रवीला मिळाला धडा!

    April 9, 2026

    ऑफिस मीटिंगमध्ये स्वत:लाच चिमटा काढला…

    April 9, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 263
    • अवांतर 180
    • आरोग्य 99
    • थर्ड अंपायर 2
    • पंचांग आणि भविष्य 379
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 192
    • मैत्रीण 17
    • ललित 545
    • शैक्षणिक 76
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेक... आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    - मनोज शरद जोशी
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    मायक्रोवेव्ह येई घरा…!!

    April 10, 2026

    Dnyaneshwari : आतां सामान्य विशेष, हें जाणणें एथ महादोष…

    April 10, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 एप्रिल 2026

    April 10, 2026
    Most Popular

    मायक्रोवेव्ह येई घरा…!!

    April 10, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.