Thursday, July 31, 2025

banner 468x60

Homeवास्तू आणि वेधआजचे पंचांग आणि दिनविशेष : 28 मे 2025

आजचे पंचांग आणि दिनविशेष : 28 मे 2025

दर्शन कुलकर्णी

 

आज, भारतीय सौर : 7 ज्येष्ठ शके 1947

अर्थात,

दिनांक : 28 मे 2025

वार : बुधवार

तिथि : द्वितीया 25:54

नक्षत्र : मृगशीर्ष 24:29

योग : धृती 19:08

करण : बालव 15:25

सूर्य : वृषभ

चंद्र : वृषभ 13:36

सूर्योदय : 06:00

सूर्यास्त : 19:10

पक्ष : शुक्ल पक्ष

मास : ज्येष्ठ

ऋतू : ग्रीष्म

सूर्य अयन : उत्तरायण

संवत्सर : विश्वावसू

शालिवाहन शक : 1947

विक्रम संवत : 2081

युगाब्द : 5127

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती


वेद कन्सल्टन्सी / 9987433660


दिनविशेष

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणारे थोर देशभक्त, साहित्यिक आणि समाजसुधारक विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म 28 मे 1883 रोजी नाशिकपासून काही अंतरावर असलेल्या भगूर या गावी झाला. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे शिक्षण भगूर, नासिक, पुणे आणि मुंबई येथे एलएलबीपर्यंत झाले. पुढे ‘बॅरिस्टर’ ही पदवी त्यांनी लंडनला जाऊन घेतली. विविध वृत्तपत्रांच्या वाचनातून देश-विदेशांतील परिस्थितीचे तल्लख भानही त्यांना येत गेलं. सावरकर हे वृत्तीने कवी होते आणि लहान वयापासून त्यांनी उत्तम वक्तृत्वही अभ्यासपूर्वक कमावले होते. लंडन येथे सावरकरांना अटक झाली. समुद्रमार्गे भारतात आणताना त्यांनी फ्रान्सच्या मार्सेलीस बंदराजवळ बोटीतून पाण्यात उडी मारली. पोहत पोहत ते फ्रान्सच्या किनाऱ्यावर आले. मात्र पाठोपाठ आलेल्या ब्रिटिश सैनिकांनी त्यांना पुन्हा पकडले. सावरकरांचे हे धाडस आणि आतापर्यंत केलेले क्रांतिकार्य याची शिक्षा म्हणून त्यांना दोन जन्मठेप (सुमारे 50 वर्षे) आणि काळ्यापाण्याची शिक्षा झाली. त्यासाठी त्यांना अंदमानला पाठवले. 1911 ते 1924 या काळात त्यांनी अंदमान सेल्युलर कोठडीत सश्रम कारावास भोगला. 26 फेब्रुवारी 1966 रोजी सावरकरांचे निधन झाले.

ग्वाल्हेर घराण्याचे गायक पं. पलुस्कर

पंडित दत्तात्रेय विष्णू पलुस्कर यांचा जन्म 28 मे 1921 रोजी नाशिक येथे झाला. हिंदुस्थानी शास्त्रीय गायनशैलीतले प्रसिद्ध गायक म्हणून त्यांचा लौकिक होता. ज्येष्ठ हिंदुस्तानी गायक विष्णू दिगंबर पलुस्कर हे त्यांचे वडील. वडील आणि वडिलांचे चुलत भाऊ पंडित चिंतामणराव पलुस्कर यांच्याप्रमाणेच ते हिंदुस्तानी संगीताच्या ग्वाल्हेर घराण्याचे गायक होते. संगीताची परंपरा असलेल्या कुटुंबातील दत्तात्रेय यांना वडिलांकडून गाण्याचे बाळकडू मिळाले होते. तर, पंडित चिंतामणराव पलुस्कर यांनी सुरुवातीला संगीताचे धडे दिले, हे उल्लेखनीय. त्यावेळी ते बापूराव म्हणूनही ते ओळखले जात होते. त्यांचे आजोबा दिगंबर गोपाळ पलुस्कर हे कथाकथन, कविता, संगीत, नाटक, नृत्य आणि तत्त्वज्ञान या शास्त्रांत पारंगत होते. धडे दिले. त्यानंतर त्यांना पद्मभूषण विनायकराव पटवर्धन, नारायणराव व्यास आणि यशवंत सदाशिवा बुवा यांचे मार्गदर्शन लाभले. 14 वर्षांचे असताना त्यांनी पंजाबमधील हरीवल्लभ संगीत संमेलनात भाग घेतला होता आणि रसिकांना मंत्रमुग्ध केले होते. बैजू बावरा या चित्रपटात उस्ताद अमीर खान यांच्याबरोबर गायन केले होते. 1944 मधील त्यांच्या पहिल्या ट्रॅकमधील  राग बहार, टिळक कामोद, केदार आणि बिलास तोडी या रागांमध्ये चार ख्याल होते. एन्सेफलायटीसमुळे 26 ऑक्टोबर 1955 रोजी वयाच्या 34व्या वर्षीच पलुस्कर यांचे निधन झाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!