Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Kitchen Tips : बाजरीची उसळ, रसम अन् मिक्स कडधान्यांची मिसळ करताना…

    March 24, 2026

    संस्कार… माणुसकी आणि सहिष्णुतेचे!

    March 24, 2026

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 28 सप्टेंबर 2025
    वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 28 सप्टेंबर 2025

    Team AvaantarBy Team AvaantarSeptember 28, 2025No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 28 सप्टेंबर 2025; वार : रविवार
    • भारतीय सौर : 06 आश्विन शके 1947; तिथि : षष्ठी 14:26; नक्षत्र : ज्येष्ठा 27:53
    • योग : आयुष्मान 24:30; करण : गरज 27:31
    • सूर्य : कन्या; चंद्र : वृश्चिक 27:53; सूर्योदय : 06:28; सूर्यास्त : 18:29
    • पक्ष : शुक्ल; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन
    • संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660

    हेही वाचा – निरामय आरोग्यासाठी मानसिकता बदलणे आवश्यक…


    दिनविशेष

    विश्वविख्यात गायिका लता मंगेशकर

    टीम अवांतर

    अत्यंत सुरेल आवाजाची देणगी लाभलेल्या, विश्वविख्यात, प्रतिभावंत गायिका लता मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी इंदूर येथे झाला. मराठी रंगभूमीवरील तेजस्वी गायक, नट मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या त्या ज्येष्ठ कन्या होत्या. दीनानाथांच्या गायनकलेचा वारसा दिदींना लाभला. वडिलांच्या ‘बलवंत संगीत नाटक मंडळी’च्या रंगमंचावर बालवयात लता मंगेशकर यांनी छोट्या भूमिकाही केल्या. ‘नवयुग’ आणि ‘प्रफुल्ल’ या मराठी चित्रसंस्थांच्या बोलपटांमध्येही अशाच छोट्या भूमिका केल्या. ‘पहिली मंगळागौर’ हा त्यांचा पहिला चित्रपट. यातील ‘मनू’च्या भूमिकेत ‘नटली चैत्राची नवलाई’, ‘श्रावण आला तरू-तरूला’ अशा समूहगीतांत त्यांचा आवाज होता.  अंदाजे 1 हजार 800 च्या वर चित्रपटांतील अनेक ख्यातनाम संगीतकारांची, विविध रंग-ढंगांची सुमारे 22 भाषांतील गाणी त्यांनी गायली असून, त्यांची संख्या 25 ते 30 हजारांच्या घरात सहज जाते. गिनीज् बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये ’जगातील सर्वांत जास्त गाणी ध्वनिमुद्रित करणारी गायिका’ म्हणून त्यांचा गौरवास्पद उल्लेख करण्यात आला आहे. लता मंगेशकरांच्या अतीव सुरेल, मुलायम आणि परिपूर्ण अशा स्वरांनी लक्षावधी रसिक श्रोत्यांना सुरांची माधुर्य तसेच सौंदर्य प्रत्ययास आणून देण्याचे मोलाचे कार्य केले आहे. संगीतातील सर्व प्रकारचे अलंकार आपल्या अलौकिक आवाजातून उमटवण्याची त्यांची क्षमता अजोड होती. त्यांची ग्रहणशक्तीही असामान्य कोटीतील होती. शब्दार्थापलीकडील तरल संवेदनेच्या भावविश्वात नेणारा अलौकिक सूर, त्या त्या भाषेच्या वैशिष्ट्यानुसार आणि प्रकृतिधर्मानुसार केलेले स्वच्छ, स्पष्ट तसेच अर्थपूर्ण शब्दोच्चार, लयीची सखोल आणि अत्यंत परिपक्व जाण, पार्श्वगायनाच्या तसेच ध्वनिग्राहकाच्या तांत्रिक अंगांवर विलक्षण प्रभुत्व अशा अनेक दुर्मीळ गुणांचा संगम दिदींच्या अद्भुत गायनात बघायला मिळायचा. लतादिदींना राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरांवर अनेक बहुमान प्राप्त झाले. त्यातील अत्यंत महत्त्वाच्या पुरस्कारांमध्ये ‘पद्मभूषण’, ‘आस्थान विद्वान’ (तिरूपती देवस्थान), ‘स्वर भारती’ (श्री शंकराचार्य), ‘कलाप्रवीण’ (जवाहरलाल नेहरू तंत्रशास्त्रीय विद्यापीठ), ‘डी. लिट्.’ (शिवाजी विद्यापीठ), ‘सूरश्री’ (लंडनच्या रॉयल ॲल्बर्ट हॉलमधील यशस्वी कार्यक्रमाबद्दल मिळालेला किताब), ‘स्वरलता’ (आचार्य प्र. के. अत्रे) इत्यादींचा उल्लेख करावा लागेल. याशिवाय राज्य शासनाची पारितोषिके, फिल्म फेअर, ‘फिल्म क्रिटिक’ तर, बेंगॉल जर्नेलिस्ट असोसिएशनची पारितेषिके, सूरसिंगार संसदेचे ‘तानसेन’ आणि ‘रसेश्वर’ ही पारितोषिक इत्यादींचा अंतर्भाव होतो. लंडनच्या ‘ई. एम्. आय.’ कंपनीने त्यांच्या वीस हजारांवर ध्वनिमुद्रिका निघाल्याबद्दल त्यांना ‘सुवर्ण ध्वनिमुद्रिका’ भेट दिली होती. हा बहुमान मिळवणाऱ्या लता मंगेशकर या पहिल्याच भारतीय कलाकार ठरल्या. उत्तम गायिकेबरोबरच त्या उत्तम संगीतकारही होत्या. आनंदघन या टोपण नावाने त्यांनी अनेक मराठी चित्रपटांना संगीत दिले.  अशा या जगविख्यात गायिकेचे 6 फेब्रुवारी 2022 रोजी निधन झाले.

    हेही वाचा – ताडोबा आणि वाघोबा…

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026 वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविषय; 23 मार्च 2026

    March 23, 2026 वास्तू आणि वेध

    साप्ताहिक राशीभविष्य : 22 ते 28 मार्च 2026

    March 22, 2026 वास्तू आणि वेध
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    By Team AvaantarMarch 24, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 24 मार्च 2026; वार : मंगळवार भारतीय सौर :  03…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविषय; 23 मार्च 2026

    March 23, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 22 ते 28 मार्च 2026

    March 22, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 22 मार्च 2026

    March 22, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Kitchen Tips : बाजरीची उसळ, रसम अन् मिक्स कडधान्यांची मिसळ करताना…

    March 24, 2026

    संस्कार… माणुसकी आणि सहिष्णुतेचे!

    March 24, 2026

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 246
    • अवांतर 174
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 185
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn