Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » साप्ताहिक राशीभविष्य : 01 ते 07 फेब्रुवारी 2026
    वास्तू आणि वेध

    साप्ताहिक राशीभविष्य : 01 ते 07 फेब्रुवारी 2026

    Team AvaantarBy Team AvaantarFebruary 1, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठी साहित्य, मराठीलेखक, मराठीआर्टिकल, मराठीस्टोरी, राशीभविष्य, बाराराशी, राशीफळ, राशीअंदाज, Weekly horoscope, horoscope, राशी,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    मेष

    या आठवड्यात सगळी कामे वेळेत पूर्ण करू शकाल. नोकरदारांच्या कामाचे कौतुक होईल. काम करवून घेताना वाद होण्याची शक्यता आहे, तथापि, कामासाठी सहकार्य मिळेल. व्यावसायिक वर्गाचे हाताखालच्या लोकांशी वाद होऊ शकतात. बोलताना आवाज वाढवावा लागेल, स्वतःचे वर्चस्व सिद्ध करावे लागेल. महिलांना घरात नजीकचे लोक भेटायला येतील; आनंदी राहाल. विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट पूर्ण करता येईल. मित्र–मैत्रिणी मदत करतील आणि तुम्हीही इतरांना मदत कराल.


    वृषभ

    या आठवड्यात तब्येतीची काळजी घ्या. आराम करा. नोकरदारांनी कामाचा जास्त ताण घेऊ नये. शक्य तेवढे काम पूर्ण करून विश्रांती घ्या. सहकारी मदत करतील. व्यावसायिक वर्गाकडे नवीन प्रस्ताव येतील. त्यांचा नीट अभ्यास करून तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेऊन निर्णय घ्यावा. कामानिमित्त प्रवास घडेल. महिलांना लग्नसमारंभाला जाण्याचा योग आहे, मैत्रिणी भेटतील. विद्यार्थ्यांना आवडीच्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळेल.


    मिथुन

    हा आठवडा थोडा त्रासदायक आहे. कुठल्यातरी गोष्टीचा ताण जाणवेल. नोकरदारांनी कामाच्या ठिकाणी वेळेत जावे आणि काम वेळेत पूर्ण करावे. सर्व नियमांचे पालन करावे. इतरांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. व्यावसायिक वर्गाने जाहिरात करून व्यवसाय वाढवावा. व्यवसायात काही नव्या योजना राबवाव्यात. वडिलोपार्जित संपत्तीबाबतचे प्रश्न सुटतील आणि महिलांना लाभ होईल. विद्यार्थ्यांनी इतरांच्या भानगडीत पडू नये, विचारल्याशिवाय कोणाला सल्ला देऊ नका.


    कर्क

    हा आठवडा शांत जाणार आहे. जोडीदाराबरोबर वेळ घालवू शकाल. नोकरदारांच्या बाबतीत कामाच्या ठिकाणी सर्व काही सुरळीत राहील. कामे वेळेत पूर्ण करू शकाल. व्यावसायिक वर्गाला कामांची विभागणी नीट करावी लागेल. “हा करेल, तो करेल” या गोंधळात काम अडकून राहणार नाही, याची काळजी घ्या. महिला कुटुंबाला वेळ देऊ शकतील. मुलांसाठी खास नवीन पदार्थ तयार कराल. विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी नीट करावी, ऐनवेळी गोंधळ होण्याची शक्यता आहे.


    सिंह

    या आठवड्यात नवीन जॉब ऑफर येण्याची शक्यता आहे. नोकरदारांच्या कामाच्या पद्धतीची छाप पडेल. त्याबद्दल कौतुक होण्याची शक्यता आहे. सहकाऱ्यांकडून कुरघोडी होऊ शकते. व्यावसायिक वर्गाला स्पर्धक त्रास देतील. तुमच्या कल्पना आणि नवीन योजना इतरांच्या नावावर जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे सावध रहा. महिलांनी पर्स, पैसे आणि दागिने सांभाळावेत, भुरट्या चोरांपासून सावध राहावे. नोकरीच्या शोधात असलेल्या विद्यार्थ्यांना ती मिळण्याची शक्यता आहे. कॅम्पस थ्रूमधून नोकरी मिळू शकते.

    हेही वाचा – हत्ती पकडण्याची कला


    कन्या

    हा आठवडा धावपळीत जाईल. तथापि, शुभ ग्रहांची साथ मिळेल. नोकरदारांवर कामाचा ताण राहील, पण मनाप्रमाणे काम केल्याचे समाधान मिळेल. व्यावसायिक वर्गाला व्यापार विस्तार करता येईल. अडकलेले पैसे वसूल होतील. नवीन गुंतवणूक करू शकाल. महिलांना घरात धार्मिक कार्य करता येईल. तसेच, मुलाकडून आनंदाची बातमी मिळेल. विद्यार्थ्यांना कला क्षेत्रात उज्वल यश मिळू शकते. त्यांच्या कामाचे कौतुक होईल.


    तुळ

    हा आठवडा धावपळीविना जाईल. सगळी कामे सुरळीत होतील. 30 जानेवारीला शुक्र उदय झाला आहे आणि शुक्र हा तुळ राशीचा स्वामी आहे. नोकरदारांची अडकलेली कामे पूर्ण होतील. वाहन किंवा घर खरेदी करू शकाल. प्रदर्शन भरवून व्यावसायिक वर्गाला लाभ मिळेल. शिवाय, सोशल मीडियाचा वापर करून व्यापार वाढवता येईल. नोकरी करणाऱ्या महिलांना कामाचा ताण जाणवेल. विद्यार्थ्यांना मित्र–मैत्रिणींबरोबर मजा करता येईल. एखाद्या पिकनिकला जाऊ शकाल.


    वृश्चिक

    या आठवड्यात भावाबहिणींशी वाद होण्याची शक्यता आहे. पण शांत रहा. समोरच्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घ्या आणि मगच स्वतःचे मत मांडा. कारण नसतानाही नोकरदारांची कामे अडकू शकतात. इतरांवर अवलंबून राहू नका. व्यावसायिक वर्गाला नवीन गुंतवणूक करता येईल. व्यापारासाठी नवीन खरेदी करू शकाल. मान–सन्मान मिळण्याची शक्यता आहे. महिलांना घरात नवीन वस्तू खरेदी करता येतील, तसेच स्वतःसाठीही खरेदी कराल. विद्यार्थ्यांवर आई–वडील खूश असतील. नवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू भेट मिळेल.


    धनु

    या आठवड्यात भावाबहिणींच्या भेटी होतील. नोकरदारांना कामाच्या ठिकाणी नवीन योजनांमुळे फायदा झाल्याचे दिसेल. कामाचे कौतुक होईल आणि बक्षीस मिळू शकते. व्यावसायिक वर्गाला कामानिमित्त प्रवास करावा लागेल. प्रवासात नवीन ओळखी होतील आणि नवीन व्यवसायाच्या संधी मिळतील. महिलांनी स्पष्ट बोलावे आणि स्वतःचे मत मांडावे. शांतपणे योग्य निर्णय घ्या. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल. नियमित अभ्यास करा; प्रगती होईल


    मकर

    हा आठवडा थोडा विचित्र ताण देणारा वाटेल. नोकरदारांना कामे वेळेत पूर्ण करता येतील. आठवड्याच्या शेवटी सहकारी वर्गाबरोबर सहलीला जाऊ शकाल. व्यावसायिक वर्गाने कोणताही निर्णय घेताना तज्ज्ञ लोकांचे मार्गदर्शन घ्यावे. आत्मविश्वास आणि व्यापार दोन्ही वाढेल. महिलांनी काम करताना इतरांची मदत घ्यावी, तब्येतीची काळजी घ्या. विद्यार्थ्यांनी स्वतःवर विश्वास ठेवावा आणि प्रामाणिक प्रयत्न करा; यश नक्की मिळेल.


    कुंभ

    या आठवड्यात तब्येतीची काळजी घ्या, पथ्यपाणी पाळा. नोकरदारांची कामे सुरळीत होतील. वरिष्ठ खूश राहतील. नवीन जबाबदारी मिळेल. कामे लांबणीवर पडल्याने व्यावसायिक वर्गाची चिडचिड होण्याची शक्यता आहे; पण शांत रहा. घरातील मदतनीस अचानक दांडी मारू शकतात, त्यामुळे महिलांना कामाचा ताण जाणवेल. विद्यार्थ्यांना आधी केलेल्या कामाचे पैसे मिळतील, मनाप्रमाणे खर्च करू शकाल.

    हेही वाचा – गैरसमज… पुत्राचे पितृप्रेम!


    मीन

    या आठवड्यात मुलांची चिंता राहील. नोकरदारांनी कामात टाळाटाळ करू नये, नंतर काम खूप वाढून स्थिती अवघड होऊ शकते. व्यावसायिक वर्गाची कोर्टाची कामे मार्गी लागतील. परदेशी प्रवास करू शकाल. परदेशात व्यवसाय करू शकाल. महिलांना मुलांच्या बाबतीत कठोर निर्णय घ्यावे लागतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासात प्रामाणिक प्रयत्न करावा; यश नक्की मिळेल. मित्र–मैत्रिणींबरोबर जास्त वेळ वाया घालवू नका.


    prajaktakathe3970@gmail.com

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026 वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविषय; 23 मार्च 2026

    March 23, 2026 वास्तू आणि वेध

    साप्ताहिक राशीभविष्य : 22 ते 28 मार्च 2026

    March 22, 2026 वास्तू आणि वेध
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    By Team AvaantarMarch 24, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 24 मार्च 2026; वार : मंगळवार भारतीय सौर :  03…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविषय; 23 मार्च 2026

    March 23, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 22 ते 28 मार्च 2026

    March 22, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 22 मार्च 2026

    March 22, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026

    Dnyaneshwari : आरंभीं बीज एकलें, मग तेंचि विरूढलिया बुड जाहलें…

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 245
    • अवांतर 173
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 184
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn