Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » साप्ताहिक राशीभविष्य : 01 ते 07 जून 2025
    वास्तू आणि वेध

    साप्ताहिक राशीभविष्य : 01 ते 07 जून 2025

    Team AvaantarBy Team AvaantarJune 1, 2025No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठी साहित्य, मराठीलेखक, मराठीआर्टिकल, मराठीस्टोरी, राशीभविष्य, बाराराशी, राशीफळ, राशीअंदाज, Weekly horoscope, horoscope, राशी,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    धनंजय जोशी

    (‘ज्योतिष आणि वास्तू’विषयक सल्लागार)

    संपर्क – 8850453833


    मेष

    मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ संकेत घेऊन येणारा आहे. घर, घरातील माणसं, आई अथवा परिवार अशा सर्वांबरोबर उत्तम वेळ घालवायची संधी या आठवड्यात मिळेल. काही भावनिक क्षण देखील अनुभवायला मिळतील. स्त्रियांनी या आठवड्यात आपण भावनाविवश होत नाही ना, या गोष्टीकडे जास्त लक्ष द्यावे. आठवड्याच्या उत्तरार्धात घरातील मुलांच्या दृष्टीने काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ आपल्यावर येईल. त्यात भावनेबरोबर तर्काला देखील समान महत्त्व द्यावे.

    वृषभ

    आपल्या भावंडांशी अथवा निकटच्या मित्र-मैत्रिणींशी या आठवड्यात काही वादविवाद होण्याची शक्यता आहे. तरी, आपल्या बोलण्यातून कोणाला दुखवत नाही ना, याची काळजी घ्यावी. वाहनातून छोट्या प्रवासांचे योग येतील. नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी आपल्यासोबत काही फसगत तर होत नाही ना, हे पडताळून पहावे. लहान मुलांनी या आठवड्यात आपला वेळ मैदानी खेळात कसा जाईल, यावर भर द्यावा.

    मिथुन

    आठवड्याच्या पूर्वार्धात काहीतरी चमचमीत, तिखट खावे आणि उत्तम भोजनाचा आस्वाद घ्यावा, असे योग आपण घडवून आणाल. मिथुन राशीच्या कलाकारांना या आठवड्यात आपल्या कलेला नवीन व्यासपीठ मिळेल, याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. अशा कोणत्याही संधी उपलब्ध झाल्या तर, त्याचा पूर्ण फायदा करून घ्यावा. मिथुन राशीच्या स्त्रियांना या आठवड्यात आत्मपरीक्षणातून अनेक लाभ होतील.

    कर्क

    कर्क राशीच्या लोकांना या आठवड्यात पाण्यापासून थोडे सावध राहण्याची गरज आहे. पोहायची कितीही इच्छा झाली तरी, परिसराची पूर्ण माहिती करून घेतल्याशिवाय हे धाडस करू नये. आठवड्याच्या उत्तरार्धात काही नियोजन नसताना अचानक खर्च होऊ शकतो. कर्क रास असलेल्या आणि फॅशन डिझाइनिंग किंवा तत्सम क्षेत्राशी निगडित विद्यार्थ्यांनी येत्या आठवड्यात आपल्या कामाचे मूल्यमापन करून घेण्यास तयार रहावे.

    सिंह

    चिंता आणि काळजी अशा संमिश्र भावनांनी हा आठवडा चालू होईल, जस जसा आठवडा पुढे सरकेल तसतशा चिंतेच्या बाबी कमी होतील. विदेशात स्थायिक झालेल्या आपल्या घरातील माणसांच्या भेटीचे काही योगही येऊ शकतात. घरातील वरिष्ठ सदस्यांच्या तब्येतीची विशेष काळजी घ्यावी. महिलांनी येत्या आठवड्यात परिवाराची काळजी घेण्यासोबत स्वतःकडे देखील लक्ष द्यायला हवे.

    कन्या

    कन्या राशीच्या जातकांना आगामी आठवड्याच्या सुरुवातीला आर्थिक मिळकतीबद्दल काही चांगल्या बातम्या मिळण्याचे योग दिसत आहेत. हाती आलेला पैसा खर्च करताना आधी गुंतवणुकीचा विचार करून उरलेला पैसा खर्च करण्यावर भर द्यावा. उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना या आठवड्यात आपले बुद्धी-कौशल्य दाखवण्याच्या काही संधी मिळतील. त्याचा लाभ कसा करून घेता येईल याकडे लक्ष केंद्रीत करावे.

    तूळ

    ‘तुटे वाद संवाद तो हीतकारी’, हा विचार मनाशी घट्ट करून आपल्या नोकरी-धंद्याच्या ठिकाणी चालावे. छोट्या छोट्या चिंतांनी सुरू झालेला आठवडा उत्तरार्धात धनलाभाचे योग दर्शवत आहे. कोर्टकचेऱ्यांचे कोणतेही प्रकरण सुरू असल्यास अशा प्रकरणात विशेष सावधगिरी बाळगावी.

    वृश्चिक

    मूळच्या या अबोल राशीला अजून अंतर्मुख करणारी अशी या आठवड्याची ग्रहदशा आहे. वृश्चिक राशीचे लोक या आठवड्यात अधिक आत्मचिंतन करताना दिसू शकतात. जस जसा आठवडा पुढे सरकेल तसतशी ही परिस्थिती बदलेल आणि नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी मन उत्तम रमेल. विद्यार्थ्यांनी या आठवड्यात नियमबाह्य गोष्टी आपल्या हातून घडणार नाहीत, याची विशेष काळजी घ्यावी.

    धनु

    हितशत्रूंपासून संभावणारे धोके आगामी आठवड्यात आपल्याला प्रकर्षाने जाणवतील. तरी, अशा सर्व प्रसंगांना धीराने आणि हुशारीने सामोरे जावे. मनात कोणत्याही प्रकारचा गोंधळ असल्यास गुरुजनांकडून मार्गदर्शन जरूर घ्यावे. महिलांना या आठवड्यात घरातील शिस्तीबाबत काही प्रश्न भेडसावू शकतात. शिस्त अथवा अनुशासन अशा कोणत्याही बाबतीत घरात निर्णय घ्यायचे असतील तर, अशा वेळी घरातील वरिष्ठांना अथवा आपल्या जोडीदाराला सहभागी करून घेणे, हेच योग्य ठरेल.

    मकर

    मकर राशीच्या जातकांना येणारा आठवडा हा थोडा बेताचाच आहे. अपेक्षा हे दुःखाचे मूळ आहे, हे आपल्या उराशी बाळगून पुढे चालावे. नोकरीसंदर्भाने काही महत्त्वाचे निर्णय या आठवड्यात होऊ शकतात. व्यवसायातून होणारी मिळकत ही व्यवसायातच गुंतवली जाण्याचे योग या आठवड्यात दिसत आहेत.

    कुंभ

    कुंभ राशीच्या जातकांना या आठवड्याच्या पूर्वर्धात तब्येतीच्या कुरबुरी भेडसावू शकतात. जसा आठवडा पुढे सरकेल तसे हे प्रकार कमी होऊन मन चिंतामुक्त होईल. घरकामात मदत करायला येणारी माणसे या आठवड्यात सुट्टीवर गेली तर, नवल मानू नये. आपण कंबर कसून ते कार्य करण्यास तत्पर रहावे. मुख्यत्वे महिलांना यात जास्त लक्ष घालण्याची गरज भासू शकते. कुंभ राशीच्या लहान मुलांना येत्या आठवड्यात आजी-आजोबांबरोबर उत्तम वेळ घालवण्याची संधी मिळू शकते.

    मीन

    परिवारातील अथवा ओळखीतील लहानग्यांबरोबर उत्तम वेळ घालवण्याची संधी या आठवड्यात चालून येईल. अशा संधीचा आपण पुरेपूर फायदा करून घ्याल. आगामी आठवड्यात मीन राशीच्या महिला सौंदर्य-प्रसाधने अथवा कपडे यावर खर्च करताना दिसतील. आठवड्याचा उत्तरार्ध हा तब्येतीच्या काही चिंता घेऊन येऊ शकतो. अशा चढउतारांनी भरलेला हा आठवडा असेल.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026 वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविषय; 23 मार्च 2026

    March 23, 2026 वास्तू आणि वेध

    साप्ताहिक राशीभविष्य : 22 ते 28 मार्च 2026

    March 22, 2026 वास्तू आणि वेध
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    By Team AvaantarMarch 24, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 24 मार्च 2026; वार : मंगळवार भारतीय सौर :  03…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविषय; 23 मार्च 2026

    March 23, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 22 ते 28 मार्च 2026

    March 22, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 22 मार्च 2026

    March 22, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026

    Dnyaneshwari : आरंभीं बीज एकलें, मग तेंचि विरूढलिया बुड जाहलें…

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 245
    • अवांतर 173
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 184
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn