Monday, February 23, 2026

banner 468x60

Homeआरोग्यस्वस्थ आरोग्य आणि आरोग्याचे विविध पैलू

स्वस्थ आरोग्य आणि आरोग्याचे विविध पैलू

आरोग्य सदरातील पहिल्या लेखात आपण निरामय आरोग्याची गरज या विषयावर थोडक्यात माहिती घेतली. या लेखात आपण स्वस्थ आरोग्य म्हणजे काय, हे उजळणी करून समजून घेणार आहोत आणि तद्नंतर आरोग्याच्या विविध पैलूंविषयी जाणून घेणार आहोत.

स्वस्थ आरोग्य म्हणजे काय?

आजच्या धकाधकीच्या आयुष्यात अन्न, वस्त्र आणि निवारा या मुलभूत गरजांबरोबरच आता ‘स्वस्थ आरोग्य’ या वाढत्या गरजेची पडलेली भर अधोरेखित झाल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. आपले आरोग्य चांगलेच आहे, असे बर्‍याच जणांना वाटत असते. माझी कोणतीही शारीरिक तक्रार नाही, मला कसलाही आजार नाही,  मला आत्तापर्यंत औषधाची गरज लागली नाही, अशी विधाने आपण नेहमीच ऐकत असतो… आणि यालाच बरेच जण आरोग्य समजतात. परंतु ही वस्तुस्थिती म्हणजे आरोग्य नव्हे. मग आरोग्य म्हणजे काय? असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो.

या प्रश्नाचे समर्पक उत्तर आयुर्वेदाने केलेल्या स्वस्थ आरोग्य या संज्ञेच्या व्याख्येत मिळते. या व्याख्येनुसार स्वस्थ आरोग्याची सोप्या, सहज समजेल अशा भाषेत वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे होत –

  • जेवणाच्या वेळेस कडकडून भूक लागणे.
  • अन्नाचे व्यवस्थित पचन होणे.
  • मलक्रिया व्यवस्थित असून नैसर्गिकरीत्या कार्य करणे म्हणजे मलविसर्नानंतर पोट हलके वाटणे.
  • रात्री शांत आणि गाढ झोप लागणे.
  • शरीरात कोणतेही दुखणे अथवा कुठलाही विकार नसणे.
  • मन प्रसन्न आणि आनंदी असणे.

जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्याची व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे –

Health is a state of complete physical, mental and social well being and not merely absence of disease or infirmity.

थोडक्यात, आरोग्य म्हणजे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक समतोल असलेली स्वस्थ आणि रोगमुक्त अवस्था होय… या व्याख्येतून आरोग्याचे विविध पैलू लक्षात येतात.

आरोग्याचे विविध पैलू कोणते आहेत?

आरोग्याची व्याप्ती विशाल असून आरोग्याचे विविध पैलू पुढील प्रमाणे आहेत –

  • शारीरिक आरोग्य
  • मानसिक आरोग्य
  • भावनिक आरोग्य
  • अध्यात्मिक आरोग्य
  • सामाजिक आरोग्य
  • व्यावसायिक आरोग्य

आता आपण आरोग्याच्या वरील पैलूंविषयी थोडक्यात जाणून घेऊयात.

शारीरिक आरोग्य

मानवी शरीर निसर्गातील पृथ्वी, आप (जल), तेज (अग्नी), वायू आणि आकाश ही पंचमहाभूते आणि आत्मा म्हणजे मन यांच्यापासून तयार होते. शारीरिक आरोग्य ही सर्वांना सहजी समजणारी संकल्पना आहे. सोप्या भाषेत, शारीरिक आरोग्य म्हणजे शरीराचे आरोग्य. शरीरातील सर्व अवयवांची स्थिती चांगली असणे, त्यांची कार्यक्षमता अधिकाधिक असणे, सर्व अवयवांत कार्य करताना एकमेकांशी सुसंवाद आणि समन्वय असणे, यास उत्तम शारीरिक आरोग्य म्हणता येईल.

हेही वाचा – निरामय आरोग्यासाठी योगाभ्यास

मानसिक आरोग्य

मानसिक आरोग्य म्हणजे मनाचे आरोग्य. मन ही संकल्पनाच पूर्णपणे समजलेली नाही. असे असले तरी, मनाच्या बाबतीत लक्षात आलेल्या महत्त्वाच्या बाबी अशा की, शरीरासारखे मनाचे देखील आजार आहेत. ताणतणावांमुळे मनाचे आरोग्य बिघडते आणि मानसिक अनारोग्य शारीरिक आरोग्य बिघडविण्यास कारणीभूत ठरते. व्यक्तीचे आचार-विचार चांगले असतील तर मनाचे आरोग्य नक्कीच चांगले राहते.

हेही वाचा – निरामय मानसिक आरोग्य

भावनिक आरोग्य

आपणास जे समजते ते मनामुळे आणि आपण जे अनुभवतो ती भावना असते. आनंद, दु:ख, भीती, राग, द्वेष, मत्सर या भावना आहेत. भावनेचे मूळ कारण मन असल्याने मनाचे आरोग्य चांगले असेल तर भावनिक आरोग्य देखील चांगले राहते.

अध्यात्मिक आरोग्य

मानवी जीवनाच्या हेतूचा शोध घेत आत्मसाक्षात्कार करणे, त्यातून परमात्म्याशी ओळख करून घेणे आणि परमात्मस्वरूपाशी एकतानता साधणे म्हणजे अध्यात्म होय. अध्यात्म समजण्यासाठी मन निरोगी आणि आरोग्यसंपन्न हवे.

सामाजिक आरोग्य

मनुष्यप्राणी समाजात राहणारा प्राणी असल्याने समाजातील अनेकांशी संपर्क येणे साहजिक आहे. व्यक्तीचे समाजातील इतरांशी वागणे सामाजिक नीतीनियमांना अनुसरून असेल तर सामाजिक संघर्ष न होता सामाजिक संबंध चांगले आणि समाजातील सर्वांना उपयुक्त राहतील. यावरून सामाजिक आरोग्य ठरते. थोडक्यात, व्यक्तीची वर्तणूक समाजाच्या आरोग्याला कारणीभूत असते. या सामाजिक आरोग्याचे कारणही मनच आहे.

व्यावसायिक आरोग्य

व्यक्तीचे आरोग्य अथवा अनारोग्य व्यवसायाशी निगडित असते. नोकरी/ व्यवसाय व्यक्तीच्या शारीरिक आणि विशेष करून मानसिक आरोग्याला कारणीभूत असते.

हेही वाचा – निरामय आरोग्यासाठी आहार-विहार

आरोग्यसंपन्नता

आपण विचारात घेतलेल्या वरील सर्व पातळ्यांवर शरीर-मनाचे व्यापार नैसर्गिक पद्धतीने घडणे म्हणजे आरोग्यसंपन्नता होय.

तात्पर्य – आपल्या मनाचे आणि शरीराचे आरोग्य एकमेकांशी गुंफलेले आहे. व्यक्तीचे मानसिक आरोग्य त्याचे शारीरिक,  भावनिक,  अध्यात्मिक आणि सामाजिक आरोग्य ठरविण्यास कारणीभूत असते. आरोग्यसंपन्नतेसाठी आरोग्याचा विकास (Positive Health) आवश्यक आहे.

यासंदर्भात इथे आवर्जून नमूद करावेसे वाटते की निरामय आरोग्य संकल्पनेतील माझ्या ‘निरामय आरोग्यासाठी योगाभ्यास’, ‘निरामय आरोग्यासाठी आहार-विहार’ आणि ‘निरामय मानसिक आरोग्य’ या पुस्तकांत संबंधित विषयांवर उपयुक्त सर्वसमावेशक सविस्तर मार्गदर्शन केले आहे.

रविंद्र परांजपे
रविंद्र परांजपे
वय 69 वर्षे. योग शिक्षक आणि अभ्यासक. लेखक आणि प्रकाशक. पुणे. Education - B.Com.(Hons.), DBIM, DEIM, LL.B.(Gen.), Retired Company Secretary. Experience - Corporate Sector 32 Years. Started career as a Stenographer and Retired as General Manager (Legal & Administration) & Company Secretary. Education Field - In Business Management Education Institutes: 8 Years as Visiting Professor and 6 Years as Director & Dean. योग अभ्यासक : सन 2000पासून नियमित योगाभ्यासाचे आरोग्य लाभ अनुभवत आहेत. योगाभ्यास अध्ययन : निवृत्तीनंतर योग शिक्षक पदविका प्राप्त. यूट्युबवरील Yoga for Fitness Channel वर स्वनिर्मित उपयुक्त योगा व्हिडीओ उपलब्ध. निवृत्तीनंतर एकमेव ध्येय : योगप्रचार आणि योगप्रसार. योग अध्यापन : सन 2015पासून ते "निरामय आरोग्य संकल्पना" यशस्वीरीत्या राबवत असून त्यांनी असंख्य महिला व पुरुष योग साधकांना योग-आरोग्य मार्गदर्शन केले आहे. त्यांनी लिहिलेली 'निरामय आरोग्यासाठी योगाभ्यास', 'निरामय आरोग्यासाठी आहार-विहार' व 'निरामय मानसिक आरोग्य' ही जीवनोपयोगी मार्गदर्शनपर पुस्तके माफक शुल्कात उपलब्ध आहेत. पुस्तके घेतल्यानंतर विनाशुल्क वैयक्तिक योग-आरोग्य मार्गदर्शन उपलब्ध असणार आहे. या संकल्पनेचा लाभ घेण्यासाठी आवर्जून संपर्क करावा. मोबाइल – 9850856774.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!